Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेने वकील अचानक बदलले आज
नेने वकील अचानक बदलले आज
पोलीस असा कसा काही पुरावा नसताना आत टाकायच्या गोष्टी करतो. चोंत्याचं नक्की काय केलं अण्णाने. तो चोंत्या पायरीवर बसून शेवंताशी बोलत असतो तेव्हा मला वाटलं त्याचं भूत आहे कारण तो अचानक गायब होतो. शेवंता आत्महत्या कधी करते ते बघायचं आता.
मी इंस्टावर पांडबाला फॉलो
@ चंपा, मी इंस्टावर पांडबाला फॉलो करतो. त्याला मी नेने काकांबद्दल विचारलं तर तो म्हणे हेल्थ इश्युमुळे त्यांना बदलावं लागलं. आता ते बरे आहेत.
जुने नेने काका पुन्हा लवकरच शूटिंग करू शकतील अशी आशा करूया.
@svalekar धनयवाद
कालच्या भागात पाटणाकरीण
कालच्या भागात पाटणकरीण जेंव्हा चोंट्याच्या घरी पोचते तेव्हा तिथं कोणीच नसतं. फक्त जमिनीवर सांडलेला भात आणि बाजुलाच पडलेला आण्णाच्या गळ्यातील पंचा असतो. शितावरुन भाताची परिक्षा करण्यात आपण जसे माहीर असतो तशीच पाटणकरीण पण...! ती पण डोकं लावते अन आण्णाने चोंट्याचा जीव घेतला असेल असा निष्कर्ष काढत घरी निघते. रात्रीच्या अंधारात तिला रस्त्याकडेला एका पायरीवर चोंट्या मलुल चेहर्याने बसलेला दिसतो. ती त्याला तो कुठं गेलेला असं विचारुन त्याने लग्नाचा साक्षीदार म्हणुन तिची साथ द्यायला हवी असं सांगते. साक्षीदार म्हणुन तिच्या सोबत वाड्यावर चल असं म्हणते. पण चोंट्या तिला नकार देत काळजी घ्यायला सांगतो. ती त्याला समजावुन तिच्या सोबत यायला सांगते पण अचानक तो गायब होतो. ती त्याला सगळीकडे शोधते पण तो सापडत नाही. तिला वाटतं की तिला त्याचा भास झाला. (आपलाही असाच ग्रह होतो..!
)
मग दुसर्या दिवशी सकाळी सकाळी ती थेट पोलिस स्टेशन गाठते. इन्स्पेक्टर मंगेश जाधव साहेब अजुन टेबलवर आलेले नसतात तेव्हा त्यांची वाट बघत ती तिथंच बसते. पोलिसांकडे आण्णाची तक्रार करावी अन तिच्या लग्नाचा पुरावा असलेल्या चोंट्याला आण्णाने मारले असं सांगावं तर आण्णाचे पहिले लग्न झालेले आहे हे माहित असतानाही त्यांच्याशी दुसरं लग्न करण्याच्या गुन्ह्यात ती स्वतः अडकेल हे लक्षात आल्यामुळे ती सावध होते अन गळ्यातील मंगळसुत्र काढुन साडीच्या पदराच्या टोकाला गाठ मारुन त्यात ठेवते. इन्स्पेक्टर ला फक्त एवढंच सांगते की चोंट्याला गायब करण्यात आणि त्याचा खुन करण्यात खात्रीशीरपणे आण्णाच सामील आहेत. मग इन्स्पे़क्टर्च्या २-४ उलट्या-सुल्ट्या प्रश्नांना धीरोदत्तपणे उत्तरं देत त्याला ती चोंट्याच्या घरी पुरावा ताब्यात घ्यायला चला म्हणते. तोही लगेच जीप काढुन तिच्या सोबत चोंट्याच्या घरी पोचतो. तिथं पुन्हा तेच सांडलेला भात, आण्णाचा पंचा पाहुन पुरावे ताब्यात घेतले जातात. तिथं जमलेल्या माणसांना चोंट्या शेवटचा कधी दिसला असंही विचारतात. त्यानंतर पाटणकरीण अन इं. जाधव पोलिस गाडीत बसुन वाड्यावर येतात. भर पावसात वाड्यासमोर गाडी थांबते अन ओसरीत झोपाळ्यावर बसलेल्या आण्णाला च्याय देणारी माई आता ही बया पोलिसांना घेऊन इथे का आली या प्रश्नात पडते.
