Submitted by पुरंदरे शशांक on 21 October, 2019 - 01:21
चरैवेति, चरैवेति
नाहीच येथ कोणी उत्साह वाढवाया
कोणी न दे प्रशस्ति ना वाहवा कराया
चालायचीच वाट माझीच एकट्याला
चुकली जरी कधी ती कोणी न सावराया
टिकवावयास धैर्या माझाच मीच साथी
विश्वास आणि श्रद्धा हातात हात द्याया
हा मार्ग वेगळाचि नाही खुणा पथीच्या
चालून कोणी गेले ना ठेविती सहाय्या
ह्रदयात एक उर्मी फुलवोनी कोणी गेला
मार्गी दिसे कधी तो आश्वस्त मज कराया
तो भासमान आहे, सत्यात उतरलेला
ठाऊक नाही तरीही बळ देई चालण्या या
मार्गी थकून जाता नव्हताच काही थारा
खांद्यावरी हाताचा आभास फक्त वाया
बळ कोणते कळेना गति देत चालण्याला
चालावयास मिळूदे मंत्रास जागवाया
चरैवेति..... चालत रहा
चरैवेति चरैवेति (चालत रहा, चालत रहा) हाच मंत्र असून तो सिद्ध होण्याकरता चालत रहाणेच गरजेचे !!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदरच! भारी!!
सुंदरच! भारी!!
चरैवेति चरैवेति.......
प्रेरक!
प्रेरक!
सुंदर कविता.
सुंदर कविता.
सुंदर कविता.
सुंदर कविता.
दिवाळी शुभेच्छा !
प्रेरणादायी! आवडली..
प्रेरणादायी! आवडली..
प्रेरक कविता. माधव ज्युलियन
प्रेरक कविता. माधव ज्युलियन यांच्या भ्रांत तुम्हा का पडे कवितेची आठवण झाली.
थांबला तो संपला अशी ओळही होती त्यात.
मस्तच !
मस्तच !
तू न जाने आसपास है खुदा ह्या
तू न जाने आसपास है खुदा ह्या गाण्याची आठवण झाली. मस्तच!
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
सुंदर!