Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो... शेवटचाच आठवडा सुरु आहे.
हो... शेवटचाच आठवडा सुरु आहे...
कालच्या भागात छायाचे पाय धरुन
कालच्या भागात छायाचे पाय धरुन झाल्यावर आण्णा बाहेर दिवाणखाण्यात येतात अन त्यांच्या मागोमाग दत्ता अन माई पण येतात. आतमधे आण्णांनी छायाचे पाय धरले याचं भयंकर वाईट वाटुन छाया तिचं दु:ख सरिता समोर मोकळं करते अन सरिता पण 'हो ला हो' करुन तो सीन संपवते तर बाहेर दिवाणखाण्यात बसलेले आण्णा "वाड्यात शांतता ठेवा अन पाटणकरांना त्रास होईल असं वागु नका" असं दत्ता अन माईस सांगतात. हे ऐकुन दत्ता अन माईची अवस्था अवघड जागेचं दुखणं अन जावई डॉक्टर अशी होते
आज अमवस्या आहे म्हणुन माई दत्ताला तुळाशीसमोर राखणदाराला नारळ फोडायला सांगते म्हणुन हातात नारळ अन कोयता घेऊन तोबाहेर येतो. पाठोपाठ आण्णा पण येतात. इतकी वर्षं राखणदाराला नारळ स्वतःच्या हाताने दिला नाही तरी त्याने यांचं घर राखल्यान म्हणान आण्णा स्वतःच तो नारळ फोडातो असं म्हणत अन नारळ्+कोयता हातात घेतात. खाली ठेवलेला नारळ कोयत्याने स्लो मोशन मधे फोडणार इतक्यात काय होतं कुणास ठाऊन पण आण्णा तो नारळ अन कोयता घेऊन मागे फिरतात अन अंधारातच (हातात टोर्च वगैरे न घेता) थेट पाटणकरणीच्या (नव्या) घराकडे जाऊ लागतात अन मागोमाग "आण्णा.. आण्णा.." करत दत्ता पण जातो. पावसाने वाट्टोळं झालेल्या अंगणात चिखल तुडवत दोघेही पाटणकरणीच्या घरापुढे पोचतात अन तिथं एका दगडावर आण्णा तो नारळ कोयत्याने पार भुगा होईस्तोवर फोडतात. ते बघुन दत्ताची दातखीळ बसते.. काय बोलावे हे त्याला सुचतच नाही.
मग दत्ता आण्णांना घेऊन वाड्यात येतो अन माईला शोधायला आत तिच्या खोलियेत (जी खोली आण्णांनी पाटणकरांना दिलेली असते) जातो. माई गादीवर बसुन मागे भिंतीला डोकं टेकुन डोळे झाकुन बसलेली असते (झोपच लागलेली असते म्हणा ना..! ) अन दत्ता तिला हाका मारतो तरी ती काही हलत नाही. मग तिला हात लाऊन "आये..आये.. " केल्यावर तिचा डोळा उघडतो अन दत्ताला ती विचारते की राखणदारास नारळ फोडला का म्हणुन. त्यावर दत्ता तिला घडलेला प्रसंग सांगतो अन तेवढ्यात आण्णोबा बाहेरुन (आतमधे पाटणकर जोडपं आहे असं मानुन) "झोप लागली का? काही हवं असल्यास ते माडीवरच आहेत तेव्हा नि:संकोच हाक मारा" वगैरे म्हणतात ते ऐकुन पाटणकरणीने मेल्यावरही आपली पाठ सोडली नाही हे बघुन माईला फार फार दु:ख होतं. ते बघुन दत्तालाही वाईट वाटतं अन पुढच्याच क्षणी माई दत्ताला त्या बयेचं घर (नवं) उद्याच्या उद्या पाडुन टाक असं म्हणते.
मग दुसरा दिवस उजाडतो अन सकाळी सकाळी अगदी झुंजुमुंजु व्हायच्या वेळचं धुक्यात हरवलेलं वाड्याच्या सभोवतालचं चित्रीकरण बघत आपण दत्ता सरिताच्या खोलियेत शिरतो. तिथं दत्ताची लगबग सुरु असते अन आज माणसांची जुळणी करुन पाटणकरणीचं घर पाडुक व्ह्यया म्हणान तो बाहेर जुळणी करायला जाऊ लागतो तशी सरिता भसकन पुढं येऊन त्याचा हात पकडते अन आधी नेने वकिलांना फोन लाऊन सल्ला घ्या म्हणते (हिलाच फार कळतं बरं का... आयत्या पिठावर रेघोट्या कशा मारायच्या ते..! )
दत्ताच्या फोन मुळे नेने काकांना आयतं कोलित मिळुन ते आण्णांच्या वाड्यात येतात तर माई गेली १०-१२ वर्षे तीने कसे डोळ्यात तेल घालुन अन घरात्सुन बाहेर न पडता आण्णांची कशी सेवा केली हे सरिताला ऐकवत डोळे पुशीत दिवाणखान्यात बसलेली असते. नेने वकील आल्यावर माईचं डोळे पुसणं त्यांच्या नजरेतुन सुटत नाही अन ते आण्णाला समजावयाला वर जाऊ लागतात तसं ते माडीवर नसुन आतमधे माईच्या खोलित नसलेल्या पाटणकरांशी बोलत आहेत असं दत्ताने सांगितल्यावर काका त्या खोलित जातात. आण्णोबा गादी समोर खुर्ची टाकुन अदृश्य पाटणकरांशी बोलत असतात. ते बघुन नेने वकील आण्णांना समजाऊन निराशेने बाहेर दिवाणखान्यात येतात अन "अवघड आहे... आण्णा ठार वेडा व्हायच्या आत त्याला इस्पितळात न्यायला हवं" असं म्हणतो तसं सरिताला १२ हत्तींचं बळ येतं अन ती आधीपासुन कसं हेच सांगत असते तरी तिच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही की आण्णांना खूळ लागलं वगैरे ऐकवते (हिला सदानकदा स्वतःवर फोकस आणायची भारी हौस..!!) ते ऐकुन माई चवताळुन उत्तरते की कायोक झाला तरी ह्यांका ती इस्पितळात जाऊक देउची नाय.. त्यांचा जे काय होईत ता तिथंच त्या वाड्यात व्हईत.." अन ती तरातरा आत (आण्णा बसलेल्या खोलियेत.. म्हणजे तिच्याच) निघुन जाते.
दाराशी उभा राहुन ती आत आण्णा काय बोलत आहेत ते ऐकु लागते अन आण्णांना आत पाटणकरीण दिसत असते. तिचे हात स्वतःच्या हातात घेऊन आण्णा भिर्रर्रर्र झालेले असतात.. तिच्या रुपाचं गुणगाण गात असतात.. तिच्या रुपाला अजुन बहर यावा म्हणुन तिचे हात आणि गळा पिवळा होऊक व्हयो असं बोलत इंदोला सांगुन पाटणकरणीसाठी सोन्याचो दागिने देऊक सांगतो असं बोलुत पाटणकरणीचे हात हाती घेतात.. अन वास्तवात तिथं माई उभा असुन तिचे हात आपल्या हातात आहेत हे जेव्हा आण्णांना कळते तेव्हा ते भिर्रर्रर्रर्र झालेलं व्यक्तिमत्व धक्का बसुन "इंदो तु..?" असं म्हणते. त्यावर माई दात ओठ खात "व्हय मीच... इंदुमती हरी नाईक... तुमची बाईल अन या वाड्याची मालकीण.." अशी नव्याने ओळख करुन देते अन आण्णाच्या डोळ्यापुढं काजवे चमकतात अन एपिसोड संपतो..
प्रीकॅप मधे "जित्तेपणी तिका (पाटणकरणीक) दागिनो घेऊक दिल्यान नाय अन आता मेल्यावर बरी घेऊक दीन.." असलं कायबाय बोलत माई आण्णांच्या हाताला धरुन माडीवर नेते अन कपाटाच्या कोपर्यातुन बंदुक काढुन कमावलेल्या ताल टिपेच्या जोरावर गरजते "आज या वाड्यात्सुन एकतर माझो तिरडी जाईत नायतर या वाड्यात आज मी आण्णा नायकाच्या नावान डोक्यावरसुन अखेरचो पाणी घेइत..." असं निक्षुन सांगुन ती बंदुक आण्णांच्या हाती देत खंबीर होत "निर्णय तुमचा असा.." असं म्हणते
कालचा भाग माईने खाऊन टाकला.
कालचा भाग माईने खाऊन टाकला. अपेक्षेप्रमाणे तिने यथेच्छ आरडुन-वरडुन नुसतं धुमशान घातलं. भाग सुरु होतो तोच मुळी माईच्या खोलियेत..! आण्णा पाटणकरणीचे दोन्ही हात हातात घेऊन उभे राहिलेले असतात तेव्हाच अचानक त्यांना पाटणकरणीच्या जागी आपण माईचे हात धरुन उभे आहोत याची जाणीव होते अन ते "इंदो तु...??" असं म्हणुन चांगलेच चपापतात. माईला आयतंच कोलीत मिळतं अन ती मग - "व्हय... मीच. इंदुमती हरी नाईक.. आण्णा नाईकाची बाईल.. नाईकांच्या घराची सून.. या घराची मालकीण..!!" अशी झणझणीत ओळख करुन देते अन हाताने गळ्यातलं मंगळसुत्र आण्णाला दाखवत "ह्या वेसण गळ्यात व्हता म्हणान आजवर तुमच्या सोबत संसार करुक इलंय.. लग्न होऊन ३ दिवस झाले तरी तुमची "इंदो" अशी हाक ऐकायला तरसत र्हायले.. गावातले लोक नानांकडे हात जोडुन म्हणायचे की तुमच्या पोराचा लगीन झालाहा... आतातरी त्याला आम्च्या घरच्या बाया-माणसांकडं.."अन त्यानंतर तिला शिसारी येऊन आण्णाचं रंगेल वागणं कसं झेललं याची थोडक्यात झलक दाखवुन जाते . मग आण्णांना खोलियेत सगळे कोपरे दाखवत त्यांना पाटणकर आणि पाटणकरीण कुठं दिसले असं विचारत चांगलंच चमकावते . तरिही आण्णांचं आपलं हाताच्या बोटाने गणीत सोडवण्याचा निरुद्योग सुरुच असतो. ते बघुन माईच्या डोक्यात तिडीक जाते अन ती आण्णांना हाताला धरुन बाहेर दिवाणखान्यात आणते.