पोलिस आण्णाला चोंट्याविषयी अन त्याच्या गायब होण्याविषयी पोलिशी खाक्यात प्रश्न विचारतो त्याची शिताफिने उत्तरे आण्णा देतो. चोंट्याचा खुन करण्यात आण्णाचा हात आहे असे सांगताच माई आरडा ओरडा करत पोलिसांपुढे आण्णाची वकिली करते अन छाया ही आफत पाटणकरणीने आणली असं बोलते. दत्ता पाटणकरणीने हे खोटे आरोप आण्णावर लावले असं बोलत तिच्या अंगावर धाऊन जायला बघतो तसा इन्स्पेक्टर दत्ताला पोलिशी हिसका दाखवुन त्याचा जागेवरच पुतळा करतो. सरिता देखील दत्ताला मागे खेचत शान्त करते. मग इन्स्पेक्टर आण्णाला घेऊन स्टेशनला जातो तर मागे राहिलेली पाटणकरीण आता ह्या घरावर रोज नवीन संकटे कशी येतात ते बघा..!" असा दम देत स्वतःच्या घराकडे जाते. तिचा दम ऐकुन माई, दत्ता, सरिता, छाया सगळेच चिंताग्रस्त होतात.
तिकडे पोलिस स्टेशनात आण्णा इन्स्पेक्टर समोर बसलेला असताना गुर्मीत बोलु लागतो तसा खवळलेला इन्स्पेक्टर त्याच्या कॉंस्टेबल रणदिवेला बोलावुन आण्णाला लॉकप मधे न्यायला लावतो. काँ. रणादिवे असहाय्यपणे नजर चोरुन फक्त उभा रहतो ते बघुन आण्णा छदमि हसतो. मग इं. मंगेश जाधव स्वतः उठुन आण्णाचा हात पकडुन त्याला लॉकप मधे नेऊ लागतो तेवढ्यात तिथं बदललेले नेने वकील येऊन आण्णाची बाजु घेतात. (हा नवा नेने वकील बघताक्षणी धक्का बसला... हा माणुस नेने म्हणुन नको नको होतो अगदी
. नेने काका परत या परत या असं ओरडावसंही वाटलं त्या शॉटला...
). जो माणुस मेलाच नाही त्याच्या खुनाच्या केस मधे आण्णाचं नाव कसं घालता म्हणुन इन्स्पेक्टरला विचारतात. आन त्याच वेळेस चोंट्या तिथं येतो.
इन्स्पेक्टर चोंट्याला आण्णा रात्री त्याच्या घरी आले होते का असं विचारतो तर घाबरलेला चोंट्या त्याला नाही असं सांगतो. ते ऐकुन इन्स्पेक्टरचा सगळा आवेश मावळतो अन आण्णा छद्मी हसत नेने वकिलांकडे बघतो अन एपिसोड संपतो.
)
(चोंत्याचं तत्काळ कन्फर्म तिकिट निघालं असलं तरी दिगंतरी एक्सप्रेस लेट झाल्यामुळे त्याचा प्रवास थोडा उशिरा सुरू होईल असं वाटतंय
नेने वकील बदलल्यामुळे झालेल्या बोलाचालीत प्रीकॅप बघायचा राहुनच गेला. कुणी बघितला असेल तर प्लिज सांगा
Dj
Dj
खूप मस्त अपडेट देता तुम्ही >> +11
मालिका बघणं सोडून दिलं होतं
मालिका बघणं सोडून दिलं होतं पण Dj यांच्या पोस्ट वाचून पुन्हा बघायची ईच्छा होते.
@ समाधानी - धन्यवाद
@ समाधानी - धन्यवाद

@ बोकलत - हल्ली कुठं चांगल्या मालिका बघायला मिळतात. हीच एक तेवढी खरोखर चांगली वाटते मला. तुम्ही पण बघत चला.. मला जमेल तसे अपडेट देत राहीन
भारी अपडेट्स Dj...परत बघायला
भारी अपडेट्स Dj...परत बघायला सुरुवात़ केली.
@ गीता१२३ -
@ गीता१२३ -
आता ह्यांचा रोमांस वगैरे
आता ह्यांचा रोमांस वगैरे बघायला मिळतो की काय या भितीत असतानाच



तो माईच्या हातातली कुंकवाची डबी घेतो अन स्वतःच्या हातावर उपडी करतो अन गप्प्कन माईचं डोकं धरुन तिचं कपाळ त्याच्या हातातील कुंकवावर दबलं जाईल असं आदळवतो.
एवढे मोठे धुड फराफरा ओढत माजघरातुन दिवाणखान्यात अन तिथुन ओसरीत अन तिथुन थेट अंगणात आणुन टाकताना माईने जो अभिनय केलाय अन जो आवाज लावलाय त्याला कशाचीही तोड नाही
डीजे मस्त अपडेट्स देत आहात अगदी दिल खोलके
नवीन नेने मात्र dijest झाले
नवीन नेने मात्र dijest झाले नाहीत आजिबात... अत्यंत हास्यास्पद डायलॉग डिलिव्हरी आहे. नवखे दिसतात कोणीतरी. आपले मुरब्बी आणि घातकी दिसणारे नेनेच खरे शोभतात. Hope की ते परत येतील....
खरंतर या मालिकेत कुठल्याच पात्रा च्या रिप्लेसमेंट ला जागा नाही इतकं चपखल कास्टिंग आहे.
