रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोक णात ला माल पण खायला आता कसे तरी वाटू लागले आहे. कोणत्या शेतात कोणत्या कलमाखाली कोणाला पुरले असेल असे वाटून कसे तरी होते. >> अमा, तुम्ही सिरिअल सुरु व्हायच्या आधीचा डिस्क्लेमर वाचलात का..? प्रत्येक गावात साधी-भोळी आणि गळ्यात गोड शहाळी असणारी ४ टाळकी सोडली तर बाकी सगळे भन्नाटच असतात ना..?? Wink
एवढं मनाला लावुन नाही घ्यायचं.. या मालिकेत कृत्रीमपणा फार कमी आहे असं मला तरी वाट्तं Bw

डीजे काय हे
1 जिथल्या तिथे थिजली Rofl Rofl Rofl Rofl
ही सरिता मोकळी कधी होणार Rofl Rofl Rofl
हसून हसून डोळ्यातून पाणी आलं.
पोष्ट्याला रात्री मारतो ना अण्णा, मग त्याचं शरीर फुगणार नाही का सकाळपर्यंत.

पोष्ट्याला रात्री मारतो ना अण्णा, मग त्याचं शरीर फुगणार नाही का सकाळपर्यंत.>> लगेच नसेल वाटतं फुगत. त्यात तो पोष्ट्या एकदम पाप्याचा पितर. फुगून फुगून कितीसा फुगणार? असो..
*******
कालच्या भागात पोष्ट्याचं मढं बघून घाबरलेली सरिता अन् दत्ता घरात येतात आणि तिची ही अवस्था पाहून माई त्यांना काय झालं म्हणून विचारते. तेव्हा दत्ता तिला पोष्ट्याचा कुणीतरी खून केला असं सांगतो. मग माई जी गळा काढते की काही विचारू नका (पोष्ट्यसाठी त्याची बायको पण एवढं रडली नसेल. Uhoh ) . पोरांच्या आणि सूनेच्या देखत बैठकीच्या खोलीत भुईवर त्या पांढऱ्या नक्षी शेजारी बसून माई पोष्ट्याच्या आठवणी काढकाढून रडत असते नेमके तेव्हाच आण्णोबा जिन्यावरून खाली येतात. रडारड बघून काय झालं ते विचारतात तर दत्ता पोष्ट्याबद्दल सांगतो. मग आण्णा "घरची माणसं शाबूत आसात ना? मगे सुतक पाळून गळो कित्या काडता?" असं विचारून माईची हवाच काढतो.

तिकडे पोलीस इन्स्पेक्टर पोष्ट्याच्यां खुनाच्या चौकशीसाठी गावात टाटा सुमोतून फिरत असतो. ती चौकशी चोंट्या ऐकतो आणि पाटणकरणीच्या घरी जाऊन पोष्ट्याला कुणी मारलं असेल असं विचारतो. तेव्हा पाटणकरीण त्याला आण्णानेच मारलं असं सांगते. तेवढ्यात बाहेर नाईकांच्या वाड्यात पोलीस गाडी येते आणि ते बघून चोंट्या घाबरतो आणि शोभाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात सहभागी असल्याने आपलीही चौकशी करतील म्हणून भिऊन कॉट खाली लपतो.

इकडे आण्णा बेमुर्वतखोरपणे इन्स्पेक्टरला अजिबात न घाबरता सामोरा जातो. पोलिसाचा पार पाणउतारा करून ठेवतो. मग इन्स्पेक्टर पाटणकरणीच्या घरी जातो. पाटणकरीण शिताफीने त्याला बाहेर अंगणातच बसवते (आत कॉट खाली चोंट्या लपलेला असतो ना..!) आणि पोष्ट्याबदल कढ काढून बोलते. तेवढ्यात तिला अण्णा गॅलरीत उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत असलेला दिसतो. तसा त्याला अजुन खिजवण्यासाठी ती इन्स्पेक्टरच्या शर्टवर काहीतरी पडलंय असा बहाणा करत ते झटकण्याचा प्रयत्न करत त्याच्या जवळ जाते अन् हळू आवाजात त्याच्या प्रश्नांना उत्तरं देते. अण्णाला वाटतं हिने खरं काय ते सांगितलं की काय..! मग पोलीस निघून गेल्यावर अण्णा रात्री तिच्या घरी जातो तेव्हा ती माईने तिचा कसा आणि किती अपमान केला याचा हिशोब लावत बसलेली असते. आण्णा तिला विचारतो की तिने पोलिसांना खरं सांगितलं का ते आणि तिचा गळा पकडतो. पण ती महाजांबाज बाई त्याला प्रेमाच्या गुंत्यात अडकवून गळ्यात मंगळसूत्र बांधा म्हणते तेव्हा आण्णा चांगलाच खुलतो.

