रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि भाजी ती केव्हढी तर 'आडजिभेने खाल्ली तर पडजीभ बोंब मारेल' एव्हढी. ना कोशिंबिर, ना लोणचं, ना चटणी, ना सांडगे-पापड. आपण किती गरिबीत जीवन कंठतोय ते दाखवत होती. आणि हो, नवरा गेलाय म्हणून काही मेकअप, साजशृन्गार नाही, पण भुवया बाकी अजून रेखीव आहेत हो. शोभा थ्रेडिंग करुन देते काय म्हणते मी.

माईने खरपुस तळलेले बांगडे सोडुन शेवंताचा डाळ-भात-चेंदाडलेला बटाटा खायला गेल्लेल्या आण्णाची कीव आली.

घी देखा बडगा नही देखा......दुसरं काय?? काही दिवसनी कळेल त्याना की ही बाई high maintenance आहे Proud

आता माईने अण्णाच्या कपाटातली दारु ढोसून 'न जाओ सैय्या छूडाके बय्या' चा मालवणि तर्जुमा सादर करुक होया. तरच अण्णाचं शेवंताकडे जाणं थांबेल. हो, जोडीला तळलेल्या बान्गडयाचा चखणा असू देत. अण्णा खोलीच्या डावीकडून उजवीकडे झुकांड्या खातील. माई उजवीकडून डाविकडे. मिस्टर ऐण्ड मिसेस झुकॉव्ह!!

हा हा हा......हा आयटम नम्बर हवा होता एवॉर्ड समारंभात. माई नाचताना शेवंतापेक्षा बरी दिसली असती नक्कीच.

.हा आयटम नम्बर हवा होता एवॉर्ड समारंभात. माई नाचताना शेवंतापेक्षा बरी दिसली असती नक्कीच.>> "तुम्हा वर केली मर्जी बहाल.. नका सोडुन जाऊ रंगमहाल..".या गाण्यावरच माईने डान्स केला झी गौरव मधे.. पण आण्णा काही बधला नाही.. तुम्ही पाहिलं नाही वाटतं..!

अगं होता की.
अण्णा, माई शेवंता भिवरी ह्यांच्या पर्फॉमन्समधे माई तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडुन जाऊ रंगमहाल वर पर्फॉम केलं Lol

बाप रे! ही सिरीयल बघते तेच खूप आहे. माझ्याच्याने काही ते एवॉर्ड सेरेमनीज बघितले जात नाहीत.

"तुम्हा वर केली मर्जी बहाल.. नका सोडुन जाऊ रंगमहाल..".या गाण्यावरच माईने डान्स केला झी गौरव मधे.. >>>>>>> मला माईचे एक्सप्रेशन्स अन्गाईगीताचे वाटले त्यात. Proud

>>मला माईचे एक्सप्रेशन्स अन्गाईगीताचे वाटले त्यात. 

अय्योय्यो, नूतन आणि सुनिल दत्तचं तुमही मेरी मंजिल तुमही मेरी पुजा आठवलं की हो Happy

आता चोन्गटया आणि शेवंता लपाछपी खेळताहेत काय घराबाहेर? रात्रीस खेळ चाले नाव सार्थ करताहेत. बहुतेक अण्णाला जेलस करायला हे नवं कारस्थान दिसतंय. त्या हलनार्या झाडातून एलियन आले नाहीत म्हणजे मिळवलं. सरिता कशाला अण्णाला मस्का मारत होती?? अण्णा पण अवाक झाला तिचं बोलणं ऐकून. शेवंताने अण्णाला उठवायला त्याच्या हाताचं बोट चहात बुडवलेल्ं पाहून फुटलेच मी. कुठल्या तरी सिनेमात हा सीन नक्की पाहिलाय. आता ते बोट बुडवलेला चहा अण्णा पिणार? ब्यॉक!! चहावांगडा खारी, मारी, टोस्ट काही नाही की. अगदीच गरिब पाटणकरीण.

