Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कलियुगातली कुठलीही बाई, नवरा
कलियुगातली कुठलीही बाई, नवरा अगदी पत्नीनिष्ठ असला तरी, एखाद्या कुरुप बाईलाही घरात घेताना दहा वेळा विचार करेल. इथे तर माईला अण्णाची औकात माहित आहे, शेवंता सुंदर आहे हे माहित आहे. भिवरी प्रकरण माहित आहे. मग तिला एका रात्रीपुरते का होईना तिने घरात घुसूच कसं दिलं म्हणते मी. त्यापेक्षा 'मी येते तुमच्यावांगडा तुमच्या घरी झोपायला' असं म्हणावं किंवा शोभाला पाठवाव्ं तिच्यासोबत. बरं घेतलं घरात, तिला आपल्या खोलीत झोपवायचं. तर तेही नाही. सरिता विचित्र वागतेय तेही तिच्या लक्षात येत नाही. कुठलीही बाई इतकी माठ असणंच शक्य नाही. पांडग्याचं डोकं ठिकाणावर आहे काय? नसेल तर त्याच्या बायकोने त्याला समजावू नये काय???? माझी आजी म्हणायची जेवायला ताट द्यावं, बसायला पाट देऊ नये. इथे माईने दोन्ही बहाल केलंय. धन्य आहे!
शेवन्ताचं character
शेवन्ताचं character उत्तरोत्तर गंडत्ंय. तिला split personality आहे की काय असा संशय येतो मला. कधी एकदम पतिव्रता असल्यासारखी वागते. तर कधी अण्णाशी असलेलं प्रकरण अजूनही तिला चालू ठेवायचं आहे असं दिसतंय. मग अण्णाने पैसे दिले मागे तर किचन मध्ये जाऊन रडत का होती म्हणे??? शहरात जाऊन नणन्देवर भार व्हायचं नाहिये. पण इथे अण्णाची ठेवलली बाई म्हणून काय प्रतिष्ठा मिळनार आहे का? अण्णाला तिच्याशी लग्न करायचं असतं तर ते त्याने कधीच केलं असतं. तिला बायकोचा दर्जा मिळणं शक्यच नाहियें हे न कळण्याइतकी माठ ती खचितच नाही. का घरात राहुन हळूहळू आपली सत्त्ता प्रस्थापीत करायची आहे? पण सिझन 1 मध्ये तर माई म्हणते की शेवन्ताला ह्या घरात यायचं होतं पण मी तिला पाय ठेवू दिला नाही. काय कळत नाही काय चाललंय ते
अण्णा शेवंताला विचारत होता की
अण्णा शेवंताला विचारत होता की येतेस का उचलून नेऊ. मी तर फुटले ऐकून. ह्याला आधी स्वत:चा तोल सांभाळता येत नाही बेवड्याला. त्या शेवंताच्या धुडाला उचलून काय नेणार? धोतराचं पितांबर होईल ह्याच्या. कैच्या कै. त्या हिंदी सिरियल्समध्ये कुठे खुट्ट झालं तरी लोक चहूबाजूने धावत येतात आणि इथे हे मिठ्या मारत बसलेत दिवाणखाण्यात आणि घरात कोणाला पत्ता नाही. वर घरातुन अण्णा आणि पाटणकर बाई दोघे गायब आहेत म्हटल्यावर माई म्हणते की 'काय म्हणायचं ह्या'. भुसा भरलाय का हिच्या डोक्यात एव्हढ्या रात्री ते दोघे झिम्मा फुगडीच खेळत असणार ना. छायाला पण संशय येत नाही. ते छपरावरचे दगड ह्यांच्या डोक्यातून निघालेले दिसतात किंवा त्यांच्या डोक्यात तरी पडले असणार.
शोभाच्या टाळक्यात दगड कोणी
शोभाच्या टाळक्यात दगड कोणी घातले? जाते की काय ढगात काशीला भेटायला आता?