प्रीकॅप मध्ये पाटणकरीण खुशीत बाहेर जाणार असते तेवढ्यात चोंट्या येतो आणि खुशीत असलेल्या तिला कुठे निघाला म्हणून विचारतो. तेव्हा ती बाजारात जाऊन हळद, कुंकू, चुडा, मुंडावळ्या इत्यादी आणायला निघाले असं सांगते. तर तो तिला विचारतो की सुषमा तर अजुन लहान आहे मग इतक्यात ही लग्नाची तयारी कशासाठी म्हणून तेव्हा पाटणकरीण हे सर्व स्वतःच्या लग्नसंदर्भात करतेय असं सांगते. आता आज काय होतं ते बघुया.

शेवंताला कसं माहित की अण्णानेच पोष्ट्याला मारले आहे Uhoh आज शनिवार असल्यामुळे मालिका बघायला मिळणार.

अहो चंपा, पाटणकरणीच्या घरात पोष्टया आण्णाला पाणी भरताना बघतो. पाटणकरणीने मुद्दाम पोष्ट्यासमोर अपमान केलेला असतो. त्यामुळे आपली बदनामी होईल या विचाराने अण्णा पोश्ट्याचा खून करतो. जाऊद्या कुठल्या का कारणाने असेना पोश्ट्याचं दिगंतरी एक्सप्रेस चे तिकीट कन्फर्म झालं हे किती छान झालं ना Proud

आजच्या भागात अचानक वच्छी आली अन् संथ झालेल्या पाण्यात अचानक खळबळ माजवली.

भाग सुरू झाला ते पाटणकरणीच्या घरात. पाटणकरीण आण्णाला गळ्यात मंगळसूत्र बांधा म्हणून हट्ट करते आणि आण्णा हसत घराबाहेर पडतो. कालच्या प्रेकॅप मध्ये दाखवल्याप्रमाणे चोंत्याला ती तिच्या लग्नाच्या खरेदीला बाजारात जाते असं सांगून बाहेर पडते.

तिकडे वच्छीच्या मांगरात वच्छी दचकून झोपेतून उठते अन् ओरडू लागते. आबांनी विचारल्यावर आण्णा तिचं घर हिसकावून पाटणकरणीला देणार असं सांगते. आता तिला अन् आबाला रस्त्यावर यावं लागेल असं बोलते. पण अबा तिला असं काही होणार नाही असं बोलून अश्वस्त करतो.

नंतरच्या फ्रेम मध्ये सावंतवाडी चा एरियल व्ह्यु दाखवलाय. मोती तलावाच्या पार्श्वभूमीवर शांत आणि निसर्गरम्य सावंतवाडी अतिशय सुंदर दिसते. मग कमेऱ्यासोबत आपण सावंतवाडीच्या बाजारपेठेत शिरतो तर पाटणकरीण एका दुकानासमोर खरेदी करत असते. अचानक तिला कोणीतरी मागे खेचते अन् तिच्या चेहऱ्यावर शेण फा सते. ती शेण फासणारी वच्छी असते. गर्दिसमोर ती पाटणकरणीला तिच्या एकनएक चुकीची आठवण करून देत खूप सूनावते. आबा येऊन वच्छी ला शांत करून घेऊन जातो. जमलेल्या लोकांपुढे इज्जत गेली म्हणून पाटणकरीण रडत पोलीस स्टेशन मध्ये येते अन् इन्स्पेक्टर कडे तक्रार देते. त्यावेळेस नेने काका पण तिथं आलेला असतो. मग नील्याच्या ताकाच्या गुत्त्यात नेने वकील आण्णा ला पोलीस स्टेशन मध्ये पाटणकरणीला बघितलं आणि तिच्या पासून सावध रहा असं सांगतो.