शोभा घराला बाहेरुन आग लावणार की काय आता? तिचं कलम लागायची 'हीच ती वेळ' Happy

तिने ज्या पध्दतीने घराचा उंबरा ओलांडला त्यावरुन असं वाटलं की ती जिवंत तिथे परत जाणार नाही.

अरे शोभा घरात कशी घुसली पाटणकरणीच्या?? ती गेल्यावर पाटणकरणीने अण्णाला आतुन कुलुप लावून घ्यायला सांगितलं होतं ना. शोभाने सगळ्या घरात रांगून घेतलं. एव्हढ्ं तर गोकुळात बाळकृष्णही रान्गला नसेल. बरं, अन्नाने सगळीकडे, अगदी बेड खालीही वाकून पाहिलं आणि अडगळीची खोली चेक नाही केली? शोभा किती जोराने ती पहार आपटत होती. पाटणकरीण बहिरी झालेय का काय?? अण्णा आणि पाटणकरीण खिडकीसमोर झोपले होते. कोणालाही दिसू शकतात बाहेरुन. सगळ्यात मजा म्हणजे पाटणकरीण रात्री दचकून उठते तेव्हा दोघे fully clad. मारे अण्णा रात्र सरत चाललेय वगैरे म्हणत होता. दोघं रात्रभर अंताक्षरी खेळले का काय?? Proud झेपत नाही तर असलं दाखवाव्ं कशाला म्हणते मी.

सरिता डाम्बिस आहे. माईचे कान फुंकून अण्णाचा ओरडा खायला लावलान. आणि आपण पैसे घेऊन पसार झाली. बरं, माई पण असली माठ आहे ना. म्हणे हे कुठे गेले माहित नाही. तो अण्णु काय विमानाने गेलाय? मागुन जा की त्याच्या आणि बघ कुठे जातोय ते.

रच्याकने, पाटणकरणीच्या घरातला बेड मोठा झालाय का? अण्णा आणि शेवंता एकत्र मावून जागा उरली म्हणून विचारतेय. आधी definitely लहान होता.

पाटणकरीण रागारागाने अण्णाकडे बघत होती. बहुतेक गोड बोलून त्याची संपत्ती हडप करून त्याला देशोधडीला लावायचा तिचा बेत असावा. पोलिस पाटणकरच्या मृत्यूची चौकशी करताहेत का नाही???

25 नोव्हेंबरपर्यंत हे सगळं संपवतील तर बरं. अग्निहोत्र सुरु होतंय.

वछी चोंत्या ला कपडे वाळत घालायला लावते ते बघून जाम हसू आलं.... भारी आहे वच्छी.
शोभाला अण्णा मारतो तो शॉट इतका भयानक वाटला की बस....तिचा क्लोज अप घेतलाय ते तर जबरीच.... बिचाऱ्या तिच्या सासऱ्याच कसं होईल आता

हे खरंच झालं असेल तर आता 3 लोक उरले - पोस्टमन, चोन्गटया आणि शेवंता. शोभा घरातुन निघतानाच 'आम्ही जातो आमुच्या गावा' मोड मध्ये होती. कलम लागणारच होतं.

काही नाही हो...रात्री घरात कसलातरी आवाज येतो म्हणून शेवंताने ठणाणा केला. अण्णाने अडगळीची खोली सोडून सगळं चेक केलं. पण शोभा आत पिम्पात लपली आहे हे त्याला ठाउक होतं. तो काही शोभाच्या करणीने वश वगैरे झाला नव्ह्ता. त्याला आपल्या पाठिमागे ती काय करतेय ते माहित होतं म्हणे. पाटणकर बाई म्हणजेच शेवंता हे तिने सरिताला सांगताना त्याने ऐकलं होतं. ती आपल्या आणि शेवंताच्यआ जीवावर उठणार ते त्याने ताडलं. शेवंता झोपल्यावर त्याने जाऊन शोभला शोधलं. तू कशी पिम्पात बसली होतीस ते दाखव म्हणजे तुला जाऊ देतो असं सांगितलं. ती आत बसली तेव्हा बारदान तोंडावर दाबुन त्याने तिला मारलं. आता हे कळल्यावर शेवन्ताची जाम टरकलीय.

