" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
अहो अप्पा, शिक्रा शिकार करूनच
अहो अप्पा, शिक्रा शिकार करूनच खाणार, तो मांसाहारी आहे. बहुतेक सर्व मांसाहारी पक्षी जिवंत प्राण्यांची हत्या करून भूक भागवतात, गिधाडे कुजलेले मांस खातात.
शिक्रा केळ्याच्या शिकरणावर राहू शकत नाही ना...
हो बरोब्बरे. पण आपल्या समोरच
हो बरोब्बरे. पण आपल्या समोरच शिकार केल्यावर कसं वाटतं? त्या खारीचे मी खुप फोटो काढले होते. येथेही दिलेत काही. आता ती खार दिसत नाही म्हणजे तिचीच शिकार झाली.
गप्पीदास (Stonechat)
गप्पीदास (Stonechat)
नसेल हो, ती वेकेशनवर गेली
नसेल हो, ती वेकेशनवर गेली असेल...
पण आपल्या समोरच शिकार
पण आपल्या समोरच शिकार केल्यावर कसं वाटतं?......चिकन्,ससे,तित्तिर खाताना कसे वाटते? त्यावेळी जिवो जीवस्य जीवनम ना!
खरे आहे देवकी तुमचे. पण
खरे आहे देवकी तुमचे. पण माझ्यासमोर कुणी कोंबडी किंवा बकरु मारले तर मी तिन चार महिने नॉनव्हेज बंद करतो. म्हणजे इच्छाच होत नाही. कॉलेजला असताना मात्र रानडुकरांच्या शिकारी करायचो आम्ही. वय झाले आता, दुसरे काय.
वॉव जागू मस्तच गं
वॉव जागू मस्तच गं, याला लांबलचक पांढरी शेपटी असते ना? की तो वेगळा?
हो हा एव्हिनिंग ब्राऊनच ड्राय सिझन फॉर्मच वाटतोय, हा माझ्याकडील फोटो
>>हा देखील कॅटल इग्रेटच आहे मग डोळ्यांच्या रंगात फरक का?
खरच की. कदाचित त्यांच्यात अजून पोटजाती असतील
Purple rumped sunbird
Purple rumped sunbird
मुंबई, निकॉन कूलपिक्स पी६००
कॅटल इग्रेटच्या डोळ्यांचा
कॅटल इग्रेटच्या डोळ्यांचा रंगही पिवळा होतो विणीच्या हंगामात. गेल्या वर्षी रंगनथिट्टूच्या सफरीत गाईडने सांगितलं होतं असं मला वाटतंय
वर्षा सनबर्ड मस्त टिपलाय.
वर्षा सनबर्ड मस्त टिपलाय. ग्रे बॅकग्राऊंडमुळे छान दिसतेय सगळीच फ्रेम.
वावे अशा लहानसहान गोष्टी माझ्या धाग्यावरही देत चला. माझ्यासाठी महत्वाचे आहे हे.
वर्षा, मस्त फोटो!
वर्षा, मस्त फोटो!
धन्यवाद हरिहर, देवकी!
धन्यवाद हरिहर, देवकी!
दिपमाळ .
दिपमाळ
.
पाण्यातील पक्षांचे नंदनवन..
पाण्यातील पक्षांचे नंदनवन...विनया जंगले यांचा नलसरोवरातील पक्षीविविधतेवरील आजच्या लोकप्रभातील लेख.
http://epaper.lokprabha.com/2438846/Lokprabha/06-12-2019#dual/6
कवडी पाट (हडपसर)
कवडी पाट (हडपसर)
सगळे प्र चि लै भारी आहेत.
सगळे प्र चि लै भारी आहेत.
तो कॅटल इग्रेट कसला क्यूट आहे.