मग आण्णा रात्री घरी येताना पाटणकरणी च्या घरात येतो अन् तो तिच्याशी लग्न करेल तो पर्यंत वाट बघ असं सांगतो. हे ऐकुन पाटणकरणीला खूप आनंद होतो.

आजच्या भागात माई, छाया, दत्ता, सरिता, माधव, पांडू यांच्या पैकी कोणीच दिसलं नाही. Uhoh

प्रिकॅप मध्ये अण्णा पाटणकरणीचे डोळे बांधून गळ्यात मंगळसूत्र च काय इतर दागिने पण घालतो असं बोलत असतो आणि हे सर्व चोंट्या खिडकीतून बघतो असं दाखवलं. आता सोमवारी काय होतं ते बघावं लागेल.

अण्णा लग्न करतो वाटतं शेवंताबरोबर. लग्न म्हणजे नुसतं मंगळसूत्र घालणार तेही घरातच एखादा हार घालावा तसे. शेवंती एवढ्या हौसेने बाजारात जाते आणि ती वेडी वच्छी सगळा रंगाचा बेरंग करते. मला फार दया आली शेवंताची, लग्न तर राहूच दे, कुणी खरेदीसुद्धा मनासारखी करू देत नाही. गर्दीतील प्रेक्षक स्माईल देत होते Happy नेने किती नीच आहे, त्याला नक्की काय हवे आहे, नुसती मजा बघायला मिळावी म्हणून तो अशा काड्या करत राहतो का. अण्णा ही नेनेवर लगेच विश्वास ठेवतो, शेवंताला एकदाही विचारत नाही की ती पोलिसात का गेली होती आणि ती पण येडी सांगत नाही स्वतःहुन.

तेरवाच्या भागात चोंट्या पाटणकरणीला समाजावुन सांगतो पण ती आण्णाशी लग्न करण्याच्या विचारातुन बाहेर येत नाही. नंतर आण्णा पाटणकरणीला मंगळसुत्र आणुन देतो. दत्ता पेढीत जाऊन घरी आल्यावर माई त्याला मंगळसुत्र आण्लं का म्हणुन विचारते. दत्ता माईला सांगतो की पेढीवरुन आण्णाने आधीच मंगळसुत्र नेलेलं आहे. मग काळजीत पडलेली माई तरातरा वर आण्णाच्या खोलीत जाते आणि त्याला मंगळसुत्राबाबत जाब विचारते. आण्णा पण ते मंगळ्सुत्र तिच्या सवतीला देणार असं सांगुन तिच्या हातावर मंगळसुत्र ठेवतो. ते मंगळसुत्र बघुन माईला खुप आनंद होतो आणि आण्णा पण बेरकी हसं दाबतो. (आता त्या दोन मंगळसुत्रातलं खरं कोण्तं ते आण्णालाच ठाऊक.. Uhoh )

परवाच्या भागात माई अन सरिता रव्याचे लाडु वळत बसलेल्या असतात तेव्हा माधव येतो आणि माईकडुन लाडवांची रेसिपी लिहुन घेतो. त्यानंतर माडीवर जऊन तो सुषमाला पत्र लिहितो की तिने लवकर इकडॅ येऊन हे लग्न थांबवावं. मग पोष्टात जाऊन ती चिठ्ठी सुषमाला पाठवतो तेवढ्यात नवा पोष्टु माधवाजवळ येऊन जुन्या पोष्ट्याची कड काढतो. नवा पोष्टु माधवाला पाटणकरणीबद्दल विचारतो आणि ती यांच्या शेजारीच रहायला आलिये ना हे कन्फर्म करुन घेतो. कन्फर्म होताच तिची ४ पत्रे माधवाच्या हाती ठेऊन पोहोच कराल का म्हणुन उंटावरुन शेळ्या राख्तो. (जुना पोष्ट्या याची पत्रे त्याला आणि याची पत्रे त्याला करत होता आणि उरलेली पत्रे पाटणकरणीकडुन क्लासिफाय करत होता. हा नवा पोष्टु तर डायरेक्ट पोष्टातुनच ग्राहकांकरवी इतरांची पत्रे पोहोच करु लागला हे बघुन धन्य झालो.!)