तो कुंकवाचा सीन अगदीच विनोदी
तो कुंकवाचा सीन अगदीच विनोदी होता. आपल्या बनलेल्या नवऱ्याला माई काय ओळखत नाहीत. उलट लग्न करून वरून पलटी मारणाऱ्या नवऱ्याचा राग यायला पाहिजे होता माईंना. सवत माझी लाडकी म्हणून माईंनी जर शेवंताला घरात ठेवून अण्णाला भेटू दिले नसते तर खरी मजा आली असती.
नवीन नेने आवडले. कुठेही नवखे वाटले नाहीत. अन्नापेक्षा फारच देखणे आहेत. असा कुणीतरी देखणा माणूस अण्णा म्हणून दाखवला असता तर पटले असते. सध्या जे अण्णा आहेत ते फारच थोराड आणि धिप्पाड वाटतात. दारू पिऊन झोकांड्या मारतात तेव्हा सगळा रस्ता अडवतात.
@ सुजा : धन्यवाद
@ सुजा : धन्यवाद
जुने नेने वकील चांगलेच होते यात वाद नाही पण तब्ब्येतीच्या कारणामुळे त्यांना मधुनच जावं लागलं त्याला कोणीच काही करु शकणार नाही. ते लवकर बरे होऊन पुन्हा शुटिंग करतील अशी आशा करु शकतो आपण.
@ सान्वी : हो.. नवीन पात्र मालिकेत आलं म्हटलं की त्याला अॅक्सेप्ट करणं खुप अवघड असतं त्यामुळे आपणाला ते रुचत नाही. ,मागच्या सिझनची सरिता या सिझन मधे बदलली तेव्हाही असंच वाटलेलं पण आताची नवी सरिता मागच्या पेक्षा भारी वाटते की नाही
@ चंपा :
कालचा भाग सुरु झाला तोच पोलिस
कालचा भाग सुरु झाला तोच पोलिस स्टेशनात. नेने वकिलांनी चोंट्याला तिथं बोलावुन पाटणकरणीने केलेल्या तक्रारीतील हवाच काढुन घेतली. चोंट्याने पण शेवटची माती खाऊन पोलिस संरक्षणात असतानाही आण्णाच्या चुकांवर पांघरुण घातलं ज्याची जबर किंमत त्याला त्याच एपिसोड मधे भोगावी लागली. पुरावा हाती असतानाही साक्षीदारानेच साक्ष फिरवल्यामुळे इं. मंगेश जाधव पुरता हतबल झालेला दिसला अन चरफडत त्याने पुरावा म्हणुन आणलेला आण्णाचा पंचा रागाने जमिनीवर भिरकावला.
आण्णा आणि नेने वकील रस्त्यावरुन चालत निघालेले असताना ड्रोन मधुन भातशेती आणि परिसराचा जो काही नयनरम्य देखावा चित्रीत केला आहे त्याला तोड नाही. वाटेत जाता जाता नेने वकील चोंट्याचा विषय संपवायला हवा असं आण्णाला सुचवतो. चोंट्या आत्ता कुठे असेल असे आण्णाअ नेने वकिलांना विचारतो त्यावेळेस नेने वकील अगदी कावेबाजपणे उलट प्रश्न आण्णालाच करतो की त्यानेच शोधावे तो कुठे असेल.. मदत मागायला तो पाटणकरणीकडेच गेला असेल हे सांगायला दुसर्या कुणाचीच गरज नाही. त्याच वेळेस घाबराघुबरा झालेला चोंट्या भेलकांडत पाटणकरणीच्या घरापर्यंत पोचतो आणि दरवाजाची कडी वाजवतो. घरात रडत बसलेली पाटणकरीण उठुन दरवाजा उघडते पण बाहेर कोणीच नसतं. (आण्णा चोंट्याला हाय्जॅक करतात
)
दूर रानात आण्णा अन चोंट्या असतात अन त्यांच्या मागे दोन म्हशी चरत असतात असं फ्रेम मधे दिसतं
. मग आण्णा चोंट्याला विचारतात की तो पाटणकरणीकडे कशाला गेलेला..? नक्की दोघांचं काय चालु आहे..? माझ्या तुकड्यांवर जगलास अन आता पाटणकरणीची साथ देतोस का वगैरे वगैरे.. मग घाबरलेला चोंट्या अजुनच खचतो अन माती खाल्लंय माती खाल्लंय असं बोलतो. आण्णा त्याला घरेच माती खायला लावतो. स्वतःछ्या हाताने अजुन बकणाभर माती त्याच्या तोंडाअत कोंबतो. त्यामुळे चोंट्याच्या घशाला कोरड पडते. तो पाणी मागु लागतो तसा त्याच्या हातात कुदळ देऊन आण्णा त्यास जमिनेत खड्डा खणायला लावतो. खड्डा खणताना कासावीस होऊन पाणी मागतो तर आण्णा त्याच्या सोबत असलेल्या बाटलीतील दारु पाजतो. त्यामुळे चोंट्याची अवस्था फार बेकार होते. तशा अवस्थेतही चोंट्या त्याच्या खांद्या इतक्या खोलीचा खड्डा खणतो.