अण्णु बोले हो शेवंताला
अण्णु बोले हो शेवंताला
अण्णु बोले हो शेवंताला
येतेस का उचलून नेऊ तुला
चालता येईना ह्या बेवड्याला
कसा उचलणार तिच्या धुडाला
वाड्याबाहेर शोभा आली
भानगड उघडकीस आणेन म्हणाली
डोक्यात दगड पडताच मात्र
तिथेच आडवी की हो झाली
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/zee-marathi-awards-2019-ratris-...
ह्यात शरद पोन्क्षे अग्निहोत्र
https://www.loksatta.com/manoranjan-news/sharad-ponkshe-fight-back-cancer-ssj-93-1991811/
ह्यात शरद पोन्क्षे अग्निहोत्र 2 मध्ये अभिनय करणार आहेत असं लिहिलं आहे. अग्निहोत्र चा शेवट गंडला असला तरी बाकी मालिका चान्गली होती. मजा येईल पुढला भाग पहायला.
शोभा मरणार आहेच कधीतरी कारण
शोभा मरणार आहेच कधीतरी कारण पहिल्या भागात हरी नाईकला मरायच्या आधी दिसतात भुते तयात हे जोडपे पण असते. माई जरा यडचाप आहे काय? सून त्यामानाने ढाक आहे. बरोबर सर्व दूर ठेवते.
>>शोभा मरणार आहेच कधीतरी कारण
>>शोभा मरणार आहेच कधीतरी कारण पहिल्या भागात हरी नाईकला मरायच्या आधी दिसतात भुते तयात हे जोडपे पण असते.
हो, ते माहित आहे. पण मग तिचं भूत अण्णाला का दिसतं? कारण दगड डोक्यात पडून ती मेली असेल तर त्यात अण्णाचा काही संबंध नसणार ना?
>>माई जरा यडचाप आहे काय
जरा???? माठाधिपती आहे. मूर्ख बेअक्कल बाई!!
मूर्ख बेअक्कल बाई!!>> गोड आहे
मूर्ख बेअक्कल बाई!!>> गोड आहे पण . सुसल्या घरी आली तेव्हा तिला चाय बटर ऑफर करते तो सीन मला इतका इतका आवडला. माईला काही चॉइस नाही. मुलांसाठी राहते. कुठे जाईल बाहेर. तसे पाहिलेतर माई छान आहे दिसायला. ग्रेट फिगर. साडी फार छान दिसते. व स्टाइल मसत. प्लेन काँट्रास्ट ब्लाउज सुती सिंगल कलर साड्या पोपटी, केशरी निळी. मी फॅ न आहे माफी असावी.
दगड पांडबा मारीत असावेत.
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात ‘रात्रीस खेळ चाले २ ' मधील चोंगट्या ठरला हिरो !!!
लोकसत्ता ऑनलाइन |
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात ‘रात्रीस खेळ चाले २’ व ‘अग्गंबाई सासूबाई’चाच बोलबाला
‘रात्रीस खेळ चाले २’ला मिळालेले पुरस्कार-
सर्वोत्कृष्ट खलनायिका- वच्छी
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (स्त्री)- शेवंता
सर्वोत्कृष्ट खलनायक- अण्णा नाईक
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष)- अण्णा नाईक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री)- छाया
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष)- चोंट्या
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष)- अण्णा नाईक? सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (स्त्री)- शेवंता?
बादवे, काल एबीपी माझावर शरद पोन्क्षेची मुलाखत बघितली. छान बोलले.
मी वर लिंक दिली आहे लोकसत्ता
मी वर लिंक दिली आहे लोकसत्ता पहिली ती झी मराठी awards चीच आहे.
(No subject)
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/manoranjan-news/agnihotra-serial-series-again-abn-97-1991725/lite/
मी वर लिंक दिली आहे लोकसत्ता
मी वर लिंक दिली आहे लोकसत्ता पहिली ती झी मराठी awards चीच आहे. >>>>>>> मन्दार आणि अन्जू बोलले ते खर आहे. काल झी मराठी awards च नॉमिनेशन्स इवेण्ट होत. त्यात अण्णा आणि शेवन्ताला अनुक्रमे सर्वोत्कृष्ट पुरुष व्यक्तिरेखा आणि सर्वोत्कृष्ट स्त्री व्यक्तिरेखा साठी नॉमिनेशन्स आहेत.
