असे वाटते मैफिल काही जमून आली नाही
जिथून होती दाद पाहिजे .. तिथून आली नाही
सहजच होता पाण्याला मी स्पर्श एकदा केला
एक लाट जी गेली मागे फिरुन आली नाही
आयुष्याने मारून ठोकर केले खरे शहाणे
सारी अक्कल काही शाळा शिकून आली नाही
तिला बहूधा खूप आठवण येत असावी आता
याच्या आधी कोरी चिठ्ठी चुकून आली नाही
इकडे चुकतो ठोका तिकडे उचकी लागत असते
प्रेमाची ही भाषा तेंव्हा कळून आली नाही
त्या मातीला तसा देखणा स्पर्श मिळाला होता
उगाच काही तिथे अबोली उगून आली नाही
सणासुदीला लेकीवाचुन सुने वाटते अंगण
निरोप येतो ‘‘निरोप नव्हता’’ म्हणून आली नाही
जरी नोकरी संसाराचे अवघड गणित जुळवते
तरी असे दाखवते की ती दमून आली नाही
हंबरडा फोडत गोठ्याशी गायी कधीच आल्या
गुरे चारण्या गेलेली ती अजून आली नाही
बरेच झाले की मी माझी व्यथा मांडली येथे
इथल्या इतकी गर्दी कोठे जमून आली नाही
___________________________ शाम
खूप आवडली ये ही गझल
खूप आवडली ये ही गझल
सुरुवातच इतकी भारी आहे..
सुरुवातच इतकी भारी आहे.. मस्तच!
वाह!!!
वाह!!!
आल हे सामो नावाच घुबाड.
आल हे सामो नावाच घुबाड.
अडमिनच्या चार चार वेळा पाया
अडमिनच्या चार चार वेळा पाया पडून सामो आयडी घेतला आणी घालायची ती घातलीच .
सुंदर..!
सुंदर..!
क्या बात.. क्या बात.. क्या
क्या बात.. क्या बात.. क्या बात..
ह्याला म्हणावं गझल
ह्याला म्हणावं गझल
खूप छान आहे..
खूप छान आहे..
Pages