. त्यानंतर खड्ड्यातुन बाहेर येण्यासाठी तो आण्णाला मदत मागतो तर आण्णा त्याला हात देण्याच्या बहाण्याने भरपुर खेळवतो. शेवटी दमुन चोंट्या खाली कोसळतो. आण्णा त्याला घागरीच्या तळाशी असस्लेले पाणी पिणार्या कावळ्याची गोष्ट ऐकवतो अन कावळ्याने ज्या प्रकारे घागरीत खडे टाकुन पाणी वर आणलं तसं तो चोंट्याला खड्ड्यात माती टाकुन वर काढेल असं सांगतो. दमलेला चोंट्या विश्वास ठेऊन खड्ड्यात तसाच पडुन रहातो अन अक्षरशः जीवंत गाडला जातो
त्या गाडलेल्या चोंट्याच्या खड्ड्यावर आण्णा नवीन कलम लावतो अन माघारी फिरतो.
नेने वकिलांच्या घरी रघुकाका भर पावसात तोंडावर टॉवेल ठेऊन येतो अन वकील त्याला विचारतो की असा तोंड लपवत का आला म्हणुन. मग रघुकाका त्याला सांगतो की बाबा ती पाटणकरीण त्याच्या घरापर्यंत पोचली आहे. साक्षीदार शोधत आहे. आता कुठ्ही तोंड लपवायला जागा उरली नाही वगैरे वगैरे. (तुफान पावसामुळे नेने वकीलाच्या घरात पाण्याचे उमाळे फुटलेले दिसले..!) त्याच वेळेस पाटणकरणीचा नेने वकिलांना फोन येतो तर ते तिला खोटं खोटं सांगुन टाळतात. मग रघु काका अन वकिल दोघेही जोरात हसतात.
इकडे वाड्याच्या बाहेर येऊन आण्णा "इंदो.. अगो इंदो.." अशी हाळी मारतो. त्या आवाजा सरशी वाड्यातुन माई, दत्ता, सरिता अन छाया तर पलिकडच्या घरातुन पाटणकरीण बाहेर येतात. आण्णा पोलिस स्टेशनातुन परत आला म्हणुन घरच्यांच्या चेहर्यावर आनंद तर पाटणकरणीच्या चेहर्यावर दु:ख आणि चिंता दिसुन येते. मग आण्णा त्याच्या इंदो ला त्याचे कपडे मागे विहिरीवर ठेवायला सांगतो अन दत्ताला पाणी काढायला सांगतो. ते दोघेही लगोलग आत जातात अन पाटणकरणीलडे बघत आण्णा वाड्यात शिरतो.
वर माडीवरच्या खोलीत आण्णा कॉटवर बसलेला असतो. माई त्याच्या समोर येऊन पाटणकरीण पोलिसांपर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं असं सांगते अन या आधिही तिने पाटणकरणीबद्दल सावध रहाण्याचं सांगितलं होतं ते त्याने ऐकलं नाही असं ज......रा लाडात येऊन सांगते तसा आण्णा फटकन शेंडाच खुडतो. माईने आण्णाला अक्कल शिकवण्याचं काहीही काम नाही अन त्याच्या मनात आलं तर तो कोणत्याही क्षणी पाटणकरणीच्या घरात जाऊन तिला वाड्यावर घेऊन येऊ शकतो असं दरडावत जिना उतरतो. अंगणात आल्यावर तो थेट पाटणकरणीच्या घरी पोचतो तर ती कॉटवर रडत बसलेली चिंताग्रस्त झालेली दिसते.
प्रीकॅप मधे आण्णाला उद्देशुन पाटणकरीण म्हणत असते की जर तो मागचं सगळं विसरुन पुढं जायला तयार असेल तर तिही सगळं विसरायला तयार आहे. मग ती आण्णाच्या गळ्यात पडुन म्हणाते "मला माहित होतं की तुमचं माझ्यावर खुप प्रेम आहे.. तुम्ही मला सोडुन राहुच शकणार नाही..!" ते ऐकुन आण्णा छद्मीपणे हसतो.
DJ.. छान अपडेटस देताहात.
DJ.. छान अपडेटस देताहात. माईने शेवंताचं बखोटं धरून बाहेर काढल्याचा एपिसोड तुमची अपडेट वाचून पाहिला आणि डोळ्याचं पारणं फिटलं. ही सिरियल रेंगाळेल अशी भीती असल्याने रोजचे भाग पहाणार नाही. पण तुमचे अपडेटस मात्र वाचेन. अगदी डिटेलमध्ये लिहिलं नाहीत तरी थोडक्यात काय झालं ते सांगत रहा प्लीज. शेवंता मरेल तो एपिसोड मात्र बघणार मी. चोंगट्याबद्द्ल वाचून वाईट वाटलं. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणतात ते खरं आहे अगदी.