बाहेर सगळेच चिंतातुर चेहर्याने बसलेले असतात. नेने वकील सर्वांना समजाऊन सांगत असतात की आण्णाला आता इस्पितळात भरती करणं गरजेचं आहे अन त्यांच्या सुरात सुर मिळवत सरिताचा आक्रस्ताळेपणा सुरु होतो अन ती आण्णांना वेड लागलं आहे असं बोलुन दत्ताला सांगते की अभिराम अन माधवला फोन करुन ही बातमी द्या. दत्ता तिला ही ती वेळ नव्हे असं सांगतो पण तिची सुटलेली गाडी कोण अडवणार तरिही नेने वकील तिला जाणीव करुन देतात की ही वेळ असं काही करण्याची नाही आणि इथे सर्वजण आहेत ते मिळुन निर्णय घेऊ वगैरे तेवढ्यात माई आण्णांना घेऊन तिथं पोचते. ती ठणकाऊन सांगते की आण्णांचं जे काय व्हायचं ते ह्या वाड्यातच होऊदे त्यांच्या पापाची फळं याच वाड्यात आहेत आणि ती त्यांना इथेच भोगुची लागताहा. याउपर नेने वकिलांनी जास्त शहाणपणा केला तर तिच्या तोंडुन उगीच काहीतरी वाईट शब्द जाण्या आधी हा विषय इथेच थांबला तर बरा. ते ऐकुन नाईलाज झालेले नेने वकील तिथुन काढता पाय घेतात तर सर्वांना खबरदार करुन माई या सगळ्याचा साक्षमोक्ष लावायला आण्णांना घेऊन माडीवर जाते.
माडीवर येताच माई अलमारीत कापडात लपवलेली बंदुक आणि तिच्या गोळ्या बाहेर काढते अन आण्णांच्या हातात देऊन त्यांनी आजवर कुणाकुणाचे आणि कसे मुडदे पाडले याचा लेखाजोखा वाचते. या सर्वांसोबत आज आजुन एक मुडदो पाडा म्हणान रडु लागते. ज्या आण्णा नाईकाची बाईल म्हणान ती जगत आली हा त्या आण्णा नाईकाची ही अवस्था तिला बघवत नाही (म्हणजे त्याने अजुन वर्षा सहा महिन्याला १ मुडदो पाडुक व्हया तर..! ) असं म्हणत "आज एकतर घरात्सुन माझो तिरडी तरी उठात नायतर आण्णा नायकाच्या नावान डोक्यावरुन शेवटचा पाणीतरी घेईन"म्हणते अन "मारा.. माका मारा.." चा पुनर्घोष करत रहाते. माईचं हे असलं भयंकारी रुप बघुन अन बोलणं ऐकुन आण्णांची जाम तंतरते अन हातात आलेल्या बंदुक अन गोळ्या त्यांच्या हातुन गळुन पडत ते सुद्धा कॉटवर मटकन बसतात.
त्यांचा माडीवरचा धुमशान ऐकुन खाली दत्ता, सरिता अन छायाचो पुरतो पुतळो झालेलो असात. मगे माई एकटीच दणदण जिना उतरत खाली येते अन जिन्याच्या शेवटच्या पायरीवरुन रडवेल्या चेहर्याने सर्व पुतळ्यांकडे पहात कोंकणकन्या एक्सप्रेस सारखी उजवीकडे झोकदार वळण घेत दिवाणखाण्यातुन माजघराच्या दरवाजाकडे अन तिथुन थेट परसदारातुन बाहेर बावीकडे सुसाट सुटते. तिच्या मागोमाग तिचे ३ डबे पण "आये.. आये.." करत येतातच
आपल्या डब्यांकडे बघत इंजिन बावीच्या रहाटापाशी थांबतं अन हातानेच जागच्या जागी थांबण्याचा आदेश देत आणि जीव देणार नाही असं आश्वस्त करत रहाट उलटा फिरवतं. एवढ्या फुल्ल भरलेल्या बावीत कळशी एवढ्या वेगाने आत जात रहाट अस्सा गर्रर्रर्रर्रर्र फिरवते की बस्स..!बघतच रहावं..!!! मग बावीतुन पाणी शेंदुन माई ती तांब्याची कळशी उचलुन राणा भिमादेवी थाटात दत्ता, सरिता अन छायाच्या समोर स्वतःच्या डोक्यावर ओतुन घेते. हा सीन काय जमलाय वा वा वा..!! माई एका कळशीत डोक्यापासुन थेट पायापर्यंत ओली होते अन तिचं ते राणा भिमादेवी थाटातलं उपडी कळशी डोक्यावर धरलेलं अन कपाळाची टिकली नाकापर्यंत खाली उतरलेलं भयंकारी रुप स्लो मोशन मधे आपणासहीत दत्ता, सरिता अन छाया त्याबरोबरच माडीवरुन खिडकीतुन आण्णा बघत असतानाच एपिसोड संपतो.
प्रीकॅप मधे आण्णा देवघरात बसुन देवाची माफी मागत असतात अन मागे सर्वजण आनंदात उभे असलेले दिसतात (बहुतेक आण्णांचं खूळ गेलेलं दिसतंय..!) नंतर सरिता आपल्या सासु-सासर्यास दिवाणखाण्यातल्या गादीवर बसवुन प्रसन्न चेहर्याने ओवाळताना दिसत असते तेव्हाच बाहेरच्या अंधारातुन पाटणकरणीने टांगुन घेतलेल्या झाडाखालुन कोणीतरी कॅमेरा बनुन वाड्याकडे वेगात झेपावते अन ओसरीतुन दारात येत आतमधे चालु असलेलं सासु-सासर्यांचं गुणगान बघते असं दाखवलं जातं... आता आज नाईकांकडे कोण बरं आलं असेल... सुसल्या की गणेशा...??
मस्त अपडेट डीजे
मस्त अपडेट डीजे
जाई. धन्यवाद
जाई. धन्यवाद
कालचा भाग थोडा संथ आणि
कालचा भाग थोडा संथ आणि गुडीगुडी झाला... एपिसोड सुरु झाला तोच माईची राणा भिमादेवी थाटातली डोक्यावर उपडी कळशी केलेली मुर्ती पुन्हा दाखवुन. पुन्हा तेच सर्व स्लो मोशन मधे दाखवुन आपण पुन्हा एकदा माईला एका कळशीत डोक्यापासुन पायापर्यंत भिजलेले पहतो अन आपल्यालाच हुडहुडी भरते तशी ती छाया अन सरिताला पण..! (असल्या कोरोनाच्या काळात पावसाळी वातावरणात माईने अशी गार पाण्याची आंघोळ केलेली बघुन आपल्याला उगीच घसा दुखु लागला तर.. सर्दी झाली तर.. ताप आला तर... कफ झाला तर... अशी तिची काळजी वाटून जाते). सरिता अन छाया माईला दुसरी कळशी डोक्यावरुन घ्यायला मज्जाव करत आजारी पडशान अशी तंबी देतात अन लगोलग सरिता टॉवेल आणत माईचं डोकं पुसु लागते तरी माईचं फुर्रर्रर्रर्रर्र... फुर्रर्रर्रर्रर्र.. सुरुच अन ती काही सरिताला डोकं पुसु देत नाही. मग कसंबसं छायाने समजावल्यावर ती डोकं पुसुन घेते अन सगळे तिला घरात घेऊन येतात.
त्यानंतर देवघरात माई मस्तपैकी आवरुन, केसाला टॉवेल गुंडाळून, पिवळ्या-केशरी रंगाचं नऊवारी पातळ, लालभडक रंगाचं ब्लाऊज अन सेम त्याच रंगाचं ठसठशीत कुंकु लाऊन देवाला साकडं घालायला सुरुवात करते. बाहेर दिवाणखान्यात काळजीग्रस्त छाया, सरिता अन दत्ता आण्णांच्या वागण्याबद्दल खार खात असतात. माईला कसे समजवायचे या विचारात असलेली सरिता दत्ताकडे बघत आण्णा कसे आहेत ते बघुन या म्हणुन त्याला वर माडीवर जायला सांगते अन ते ऐकुन दत्ताला फार आश्चर्य वाटतं . तो असा तोंड आ वासुन बघत बसलाय हे बघुन सरिता त्याला सांगते की ती एवढीपण वाईट नाय असा.. तिका पण आण्णांची तेवढीच काळाजी असा जेवढी दत्ताक असां (गुणाची गं बाय ती ). आण्णांच्या अशा वागण्याचा परिणाम माईवर व्हायला नको म्हणुन तिला समजाऊन सांगायला आणि उपाय करायला रघुकाकांना सांगायला हवं असं ती म्हणते तेवढ्यात दत्ता सांगतो की त्याने मघाशीच रघुकाकांना फोन करुन बोलावले आहे ते.
इकडे माईने बोलु न दिल्याने नाईलाज होऊन निघालेल्या नेने काकांना रस्त्यात रघुकाका भेटतात अन ते त्यांना विचारतात की कुठे निघालात म्हणुन तर रघुकाका त्यांना सांगतात दत्ताचा फोन आला आहे म्हणान आण्णाच्या घरी निघालेलो असात. त्यावर कुत्सीतपणे हसत नेनेकाका रघुकाकांना म्हणतात की कशाला त्या वेड्याच्या घरी जातो. आण्णाची अवस्था आता अशी झाली आहे की जर तो घराच्या बहेर निघाला तर गावातले लोक त्याला वेडा वेडा म्हणुन दगडं मारतील मग अशा आण्णाला मदत करण्यासरखं रघुकाकाकडे काय आहे..? तरी रघुकाका उत्तरतात, "त्या घराचं मीठ खाल्लं असां.. माका जाऊक व्हया..!"