आता तिची बॉडी ट्रंकमध्ये घालून चोन्गटयाला सोबत घेऊन चाललाय अण्णा. चोन्गटयाने आत काय आहे हे पाहिलं तर पुढल्ं कलम त्याचं लागणार हे नक्की

>>पोस्टमन नी काय केलाय.....

ते काय माहित नाही. इथे कोणीतरी पहिला भाग पाहून लिहिलंय की अण्णाला मरताना जि भुत्ं आसपास दिसतात त्यात चोन्गटया आणि पोस्टमनही असतात. बहुतेक पोस्टमन कोणाचा तरी खून होताना किंवा बॉडी डिस्पोजऑफ़ होताना पाहत असेल.

वच्छी आणि आबाचं मात्र वाईट वाटतं. आजच्या वच्छी आणि माईच्या सीनमध्ये माई abruptly उठुन गेल्यासारखी वाटली नै??? आता शेवंता काही त्या घरात राहायची नाही. तिचं कोण आहे, कोण आहे चालू झालंय परत.

पाटणकरणीच्या घरातला बेड मोठा झालाय का? अण्णा आणि शेवंता एकत्र मावून जागा उरली म्हणून विचारतेय. आधी definitely लहान होता.>> बरोब्बर...! छान निरिक्षण आहे..!! पाटणकरणीचं ओझं झेलुन पलंग पसरलाय..

राखेचा-२ चं शुटिंग आणि आण्णा नाईकांच्या वाड्याची भेट :

अ‍ॅक्टर नंदु (वच्छीच्या घरी येणारे मांत्रीक) मालवण-सावंतवाडी एस.टी.त कुडाळ मधे चढले आणि मागच्याच सीटवर बसले.. ते शुटींगसाठी आकेरीला निघाले होते.. आमचे मालिकाप्रेम पाहुन त्यांनी आम्हाला शुटींगचा पत्ता आणि वेळ सांगुन तिथं कसं यायचं ते सांगितलं
20191025_180106.jpg

एक शॉट ओके करुन आबा आणि वच्छी घराबाहेर येऊन खुर्चीत बसुन पुढच्या शॉटची तयारी करणार होते तेवढ्यात वच्छीचं लक्ष आमच्याकडे गेलं आणि मी अत्यानंदाने तिला 'हाय' केलं.. तिनेदेखील त्याच भावनेने हात उंचावुन मला जवळ बोलावलं.. आम्ही सहकुटुंब त्यांना भेटायला आलोय म्हटल्यावर तिला कोण आनंद झाला.. आमची ओळख करुन दिल्यावर दुसर्‍या शॉटची स्क्रिप्ट वाचायला घेतलेल्या आबांना तिनं हटकलं आणि त्यांच्याशी भेट घडवली.. आबांना देखील आनंद झाला. त्यांनी आमच्यासोबत फोटो काढला.
Screenshot_20191025-180613_Gallery.jpg

तेवढ्यात दिग्दर्शक आले आणि वच्छीने आमच्याबद्दल त्यांना संगितलं. ते थोडे तुटक-तुटक बोलले पण मी आम्हाला आण्णांचा वाडा पहायचा आहे असं सांगितल्यावर त्यांनी सहाय्यकापैकी एकाला बोलवुन वाड्याच्या सेक्रेटरीला फोन करुन आम्हाला वाडा दाखवायला सांगितलं.

वच्छीच्या घरामागेच आण्णांचा ताकाचा गुत्ता होता.. त्यामागे नेने वकिलांचे घर.. बाजुला शेवंताचे घर. Bw

वच्छी अन आबा भेटल्याचा कोण आनंद आम्हा सर्वांना झाला होता.. त्या आनंदात तिथे शोभा+चोंगट्या+मांत्रीक आहेत का हे विचारायचं भानही राहिलं नाही. संध्याकाळ होण्याच्या आत वाड्यात पोचलं पाहिजे या घाईत ज्या मांत्रीक नंदु यांच्यामुळे आज स्वप्नवत ठिकाणी येण्याची संधी मिळाली त्यांनाच भेटण्याचं राहुन गेलं याची हुरहुर मनाला अजुनही आहे.