@ स्वप्ना_राज - धन्यवाद
@ स्वप्ना_राज - धन्यवाद
शेवंता मरेल तो एपिसोड मात्र बघणार मी. >> अपुर्वा नेमळेकरने तिच्या इंस्टावर लाल साडी, गळाभर दागिने अन कपाळ भरुन मळवट (ब्लॅक व्हाईट मधे
) असा फोटो टाकला आहे याचा अर्थ तिने टांगुन घेतलेल्या एपिसोडचं शुटींग संपलेलं दिसतंय.
शेवन्ता मरेल त्यानन्तर सीरियल
शेवन्ता मरेल त्यानन्तर सीरियल फार काळ चालणार नाही असा कयास आहे . बहुतेक १५ ऑगस्ट ला नवीन सीरियल येणार साडेदहा च्या स्लॉट ला ! किंवा जास्तीत जास्त ३१ ऑगस्ट...
चोंत्या त्या अवस्थेत एवढा
चोंत्या त्या अवस्थेत एवढा मोठा खड्डा खणतो ते बघून आश्चर्य वाटलं. एवढा मोठा खड्डा खणायला किती वेळ लागला असेल तेही चोंट्या एकटा खणत असताना

चोंट्या जो पटापट दोन वेळा काल गायब झाला ते अविश्वसनीय होतं. अन्नासारखा धिप्पाड माणूस त्याला काही सेकंदात स्वतः सकट घेऊन जातो
आज शेवंताची अवस्था बघून वाईट वाटले. ती रस्त्यावर पेंगुळलेल्या अवस्थेत बसलेली असते आणि तो दारुडा तिच्यासमोर येऊन बसतो ते बघून किळस वाटली. नंतर ती सगळ्या पिशव्या घेऊन धावत सुटते तेव्हा तर फारच वाईट वाटते. ती मुंबईला जाऊन माधवची मदत घेऊ शकली असती पण तसे नाही होणार. वाईट शेवट.
कालचा भाग खरेतर सरिताच्या
कालचा भाग खरेतर सरिताच्या नावावर करावा असाच होता... तिचं वागणं १८० अंशांच्या कोनात फिरल्यामुळे नाईकांच्या वाड्यातल्या बाकी नाईकांचं तोंड दाबुन हसणं आपल्या ओठांवर फुटत होतं.
कालचा भाग सुरु होतो तोच माईच्या ओरडण्याने. भर रात्रीची ती ओसरीत उभा राहुन दत्ताला हाक मारते अन त्याच्यावांगडा सरिता अन छाया पण येतात. माई त्या तिघांना सांगते की मघाशी माडीवर ती आण्णांना समजावण्याच्या स्वरात थोडं बोलली तर ते खुप चिडले अन खाली गेले. बहुतेक आण्णा समोरच्या घरात पाटणकरणीकडे गेलेत असं म्हणते आणि राग, वैताग, चीड यांचं मिश्रण तिच्या चेहर्यावर उमटतं.
. तिची अशी स्थिती बघुन सरिता जोरात उसळते.
. आण्णांच्या वागण्याला काही धरबंदच नाही. कशीबशी पाटणकरीण वाड्यात येता येता राहिली तर माईने आण्णाला उगिच समजवण्याचं काही करण होतं का..? ते कधी कुणाचं ऐक्तात का..?? त्यांच्या मनाला वाटतं तेच ते करतात मग आता इथं ओसरीत थांबुन काय आरतीचं ताट घेऊन त्यांच्या येण्याची वाट बघत बसायचं का..??? वगैरे वगैरे
मग ते तिचं बोलणं असहय्य होऊन दत्ता आण्णाला आणायला पाटणकरणीकडे जायला निघणार तेवढ्यात सरिता त्याच्या हाताला हिसका मारुन थांबवते अन त्या बाईसमोर आण्णांनी दत्ताचा अपमान केलेला तिला आजिबात खपणार नाही म्हणुन निक्षुन सांगत त्याला तिथं जायला मनाई करते. 
