रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिसेस मुख्यमंत्री च्या जागी येणार आहे हि नवीन सिरीयल ( सुमी गाडीच्या बॉनेटवर सांडगे सुकवताना सिरीयल संपवली )

>>मग का उगीच सुसल्याला सोनं देत नाहीत ते..? २५ तोळे घेऊन ब्याद घरातुन निघुन तरी जाईल एकदाची.

लालच बुरी बला है. आणि २५ तोळे घेउन गपगुमान जाईल ती सुसल्या कसली. मला उगाच तिचा आणि त्या इन्स्पेक्टरचा काहीतरी ट्रॅक असेल असं वाटलं होतं सिझन १ च्या वेळेस. काय नाव होतं हो त्याचं डीजे?

काल पासुन राखेचा १ चा सुद्धा शेवटचा प्रवास सुरु झाला.. नाईकांना समजलं की तो विश्वासराव पोलिस इन्स्पेक्टर आहे... सरिता सुद्धा दागिन्यांचा हव्यास सोडुन बसली.. पार वैराग्य आलं तिला तो विश्वासराव पोलिस आहे हे समजल्यावर Proud

रघुकाकाने खरेच पुन्हा पहिले उद्योग सुरु ठेवलेत... उगीच माईच्या पायावर डोकं टेकवुन सगळं सोडणार असं म्हणाला होता...

आण्णा बिडी ओढत असत म्हणे.. तेही झोपाळ्यावर बसुन. काहीही बरळतो हा पांडु. आम्हाला कसे नाही दिसले ते बिड्या ओढताना सिझन २ मधे Uhoh

>>रघुकाकाने खरेच पुन्हा पहिले उद्योग सुरु ठेवलेत... उगीच माईच्या पायावर डोकं टेकवुन सगळं सोडणार असं म्हणाला होता

कुत्र्याचं शेपूट, कडू कारलं इत्यादी इत्यादी.

>>आण्णा बिडी ओढत असत म्हणे.. तेही झोपाळ्यावर बसुन.

आणि ते माईच्या खोलीत कपाटातून का बाहेर यायचे त्याचंही काही स्पष्टीकरण मिळालं नाही दुसर्‍या सीझनमध्ये.

आता फार काही कीस काढण्यासारखं नाही उरलं... आण्णा दिसतात हा माईचा भ्रम होता असं म्हणायचं. बिचारीने येडा बन के पेडा खायेला है. आधिच्या सिझन मधे कैच्या कै सीन वाट्याला आले तिच्या. पण दुसर्‍या सिझन मधे उद्धार होईल असं वचन मिळालं असेल म्हणुन तिने पहिल्या सिझन मधे वाट्टेल ते केलं Proud

दुसर्‍या सिझन मधे मात्र माईचं खरेच सोनं झालं अगदी.

पाटणकरणीला झी युवा वर 'तुखं माझं जमतंय' मालिका मिळाली ज्याचा लेखक पांडु आहे.

तर माईची सोनी मराठीवर 'आई माझी काळुबाई' या मालिकेत आशालता वाबगांवकर साकारत असलेल्या रोल साठी वर्णी लागली.. आजपासुन माई 'वसुंधरा राजे' म्हणुन टीव्हीवर दिसेल.. Bw

हे fb वर पाहिलं. जाम भारीये Proud

FB_IMG_1602876651067.jpg

पाणी पुरी डिलिव्हरी करणाऱ्याची एड.. आमची पाणी पुरी खाऊन मोठे पण लहान होतात Proud Proud Proud

अरे वा... खरंच की काय..?? नवीन सीझन आणतायत की जुन्याच सीझनच्या पुण्याईवर झीम वाले स्पर्धेत तरुन जाण्याची तयारी करत आहेत..??? Bw

अरे वा स्वप्ना_राज, तुम्ही तर चांगली बातमी दिलीत..!! Bw

परंतु, हा खरेच तिसरा सिझन आहे की राखेचा१,२ च्या पुण्याईवर एखादा रिअ‍ॅलिटी शोचा परिक्षक म्हणुन आण्णाला गळ्यात मारण्याची तयारी सुरु आहे हे लवकरच कळेल.

https://www.loksatta.com/manoranjan-news/is-ratris-khel-chale-season-3-c...

ही बातमी आज वाचली, पण मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी स्प्रे पेंटने 'अण्णा नाईक परत येणार???' असे बऱ्याच दिवसांपासून लिहिलेले दिसते आहे.

हो.. मी पण गेल्या आठवड्यात वोल्गा चौकात असं पाहिलं..!

बहुतेक नवा सिझन येतोय असंच वाटतंय.. प्रोमो तर कातील आहे एकदम..!

शेवटी येईल येईल म्हणत रात्रीस खेळ चाले चा तीसरा सिझन २२ मार्च पासून सुरु होत आहे. या सिझनच्या प्रोमोत नाईक कुटुंबिय कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे कदाचित वेगळ्या धाटणीचा सिझन असावा अशी शंका येत आहे. जर तसे खरेच असेल तर या धाग्यावरील नाईकांच्या आठवणी जपल्या जाव्यात या हेतून सीझन ३ ची पिसे काढण्यासाठी नवीन धागा काढत आहे : https://www.maayboli.com/node/78301

219 एपिसोड, वरची किमान एक नोट तरी खरी ठवायची, शेवंता अन्नाला परत करायला पैसे आणि दागिने काढून ठेवते कपड्यावर तेव्हा..

Pages