इकडे दिवाणखाण्यात माईच्या काळाजीत बसलेल्या तिघांना रघुकाका दारात आलेले दिसतात अन यांना "येवा..येवा.." केल्यावर ते "माई कुठं असां" असं विचारुन "ती देवघरात आहे" असं कळाल्या कळाल्या ते तडक आत देवघरात जातात अन त्यांच्या मागुन दत्ता,सरिता, छाया अशा रितीने देवघरात उभे रहातात की देवाच्या मागुन कॅमेरा ठेऊन देवापुढे बसलेली माई अन तिच्या मागे देवघराच्या बाहेर माजघरात उभे असलेले ते चौघे व्यवस्थीत दिसु शकतील..! . मग रघुकाका माईला तिचं तिचं गार्हाणं घालु दे म्हणुन सांगतो. माई मागे फिरुन रघुकाकांना आता काय करु वगैरे विचारु लागते अन तिच्यासहित घराला या सर्वातुन सोडवण्यासाठी उपाय विचारते. "आमावस्या संपली असात अन तो बघताहां" असं म्हणुन रघुकाका माईला अंगार्याचो पुडी देताहा अन तो अंगारा सर्व घरात अन आण्णांच्या कपड्यांवरही टाका म्हणजे आण्णा तुम्ही म्हणाल तसं वागेल अशी मखलाशी जोडुन निघुन जातात (त्यांना कोणीही चहा विचारत नाही हे विशेष..!! ). मग त्या तिघांना माजघरातच थांबायची सुचना करत माई बाहेर जाते.
त्यानंतर माई माडीवर येते (बहुतेक सगळ्या घरात अंगारा फुंकला असेल..!) अन बघते तर आण्णा कॉटवर डोळे मिटुन पडलेले असतात आणि "इंदो, तु माका सोडून जाऊ नको.." असं बडबडत असतात. मग माई त्यांना जागं करते अन ते तिला अगदी आहो-जाहो करुन माफी मागतात.. पाय धरु लागतात तसं माई त्यांना तसं करण्यापासुन रोखते अन त्यांना माफी मागायचीच असेल तर खाली देवाच्या पायावर नतमस्तक होऊन मागा असं म्हणत रघुकाकांनी दिलेला अंगारा लावते. कपाटातुन काळा कोट, काळी टोपी (असा पेहराव नाईकांच्याकडे कसा याचं उत्तर मला मिळालंच नाही.. कोकणातले कोणी सांगु शकेल का प्लिज..?? ) घालायला सांगते अन उरलेल्या अंगार्याची पुडी कोटाच्या खिशात कायम असु द्या असं बजावते.
इकडे माजघरात देवाच्या पुढे ते तिघं गप्पा हाणत रघुकाकांनी दिलेल्या अंगार्याचो काही उपयोग होईल का यावर चर्चा करत असतानाच माई आण्णांना घेऊन तिथं पोचते अन सर्वांच्या आश्चर्याला पारावार उरत नाही. आण्णा त्या तिघांचीही हात जोडुन माफी मागतो अन त्याने सर्व घरादाराला खुप त्रास दिला असं दु:खी अंतकरणाने म्हणतो. मग माई त्यांना देवापुढे नाक घासायला सांगते अन मग आण्णाही सांगितल्याबरहुकुम तो सीन पार पाडतात (हे बरं आहे की.. एवढे खून करुन देवाच्या पायावर डोकं टेकवलं की पापं शुद्धं..! )
मग सगळं छान छान सुरु होतं अन बाहेर दिवाणखान्यात खुर्चीवर आण्णा अन पुढे गादीवर दत्ता अन लक्षमीच्या चित्राखाली भिंतीला पाठ टेकवून छाया हे सगळे गप्पा मारत बसलेले असतात तेवढ्यात सरिता चहा घेऊन येते अन आण्णांना देते. आण्णा तिच्या चहाची फार तारीफ करतात तसं छाया दत्ताला बोलते असं दाखवत सरिताला टोमणा मारते "बघ दत्ता... सासर्याक चहा देऊन सगळी इस्टेट नावावर करुन घेताहा तुझी बाईल.. " त्यावर लटक्या रागात सरिता तिला असलं काहीही नको म्हणते अन आण्णांना सांगते, "परवा तालुक्याच्या गावाहुन पुर्वा (तिची अन दत्ताची मुलगी) येईल तेंव्हा तिच्या हातचा चहा खाल तर आमच्या सर्वांचो हातचो चव इसराल..!" असं म्हटल्यावर छायाचा अजुन एक टोमणा - "बघितलंस दत्ता.. आता तर लेकीच्या नावावर पण एक जमिनीचो तुकडो करुन ठेवल्यान " तसं आण्णा छायाला म्हणतात, " बघ छाया... तुझ्या नावावर आता फक्त पडवीच उरलेला असात" असा सगळा खुसखुशीत मामला सुरु असताना माई येते अन सरिता दत्ताला पाट आणुन ठेवा असं म्हणात देवघरात जाते. आण्णा अन माई दोघेही "हे कशाला..? कशाला..?" विचारत असतात पण छाया अन दत्ता सस्पेंस कळु देत नाहीत .
मग माजघरातुन आरतीचं ताट आणलं जातं अन दिवाणाखान्यात गादिपुढं दोन पाट मांडुन त्यावर आण्णा-माईस बसवलं जातं. "हे सर्व कशासाठी?" असं माईने विचारल्यावर सरिता म्हणते की तिन्हीसांजेच्या वेळेस घरच्या लक्ष्मीस अन कर्त्या पुरुषास ओवाळायला हवं (कित्ती गुणाची झाली गं आता ही बाय..! ). तिचं ओवाळुन झाल्यावर आण्णा तिला सव्वा रुपाया ओवाळाणी टकतात त्यावरुन सरिताला पुन्हा छायाचा टोमणा बसतो . असं सगळं गुडीगुडी सुरु असताना पाराखालून कोणीतरी वेगात ओसरीतुन येत दिवाणखाण्यातला कार्यक्रम बघत असतं.
सगळं आटोपल्यावर सरिता, छाया, माई, दत्ता आपापल्या कामाला गेल्यावर आण्णा ओसरीत येतात अन समोर पाटणकरणीने टांगुन घेतलेल्या जांभळीच्या झाडाकडे बघत तिथे जातात. झाडाखाली दिवा लावलेला असतो अन तिन्हीसांजेच्या आंधारात त्या दिव्याच्या प्रकाशाच्या साक्षीने आण्णा पाटणकरणीला स्मरुन केलेल्या चुकांचे माफी मागतात. यापुढे ते सुसल्याला कधीच अंतर देणार नाहीत असं सांगतात तेव्हा दिवा थोडासा फडफडतो (आपणाला पाटणकरणीची आठवण येऊन उगीच कातरल्यासारखं होतं..! ) अन एपिसोड संपतो..!!
हा सर्व माफीनामा सादर करत असताना कुणालाच आबा अन वच्छीची आठवण मात्र येत नाही याचं आपणाला आश्चर्यमिश्रीत दु:ख होत रहातं.. त्यांची काहीही चुक नसताना त्यांना प्रचंड दु:ख, वेदना झाल्या, त्यांचा मुलगा अन सून मारले गेले अन त्या दोघांनाही जीवन नकोसे होऊन शेवटी कड्यावरुन नदीत उडी मारावी लागली याचं काहीच कसं सोयर सुतक कुणालाच वाटलं नसेल बरे..??
या सर्व गुडीगुडी प्रकारात प्रीकॅप मधे काय दाखवलं हे बघितलेलं विसरलं
हा सर्व माफीनामा सादर करत
हा सर्व माफीनामा सादर करत असताना कुणालाच आबा अन वच्छीची आठवण मात्र येत नाही याचं आपणाला आश्चर्यमिश्रीत दु:ख होत रहातं.>> खरं आहे. मी आज सकाळी ऑफिसला यायला उशीर होत होता तरी बघितल एपिसोड. आणि हेच वाट्लं किती मर्डर केले ह्यानं आणि आता देवासमोर नाक घासले की झाले!! खरे त्याची कर्मे बघून त्याला लाइफ टर्म स जेल मध्ये घालायला हवे किती कॄर खून पाडले.
Dj, खूप खूप धन्यवाद अपडेट
Dj, खूप खूप धन्यवाद अपडेट साठी. गणपतीत आईकडे आली आहे त्यामुळे कार्यक्रम बघता येत नाही पण तुमच्या डिटेल अपडेटमूळे वाटतच नाही की काही मिस होतंय.
धन्स निल्सन
धन्स निल्सन
एन्जॉय गणपती आणि माहेरपण..!!
@ अमा : हो ना.. झी अवॉर्ड मिळालेल्या वच्छी व्यक्तीरेखेला अन तिच्या नवरोबा आबाला असं कसं चुकवलं असेल...? मला तर त्या दोघांना असेच मोकळे सोडुन दिलेलं असल्यामुळे त्या दोघांच्याकरवी राखेचा३ चा नारळ फुटतो की काय असं वाटु लागलंय...
कालच्या भागात सुरुवात होते ते
कालच्या भागात सुरुवात होते ते टायटल साँग न येताच . हिरव्यागार आकेरीचं उंचावरुन दर्शन घेत घेत आपण सकाळी सकाळी नाईकांच्या वाड्याच्या अंगणात हळूच उतरतो तेव्हा माई गुलाबी नऊवारी, निळं-जांभळं ब्लाऊज, ठसठशीत कुंकु, केसात माळलेली टप्पोरी सोनचाफ्याची फुलं अशा रुपात अतिपावसाने शेवाळून निघालेल्या तुळशी वृंदावनासमोर मनोभावे नमस्कार करत असते. तिला ओसरीतुन न्याहाळत आण्णा झोपाळ्यावर झुलू लागतात तसा कर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज ऐकुन माई सावध होऊन लगेच तांब्या, पुजेचं ताट घेऊन चिखल झालेल्या अंगणातुन अनवाणी पायाने ओसरीच्या पायर्या चढते. आण्णांसमोरुन घरात जाताजाता आण्णा तिला विचारतात की काय मागितलं तुळशीला तर प्रसन्नपणे हसत माई त्यांना म्हणते की सगळं मनासारखं चालु असताना आता काय मागणार अन मग ती "च्याय आणुन देतंय हां..." असं म्हणात घरात जाते.