तिकडे पाटणकरणीच्या घरात आण्णा घुसतात तर रडकी पाटणकरीण त्याच्यावर चिडुन त्याने हिला फसवलं, बदला घेईन, पोलिसांसमोर सगळी गुपीतं सांगेन असं बोलत रहाते तर आण्णा काहीही न बोलता फक्त छद्मी हसत तिच्या शेजारी बसतो. मग पाटणकरणीच्या चेहर्यावरील भाव झरझर बदलतात अन ती म्हणते की तिला माहीत होतं आण्णा तिच्याशिवाय राहुच शकत नाहीत. जर ते मागचं सर्व विसरायला तयार असतिल त्र तिही सर्व विसरायला तयार अहे. पोलिसंना ती कधीच काहीच सांगणार नाही वगैरे वगैरे लाडात येऊन बोलु लागते. फक्त तिच्या सोबत लग्न केलेलं आण्णाने वाड्यात सर्वांना सांगावं आणि वाड्यात घेऊन जावं बस्स..! मग आण्णा तिला तिच्या ओलनीवर टाकलेल्या साड्या गोळा करत तिला तिची बॅग कुठं आहे असं विचारतो अन मग आण्णा आपल्याला वाड्यावर घेऊन जायलाच आला की काय असं वाटुन अत्यानंदाने ती सर्व कपडेलत्ते, दागिने बॅगेत भरते. आण्णाही तिच्या बॅग्स आणि दोन कळशा घेऊन घराला कुलुप लावुन चावी स्वतःकडे घेत तिच्यासहित बाहेर पडतो. अत्यानंदाने पाटणकरीण ओसरीत थांबलेल्या नाईकांकडे बघते अन ओसरीवरच्या नाईकांचं धाबं दणाणतं. सरिता ख्यास खाऊन आण्णा अन पाटणकरणीच्या बाबतीत जोरात अद्वातद्वा बोलते जे आण्णालाही ऐकु जाते. पुढच्याच क्षणी पाटणकरीण नाईकांना ऐकवते की बघा आण्णांनी शेवटी तिला वाड्यावर आणलंच तसा आण्णा तिचं सगळं सामान धाडकन जमीनीवर फेकुन देतो अन पाटणकरणीला आता या घरात पुन्हा पाय ठेवायचा नाही असा दम टाकतो.. ते बघुन पाटणकरणीला जबर धक्क बसतो अन माईकडे बघत ती आर्जवं करु लागते की ताई तुम्ही तरी आण्णांना समजवा आता या रात्रीच्या अंधारात तीने कुठं जावं वगैरे वगैरे ऐकल्यावर माईची थोडी चलबिचल होते पण मनाचा हिय्या काही सुटत नाही अन ते बघुन दत्ता, छाया, सरिता सहित आपणही सुटकेचा नि:श्वास सोडतो. सरिता तर १८० अंशात वागणं बदलते.

मग आण्णा सर्वांना जेवणाची तयारी करा असं फर्मान सोडत वाड्यात येतो. जाताजाता सरिताकडे एकवार नजर रोखतो तर ती कसनुसं हसतें
. मग वाड्यात आल्यावर दत्ता-सरिताच्या खोलीत सरिताच्या तोंडाचा पट्टा पुन्हा सुरु होतो पण नूर एकदम पालटलेला असतो
. आण्णा कसे चांगले आहेत, कसं नाईकांच्या पुरुषाप्रमाणे वागले, त्यांनी घरासाठी किती केलं, त्यांचं रुप वरुन वेगळं पण आतुन किती वेगळं असं दळाण दळु लागते तसे दत्ताच्या लॉकडाऊन मुळे फुगलेल्या गालांवर हास्याची गच्च कारंजी फुटु लागतात ते बघुन आपल्याही हास्याचा स्फोट होतो. सरिताला दत्ताचं हसु तिच्यावरच आहे असं लक्षात येतं तर ती त्याच्यावरच डाफरते की असं वागायला सुद्धा (म्हणजे आण्णा आत्ता पर्यंत जे वागत होते ते..!) दम हवा दत्ताच्याने असलं होणारे का..??
ते ऐकुन दत्ताच्या प्रसन्न चेहर्यावर हस्याचा फवारा उडतो

मग माजघरात जेवणाची तयारी झालेली असते. आज काय जेवणात धपाट्यांचा बेत असतो. माईंसमोर पण सरिता आण्णांबद्दल भरभरुन बोलु लागते. ते कसे चांगले आणि सर्वांची काळजी घेणारे वगैरे वगैरे सांगु लागते ते ऐकुन माईच्या चेहर्यावर आश्चर्याच्या भावना उचंबळु लागतात
माई आण्णांना बोलवायला निघणार तेवढ्यात सरिता माईला थांबवत ती स्वत: आण्णांना बोलवायला वर जाणार असं सांगत उठुन जाते सुद्धा. तिचं हे वागणं बघुन दत्ता, माई, छाया सगळ्यांच्या चेहर्यावर दबकं हसु फुटतं.
वर माडीवर आल्यावर आण्णांनी कपटातुन एक घुटका घेतलेला असतो. त्यांच्या समोर सरिता चेहर्यावर आपुलकी, काळजी, मान, सन्मान असले भाव आणत त्यांना खाली जेवायला चला असं सांगते. गरम गरम जेवण सर्वांसोबत जेवलात तर किती छान होइल, जेवण थंड झालं तर ती त्यांच्यासाठी पुन्हा गरम करेल, ते जे वागले ते सगळं बरोबरच आहे असं काहीबाही बोलत बसते
आण्णाचं एक नाही अन दोन नाही तो तिला जायला सांगतो आणि दुसरा घोट घ्यायला कपाटाकडे जातो तरी सरिताचं ध्यान आपलं तिथंच घुटमळत राहतं. आपल्याला वाटतं आता ही बया आण्णाला कंपनी देत बसते की काय
पण आण्णा तिच्याकडे जरबेने पहातो तशी ती खाली जाते.