आण्णा नाईकांचा वाडा वच्छीच्या घरापासुन साधारण २ किमी दूर आहे. तिथे पोहोचेपर्यंत सुर्य मावळतीला लागला होता. शेवटी वाड्याच्या गेटवर पोहोचलो. वाड्याच्या दर्शनी भागाचे पावसाने नुकसान होऊ नये म्हणुन काळंं प्लॅस्टीक लावलेलं दिसलं.. भयंकर पावसाने वाड्याच्या अंगणाचं अतोनात नुकसान झालेलं रोजच्या रोज एपिसोड बघत असताना जाणवत होतंच.. पण नशिबाने आज लख्ख ऊन पडलं होतं आणि अंगणही बर्‍यापैकी सुकलं होतं
Screenshot_20191025-180645_Gallery.jpg

कृष्णा नामक सेक्रेटरी आणि एक वॉचमन वाड्याच्या गेटवर बसले होते. आमच्यासारखे काही वाड्याचे फॅन वाड्याभोवतीने फेर्‍या मारुन मार्गस्थ होताना दिसत होते. आम्ही वच्छीच्या घराकडुन आलोय आणि दिग्दर्शकाने वाडा पहायची परवानगी दिलिय हे ऐकल्यावर अजुन एकदा नावाची खात्री करुन कृष्णा आम्हाला घेऊन वाड्याच्या दरवाजाचे कुलुप उघडायला निघाला.. ( चला.. निदान आपल्याला तरी वाडा आतुन पहायची संधी लाभली Proud )

वाड्यात शिरायच्या आधीच समोर दिसलं ते माईचं वॄंदावन.. गेले १५-२० दिवस शुटिंग सुरु नव्हते तरी वॄंदावनासमोर ताजी जास्वंदाची फुले वाहिलेली दिसली.
Screenshot_20191025-181058_Gallery.jpg

ओसरी चढुन वर गेलो पण ओसरीत झोका नव्हता Uhoh शुटींग सुरु नसल्यानं काढुन ठेवलाय असं कॄष्णाने सांगितलं आणि कुलुप उघडलं
आज सोमवारी लाईट नसते त्यामुळे आत अंधार आहे असंही सांगितलं.. पण त्याने सगळ्या खिडक्या उघडल्या तसा उतरतीला लागलेल्या सुर्याचा प्रकाश घरभर पसरला. आत गेल्या गेल्या त्याने सांगायला सुरुवात केली, " ही बैठकीची खोली.. पुढे माजघर.. तिकडे स्वयपाकघर.." तेवढ्यात माझ्या तोंडुन नकळत शब्द निघाले - "अहो, मला वाड्याचा कोपरान कोपरा ठाऊक आहे.. मी कुठेही चुकणार नाही" Biggrin तसा कृष्णाही डोळे मिचकावत हसला आणि वाडा आमच्या हवाली करुन बाहेर जाऊन बसला.
Screenshot_20191025-180936_Gallery.jpg

वाड्यात पाऊल टाकताच एकप्रकारची उर्जा जाणवली. गेल्या ३ दिवसांपासुन सुरु असलेल्या प्रवासाचा शिणवटा आणि सकाळपासुन जाणवत असलेल्या ऑक्टोबर हीटचा असह्यपणा कुठल्या कुठे पळाला. डावीकडे लक्ष गेलं तर लक्ष्मी+सरस्वती+गजाननाच्या चित्राने व्यापलेली भिंत नजरेस पडली. शेजारीच स्वयंपाक घरात जाणार्‍या दरवाजावर ठेवलेले डबे-डुबे अन बरणी. डावीकडे खिडकी. चित्राच्या खाली अन खिडकीच्या भिंतीला खेटुन टकलेली गादी मात्र गुंडाळुन ठेवलेली दिसली (शुटिंग सुरु असेल तेव्हाच ती अंथरत असावेत Wink )
Screenshot_20191025-180654_Gallery.jpg