कपबशी घेऊन माई बाहेर येते तेव्हा आण्णा अन दत्ता बोलत असतात. दत्ता आण्णांना हिशोब तपासुन बघा म्हणत बाड आणायला आत जाऊ लागतो तेव्हा माईने आणलेला चहा पिता पिता त्याला अडवत आण्णा म्हणतात की त्यांचा याच्यावर पूर्ण विश्वास आहे नको आणुस. पण तरिही "असा कसा एकदम अंग काडुन घेशात?" म्हणात दता त्यांना टोकतो तेव्हा माईपण त्याला दुजोरा देत आण्णांना आज शेतावर जाऊन या म्हणते. दत्ता पण वांगडा यायला तयार होतो. असं सगळं प्रसन्न प्रसन्न वाटत असतानाच नेने वकील दत्त म्हणुन हजर..!
त्या तिघांना ओसरीत हसताना अन शेतात जायचं ठरलेलं बघताना नेने वकील आण्णांना महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगुन माडीवर घेऊन जातात. तिथं गेल्यावर ते आण्णांना आत्ता सर्व सुरळीत सुरु आहे पण पुढेही राहील असं समजु नको असं म्हणत मृत्युपत्र तयार कर असं सांगतात. मृत्युपत्रात सुसल्यासाठी पण तरतूद कर म्हणतात. ते ऐकुन आण्णांना नेने वकीलांचं म्हणणं पटतं अन ते माईला बोलवण्यासाठी उठतात तसं नेने वकील हे सर्व माईला सांगु नको असं म्हणुन त्यांना रोखतात. आण्णांसाठी छोट्या बाटलीत आणालेलं तीर्थ ते टेबलवर ठेवतात. ती बाटली बघून आण्णांना मोह होतो अन त्यांचा हात पुढे होतो नेमकं तेव्हाच माई चहा घेऊन वर येते अन घाईगडबडीने आण्णा हात मागे घेऊन नेने वकील ती बाटली कोटाच्या खिशात ठेवू लागतात तेव्हा माई ते बरोब्बर हेरते अन वकीलांपुढे उभं रहात खिशात घातलेली बाटली काढुन ताब्यात घेते . आण्णांना सुधरवण्यासाठी तिने कित्येक वर्षं मेहनत घेतली आहे अन आता त्यांना पुन्हा त्या वाटेवर घेऊन जाऊ नका असं निक्षुन सांगते तसं आण्णा जाम वरमतात अन नेने वकील पण चोरी पकडली गेल्यामुळॅ भिजलेल्या मांजरा सारखे होऊन " मी तर फक्त आण्णांची नियत तपासत होतो" असं सांगुन वेळ मारुन नेतात. माईपुढे टिकाव लागत नसल्याने नेने वकील आल्या पावली निघुन जातात तर माई आण्णांना समजावुन सांगते की काहि गरज पडली तर घरच्या माणासांना बोला... पण या वाटेला पुन्हा जाऊ नका.
मग संध्याकाळी सगळे दिवाणखाण्यात काल सांगितलेल्या क्रमानेच बसलेले असताना सरिता गरमागरम भजी तळुन ती पितळी ताटात भरुन बाहेर आणते अन छायाचा टोमणा पडतोच - "किती पण चांगला चुंगला खायला बनवत रव पण शेवटी तुका सव्वा रुपायाच मिळतंलंय.." . मग सगळे पुन्हा ख्वॉख्वॉ हसत असतानाच सरिता पुन्हा स्वयंपाक घरात जाऊन चहा घेऊन येते (काय सुधारली ही बाई आता... अशीच आधीपासुन असती तर किती बरं झालं असतं असं वाटुन जातं ). चहा पिता पिता आण्णा बोलतात की डोळे मिटण्या आधी हा दिवस बघायला मिळाला हे किती भाग्य आहे म्हणुन. माधव इथं असता तर खूप छान झालं असतं असं बोलल्यावर लगेच दत्ता माधवला फोन लावतो अन त्याची, वैनीची अन आर्चिसाची चौकशी करतो. अण्णांकडे फोन देऊन आण्णांशीही बोलणं होतं अन शेवटी माईकडे फोन येतो तेव्हा ओव्हर अँक्टींग करत माई तो सीन खराब करते (मुद्दाम असं चित्रीत केलं की काय असं वाटुन जातं..! ).
फोन ठेयल्यानंतर आण्णांच्या तोंडी अभिरामाच्या लग्नाचा विषय निघतो अन त्यालाही मुंबईची मुलगी बघुक व्हई असं म्हणत असतानाच दत्ता बोलुन जातो की गावाकडची पण चलात . मग सगळ्यांचा फोकस दत्तावर येतो अन सरिताकडे बघत छाया सांगते की या दोघांचं लग्न तर आण्णांनी कसं घाईत लाऊन दिलं ते अन तेवढ्यात दत्ताला जुने दिवस आठवून तो आण्णांना म्हणतो की आण्णांनी तर सरिताला बघायला गेलो तेव्हा शेणाचो हात सुद्धा धुवुक देऊक वेळ दिला नशात मगे छायाचा टोमणा - " तेवढा वेळ दिला असता तर ह्या काळो तवो साठी आजही पोरगी शोधुक बसुक लागलो असतो " . मग हास्याचा जो कल्लोळ उठतो की बस्स..!! तो थांबवत आता दत्तानेने अभिराम साठी मुलगी बघितली आहे का वगैरे चौकशीचा ससेमिरा त्याच्या मागे लागतो. मग दत्ता हो नाही करत सांगतो की अभिरामाने अन त्याच्या पुतणीने (पुर्वाने) एक मुलगी बघितली असात पण काहीच बोलाचाली झालेली नाही.. नुसती बघितली हा.. चांगली हा.. . तेव्हा आण्णा त्याला विचारतात की मग घोडं अडलंय कुठं..? बोलणी करायला काय झालं वगैरे विचारतो तर " नाईकांचं घर आपणाला झेपेल का असा विचार करुन कोणी आपल्याकडे आलं नाही" असं सांगितल्यावर आण्णा ते कोण आहेत अशी चौकशी केल्यावर दत्ता आकेरीच्याच ग्रामपंचायतीत ग्रामसेवक असणारे कोणीतरी नार्वेकर की कायसं नाव सांगतो. आण्णा त्यांना बोलणी करण्यासाठी घेऊन ये म्हणुन सांगतात आणि अभिरामाला पण बोलवुन घ्या म्हणतात.
सगळं चांगलं चांगलं सुरु असताना आण्णा बाहेर ओसरीत येतात अन जांभळीच्या झाडाकडे बघत रहातात काहीतरी आठवुन ते नाथाला हाक मारुन त्याच्या हातात बर्याच नोटा कोंबतात व सुसल्यासाठी ठेव म्हणतात त्यावेळी जांभळीच्या झाडाची सळसळ होते.
रात्रीच्या जेवणासाठी सगळे माजघरात येतात तेव्हा ताटं वाढताना पुन्हा हसवा फसवी होत आण्णा आल्यावर सगळे चिडीचुप होतात अन आण्णा न बोलताच जेऊ लागतात. ते असे शांत का बसलेत हे खुणेनेच सरिता दत्ताला विचारते आणि काहीतरी बोला असं सुचवते. मग दत्ता आण्णांना शांत का आहात असं विचारतो तेव्हा जेवता जेवताच आण्णा सर्वांना सांगतात की त्यांनी मृत्युपत्र तयार करण्याचं मनावर घेतलंय. ते ऐकुन दत्ता, माई, छाया सर्वांना काळाजी वाटु लागते तर सरिताच्या मना लड्डु फुटु लागतात (ही बाई शेवटपर्यंत सुधारली नाही हेच खरे ) अन चिंतातुर माईचा क्लोजप घेत एपिसोड संपतो.
प्रीकॅप मधे डोक्यावर हेल्मेट घातलेला अभिराम बुलेट वर बसुन झोकात एंट्री घेतो अन घरासमोर थांबलेल्या पांडबास बघुन तो "ओळखला का..?" विचारतो तसा पांडबा "इसारलंय" म्हणान मोकळा होतो तेव्हा अभिराम लहानपणीचा "मेलंय... मेलंय..." डायलॉग मारतो तसा अचानक ट्युब पेटुन पांडबा "अभिराम.. अभिराम..!" असं ओरडतो तेव्हा शिरस्त्राण उचलत अभिराम आपला चेहरा दाखवुन प्रसन्न हसतो
अरे वाह! अभिरामची एन्ट्री
अरे वाह! अभिरामची एन्ट्री झाली का मला वाटलेलं आता शेवटाकडे आहे मालिका तर उगाच बजेट वाढायला नको म्हणून नविन एन्ट्री आणणार नाहीत.
आतापर्यन्त सुधारलेला अण्णा दत्ताच्या नावावर मांगराची जमिन का करतो ते बघायला आवडेल.
आज या लोकप्रिय मालिकेचा
आज या लोकप्रिय मालिकेचा शेवटचा भाग ....
अभिराम ला आणले शेवटी तरी ते बरे झाले. पूर्वा आणि गणेश पण दाखवायला हरकत नव्हती !
नीलिमा , आर्चिस अजिबात नाही आले तरी माधव शेवटच्या एपिसोडसाठी दाखवला असता तर चालले असते !
वेटिंग फॉर राखेचा -३
मस्त अपडेट डीजे
मस्त अपडेट डीजे
कालचा भाग सुरु होतो तोही
धन्यवाद जाई.