खाली माजघरात छाया, माई, दत्ता यांची वाटच बघत असतात. माई सरिताला काळजीने ओरडते की तु या अवस्थेत जिना चढुन वर का गेली तर सरिता म्हणते की पाटणकरणीची ब्याद टळल्यामुळे तिला कहिच त्रास नाही झाला. त्यावर माई तिला समजावते अगं ती ब्याद इथे राहिली काय अन बाहेर गेली काय याची फिकीर नाही पण तिच्या सुनेला काही त्रास झालेला चालणार नाही. ( अशी सासु मिळाली हे सरिताचं भाग्यच..!
) जेवणाची ताटं वाढायला माई ताट घेते तर तिच्या हातुन सरिता ताट काढुन घेते अन आण्णांना ती स्वतः जेवण वाढेल असं सांगते. त्या ताटात ती २ धपाटी वाढते ते बघुन छाया तिला म्हणते आण्णा एवढं खाणार नाहीत तरी सरिताचं आपलं तेच की एवढा मोठा पुरुष का खाणार नाही..? त्यावर छाया तिला समजावते की ती जन्मापासुन आण्णांना ओळखते अन तु तर आत्ता या घरात आली
. सरिताची लगबग आणि एकंदर आजच्या वागण्यातला बदल बघुन माई, छाया, दत्ता एकमेकांकडे बघुन नुसते हसु दाबत असतात
फिदी: मग आण्णा जेवायला येतात. सर्वांसोबत जेवण करतात. सासर्याला जेवणात काय हवं काय नको म्हणुन सरिताची नुसती लगबग लगबगसुरु असते
त्यात माई मधेच बोलु लागते की आण्णा सर्वांसोबत जेवताना बघुन आता कसं छान वाटतं, असंच सर्वांसोबत जेवत चला ई.ई. अन तिची गाडी पुन्हा पाटणकरणीवर घसरते अन आता त्या बयेच नाव या घरात पुन्हा नको असं बोलते. सरिताची लुडबुड आणि माईचं पुन्हा शहाणपण ऐकुन आण्णा चिडुन भरल्या ताटाहुन नक्की उठणार अशी भिती छाया, दत्तासहित आपल्यालाही वाटते पण असं काहीच होत नाही हे बघुन आपला जीव भांड्यात पडतो. 
तिकडे पाटणकरीण रात्रीच्या अंधारात सावंतवाडी-कुडाळ रस्त्याकडेच्या खांबाला टेकुन अन समोर बॅगा टाकुन पेंगत बसलेली असते (या बाईला कधिही अन कुठेही कशी काय झोप लागु शकते असं आपल्याला वाटुन जातं
) . तिचे डोळे उघडतात तेंव्हा एक दारुडा तिच्या समोर बसलेला असतो. त्याला बघुन तिला शिसारी येते अन ती त्याला तिथुन हाकलु लागते. तो काही केल्या तिथुन जात नाही उलट तिच्या हाताला धरुन स्वतःच्या घरी चल म्हणतो तर ती त्याला म्हणाते की सोड नाहीतर जोरात चावेन
. शेवटी जीव खाऊन ती त्याला तिथं ढकलते अन अंधारातच सावंतवाडीच्या दिशेने पळत सुटते.
इकडे आण्णा निजानिज करण्याआधी एक घुटका घेण्यासाठी कपाटाकडे वळतो तर रेडिओ वर जोरात गाणं लागलेलं असतं. तो पाटणाकरणीच्या घराकडे बघतो तर दरवाजाखालुन लाईट दिसत असते अन रेडिओचा आवाज तिथुनच येत असतो. पाटणकरणीची हिम्मत कशी झाली परत यायची असं म्हणत तो रागाने तिच्या घराकडे येतो अन बघतो तर घराला बाहेरुन कुलुप. तेवढ्यात आतुन चोंट्या, पाटणकर, शोभा, पोष्ट्या, भिवरी, सदा या सर्वांचा आवाज येऊ लागतो अन एपिसोड संपतो.
प्रीकॅप मधे पाटणकरीण नेने वकिलापुढं गार्हाणं मांडत असते अन आण्णाला पोलिसांच्या तावडीत अडकवुन फासावर लटकवणार असं सांगते.
शेवंताचा खेळ खल्लास !
शेवंताचा खेळ खल्लास !
शेवंताने मरताना घाई केली..
शेवंताने मरताना घाई केली.. अजून थोडे रंगवता आले असते.. लाल साडीमध्ये तर टोमॅटोचे पोतं चालल्यासारखी वाटत होती.. मुलगा झाला सरिताला.. नाहीतर शेवंताने पुन्हा जन्म घेतला असे दाखवता आले असते..