मग माधव पाटणकरणीकडे जाऊन तिला आण्णासोबत लग्न न करण्याची तंबी देतो. सुषमाचा विचार करा म्हणुन सांगतो पण शेवटी पालथ्या घड्यावर पाणी. तिकडे चोंट्या वच्छीकाकीच्या घरी जाऊन तिने पाटणकरणीच्या तोंडाला शेण का फासलं विचारुन असं करु नको म्हणुन सांगतो तशी वच्छी त्याला चारीमुंड्या चीत करुन परत पाठवते. Proud

कालच्या भागात माई+दत्ता+माधव्+सरिता+छायाची दिवाणखाण्यात छान जुगलबंदी रंगलेली असते. एकमेकांची कळजी+कोपरखळी मारत घेतलेल्या फिरक्या बघुन यांच्यासोबत असंच दिवाणखान्यात अजुन थोडं रेंगाळावंसं वाटलं तेवढ्यात पाटणकरणीने माधवाला ३ वेळा फोने केला. कुणाचा फोन असं विचारणार्‍या सरिताला चुकवताना माधवाची त्रेधातिरपीट उडाली. बाहेर येऊन एकदाचा तो फोन उचलतो आणि पाटणकरणीला त्याच्या सोबत बोलायचं असतं आणि ती हे सर्व का करते हे सांगायचं असतं.

इकडॅ चोंट्या पाटणकरणीच्या घरी येतो तर ती आवरुन बाहेर निघालेली असते. तिला तो कुठे निघालात असं विचारतो तेव्हा ती घोडामैदान जवळ आल्याची आठवण करुन देते. चोंट्या तिला पुन्हा विचार करा. इंदुकाकीचा संसार मोडु नका. आण्णा चांगला माणुस नाही हे समजाऊन सांगतो पण पुन्हा एकदा पालथ्या घड्यावर पाणी. त्यानंटर पोलिस पण पाटणकरणीच्या घरी चक्कर टाकतात. वच्छीनं तिच्या तोंडाला शेण फासलेलं असतं म्हणुन त्या केस बद्दल तिला भेटायला आलेले असतात. आण्णा वरुन हे सर्व बघत असतो तेव्हा पाटणकरीण पोलिसाला हळु आवाजात काही लगलं तर फोन करेन असं सांगते.

मग आण्णा तिजोरी चेक करतो पण ती रिकामी असते (माईने सगळा मुद्देमाल तिच्या ताब्यात घेतलेला असतो) आणि म्हणुन तो पैसे मागायला नेने काकांकडे जातो. नेने त्याला पैसे देतात ते घेऊन तो पाटणकरणीकडे येतो आणि तिच्या हातात ती बंडलं ठेवतो. खुशीने पागल झालेली पाटणकरीण लग्नाची स्वप्ने रंगवत आस्ते तेव्हा आण्णा तिला 'योग्य वेळेची' आठवण करुन देतो.

प्रीकॅप मधे आज सुषम आकेरीला येणार आहे. ती आधी तिच्या घरी जाते (तिला पाटणकरीण नवीन ठिकाणी रहायला आली हे माहित नसते ना..!) तेव्हा त्या घराला कुलुप असते. मग भांबावलेली सुषमा नाईकांच्या वाड्यात येते आणि माईला हाक मारते. माई अंगणात येते तशी तिच्या पोटाला बिलगुन सुषमा रडु लागते. आई घरी नाही आणि घराला कुलुप आहे असं सांगत असतानाच सर्व जण सोप्यात पोचतात आणि सुषमा माईला बिलगलेली पहाताच सरिताच्या रागाचा पारा नेहमीप्रमाणेच चढतो. ती तरातरा पुढे जाऊन सुषमाला माईपासुन बाजुला खेचते आणि बाहेर हाकलते. या प्रकाराने भांबावलेली सुषमा अजुनच खचते आणि रडत रडात सर्वांना ही तिच्याशी अशी का वागते असं विचारते. माधवने पत्र पाठवुन तिला बोलावुन घेतलं असं सांगितल्यवर माधव चपापतो आणि सर्व त्याच्याकडे पाहत आहेत असं दाखवलं. आता आज काय होतंय हे बघायचं.

