अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे एकवेळ मान्य करु आपण.. पण मग झी गौरव मधे अशा सर्वोत्टुकार मालिका, सर्वोत्टुकार आई, सर्वोत्टुकार सासुबाई, सर्वोत्टुकार कुटुंब, सर्वोत्टुकार म्हातारबुवा.. ई..ई.. उधळलेल्या ९ पुरस्कारांचे काय..??

झी ने हा काय प्रकार चालवला आहे..? येड्याला शाणं दाखवुन शहाण्या प्रेक्षकांना येडं करण्याचा उद्योग..???>>>>>>>>>>>>>
तेच तेच अगदी तेच चालू आहे! Angry

डबड्याची मिटींग हॉटेलमधे झाली पण नुसतेच इटिंग केले त्यांनी आणि याचा बॉस राजेंचा मित्र असतो ना ज्यासाठी डबड्या शब्द टाका म्हणत असतो आधी. मग त्यादिवशी तर ते अनोळखी वागत होते एकमेकांशी तर आता हा वेगळा बॉस का? आधी एक दुसराच आला होता ना घरी?

झी ने हा काय प्रकार चालवला आहे..? येड्याला शाणं दाखवुन शहाण्या प्रेक्षकांना येडं करण्याचा उद्योग..??>> येडेपणा नाही हा , याला स्व:आरती ओवाळणे किवा ससदिय भाषेत स्वतःच स्वतची लाल करुन घेणे म्हणतात, प्रेक्षकानीच अशा मालिका बघण थाबवुन टीआर्पीच भुत खाली आणाव आपोआप फरक पडेल.

'झी मराठी' ची स्थिती लौकरच राम गोपाल वर्मा सारखी होणार आहे...
अनुराग कश्यप coffee with karan मध्ये म्हणला होता तसं... Ram Gopal Varma is नाही Ram Gopal Varma was... Zee marathi Was, म्हणावं लागेल काही दिवसांनी..!
झी मराठी लौकरच तळागळाला जाणार.. कलर्स मराठी आणि सोनिवाले अगदी उत्तम नाही पण बरा कंटेंट आणत असताना झी वाले मात्र गटांगळ्या खात आहेत आता!

चहयेद्या या एकमेव कार्यक्रमाच्या जीवावर आहे सध्या झी. झी युवा पण काही खास नाही, सुरुवात चांगली झाली होती. संभाजी आणि रात्रीस खेळ चालेचा रिपीट दाखवत नाहीत. बाकी मानबा वगैरे दिवसातून चार वेळा दाखवतात. विनाशकाले विपरीत बुद्धी.

त्यांना टी आर पी मिळतो ना, नावं ठेवायला का होईना बघतात मालिका, काही घरात हेच channel सुरु असते. बऱ्याच जणांनी काढून टाकलं channel किमान महिन्याभरासाठी का होईना, तर डोळे उघडतील आणि अल्फा मराठी असताना होता तो चांगला काळ येईल.

शुभ्राही तशीच असेल. सासूचं लग्न लावून तिला घर बळकावयचं असेल. >>>>>>> सॉरी हे पटल नाही. जर एखादया सिरियलमध्ये सासू सासरे आपल्या विधवा सूनेच लग्न चान्गल्या हेतूने लावून देत असतील भलेही त्या सुनेला दुसर लग्न करायच नसेल तरीही, तर आपण अस म्हणतो का की त्यान्ना तिला घरातून हाकलायच आहे, प्रॉपटीवर डल्ला मारेल वै वै. म्हणून त्यान्ची जबरदस्ती चालू आहे, नाही ना? उलट ते आपण कौतुकाने बघतो आणि ते योग्यही आहे. इथे शुभ्राने सुद्दा चान्गलाच विचार केला आहे.

आसाला सोहममुळे मन्गळसूत्र विकाव लागल हे जेव्हा तिला कळल तेव्हा ती त्याला घरातून हाकलत होती. पण आसा मध्ये कडमडली. ती आसाला सुद्दा सोहमला प्रत्येकवेळी पाठिशी घालण्यावरुन बोलली हे आवडल.

सध्या त्या बबडया आणि प्रज्ञाने वात आणलाय.