नुसती नॉमीनेशन्स आहेत का
नुसती नॉमीनेशन्स आहेत का एवॉर्डस मिळाली??? I am confused
आज अण्णा आणि शेवंताची पळापळ
आज अण्णा आणि शेवंताची पळापळ बघून भारी करमणूक झाली. सगळी 'कभी हिया गया कभी उआ गया' तशी गत. ते दोघे अचानक कुठे आणि कसे teleport झाले ते एक त्या पांडूलाच माहित. Beam me up Scotty पण म्हणावं लागलं नाही की. आधीच मोटार उद्योगाला वाईट दिवस आलेत. हे teleporting बघून त्यांचया पोटात तर गोळाच येईल. पण अशी सोय झाली तर बरंच आहे की. रस्त्यावरच्या खडड्याची पर्वा नको करायला बाकी शेवंताला आपल्या घरी निघुन जायला काय हरकत होती म्हणे??? शेवंता म्हणजे पाटणकरीन बाई हे गुढ़ वगैरे कळल्यावर शोभच्या चेहेर्यावर 'मृत्यूनंतर काय?' हे रहस्य कळल्यासारखे भाव आले असावेत असं वाटतं. कारण खूप अंधार होता त्यामुळे कोणीच नीट दिसत नव्हत. तिला अण्णा आणि पाटणकरणीची भानगड माहित होती. नवं काय कळलं? का घरात सार्यना अण्णा आणि शेवंता प्रकरण माहित आहे पण शेवंता म्हणजे पाटणकरिण हे अर्थातच माहित नसल्याने हे कोलीत तिच्या हाती लागल्ंय? तसंच ती अण्णा आणि पाटणकरनिची भेट घरच्यांसमोर का उघड करायला निघाली होती? ती बाब तर तिच्या दृष्टीने सोन्याच्ं अंडं देणारी कोंबडी आहे ना???
आता अण्णा साळसुदपणे घरात
आता अण्णा साळसुदपणे घरात शिरणार पण तो नेहमीसारखा वसकन ओरडत नाहिये त्यामुळे 'डाळीत काय काळं नाय गे बाय माजे तर सगळी डाळच काळी आसा' हे लोकाना कळायला हरकत नसावी. पण पूर्ण घराणं माठ लोकांचं आहे त्यामुळे ही अपेक्षा करणं व्यर्थ.
नुसती नॉमीनेशन्स आहेत का
नुसती नॉमीनेशन्स आहेत का एवॉर्डस मिळाली??? I am confused >>> अवॉर्डस मिळाली आहेत. टीव्हीवर दाखवतील नंतर.
हो कालचा निव्व्व्ळ टाइ म
हो कालचा निव्व्व्ळ टाइ म पास एपिसोड वा टला. शेवंता किती बडा बडा बोलत होती. मला वाटले आण णा तिला एक ठेवुन देतो कि काय.
पटटकनी वर गेले असते तर कोणाक कळुक नाय व्हता. पण रोमान्स कराय्चा होता ना पोत्यापाशी. किती ग्रीडी आहे ती. बांगड्या घालून आणि वर शाहाजोग पण मला बाईमान्सा ला लोक काय काय बोलतील वगैरे. काय हे.
मधले काही भाग मिसले. पण वरचं
मधले काही भाग मिसले. पण वरचं वाचून जरा अंदाज आलाय.
तरी पण आण्णा आणि पा ट ण करीण घराभोवती जोडीसाखळी का खेळताहेत ? राज्य कुणावर आहे ? शोभावर काय?
हो ना खाली हॉलमध्ये एकमेकाना
हो ना खाली हॉलमध्ये एकमेकाना चिकटून उभे होते ते तुफान विनोदी दिसत होतं. बीसकी उमर का जो है खेल......असो.