हुश्श..! Biggrin

https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2104429/ratris-khe...

कालच्या भागात पाटण करीण जुने फोटो बघत कमलाकर ला याद करत असते तेव्हाची बासरीची धून फार फर्स्ट क्लास आहे. मी आज जाउन परत ऐकेन. सुषमा किती क्यु टपणे पिशवीत सामान घेउन येते. बिचारी. तिची दुर्दशा चालू झाली आहे.

हो अमा... तो जुने फोटो पहातानाचा सीन मस्त जमलाय. पण आपल्याच चुका पुन्हा पुन्हा घोकुन नव्या चुका करताना पाटणकरणीला कहीच कसे वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं. एक आबा, माधव आणि चोंट्या सोडला तर कोणीच विचारी दाखवला नाही.

पण आपल्याच चुका पुन्हा पुन्हा घोकुन नव्या चुका करताना पाटणकरणीला कहीच कसे वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं. >> व्यसनी माण सा सारखे झाले आहे दोघांचे. द रिलेशन शिप इज राँग ऑन ऑल काउंट्स. हकनाक माणसे मेलेली आहेत त्यामुळे पण दोघांना एकमेकांबद्दल वाटणारे
आकर ष ण इतके स्ट्राँग आहे की दोघे विवेक बुद्दी सोडून बसले आहेत. आधी दोघे काही विचारवंत हुषार नाहीत. इट इज अ म्युचुअली
डिस्टृ क्टिव्ह डायाड. विनाशच होणार. काही जोडपी एक मेकांबरोबर स्वर्ग निर्माण करतात उदा ( अभय राणी बं ग/ आमटे जोडपे

काही नरक, त्यातले हे आहेत.

रात्रिस खेळ चाले मधली सगळीच जोडपी एकाचढ एक आहेत. वच्छीच्या चुकांमुळे तिचा संसार उध्वस्त झाला. शोभामुळे शोभाचाच. माईमुळे माईचा. छायामुळे छायाचा, पाटणकरणीमुळे पाटणकरणीचा, निलमीमुळे माधवचा एक सरिताच काय ते दत्तामुळे अजुन कसाबसा संसार टिकवुन आहे.

>>काही जोडपी एक मेकांबरोबर स्वर्ग निर्माण करतात उदा ( अभय राणी बं ग/ आमटे जोडपे काही नरक, त्यातले हे आहेत.<< अमा किती तो संताप म्हणायचा तुमचा Lol

कालच्या भागात सगळा फोकस सुषमा वर होता. सुषमा आधी पाटणकरणीच्या जुन्या घरी गेली अन तिथ रहाणार्‍या जहांबाज बाईने अतिषय निष्ठुर वागत तिला तिथुन हाकलुन लावले. त्यानंतर सुषमा वच्छीच्या घरावरुन जात असताना तिला वच्छीसोबत वाद घातलेले आबा तिथुन निघुन जाताना दिसतात. वच्छीच्या घरासमोर घुटमळत थांबलेली सुषमा वच्छीने बोलावल्यावर तिच्या घरात जाते. वच्छी पण तिच्याशी आगत्याने बोलुन तिला पाणी वगैरे पाजते. त्यानंतर तिची विचारपुस करताना पाटणकरणीचा विषय निघताच वच्छीचा ताळतंत्र सुटतो आणि ती सुषमाला खुप लागेलसे बोलुन घरातुन हाकलुन लावते. या प्रकारामुळे भांबावलेली सुषमा नाईकांच्या वाड्यात निघते.