*****************************************************************
कालचा भाग सुरु होतो तोही माईच्या तुळशीपुढं नतमस्तक होऊन पितळी तांब्यातुन पाणी घालताना. यावेळी लाल-शेंदरी नऊवारी पातळ अन त्यावर हिरवागार ब्लाऊज, ठसठशीत कुंकु अन केसात माळलेली सोनचाफ्याची टप्पोरी फुले असं रुप असतं. दत्ता अन छाया ओसरीतुन माईला बघुन तिच्या लगबगीचे कौतुक करत असतात तर सरिता ओसरीतल्या ओलनीवर धुतलेले कपडे वाळत घालण्याच्या तयारीत असते. माईला बघुन छाया दत्ताला विचारते, "आज अभिराम येणार म्हणान आए किती खुशीत असात..!!". दत्ता-सरिता हसुन अभिरामच्या येण्याची वाट बघु लागतात तेवढ्यात छायाचा माईला टोमणा बसतोच - "अजुन कसो इलो नाय अभिराम..? माका तर वाटतां आता अभिराम एकटा घरी येण्याऐवजी जोडीनेच येईत की काय..!" . दत्ता तुळशीला पाणी घालुन मागे फिरलेल्या माईला ओसरीत उभा राहुनच विचारतो की सकाळी सकाळी आण्णा कुठं गेले म्हणुन. तर अंगणात उभी राहुनच माई त्याला सांगते की ते त्यांच्या मित्राकडे गेले असणार. दत्ता अन छाया लगेच ओळखतात की आण्णा नेने वकिलांकडे गेले असणार . तसं दत्ता बोलुन दाखवतो अन सरिता कान टवकारते ( ). मग दत्ता माईला विचारतो की ते काल मृत्युपत्राबद्दल बोलत होते तेव्हा माईने त्यबद्दल काही विचारलं का? (सरिता अलर्ट मोड मधे..! ). माई त्याला म्हणते की तिला सुद्धा विचार करुन करुन झोप लागली नाही म्हणुन ती आण्णांशी या विषयावर बोलली त्यावर दत्ता तिला म्हणतो की मृत्युपत्र करण्याची घाई करण्याची काय कारण होती का (हे ऐकुन ओलनीवर कपडे वाळत घालण्यासाठी उभ्या असलेल्या सरिताची पुन्हा तडफड सुरु होते..!). छाया तर माईला विचारते सुद्धा की आण्णा नक्की नेने वकिलांकडेच गेलेत की ऊं.. ऊं... . मग छायाला झापत माई तिला घरात पाठवते अन दत्ताकडे बघत त्याला तिच्या खोलियेतल्या कपाटात्सुन धोतराचं नवीन पान काढायला सांगुन आज रघुकाकांना बोलावले आहे त्यांच्या हाती तेवढं ते दे असं सांगते अन तीही घरात जाते. तिच्या पाठोपाठ घरात जाणार्या दत्ताच्या हाताला जोरात हिसका देत सरिता त्याला ओसरीतच थांबवते
मग सरिताची वचवच सुरु होते. ओसरीत उभी राहुन ती दत्ताला दबक्या आवाजात झापु लागते, "मघाशी मृत्युपत्र करायला तयार झलेल्या आण्णांबद्दल 'इतक्या लवकर कशाला' असं बोलुची काय गरज होती..? करतत तर करु दे ना... आपल्यालाच गरज असा. माधव भाऊंना मुंबईत सगळा काय ते मिळताहा.. अभिराम भाऊजी पण शिकुन मोठे झाले असा. मगे आपण इथे गावात राहणार तर आपल्याला चांगली जमीन मिळुक व्हई. त्यासाठी तुम्ही काहीतरी सांगा आण्णांना.. माधव भाऊजीक जमीनीचा कायोक गरज नाय असा.. त्यांका मांगरावरची जमीन मिळाला तरी चलात. मृत्युपत्रानुसार वाटो मिळाला की आपण थोड्या पैशांचा भांडवल घालुन गणेशाक धंदा काडुक देऊ. थोडे पैसे पुर्वाच्या शिक्षणासाठी अन तिचो लग्नासाठी वापरु अन उरलेल्या पैशांचं तालुक्याच्या गावी छोटसं खोपटं घेऊ म्हणजे पैसे गुंतुन रवतील.." असं मनातल्या मनात मांडे खाणार्या बायकोला बघुन दत्ताला डोक्यावर हात मारुन घ्यायची वेळ येते तोवर त्यांना रघुकाका घरी येताना दिसतात.
रघुकाका अंगणात येता येताच ओसरीच्या पायरीपाशी चप्पल काढत सरिताला बघुन विचारतात "काय सरिता, आज माझ्या स्वागताला ओसरीत उभि रवलीस की काय..! " त्यावर दात-ओठ खाल्लेलं लपवत सरिता पण फुल बॅटिंग करते , "व्हय तर... तुम्ही येणार हे माका आधीच म्हाईत होतं म्हणान काल बाजारातुन येताना हार आन फुलं आणुची होती पण कुठं दिसलीच नाय.." त्यावर तिला मागे सारत दत्ता हसत हसत रघुकाकांना घरात घेऊन जातो. गादीवर बसवतो. त्यांच्या पुढुन रागावैतागात सरिता रिकामी बादली नाचवत स्वयंपाक घरातुन उजवीकडल्या खोलियेत जाते . तेवढ्यात स्वयंपाक घरातुन बाहेर येणारी माई सरिताला रघुकाकांसाठी पाणी आणायला सांगते . सरिता पाणी घेऊन येते तशी लगेच पुढची सुचना - "रघुकाकांसाठी च्याय ठेव" . पण रघुकाका चहासाठी नको म्हणतात (हा म्हातारा एव्हाना चहासाठी नको नको का करतो काय माहीत..? शेवटी शेवटी बजेट वाढु नये म्हणुन खबरदारी घेतोय असं वाटतंय..! ) तेव्हा पुन्हा एकदा ओरडुन माई स्वयंपाक घरात चहासाठी गेलेल्या सरिताला चहा ठेऊ नको असं सांगते
माई बसलेल्या रघुकाकांना उठा म्हणते अन मग दत्ता धोतराचे नवीन पान रघुकाकांना देतो. हे कशासाठी म्हणान विचारल्यावर उपकाराखाली दबलेली माई त्यांना सांगते की त्यांनी दिलेल्या अंगार्यामुळे आण्णा पुन्हा पहिल्या सारखे होऊन माणसात आले त्यासाठी ही प्रेमाची भेट (धोतराचं पान..!) समजा अन अगदी नम्रपणे रघुकाकांचे पाय धरु लागते. ते बघुन रघुकाकाही भारावतात अन माईला उठा उठा करत आण्णांना पुन्हा पहिल्या सारखे करण्यात माईच जबाबदार आहे असं म्हणत त्यांनी दिलेला अंगारा हा तर फक्त राख होती.. त्यांनी दिलेल्या राखे ऐवजी माईने स्वतःच्या चुलीतली राख जरी आण्णांना लावले असती तरी तिचा गुण आलाच असता. आजवर आपण लोकांना राख, लिंबु, उतारे यांच्या करवी फसवत आलो पण आता माईच्या चांगुलपणामुळे अन कष्टामुळे भारावून ते हे आजपासुन सर्व सोडुन देत आहेत असं म्हणुन ते माईचे पाय धरू लागतात. ते दृश्य बघुन छाया, सरिता, दत्ता सहित आपणालाही थोडं गहिवरुनच येतं. "ज्याचो शेवट भला तां सगळा भला" असं दत्ता म्हणत असतानाच आण्णा घरात येतात अन खुर्चीत बसतात.
रघुकाकांना घरी आलेलं बघुन आण्णा खुश होतात अन त्यांच्यासाठी काही चहापाणी केलं की नाही असं विचारतात तेव्हा माई म्हणते की रघुकाकांनी करु दिले नाही म्हणुन. मग रघुकाका हसत हसत आण्णांना म्हणतात की आता ते त्याच्या सोबत चहा घेतील. मग अभिरामच्या येण्याची बातमी आण्णा रघुकाकांना देतात अन त्याच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आज नार्वेकर घरी येत आहेत असं सांगतात. ते ऐकुन रघुकाका खुश होतात. पाहुण्यांसाठी खाण्यापिण्याची तयारी करण्यासाठी माई लगेच सरिताला कामाला लावते अन आण्णा दत्ताला सांगतात की अभिरामाला फोन करुन बघ तो कुठवर आलाय. दत्ता फोन करतो पण अभिराम काही उचलत नाही.
इकडे पावसाने ओला झालेल्या वेंगुर्ला-सावंतवाडी-बेळगाव हमरस्त्याने हेल्मेट घातलेला अभिराम बुलेटवर बसुन रमतगमत घराकडे येत असतो. वाड्याच्या गेट पाशी येताच चिक्कुच्या झाडाखाली पांडबा उभा. त्याच्या समोर बुलेट उभी करुन अभिराम त्याला विचारतो "ओळखलं का..?" तर पांडबा हेल्मेट घातलेल्या अभिरामला न्याहाळत "नाय.. नाय ओळखला.." असं म्हणतो तेव्हा अभिराम त्याला म्हणतो की तु इसारला का त्यावर सपशेल शरणागत होऊन पांडबा - "व्हय... इसारलंय... इसारलंय.." म्हणतो , मग त्याला हिंट देण्यासाठी अभिराम म्हणतो, "तु माझे काजे कुठं ठेवले...? मला खेळु देणार नाही का..??" असं म्हटल्यावर ट्युब पेटत पांडबा ओरडतो "अभिराम भाऊ.. अभिराम भाऊ..." अन मग "अभिराम भाऊ इलंय... अभिराम भाऊ इलंय.." असं ओरडत पांडबा ओसरीकडे पळतो तोवर अभिराम त्याचे शिरस्त्राण काढत त्याचा प्रसन्न चेहरा दाखवतो (त्याला राखेचा १ च्या शेवटच्या भागात बघितल्यावर पुन्हा आता बघुन आपणालाही खुप बरं वाटतं ).