माजघरात जाणार्‍या दरवाजावर असणारी गणेशमुर्ती
Screenshot_20191025-180734_Gallery.jpg

त्या दरवाजाच्या शेजारील खांबावर डकवलेली आण्णा-माईची तरुणपणीची छबी Bw
Screenshot_20191025-180659_Gallery.jpg

बैठकीच्या खोलीत भुईवर रेखाटलेली आणि मनात घर करुन बसलेली नक्षी..
Screenshot_20191025-180753_Gallery.jpg

आधी माजघर बघु की परसदार की विहीर की वर अण्णांची खोली की देवघर की स्वयंपाक घर अशी मनाची त्रेधातिरपीट उडालेली असतानाच एका अनामिक ओढीने पाय माईच्या स्वयंपाकघराकडे वळले.. माई जिथे बसुन चहा गाळते त्या जागेवर बसावसं वाटलं.. मागे कपबशा, खिडकीत बरण्या, ताटवाट्या सगळं जिथल्या तिथं होतं.. नव्हती ती फक्त माई अन सरिता..! त्या दोघींची फार आठवण आली Uhoh
Screenshot_20191025-180702_Gallery.jpg

१५-२० दिवस शुटिंग नसल्याने घरात आजिबात झाडलोट केलेली नव्हती. वाड्यातले किचन, पाटणकरणीचे किचन अन वच्छीचे किचन या सर्व ठिकाणी तेच डबे, तांबे, ताटवाट्या वापरत असवेत असं वाटलं कारण वच्छीच्या घरी शुटींग चालु होतं म्हटल्यावर माईच्या किचन मधले बरेच डबे, तांबे, फुलपात्रे, ताट-वाट्या तिकडे होते की काय कोण जाणे. फळीवर तर फक्त २च जर्मनचे डबे होते.. चायवांगडा बटर नायतर बिस्कुट खाऊक व्हया म्हणान डबो उघडल्यानी तर भुतुर कायंच नव्हता Proud
Screenshot_20191025-180714_Gallery.jpg

एरवी सिरिअल बघत असताना आपल्याला एकच देवघर दिसतं.. पण वाड्यात मात्र २ देवघरं आहेत. माईला देवापुढे बसुन रडायचं असेल तेव्हा एक आणि सर्वांनी उभं राहुन गार्‍हाणं गायचं असेल तेव्हा एक. दोन्ही देवघरं किचनच्या दोन्ही बाजुला असणार्‍या खोल्यांमध्ये आहेत. (कधी कधी सरिता रागावैतागात किचनमधुन आतल्या खोलीत जाते ते गार्‍हाणं गायचं देवघर आहे Proud )
Screenshot_20191025-180709_Gallery.jpg

स्वयपाकघरातुन बाहेर आल्यावर पावले आपसुक जिन्याकडे वळाली. धप-धप आवाज करत लाकडी जिन्याने वर गेलो तर इथेही बेडवरची गादी, बेडशीट, टेबलावरील ग्रामोफोन आणि बर्‍याच वस्तु गायब आहेत असं दिसलं. कुतुहल म्हणुन आण्णाचं कपाट उघडालं तर सगळा मुद्देमाल तिथं ठेवलेला दिसला Wink
Screenshot_20191025-180758_Gallery.jpg

डावीकडे वळुन गॅलरीत आलो.. सज्जात लावलेल्या हुंड्या पुसुन खिडकीत ठेवलेल्या दिसल्या. उद्यापासुन शुटिंग सुरु होणार म्हटल्यावर चकाचक केलेल्या दिसत होत्या. खाली पाहिले तर वाड्याकडे येणारा रस्ता फार सुंदर दिसत होता. गेटच्या बाहेर कृष्णा खुर्चीत बसलेला दिसतोय.
Screenshot_20191025-180807_Gallery.jpg