नाईकांच्या वाड्यासमोर उभं राहुन ती माईला हाक मारते तशी माई सोप्यात येते. तिला बघुन सुषमा माईच्या पोटाला बिलगुन रडु लागते तेव्हा माई ह्या पोरीला पोटाशी धरु की बाजुला सारु या द्विधेत सापडते. सुषमा तिला आई कुठं आहे असं विचारत असते आणि पाणी मागते तेवढ्यात सरिता तिथं पोचते आणि पाणी आणायला वळणार्‍या माईला आडवत सुषमाची खरडापट्टी काढते. तेवढ्यात दत्ता अन छाया तिथं पोचतात पण ते गप्प रहातात. माधव पण येतो. तो सरिताला असं वागु नको ती लहान आहे असं सांगतो. झाल्या प्रकाराने सुषमा खुप घाबरते आणि माधवला त्याने पत्र पाठवलं म्हणुन इथं आले असं रडत रडत सांगते. तिचं हे बोलणं ऐकुन सरिता माधववर जाम भडाकते. माई पण निष्ठुर वागत सुषमाला वाड्यात यायला बंदी घालते. सुषमा रडत रडत तिची आई कुठं आहे असं विचारते तेव्हा सरिता फणकार्‍याने "समोरच्या खोपटात" असं सांगुन सुषमाला बाड-बिस्तारा घेऊन सोप्याबाहेर काढते. रडवेली सुषमा पाटणकरणीच्या घरापुढे बराच वेळ वाट बघत बसते. तिला कुणी ना पाणी विचारतं ना खाणं-पिणं. नाईकांच्या वागण्याने चिडलेली सुषमा एक छोटा दगड घेऊन वाड्यावर भिरकावते तेव्हा कुठं तिच्या मनाला बरं वाटतं. संध्याकाळ झाली तरी आई येत नाही हे बघुन ती आईला चिठ्ठी लिहिते आणि दाराच्या फटीतुन आत सरकावते.

तिकडे पाटणकरीण सावंतवाडीला खरेदीसाठी जाते. पुन्हा तोच एरिअल विव्यु ऑफ सावंतवाडी विथ मोती लेक मनाला सुखावतो आणि आपण कॅमेर्यासोबत बाजारपेठेत घुसतो. तिथं पाटणकरीण सुषमा साठी गोष्टीची पुस्तकं आणि फ्रॉक्स घेते. तिची खरेदी व्हायला बराच वेळ जातो आणि संध्याकाळ होते. आकेरीला जाण्यासाठी ती ५-६ रिक्षावाल्यांना विचारते पण कोणीच तयार होत नाही (ज्या रस्त्यावर ती रिक्षावाल्यांना आकेरीसाठी येणार का विचारत असते त्या रस्त्याच्या दुसर्‍या बाजुलाच एस.टी. स्टँड आहे आणि कुडाळला जाणार्‍या सर्व बसेस आकेरीहुन जातात तरी ही स्टँड्कडे न फिरकता रिक्षेसाठी टाईमपास करत बसते..! Uhoh ). शेवटी एक रिक्षा मिळते आणि रात्री ती घरी पोचते.

प्रेकॅप मधे आज पाटणकरीण वाड्याच्या सोप्यात येऊन "नाईक....!! Angry " अशी दात ओठ खात रागाने हाक मारते. तिची हाक ऐकुन आधी माई अन मग बाकी सगळॅ बाहेर येतात,. माई तिला सोप्यात यायची हिम्मत कशी झाली म्हणुन विचारते अन दत्ताही तिला दम भरतो. त्यावेळेस पाटणकरीण दत्ता अन माईवर डाफरत सुषमाला दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल जाब विचारते. आण्णोबा वरुन हे सर्व बघत असतो तेव्हा पाटणकरीण सुषमा ही नाईक फॅमिलीची वारस आहे आणि तिला तिचा हक्क मिळालाच पाहिजे असं म्हणत सर्वांना दमात घेते. आता आज काय होतं ते बघणं औत्सुक्याचं ठरणार यात शंकाच नाही.

ह्म्म... धन्यवद डि जे... बघतो आता झी ५ वर. Wink
पाटणकरीण आणि चोंट्या दोघे थोड्या फार फरकाने जातील बहुदा ढगात... प्रश्न हा पडला आहे माका, की पांडोबा ह्या सीजन चा एंड कसा करणार ते.

टणकरीण आणि चोंट्या दोघे थोड्या फार फरकाने जातील बहुदा ढगात>. ते जाडे धूड झाडावरून लट कलेले कसे दाखवतील फांदी तुटेल की.