पांडबाची वर्दी ऐकुन दिवाणखान्यातले सर्वजण ओसरीत येतात. माईतर सर्वांच्या आधी बाहेर येऊन प्रसन्न मुद्रेने अभिरामाला न्याहाळु लागते. तिचा आनंदीत झालेला चेहरा अन लाल-शेंदरी पातळ, हिरव्या ब्लाऊज मधलं रुप तिच्यावर उन्हं पडल्यामुळे अजुनच उजळून निघतं. दत्ता, छाया, सरिता सगळेच अभिरामाला अंगणात पाहुन खूप आनंदीत होतात. रघुकाकांच्या टरक्या डोळ्यात पण समाधान दिसु लागतं . सर्वांना ओसरीत बघुन उल्हासीत झालेला अभिराम ओसरी चढुन वर येऊ लागतो तसं माई त्याच्या गळ्यातली बॅग दत्ताला घ्यायला सांगत अभिरामाच्या चेहर्यावरुन मायेने हात फिरवते. दत्ता, छाया, सरिताला भेटुन अभिराम समोर आण्णांना बघतो तसा त्याच्या चेहर्यावरील आनंद मावळतो अन आण्णा देखील प्रायश्चित्त झालेला चेहरा करुन त्याच्याकडे पाहु लागतात अन अभिरामासमोर हात जोडु लागतात तसा अभिराम पळत येऊन त्यांचे हात बाजुला करुन त्यांना मिठी मारतो. ते बघुन माई, सरिता, छाया, दत्ता यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.. ( हे सर्व बघुन आपल्याही मनाच्या कोपर्यात उगीच भरून आल्या सारखं होतं )
मग दुसर्या प्रसंगात नार्वेकर नवरा-बायको दिवाणखाण्यात येऊन बसतात. नार्वेकरीण तर नुसती घरभर नजर फिरवत बसलेली असते अन माईला म्हणते की घर तर मोठं आहे म्हणुन. नार्वेकर माईला विचारतात की आण्णा कुठं आहेत तेव्हा ते येतीलच असं सांगेपर्यंत आण्णा येऊन खुर्चीत बसतात देखील. खुर्चीत बसल्या बसल्या पहिला प्रश्न नार्वेकरणीलाच ( ) की घर सापडाय्ला काही त्रास तर नाही ना झाला वगैरे.. त्या फुल्टॉस ला लगेच नार्वेकर झेलत म्हणतो "की नाईकांच्या वाड्यात यायला दबकायलाच झालं होतं". त्यावर हसुन आण्णा त्यांना सांगतात की अभिरामाला काही विचारायचं असेल तर विचारा म्हणुन. तेवढ्यात माजघरातुन काजे ठेवलेला डबा (अभिराम होस्टेलला जाण्या आधी त्याने पांडबाकडे हा जपून ठेवायला दिलेला असतो..! हे बरं आठवलं पांडबाला..!! ) घेऊन येतो अन काजे खेळुक चला असं म्हणातो. ते बघुन नार्वेकर-नार्वेकरीण चमकतात तशी लगेच माई पांडबाला सांगते की आता अभिराम भाऊच लगीन असा.. तो काजे खेळुचा नाय.. अन मग त्याला बाहेर पिटाळते. मग नार्वेकर अभिरामाला काय करता असा प्रश्न विचारतात तर स्वयंपाक घराच्या चौकटीत उभी राहिलेली सरिता लगेच पचकुन मोकळी - "आमचे अभिराम भाऊजी लय शिकलो असां.. पार काय तां यसयससी झालां हां त्यांचा.. आता खोर्याने पैसे ओढतील तां.." तिचं उत्तर ऐकुन वरमलेला नार्वेकर अभिरामकडे बघतो अन अभिराम दत्ताकडे अन मग दत्ता नजरेनेच सरिताला झापत गप्प बसवतो . मग अभिरामच नार्वेकरांना सांगतो की तो यू.पी.एस.सी. ची परिक्षा देतोय. एक परिक्षा झाली आहे अन दुसरी व्हायची आहे. त्यावर आण्णा म्हणतात की मग साखरपुडा आधी करू अन लग्न परिक्षा झाल्यावर. समोरच बसलेल्या रघुकाकांना ते साखरपुड्यासाठी मुहुर्त विचारतात तेव्हा रघुकाका उद्याचाच मुहुर्त सांगुन "असा मुहुर्त १० वर्शात येणा नाय..!" असं म्हणतात (तर..तर.. काय मुहुर्त होता ते तर पहिल्याच भागात दिसले..! ). मग उद्याच साखरपुडा ठेऊ असं म्हणत आण्णा दत्ताला तयारी करा असं सांगतात अन आख्या गावाला ते स्वतः आवताण द्यायला जाणार असं सांगतात.
मग आण्णा गावातील पायवाटेवरील तिकाटण्यावर उभे राहुन येणार्यांना हातातील बॉक्सकडे पहात त्यातुन एकेक पेढा येणार्या जाणार्यांना देऊ लागतात अन उद्या अभिरामाचो साखरपुडा आहे अन जेवायला या असं आमंत्रण देऊ लागतात. असं करत असताना आण्णांचं लक्ष फक्त पेढ्याच्या बॉक्स कडेच असतं. एकेक जण आण्णांच्या समोरुन येत असतो अन आण्णांच्या हातातील बॉक्समधुन पेढा घेऊन पुढे जात मागे वळुन कॅमेर्याकडे बघत हसु लागतो तस तसं आपणाला करंट बसु लागतो... सर्वात पहिल्यांदा आपणाला सदा आपल्याकडे बघुन हसताना दिसतो... मग पांडुचे वडील... मग भिवरी... मग चोंट्या.. त्यानंतर पाटणकरीण.. पाटणकर...शोभा... पोष्ट्या... आपल्याला दिसतात अन आण्णा असे न बघता पेढे का वाटत आहेत याचं आपल्याला आश्चर्य वाटत रहातं.. तेवढ्यात बॉक्स मधले पेढे संपतात तरी अजुन काशी कसा दिसला नाही अशी शंकेची पाल आपल्या मनात चुकचुकत हा लांबलेला एपिसोड संपतो.
( इतक्या तरल, सुंदर, अवर्णनीय, सुखद प्रवासातील शेवटुन दुसरे स्टेशन मागे पडत गाडी आपणाला शेवटच्या स्टेशनाकडे घेऊन निघाली याची हुरहुर मनाला लागून रहाते. )
प्रेकॅप मधे माई तिच्या खोलियेत झोपलेली असते अन थोडीफार कण्हत असते. खोलियेत सगळीकडे अंधार बुडुक असतो. तिला स्वप्नात आधी घडलेले प्रसंग ब्लॅकव्हाईट रंगात दिसु लागतात ज्यात पहिल्या प्रसंगात छोट्या अभिरामला सणकुन ताप भरलेला असतो अन तो आण्णांना मारुन टाकेन असं बरळत असतो तर दुसर्या प्रसंगात पाटणकर माईला सांगत असतात की अभिरामचं सगळं चांगलं होईल. तो खुप शिकेल. पण त्याच्या लग्नाच्या आसपास आण्णांच्या जीवनात असा एक दिवस येईल की तो दिवस आण्णांसाठी फार मोठा उलथापालथ घडवणारा ठरेल. ते ऐकुन माई दचकुन जागी होते तेव्हा बाहेर कोंबडा आरवलेला आवाज येतो (पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात म्हणे..! ). अन मग राखेचा२ च्या पहिल्या भागातला एक प्रसंग तेवढा दिसतो ज्यात नाना बाहेर निजलेले असतात अन "ती आली.. ती आली..." असं म्हणात असतात.
शेवट एकदम बंडल केला.. टोटल
शेवट एकदम बंडल केला.. टोटल निराशा. अण्णा नायकाला जरा तडफडून मारायला हवा होता, एकदम डिसेंट मरण दिले त्याला
मलातर अण्णांचं वेडेपण काही
मलातर अण्णांचं वेडेपण काही कळलं नाही. तो ठार वेडा झाला होता मग अचानक रघूकाका तो अंगारा काय देतात आणि अण्णा एकदम शहाणे काय होतात. मग परत सगळी भुतं दिसायला लागतात. रघु येऊन सांगतो की तो अंगारा नसून फक्त राख होती.
दत्ता आणि पांडू स्वतःला ओळखू शकणार नाहीत ईतके बारीक होते
शेवटचा भाग सुरु होतो तोच
समाप्ती - सीझन २
शेवटचा भाग सुरु होतो तोच आण्णा माडीवरच्या खोलियेत झोपलेले असताना. सकाळ झाली आहे तरी ते अजुनही उठलेले नसतात अन गाढ झोपेत असल्या सारखे वाटत असतात तेव्हाच गुलाबी पातळ अन निळे ब्लाऊज, डोक्याला टॉवेल गुंडाळलेली, हातात पाण्याचं तांब्या भांडं घेतलेली माई आण्णांच्या खोलियेत येते अन आण्णा अजुन कसे झोपले आहेत म्हणुन काळजीत पडते. ती त्यांना उठवायला जाते तेव्हा हाका मारुनही ते उठत नाहीत तसे माईच्या काळजीत भर पडते अन तीला रात्री पडलेलं स्वप्न आठवुन घाबरं-घुबरं व्हायला होतं. मग ती जरा जोरातच आण्णांना हाक मारते तेव्हा आण्णा उठतात. सकाळ झाली तरी तुम्हाला जाग कशी आली नाही या माईच्या प्रश्नावर आण्णा उत्तरतात की काल लवकर झोप च नाही आली. मग माई त्यांना थोडावेळ झोपा असं म्हणते तर आण्णा सांगतात, ""आता घरातील शेवटच्या लग्नात तरी पुढे होऊन काम करुक व्हया" अन असं म्हणुन ते उठुन उभा रहातात अन माई त्यांचं आंघोळीचं पाणी काढायला खाली जाते.
आण्णांना परसदारी कुणाचा तरी आवाज येतो म्हणुन ते खिडकीतुन खाली बघु लागतात तर तिथं त्यांना बावीकडे जाणार्या चिर्यांवर अभिराम उठा-बशा काढताना दिसतो. दोन्ही बाजुला दोन चिर्यांवर पाय ठेऊन उठाबैठका काढणारा अभिराम थोडा विचित्रच दिसतो . ते बघुन आण्णांना बरं वाटतं अन ते हसुन मागे वळतात तेव्हा त्यांना छातीत थोडं दुखल्यासारखं होतं.
खाली माई दत्ताला सांगुन आण्णांसाठी आंघोळीचं पाणी काढायला सांगुन स्वयंपाक घरात जाते तर तिथं गॅसवर छाया नैवेद्याचा भात रांधत बसलेली असते. ते बघुन माईचं डोकं उठतं अन ती वैतागाने छायाला तिथुन बाजुक रव असं म्हणात असते तर छाया तिला म्हणते की हेच तिला काही काम करत नाही म्हणुन रोज टोकत असतात मग आज भावाच्या साखरपुड्यासाठी लागणारा नैवेद्य बनवायला घेतला म्हणुन कशाला ओरडते म्हणुन. ते ऐकुन वैतागलेली माई छायाला "आजच्या दिवस काही करु नको बाई" असं म्हणत जवळ जवळ उठवतेच अन छायाला समजुन चुकते की विधवा असल्याने माईने तिला या कामात लक्ष घालु नको असं म्हटलेलं आहे . मग ती तसं रागावैतागात बोलुन दाखवत स्वयंपाक घरातुन बाहेर पडते अन त्यावेळी जमीनीवर ठेवलेल्या खणा-नारळाच्या ताटाला तिचा पाय लागुन ओटीचे तांदुळ सगळीकडे विस्कटतात (इथे छायाचं अवतारकार्य या सिझन पुरतं तरी संपतं.!). ते बघुन माई अतिशय काळजीत पडते अन शुभकार्यासाठी भरलेली ओटी सांडली हे अशुभाचं लक्षण आहे याची प्रचंड दहशत तिच्या चेहर्यावर दिसत रहाते.