जागुतै तो स्वर्गीय नर्तक जेवताना तुझे मनोरंजन करायला येत असेल. रच्याकने पांढरा स्वर्गीय नर्तक पण असतो ना की नर आणि मादी वेगवेगळ्या रंगांचे असतात असतात? की हाच रंग बदलतो मध्ये मध्ये? (कित्ती ते प्रश्न)
कवडीपाटची (हडपसर) पहिली
कवडीपाटची (हडपसर) पहिली सुर्यकिरणे.
Squirrel
Squirrel
(साधनाताईने म्हटल्याप्रमाणे ही व्हेकेशनलाच गेली असावी. आज सकाळी पुन्हा दिसली. तिच आहे कारण तिच्या बसण्याच्या जागा, जाण्या येण्याचे रस्ते वगैरे अगदी सेम आहे.
चाहूल शेवन्तीची
चाहूल शेवन्तीची
हिरव्या चाफ्याची फळे
साधनाताईने म्हटल्याप्रमाणे ही
साधनाताईने म्हटल्याप्रमाणे ही व्हेकेशनलाच गेली असावी. आज सकाळी पुन्हा दिसली. तिच आहे कारण तिच्या बसण्याच्या जागा, जाण्या येण्याचे रस्ते वगैरे अगदी सेम आहे. Happy>>>>
हुश्शय....
निसर्गात माणूस सोडून बाकी सर्व जीव कोणाचे न कोणाचे भक्ष्य आहेत. त्या सर्वांना निसर्गतः ही जाणीव असते, ते कायम सावधान अवस्थेत असतात (बहुतेक त्यामुळेच ते कधीही त्यांचा फॉर्म गमावत नाहीत, माणूस व माणसाच्या आश्रयाने लोद्या झालेले लॅब्राडॉरसारखे कुत्रे व काही मांजरे सोडता कोणीही अतिरिक्त चरबी अंगावर बाळगत नाही).
त्यामुळे अप्पा, काळजी करू नका, तुमची खारुताई स्वतःला सांभाळेल.
हिरव्या चाफ्याला फळे येतात हे
हिरव्या चाफ्याला फळे येतात हे माहीत नव्हते. :o
रच्याकने पांढरा स्वर्गीय
रच्याकने पांढरा स्वर्गीय नर्तक पण असतो ना की नर आणि मादी वेगवेगळ्या रंगांचे असतात असतात? >>>>
मादी काळ्या व मातकट रंगांची असते. पूर्ण वाढलेला नर काळे डोके व लांब शेपूट असलेले पांढरे अंग किंवा मातकट अंग असलेला असतो. पिल्लू असताना मात्र मातकटच असतात हे पक्षी.
जागूने टाकलेला फोटो बहुतेक पिल्लाचा असावा असे वाटतेय.
(No subject)
हे काय आहे? घराजवळ खुप आहेत.
हे काय आहे? घराजवळ खुप आहेत.
याचा वेल जमीनीवर पसरलेले आहे. फोटोंसाठी हातात घेतलाय.
Momordica dasycarpa
Momordica dasycarpa
कर्टुल्यासारखे फळ
ऋतूराज कापून त्याचा फोटो टाकू
ऋतूराज कापून त्याचा फोटो टाकू का? मी एक घरी आणले आहे.
कर्नाळ्याला दिसलेला रेड
कर्नाळ्याला दिसलेला Red whiskered bulbul
NIKON COOLPIX P600
मला अगोदर वाटले की तो वर
मला अगोदर वाटले की तो वर पाहून ओरडतोय. मग लक्षात आले की एक त्याचा तुरा आहे व दुसरी चोच.
मस्त आलाय फोटो.
ओह हाहा
ओह हाहा
माझ्याही आत्ता लक्षात आलं. तुम्ही लिहिल्यावर पुन्हा निरखून पाहिला फोटो तर खरच तसं दिसतंय की
शिपाई बुलबुलचे आवडते खाद्य.
शिपाई बुलबुलचे आवडते खाद्य. नाव माहित नाही. आकार काबुली चण्याएवढा आहे.
Pages