ते मी तिरकसपणे लिहिलं आहे सुलू, शुभ्रा खूप वर्ष सोहमला ओळखत असते पण तिला त्याचा स्वार्थी आणि नीच स्वभाव कळत नाही म्हणून. जे मंसू सोहम आसावरीला देतो ते खोटं असेल असं वाटतंय.
आज च ह ये द्या मध्ये येणार आहे ना टीम.

त्या अवतारात प्रज्ञा आणि आसावरी अभिज किचनमध्ये जाऊन गिफ्ट ठेऊन येतात, प्रज्ञा तर अदलाबदल पण करते, सगळा स्टाफ बाहेर असतो, चोर येऊन चोरी करून गेला तरी यांना कळणार नाही. असावारीकडे गिफ्ट रॅप पण नाही का.

त्या प्रज्ञाचा अवतार एकदम का बदलला? वेणी आणि साडी? >>>>>>>> तिला राजे आणि आसाच प्रेमप्रकरण चव्हाटयावर आणायचय म्हणे. आपल्यावर डाउट येऊ नये म्हणून हदयपरिवर्तन झाल्याच नाटक करतेय. म्हणून वेणी आणि साडी. ती वेणी खोटी आहे. Proud

ते मी तिरकसपणे लिहिलं आहे सुलू, शुभ्रा खूप वर्ष सोहमला ओळखत असते पण तिला त्याचा स्वार्थी आणि नीच स्वभाव कळत नाही म्हणून. >>>>>> ओह, अस असेल तर मग ठिक आहे.

जे मंसू सोहम आसावरीला देतो ते खोटं असेल असं वाटतंय. >>>>>>>> मलाही

त्या अवतारात प्रज्ञा आणि आसावरी अभिज किचनमध्ये जाऊन गिफ्ट ठेऊन येतात, प्रज्ञा तर अदलाबदल पण करते, सगळा स्टाफ बाहेर असतो, चोर येऊन चोरी करून गेला तरी यांना कळणार नाही. असावारीकडे गिफ्ट रॅप पण नाही का. >>>>>>>>> तेच ना. वर तिने केकची अदलाबदल केली तेही हॉटेलमध्ये सगळे जमले असताना, कुरियरवाल्याला बोलावून.

कारखानीसकाकू ऐरवी रडवेल्या चेह्र्याने वावरत असतात, काल मात्र सिरियलमध्ये काय त्या नाचल्या.

राजे आणि आसा सायकलवर बसून जातात, मागून ' ये शाम मस्तानी' चालू होत. तो सिन छान होता.

काल चहयेद्या मध्ये कुशल बद्रिके, सोहमला डबड्या म्हणाला. मायबोली वाचतात काय हे ? >>>>>>>> अगदी अगदी

काल चहयेद्या मध्ये तेप्रच्या सूत्रसंचालनावरून विनोद केला होता,तो तिच्या कलर्सच्या सूरनवा सिझन 1च्या सूत्रसंचालनाशी संबंधित होता का?की झी वर सुध्दा तिने त्याआधी सूत्रसंचालन केल होत.
पण सूरनवाच संचालन तिने एवढ वाईट नव्हत केल.

राजे आणि आसा सायकलवर बसून जातात, मागून ' ये शाम मस्तानी' चालू होत. तो सिन छान होता. >>> ते दोघे सायकल चालवतात Uhoh फारच प्रगती आहे. हल्ली मालिका बघत नाही म्हणून कल्पना नाहीये ह्याची.

मी केकचा सीन नाही बघितला पण शुभ्रा केक बघते आणि बॉक्स बंद करते. ती बहुतेक प्रज्ञाला पाय घालून पाडते आणि प्रज्ञाचा चेहरा केकमध्ये बुडतो आणि केक खराब होतो, शुभ्रा केक घेऊन जायला सांगते. मग राजेंनी बनवलेला केक शोधून तो कापतात. प्रज्ञाने आणलेला केक छान होता, दोन हार्ट असतात एकमेकांना जोडलेले.