इकडे बावीकडे जाताना दत्ताला अभिराम उठा-बैठका काढताना दिसतो अन त्याचे वाढलेले दाढी-केस बघुन तो त्याला सलून मधे जाउन ये म्हणुन सांगतो (इथे अभिरामाचा अवतार या सीझनपुरता संपतो..!). मग बावीतुन पाणी काढुन हंड्यात ओतुन दत्ता पुन्हा मागे फिरतो तेव्हा आण्णा टोवेल घेऊन रहाटापर्यंत पोचतात. गच्च भरलेल्या बावीत ते रहाटाची कळशी टाकतात खरे पण ती भरलेली कळशी ओढण्यासाठी ते खाली बावीत बघु लागतात तेव्हा बावीत सगळीकडे धूर दिसु लागतो. हळु हळु तो धूर सर्वत्र पसरतो अन तो बघुन आण्णा भांबावून जातात. तरीही ते बावीतुन कळशी ओढु लागतात पण त्यांना ती भरलेली कळशी आजिबात वर खेचता येत नाही. ते रहाटाशी खुप झोंबु लागतात तेंव्हा त्यांना पुन्हा छातीत दुखल्यासारखे होते. कशीबशी कळशी ओढुन ते आंघोळ करतात पण अगदी त्यांच्या अंगातुन पण धूर येऊ लागल्याचा त्यांना भास होऊ लागतो.
आंघोळ करुन, आवरुन-सवरुन, काळा कोट, काळी टोपी, हातात काठी अशा रुपात ते दिवाणखान्यात खुर्चीवर बसतात अन इतक्यात त्यांना दरवाजातुन दत्ता अन पांडबा बोलत असलेले दिसतात (हे २ वर्षांपुर्वीचे शुटींग दिसतेय.. दत्ता अन पांडबा तब्ब्येतीने निम्मेही नसतात ). दत्ताने पांडबाला खाऊची पाने आणायला सांगितलेली असताना केळीची पाने घेऊन आलेल्या पांडबाला "ए खुळ्या.." असं म्हणत ओसरितुन घरात येऊ लागतो अन दरवाजात शिंकतो. ते बघुन आण्णांना चहा करु का म्हणुन विचारायला आलेली सरिता दत्ताला तिथंच दरवाजात थांबा म्हणुन सांगत पाणी घेऊन येते अन त्याच्या अंगावरुन शिंपडत असं शुभकार्याच्या दिवशी उंबर्यात शिंकु नये म्हणत आण्णांना चहा आणायला स्वयंपाक घरात जाते अन दत्ता माजघरात शिरतो. बाहेर ओसरीत तोरण बांधत असलेल्या कामगारला आण्णा हाक मारुन ते तोरण नीट लाव असं म्हणतात तसा तो तोरण लावणारा माणुन हा दुसरा तिसरा कोणी नसुन पांडुचा वडील आहे अशी जाणीव आण्णांना होते अन ते चमकतात तेवढ्यात त्यांना अंगणात फुलांच्या माळा लावताना सदाही दिसतो.. हे असं काय होतंय हे कळण्याआधी त्यांना स्वयंपाक घरातुन सरिताचा आवाज येतो की ती चहा आणतेय. आण्णा स्वयंपाक घराच्या दिशेने पाहु लागतात तेव्हा स्वयंपाक घराच्या खिडकीतुन उन्हाची तीरीप आलेली असते अन दाराशी कपबशी घेऊन शोभा उभी राहिलेली दिसते (गाल मात्र चांगलेच फुगले असतात तिचे ) अन ती बाहेर येऊन आण्णांना चहा ची कपबशी देऊ लागते. तिला पाहुन आण्णा आश्चर्याने विचारतात की "तु...????" अन तिच्या हातुन चहा घेताना आण्णांच्या हातुन चहाची कपबशी निसटते अन जमीनीवर पडते.
तेवढ्यात माजघरातुन खूप भारीतलं जांभळ्या किनारीचं आंबा रंगाचं नऊवारी नेसलेलं पातळ, जांभळ्या किनारीला साजेसा ब्लाऊज, आंबाड्यात पांढर्या फुलांचा गजरा, नाकात नथ, कपाळी ठसठशीत टिळा, गळाभर दागिने अशा रुपात माई येते अन चहा सांडलेला बघुन "काय झालं..???" असं काळजीने विचारते... सरिता म्हणते की काही नाही फक्त आण्णांच्या हातुन कपबशी निसटली अन ती सांडलेला चहा पुसुन घेऊ लागते.
नंतर माई अन सरिता स्वयंपाक घरात काम करत असताना माई चिंतातुर चेहर्याने सरिताला तिला आज सकाळ पासुन घडलेल्या घटनांचा क्रम सांगते अन पाटणकरांनी सांगितलेलं भविष्य काळजीत टाकणारं आहे असं बोलुन जाते. त्यावर सरिता माईला काळाजी करु नका, सगळं नीट होईल असा दिलासा देते. पाटणकरांना एवढं भविष्य कळत असतं तर त्यांनी विहिरित जीव नसता दिला असं ऐकवते तेव्हा तो विषय आज नको असं म्हणत माई तिला थांबवते (अन या सीनसोबत सरिताचाही अवतार संपतो..!).
इकडे आण्णांना घरात खूप धूर धूर दिसु लागतो अन बाहेर बाकड्यावर पहुडलेल्या नानांचा आवाज येऊ लागतो "थंयच रव.... थंयच रव.. उंबरो वलांडु नको.." अन तरिही कुणी इतका धूर केला हे बघायला आण्णा बाहेर ओसरीत जातात अन झोपाळ्यावर बसतात. नाना समोरच बाकड्यावर झोपलेले असतात. आण्णा सगळी तयारी बघत असताना नाना "ती आली हां... ती आली हां" असं बरळू लागतात अन आण्णा तिकडे दुर्लक्ष करुन झोका घेऊ लागतात अन बाहेरची तयारी बघु लागतात तेंव्हा त्यांना अंगणातुन ओसरीत पांडुचा वडील येताना दिसतो अन तो आण्णांना सांगतो की सगळी तयारी झाली असां असं सांगुन हसत हसत घरात जातो. मागोमाग सदा येतो अन तोही सांगितलेली कामे पार पाडली असात असं सांगत आण्णांकडे हसत हसत बघत घरात जातो. तोवर भिवरी फुलांची परडी हातात घेऊन येते अन आण्णांना "काय शेठ.. येताय ना...?" असं विचारत घरात जाते.. पाठोपाठ शोभा येते अन आण्णांना कसे आहात म्हणत हसत हसत घरात जाते.. तेवढ्यात मागुन पाटणकरीण आण्णांना हाक मारते अन "येताय ना.. आण्णा..?" असं म्हणत हसत हसत घरात जाते... पाटणकरही दत्त म्हणुन हजर अन तेही आण्णांना झाली का तयारी असं विचारत कुमुदीनी आत गेली का विचारत हसत हसत आत जातात... मागोमाग चोंट्या येतो अन हसत हसत आत जातो.. एवढे सगळे आल्यावर पोष्ट्या कसा मागे राहील...? तोही लोचटासारखा येत आण्णांकडे बघत आत जातो (काशी मात्र येत नाही... त्याला 'डॉक्टर डॉन च्या शुटींग मधुन वेळ मिळालेला दिसत नाही ). या सर्वांना बघुन आण्णांना कसंतरी व्हायला लागतं अन ते दत्ताला हाक मारतात.
इकडे अंगणात दत्ता माधवला फोन लावत ते कुठवर आलेत याची चौकशी करत असतो. तिकडे पांढर्या गाडीतुन माधव ड्राईव करत आकेरीकडे नागमोडी रस्त्याने येत असतो.. त्याच्या शेजारी आर्चिस आणि मागच्या सिटवर निलमी बसलेली असते. आण्णांचा आवाज ऐकुन दत्ता लगेच ओसरीत येतो अन आण्णांना घेऊन घरात आणुन खुर्चीवर बसवतो. काय झालं असं विचारताच आण्णा "अस्वस्थ होताहा.." म्हणत खुर्चीवर डोळ्यावर झापड आल्यागत करत रहातात.. दत्ता माईला पाणी घेऊन ये म्हणुन हाक मारतो अन माई पाणी घेऊन दिवाणखान्यात येते. आण्णा पाणी पितात पण त्यांना दत्ता अन माई ऐवजी दिवाणखान्यात उभे असलेले शोभा-काशी, पाटणकर-पाटणकरीण, पांडुचा बाप, सदा, भिवरी, चोंट्या, पोष्ट्या सगळे पांढर्या डोळ्यांनी आण्णांकडे बघत असलेले दिसतात. ते सर्वजण आण्णांना हसत असतात अन वेळ झाली याची आठवण करुन देतात. आण्णांना दिसु लागतं की पाटणकरीण आण्णांना सांगते आहे - "आता तुमची आमच्या सोबत यायची वेळ झाली..." ते ऐकुन आण्णा त्या सर्वांना झिडकारत - "माझ्या घरात लग्नकार्य असा... हयसर कशाला इला... निघा.. निघा हयसुन.." असं म्हणत असतात.. ते ऐकुन माई अन दत्ता आचंबीत होतात. अचानक आण्णांना छातीत कळ येत दिवाणाखाण्यात आण्णा-माईच्या तस्वीरीखाली बसलेल्या खुर्चीतच पाठीमागे उताणे होऊन जीव सोडतात अन माईचा हंबरडा कानी पडतो.
दत्ता माधवला फोन लाऊन आण्णा गेल्याची खबर सांगतो अन बाहेर जातो.. माई आण्णांच्या उजव्या बाजुला बसत रडु लागते अन या सिझन ची समाप्ती होते.