@ अमा : Biggrin

@ हरणखेडकरजी: मला वाटते पहिला सिजन एंड झाला त्यात आण्णा आणि पाटणकरीण कसे मेले ते कळालं नव्हतं. या सिजन मधे पहिल्या सिजन च्या एंड चा भाग पुन्हा दाखवुन ही २ जणं कशी मेली ते सर्वांना सांगायला हवं. जरी आत्ताच्या सिजनच्या पहिल्या भागात आण्णा हार्ट अ‍ॅटॅक ने मेलेला दाखवला असला तरी एवढ्या जणांचे खुन करुन तो असा आरामात मेलेला नसावा. मला तर वच्छीवर जाम शंका येतेय. वच्छीने काहितरी देऊन आण्णाला ढगात पाठवले असणार असं वाटतंय. या सर्वाचा उलगडा सिजन २ चा शेवटचा भाग दाखवुन करायला हवा. निलमीसोबत वच्छी पण तुरुंगात जायला हवी. पांडु नक्कीच ट्विस्ट ठेवेल जसा पहिल्या भागात निलमीला तुरुंगात पाठवुन ट्विस्ट दिला होता तसा.

सुसल्या किती गोड दिसते आणि छान मराठी बोलते. पहिल्या सीझन मध्ये उगीच तिला खेडवळ लुक दिला आहे. मी तर वीकांताला जुने भाग बघते. एपिसोड १५ पासून पुढे. एपि सोड ४२ वन नाइट स्टेंड आहे त्यात शेवंता जबरी दिसते. बारीकही होती तेव्हा.

@ सस्मित : हो.. वच्छी मेलेल्यात दिसत नाही. माधवचे लग्न झाले आहे पण त्याला गावात रहायचं आहे थोडे दिवस. काहितरी काम आहे म्हणे. निलमीनंच त्याला काहितरी काम सांगितलं असणार. निलमीची हाव नाईक कुटुंबियांची वाताहत करते हे पहिल्या सिझन मधे दिसलेलं आहेच. तिचीच फूस असणार माधवला की गावी थांबुन सगळ्या जमिनींचे सातबारे घेऊन ये म्हणुन आणि हे येडं पण थांबलंय गावी "हो...हो.." करत.

पण हा भलतेच सातबारे काढत बसलाय Lol
वच्छी मेलेल्यात दिसत नाही.>.ओके.
पहिला सिझन त्या लहान्याच्या लग्नाने सुरु झालेला. त्याचं नाव जाम आठवत नाहीये आता लगेच.
सगळा ड्रामा झाल्यावर निलीमा कलप्रिट दाखवलेलं ते जामच हास्यास्पद होतं. डोंगर पोखरुन उंदीर प्रकार झालेला तो.

असुद्या हो सम्सित. एवढं चविने वर्षभर पहिला सिझन बघितल्यावर शेवटी चोथा झाला असं म्हणणं बरं दिसत नाही Wink आपण त्याला 'काय ट्विस्ट होता' असं म्हणु Biggrin

काही म्हणा पण मागच्या पेक्षा हा सिझन भारी पॉलिशड आहे. मागच्यापेक्षा या सिजनचं टायटल साँग एक्दम भारी आहे. कथाही मजबुत आहे. शुटींग पण एक्दम सॉल्लिड. आण्णा अन शेवंता, आबा अन वच्छी, पण लय झॅक. अजुन काय पायजे म्हणता मग Proud

आपण त्याला 'काय ट्विस्ट होता' असं म्हणु>> एक अ‍ॅडीशन 'काय फालतु ट्विस्ट होता' Happy
मागच्या पेक्षा हा सिझन भारी पॉलिशड आहे> >>> +१ मी बघत नाही. इथेच वाचते.साधारण छायाचा नवरा मेला तिथपर्यंत बघितली.

अभिराम ल हान पणी काळा बसक्या नाकाचा. पण मोठा आहे तो गोरा तरतरीत नाकाचा अति उत्साही. कबी कुशी कबी गम मध्ये कसे जाडा

मुलगा मोठा होउन ह्रितिक रोशन!! तसे वाटलेले.

हो बरोबर. पण तो शिकायला गेलाय तो डायरेक्ट मोठा होउनच येणार वाटतं. सुट्टीला येणं नाही. माईपण विसरली त्याला.

Pages