शुभ्रा केक बघते आणि बॉक्स बंद करते. ती बहुतेक प्रज्ञाला पाय घालून पाडते आणि प्रज्ञाचा चेहरा केकमध्ये बुडतो आणि केक खराब होतो, शुभ्रा केक घेऊन जायला सांगते. मग राजेंनी बनवलेला केक शोधून तो कापतात. प्रज्ञाने आणलेला केक छान होता, दोन हार्ट असतात एकमेकांना जोडलेले.>>>>>>> हो मी बघितला आज एपि. केकचं डिझाईन मस्त होतं खरंच!
आसा ताट धरून काय उभी असते? टेबल खुर्ची नाही का? काहीतरीच दाखवतात.

आसा ताट धरून काय उभी असते? टेबल खुर्ची नाही का? काहीतरीच दाखवतात.>>हो ना अगदी समोरच लाल रंगाचा टेबल क्लोथ असलेला टेबल दाखवत होते.
आणि शुभ्रा नी एक हात राजेंचा धरला आणि एक आसावरीचा मग दोघांनी मिळून केक कापला असं झालं म्हणे.. कसा काय बुवा..

शुभ्रा नी एक हात राजेंचा धरला आणि एक आसावरीचा मग दोघांनी मिळून केक कापला असं झालं म्हणे.. कसा काय बुवा..>>>>>
शुभ्राकरवी हात धरला असं समजुन घेतलं राजेंनी. Lol
पण खरंच हे दोघं हात धरुन एकाच सुरीने एकच केक कापणार होते का? Uhoh
आणि ह्याबद्दल कुणाला म्हणजे निदान आजोबांना आणि डबड्याला काहीच वाटलं नसतं का?

प्रज्ञाने आणलेला केक छान होता, दोन हार्ट असतात एकमेकांना जोडलेले.>>>>> प्रज्ञाने फोनवर केकची ऑर्डर अशी दिली - ते नाहीका दोन हार्ट असतात एकमेकात अडकलेले तसा केक हवाय. Happy आणि वर अभिजीत लव्ह्स आसावरी असंही लिहायला सांगते.
केक चा बॉक्स उघडल्यावर केक बघुन शुभ्राला टेन्शन येतं. ती केक उघडत नाहीये म्हणून प्रद्या जात असते केक उघडायला तर शुभ्रा तिला पाय घालुन पाडते. प्रज्ञाला चेहरा केकवर आपटतो आणि ते लिहिलेल पुसलं जातं. केक खराब होतो. त्या सीनला खरंच हसु आलं. Happy
एखादी असती तर एवढा पाणउतारा झाला आणि आपलं सगळं कारस्थान उघडकीस आलं म्हणून कार्यक्रमातुन निघुन गेली असती.
पण ही तिथेच वादि साजरा करत उभी.
आणि ह्या एवढ्या कारस्थानी बाईला हे लोक तरीही जवळ कसे करतात. काहीही.

पण खरंच हे दोघं हात धरुन एकाच सुरीने एकच केक कापणार होते का>> हो मलाही कळलं नाही ते एक्साक्टली कसा केक कापणार होते एकत्र म्हणजे कसा.?
वेडिंग केक कापतात तस का Lol

काल प्रज्ञाने कहर केला. त्या आज्जी आजोबांना घरी या असे म्हणते आणि ते तयार झाल्यावर हीच जळफळाट होतो. मग मुद्दाम तयार होऊन त्यांना दारात उभे करून स्वतः पार्टीला निघून जाते. हलकट.

सस्मित तुमची पोस्ट वाचुन असे वाततय की तुम्ही पहिल्यांदाच मराठी सीरियल बघत आहात.>>>>>>> असं का वाटलं?
वेडिंग केक कापतात तस का>>> हो ना. काहीही.

एखादी असती तर एवढा पाणउतारा झाला आणि आपलं सगळं कारस्थान उघडकीस आलं म्हणून कार्यक्रमातुन निघुन गेली असती.
पण ही तिथेच वादि साजरा करत उभी.
आणि ह्या एवढ्या कारस्थानी बाईला हे लोक तरीही जवळ कसे करतात. काहीही.... ह्या अशा बायकाम्च्या जीवावरच सगळ्या मालिका सुरु आहेत ना? तीला दुर केले तर १३ भागांमधे संपेल मालिका.

Pages