********************************************************
काहीही झालं तरी या नाईकांच्या वाड्यातुन बाहेर पडावेसेच वाटत नव्हते... पण आता मात्र सिझन संपला.. बाहेर पडावेच लागणार असं वाटुन रात्री ११ ला टीवी बंद करतनाच डोक्यात अचानक प्रकाश पडला तसा मी रिमोट हातात घेऊन पट्टकन झी युवा वर आलो तर तिथं मी अजुनही नाईकांच्या दिवाणाखान्यातच आहे हे बघुन जीव सुखावला
भारीच dj. मालिकेपेक्षा तुमचे
भारीच dj. मालिकेपेक्षा तुमचे अपडेट्स मिस करू आम्ही सगळे.
भारीच dj. मालिकेपेक्षा तुमचे
भारीच dj. मालिकेपेक्षा तुमचे अपडेट्स मिस करू आम्ही सगळे.>> +1111.
डीजे तुमचे अपडेट नक्कीच मिस
डीजे तुमचे अपडेट नक्कीच मिस करू.
@ बोकलत, लंपन, श्रवु :
@ बोकलत, लंपन, श्रवु : धन्यवाद.
मीही अपडेट देणं मिस करेन.. त्यानिमित्ताने तरी लॉकडाऊनचा विसर पडुन हाताखालुन मराठीतुन १०० एक वाक्य बाहेर पडत होती.. आता तेही थांबलं
DJ.. , तुमच्या डिटेल्ड
DJ.. , तुमच्या डिटेल्ड अपडेटसबद्द्ल मनापासून आभार. मला स्वतःला हा दुसरा सिझन फारसा रुचला नव्हता. तरी पहिला सि़झन (शेवट पटला नसला तरी) आवडला होता आणि सर्व पात्रांबद्दल आत्मियता होती. म्हणून दुसरा सिझन पहात होते अधूनमधून. लॉकडाऊननंतर सिरियल पुन्हा सुरु होईतो तोही इंटरेस्ट संपला. पण एक closure म्हणून शेवट कसा होतो त्याची मात्र उत्सुकता होती. तुमच्या पोस्टींमुळे ते कळलं. पुन्हा एकदा धन्यवाद.
खरंतर पहिला सिझन खूपच भारी
खरंतर पहिला सिझन खूपच भारी हॉरर झाला असता पण कोकणात लोकं यायचं टाळतील हा मुद्दा उचलून या मालिकेवर भरपूर केस सुरू होत्या असं ऐकून आहे. त्यामुळे त्यांना मूळ कथानकात भरपूर बदल करायला लागले.
>>व्हा पुन्हा एकदा ओरडुन माई
>>व्हा पुन्हा एकदा ओरडुन माई स्वयंपाक घरात चहासाठी गेलेल्या सरिताला चहा ठेऊ नको असं सांगते
नेनेंचा वाण नाही पण गुण लागलेला दिसतोय बाकी नेनेंना माईने झापलेलं पाहून बरं वाटलं. दत्ताला मांगराची जमिन का दिली हे कोडं उलगडलं नाही. ते एक आणि दुसरं हा मृत्यूपत्राचा उल्लेख वाचून तिसरा भाग येणार ह्याची दाट शंका येऊ लागली आहे. फक्त तवोच काळो नाही, तर सगळी डाळच काळी असा.
१०.३० च्या स्लॉट च नवीन
१०.३० च्या स्लॉट च नवीन सिरीयल काही खास नाही..पकड घेत नाही.. हे बहुतेक दुसरे बाझी ठरणार.. १०.३० च्या स्लॉट्मधे राखेचा १ & २ आणि १०० डेस हेच मस्त होते..
राखेचा ३ पार्ट असेल तर.. अण्णाचे बालपण आणि उधळलेले रंग दाखवतील..
@ स्वप्ना_राज : दत्ताला
@ स्वप्ना_राज : दत्ताला मांगराची जमिन का दिली हे कोडं उलगडलं नाही. ते एक आणि दुसरं हा मृत्यूपत्राचा उल्लेख वाचून तिसरा भाग येणार ह्याची दाट शंका येऊ लागली आहे. >> अगदी अगदी.... त्या पांडबाला राखेचा-३ विचारलं तरी इतर वेळी रिप्लाय देणारा तो मीठाची गुळणी धरुन बसला
@ बोकलत : ती कोकणातल्या केसेस हे बहुतेक मर्केटिंग गिमिक असावं असं वाटतंय. बाकी अगदी सावंतवाडीत अन आकेरी मधे सुद्धा राखेचा मधे काय दाखवत आहेत याचं कुणाला काही पडलेलं दिसलं नाही. त्यांना फक्त इथं शुटींग होणारी सिरियल रात्री १०.३० लागते एवढंच माहीत होतं. तिथंपर्यंत पोचताना तिथल्या ज्या ज्या लोकांशी संबंध आला तेव्हा आम्ही इतक्या आगत्याने शुटींग बघायला आलो हे बघुन त्यांनी डोक्यावर हात मारुन घ्यायचंच बाकी ठेवलं होतं.
लेखकाला खरंतर कोकणात अंधश्रद्धा पसरवुन त्याद्वारे स्वतःच्या तुंबड्या भरणारे, घरात स्वतःचे स्थान निर्माण करणारे लोक दाखवायचे होते अन त्यांनी शेवटच्या भागाआधी रघुकाका ते देव-देवस्की सोडुन देण्याचा निश्चय करय माईचे पाय धरतात हे दाखवलं.
----------------------------------------------------------------------
बाकी मी दोन्ही सिझन बघितले. मला तरी दुसरा सिझन पेपर वर्क मधे अतिशय उजवा आणि झगमगाटी वाटला. शुटिंग, कॅमेरा, वेशभुषा, आजुबाजुचं चित्रण.. मग ते ड्रोन ने आजुबाजुची हिरवाई दाखवत नाईकांच्या वाड्यावर हळुवार उतरवणारं शुटिंग असो की अगदी सावंतवाडीची बाजारपेठ, मोती तलाव, एसटी स्टँड, वेंगुर्ला बिच असो की अगदी एस.टी. बस मधले प्रवासाचे सीन असो, सिक्स सिटर मधले सीन असो की वच्छीचं घर, पाटणकरणीची दोन्ही घरं, नेने वकिलांचं घर, ताकाचा गुत्ता.. प्रत्येक भागात केवळ वाडाच दाखवत न बसता या सर्व घरांत आपण सहज फिरुन येत होतो.. असा सिझन पुन्हा होणे नाही. सर्व पात्रे अतिशय चपखल निवडली होती आणि अगदी शेवटच्या भागातही त्यांचं (भुतांच्या भासात का होईना) दर्शन झालं... खरच किती योग्य पद्धतीने सोडलेले धागे पुन्हा एकवटुन घेतले.. वच्छी, आबा अन मृत्युपत्राची भानगड तशीच सोडुन दिली म्हणा.. पण कदाचीत तीच नवीन सिझन ची सुरुवात असेल.
मला तरी दुसरा सिझन पेपर वर्क
मला तरी दुसरा सिझन पेपर वर्क मधे अतिशय उजवा आनि झगमगाटी वाटला. .................असा सिझन पुन्हा होणे नाही.
१००% सहमत
माझ्या मते सिझन ३ काढणारच
माझ्या मते सिझन ३ काढणारच असतील तर भूतकाळात न जाता नाईकांच्या तिसर्या पिढीला घेऊन काढला तर रंजक होईल. म्हणजे माधवचा मुलगा आणि दत्ताची दोन्ही मुलं. माधवच्या बायकोला अटक झाल्यामुळे तो काही दिवस मुलाला घेऊन कोकणात आलाय. किंवा लॉ़कडाऊनमध्ये कोकणात आलाय. आणि मग तिथे चालू होणारं खुनाचं सत्र किंवा भानामती वगैरे प्रकार हे तिघं मिळून सोडवतात असा काहीतरी प्लॉट जमू शकतो. अभिराम आणि त्याची चायनीज दिसणारी बायको नसले तरी चालतील. नाहीतरी चायनीज गोष्टींवर बंदी आहेच सध्या सुशल्याचा उपयोग दाल काली करायला होईल. वच्छी आणि आबा जिवंत आहेत की काय असं पिल्लूही सोडता येईल कथानकात. रघूकाकाने माईला काहीही सांगितलं तरी त्याचे सगळे धंदे पूर्वीसारखेच चालू असल्याने तोही हवाच. वकिल शक्यतो नको. अभिरामाचा तो पोलिस मित्र असेल तर बरं. छायाचं शुभमंगल व्हावं ही इच्छा.
@ स्वप्ना_राज : भारीच की...
@ स्वप्ना_राज : भारीच की... असंच व्हायला हवं. छान जमेल प्लॉट
अभिराम आणि त्याची चायनीज दिसणारी बायको नसले तरी चालतील.>> हो हो अगदी.. तसाही अभिराम यु.पी.एस.सी. करतोय म्हटल्यावर त्याची अपॉईंटमेंट कुठेतरी जिल्ह्याच्या ठिकाणीच होईल म्हणा..
वकिल शक्यतो नको. >> त्याला निलमीने आधीच मारलाय.... त्यामुळे काळाजीच मिटली..
_____________________________________________
बाय द वे... मी झी युवावर पहिला सिझन बघणं सुरु केलंय... त्यात अभिराम त्याच्या पोलिस मित्राला सांगत होता की घरात अडिचशे तोळे सोनं आहे म्हणुन अगदी दत्ता-छाया-माधव-अभिराम-सुसल्या सगळ्यांना वाटुन दिलं तरी २५-२५ तोळे सोनं येईल.. मग का उगीच सुसल्याला सोनं देत नाहीत ते..? २५ तोळे घेऊन ब्याद घरातुन निघुन तरी जाईल एकदाची.
बाकीच्या मालिकांचे धागे दिसत
बाकीच्या मालिकांचे धागे दिसत नाहीत म्हणून इथेच लिहितोय. आज लोकसत्तेत पहिल्या पानावर झीच्या नवीन मालिकेची जाहिरात आहे.
आज सुरू होतेय. लाडाची मी लेक गं.
बिग बॉसमधला भुवया जुळलेला आणि रडकाचिडका आरोह वेलणकर आणि स्मिता ता़ंबे ओळखता आले.
कोणती मालिका संपली?
नवीन मालिकेसाठी अजून धागा कसा नाही आला?
Pages