अगदी अगदी छायाला राजग्या
अगदी अगदी छायाला राजग्या पासून तोडा यला कारणी भूत हीच बया आहे. बिचारे तरूण जोडपे दूर झाले आणि ह्यांचा जोर शाबूत.
गाईज, १४ ऑक्टोबर ला मी माझ्या
गाईज, १४ ऑक्टोबर ला मी माझ्या संपुर्ण कुटुंबासोबत आकेरीला जाऊन आलो. वच्छी-आबा-मांत्रीक-नेने वकील-दिग्दर्शक भेटले..!
नाईक वाड्यातला कोपरान-कोपरा फिरुन आलो.. आण्णा-माई-छाया-दत्ता-सरिता-नाना-पांडु-चोंगट्या-शोभा-शेवंताचं शुटींग नव्हतं ते आज सुरु होणार होतं म्हणुन त्यांची भेट नाही झाली.
वच्छी-आबा-मांत्रीक यांनी आस्थेने आमची विचारपुस केली व आमच्या सोबत फोटो पण काढले. आकेरी खुप छान आहे. तिथे जाऊन आण्णाचा वाडा बघायची माझी इच्छा पुर्ण झाली
कामातुन रिकामा झालो की १-२ दिवसात फोटो अपलोड करेन.
मी प्लॅन केल्याप्रमाणे माझी ट्रीप - मडगाव-सिंधुदुर्ग-मालवण-देवबाग-सावंतवाडी-आकेरी पुर्णपणे ठरल्याप्रमाणे झाली (मी लवकरच सर्व व्रुत्तांत लिहीन - ऑफिस ची कामं पेंडलीत )
वॉव मस्त. पहिले अप लोड करा
वॉव मस्त. पहिले अप लोड करा. कामे होत राहतील. म्हणे. व्याख्या विक्खी वुख्हू.
करतो संध्याकाळपर्यंत
@ अमा :
करतो संध्याकाळपर्यंत
DJ.. तुम्ही शुध्द मराठीत
DJ.. तुम्ही शुध्द मराठीत लिहिलं म्हणून वाचायचं धाडस केलं पण आम्हाला न सांगता गेलात. शोनाहो मी काही निरोप दिले असते ना नाईक मन्डळीसाठी. उदा. एक मोठा काळा लाम्ब मिशांचा झुरळ प्लस एक पाल प्लस 1-2 ढेकूण मेल्या अण्णाच्या सदर्यात सोडा. तुमच्या बायकोकरवी पाटणकरणीच्या झिंज्या उपटवा. आणि माईना एक डझन रुमाल द्या डोळे पुसायला.
वच्छी, आबा, मांत्रीक आणि वकील एक साथ म्हणजे शोभाने पाटणकरणीवर हल्ला केला म्हणून वकील आणि तिला झपाटल्यची शंका आहे म्हणुन उप्च्गार करायला मांत्रीक असा प्लॉट शिजतोय काय???
फोटो टाका बघू फटाफट. आमका पण बघुक होया की.
दिग्दर्शक भेटले हे वाचल्यावर
दिग्दर्शक भेटले हे वाचल्यावर 'ह्या मालिकेला दिग्दर्शक आहेत?' असं विचारावंसं वाटलं. हा बाबा दिसतो तरी कसा आननी पाहू तरी.
दिग्दर्शकासोबत नाही काढला
दिग्दर्शकासोबत नाही काढला फोटो..
फक्त वच्छी, आबा, मांत्रीक (जो मला कणकवली-सावंतवाडी एस.टी. मधे कुडाळ-आकेरी मार्गावर माझ्याच सीट मागे भेटला - सविस्तर कहाणी लवकरच..! ) आणि आण्णाचा वाडा दाखवणारा कृष्णा यांच्या सोबतच फोटो काढले.
पण आण्णा आणि पा ट ण करीण
पण आण्णा आणि पा ट ण करीण घराभोवती जोडीसाखळी का खेळताहेत ? राज्य कुणावर आहे ? शोभावर काय?>>>
DJ.. तुम्ही शुध्द मराठीत लिहिलं म्हणून वाचायचं धाडस केलं>>>>> अगदी अगदी!
Pages