पुन्हा ३ पायर्‍या चढुन आण्णोबाच्या खोलीत आलो अन समोर भिंतीवर बंदुक दिसली Bw
मग काय 'आण्णा नाईक आसंय मी.. एकेकास गोळ्यो घालीन' चा खेळ सुरु झाला Proud
Screenshot_20191025-180859_Gallery.jpg

काहीही म्हणा.. पण आण्णांच्या खोलीची शान काही औरच..! खिडकीतुन खाली पाहिले तर बाव दिसली
Screenshot_20191025-180755_Gallery.jpg

मग मात्र पाय झटपट हालले.. पळतच जिना उतरला अन झर्रर्रर्रर्सर्र्कन वळुन माजघरात आलो. बघतो तर काय.. नानांची खोली, छायाची खोली, दत्ता+सरिताची खोली म्हणजे हे माजघरच..! फक्त कॉटची पोझिशन बदलली, बेडशीट अन उशांचे अभ्रे बदलले की झाले काम..! Proud (एरवी आपणाला जिन्या खालची खोली म्हणजे सरिता+दत्ताची खोली वाटते पण ती वापरली जात नाही).

माजघरातुन पुढे आलो तर पांडबाची खोली... कैक ट्रंका, मोठ्ठा हंडा आणि अडगळीचे सामान तिथं ठेवले आहे. एका बाजुला छोटीशी मेकअप रुम आहे.
Screenshot_20191025-180740_Gallery.jpg

हे परसदार -
Screenshot_20191025-180742_Gallery.jpg

मागे आलो तेव्हा परसदारी असलेली बाव, केळीची बाग आणि पाठमोर्‍या वाड्यावर सोनेरी किरणं पडली होती.. त्या किरणांनी न्हाऊन निघालेल्या परिसराचं दर्शन होऊन अदभुत जगात आल्याचं समाधान वाटलं..
Screenshot_20191025-180940_Gallery.jpg

ऑक्टोबर हीट मुळे घामेजलेल्या जीवाने पळतच बाव गाठली... सरसर सरसर रहाट ओढुन कळशी वर खेचली.. गार पाण्याने चेहरा-हातपाय धुतले तेव्हा आत्मा सुखावला.. बावीत डोकावुन 'मेलंय..मेलंय..' चा खेळ खेळणारी छोटी द्वाड छाया, माधव, पांडु आठवले.. तसं मी देखील बावीत डोकावुन 'मेलंय.. मेलंय..' म्हणुन बघितलं.. पाटणकर वर येतो की काय असं वाटुन गेलं Biggrin
Screenshot_20191025-181050_Gallery.jpg

एकदा संपुर्ण वाड्याला चक्कर मारली. शुटींग चालु असताना कलाकारांना आणि सपोर्ट स्टाफला चहा-पाणी देण्यासाठी छोटंसं कँटीन आहे.

एव्हाना सुर्य मावळायला आलाच.. आता सगळी दारं बंद करुन एकवार वाडा नजरेखालून घातला.. कृष्णाचे आभार मानुन आम्ही वाड्याबाहेर पडलो.. वाड्याच्या बाहेरचा परिसर नितांतसुंदर आहे.. एकवार असंच दोन्ही बाजुंना असणार्‍या भातशेतीत पुढे चालत जाऊन पुन्हा मागे आलो.

Screenshot_20191025-180624_Gallery.jpg
.
Screenshot_20191025-181104_Gallery.jpg

भले वाड्यात माई, आण्णा, सरिता, दत्ता, छाया, पांडु, नाना भेटले नाहीत पण त्यांच्या वाड्याचा कोपरान कोपरा पाहता आला, रात्रीस खेळ चाले - २ चं शुटींग, आबा+वच्छीची भेट.. हे सर्व नंदु मुळे शक्य झालं..!

ईछाशक्ती असली की रस्ता आपोआप सापडतो याचा प्रत्ययही आला.. Proud

Pages