अरे dj 2 दिवस झाले अजून अपडेट
अरे dj 2 दिवस झाले अजून अपडेट दिले नाही,
शेवंताचे आत्महत्या प्रकरण
शेवंताचे आत्महत्या प्रकरण वाटले होते तेवढे रंगले नाही, उलट जरा उरकल्यासारखेच झाले. घरात एकतर अण्णा माई दोघंच होते आणि तेही दरवाजा बंद करून बसले होते. शेवंताने शेवटी कदाचित विचार बदलला होता पण सगळी भुतं बघून ती घाबरली आणि तिच्याही नकळत तो दगड पायाखालून सरकला गेला. तिला लटकलेले दाखवतात की नाही ते आज कळेल. नाही दाखवले तर समजून जायचे की दुसऱ्याच मुलीचे पाय दाखवले म्हणून कारण शेवंताचे वजन झाडाला झेपले नसेल. आता अण्णा चक्की पीसींग करणार का कारण नेने मदत करतील असे वाटत नाही.
नेने वकिलाने कसला प्लॅन केला
नेने वकिलाने कसला प्लॅन केला होता नक्की? फांदी अर्धी कापून ठेवायची, दोरी विट आत्महत्येचं समान तिथेच ठेवायचं. त्या नेने वकीलालाच ताब्यात घ्यायला पाहिजे. अण्णा बिचारा गरीब साधा भोळा आहे.
दोरी (दोरी कसली दोरखंडच तो)
दोरी (दोरी कसली दोरखंडच तो) अगदी नवी कोरी होती आणि विशेष म्हणजे गाठही मारून ठेवलेली होती. तो मोठा दगड फक्त हलवायचे कष्ट पडले पाटणकरबाईंना. तो दगड नसता तर घरातून स्टूल मागावा लागला असता तिला. अण्णाला त्या दागिन्यांची पडली होती. ते दागिने आता कुठे जातील कुणास ठाऊक. सरिताने शेवंताला लटकलेले बघितले असते तर तिला दवाखान्यात नेण्याची गरजच पडली नसती, तिथेच मोकळी झाली असती ती.
finally सरिता आणि शेवंता दोघी
finally सरिता आणि शेवंता दोघी मोकळ्या झाल्या..
@ चंपा : सरिताने शेवंताला
@ चंपा : सरिताने शेवंताला लटकलेले बघितले असते तर तिला दवाखान्यात नेण्याची गरजच पडली नसती, तिथेच मोकळी झाली असती ती.>>
आणि ती राखेचा१ मधे निलिमाला कसं सांगत असते कि शेवंता कशी मेली अन हिनं कसं सगळं डोल्यांनी बघितलं वगैरे.
@ आदु : अहो वेळच नाही मिळाला अन मला पण जरा लवकर उरकल्यासार्कहं प्रकरण त्यामुळॅ मला पण जास्त इंटरेस्त आला नाही लिहायला. मला पण प्रसन्न जी म्हणाले तसं वाटतंय की सिरियल १५ ऑगस्ट पर्यंत संपेल.
नेनेंनी लिहून घेतलेल्या
नेनेंनी लिहून घेतलेल्या पत्रातला मजकूर वेगळा होता का. त्यात अण्णामुळे आत्महत्या करत आहे असे लिहिले होते ना. अण्णा मधल्या मध्ये काही चाल खेळला की काय
त्या घरातल्या आजोबांना भुतं दिसतात का. ते म्हणत होते ती आलीये आत वगैरे.
नेने लय बेरक्या आणि प्रचंड
नेने लय बेरक्या आणि प्रचंड स्वार्थी आहे , राखेचा चा खरा व्हिलन अण्णा की नेने असा प्रश्न पडावा कारण अण्णाच्या बर्याच जमिनींची अफरातफर नेने वकिलाने केलेली आहे ! पहिल्या सीझन मध्ये आणि या सीझन मध्येही सुरुवातीला देखील रघु आणि नेनेच्या बोलण्यात त्याचा सन्दर्भ आलेला असतो ...
शेवंताने लिहिलेली चिट्ठी नेने
शेवंताने लिहिलेली चिट्ठी नेने कडेच राहिली , आत्महत्या करायला जाताना शेवन्ताला नेनेने दुसरीच चिट्ठी दिली ... अण्णाच्या घरी पोलिस आल्यावर नेने हाताची पाच बोटे दाखवून नेने अण्णाला इशारा करतो की हे प्रकरण दडपायला ५०,०००/- रुपये खर्च येइल ! नेने लय पहुंचा हुवा आदमी है !
नेनेनी चिठ्ठी का बदलली पण?
नेनेनी चिठ्ठी का बदलली पण? उलट मला वाटलं होतं की तो दुहेरी चाल खेळतोय. एकीकडे शेवंता पण मरेल आणि दुसरीकडे अण्णा अडकेल. पण हे तर भलतंच झालं. आणि मग हेच करायचं होतं ती तिच्या कडून चिट्ठी लिहूनच का घेतली?
Pages