रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

DJ.. तुम्ही शुध्द मराठीत लिहिलं म्हणून वाचायचं धाडस केलं>>>>> अगदी अगदी!>> ह्ये काय माका पटलं नाय.. मालवण-तारकर्ली-देवबाग-सावंतवाडी-आकेरी फिरत असताना मला सर्वत्र हीच भाषा ऐकु येत होती आणि मी तुमच्याशी ज्या भाषेत संवाद साधला त्याच भाषेत मी तिथल्या सर्वांशी बोलायचो.. वच्छी-आबाशी सुद्धा ह्याच मालवणीत बोललो पण मला ४ दिवसात कुणीही टोकलं नाही जेवढं इथे टोकलं जातं Uhoh

DJ.. टीझर टाकताहेत Proud >> Biggrin
खुप छान झाली ही ट्रीप.. आकेरी तर या ट्रिप चा कळसाध्याय होता.. मी लवकरच लिहीन सर्व.. Bw

त्याना 4 दिवस ऐकायचं होतं फक्त. Proud जोक्स अपार्ट....मलाही ही भाषा बोलायला आवडेल पण जिथे तुमचं चुकलेल्ं दुरुस्त करायला कोणी नाही तिथे ती बोलून काय फायदा असं मला वाटतं. उलट अश्याने चूका जास्त reinforce होण्याची भिती असते. त्यापेक्षा एखादा वेगळा धागा काढा. तिथे 1-2 वाक्यं जरी रोज लिहिलीत आणि तपासुन पहायची विनंती केलीत तर लोक मदत करतील. त्याचा बाकी लोकानाही उपयोग होईल असं एक हितचिंतक आणि भाषाप्रेमी म्हणुन नम्रपणे सुचवाव्ंसं वाटतं. पटतंय का बघा. नायतर सोडून देवा. Happy

त्याना 4 दिवस ऐकायचं होतं फक्त. >> गे बाय माझे..! Uhoh
Rofl म्हणजे मी मालवणी लिहुन इतका भयानक अत्याचार केला का सर्वांवर..?? Rofl

मला कणकवली-सावंतवाडी एसटीत तो वच्छीचा मांत्रीक (नंदु) कसा भेटला आणि त्यांनी सांगितल्याबरहुकुम मी सावंतवाडीत हॉटेलवर बॅगा ठेऊन, फ्रेश होऊन संध्याकाळी ४ वाजता सर्वांना घेऊन आकेरीत कसा दाखल झालो आणि माझे मनोरथ कसे पुर्ण झाले याचे इत्यंभुत वर्णन मी मालवणीत करायचं ठरवलं होतं Uhoh

डीजे, तुम्ही जाउन पण आलात? मस्तच. अभिनंअदन.
वृतांत येउदे. (मराठीत Happy ) आणि फोटो पण (मालवणीत चालतील Light 1 )

पूर्ण मडगाव-सिंधुदुर्ग-मालवण-देवबाग-सावंतवाडी-आकेरी चा वृत्तांत टाका बरं का. नुसता सावन्तवाडी ते आकेरी नको. पाटणकर बाईचे घर बघितलं का? आणि माधव चालत जातो तो रस्ता? तसाच हिरवागार आहे का?

DJ भारीच, अभिनंदन. लिंक दाखवलीत का मा बो च्या या बाफची.

तुम्ही मालवणीत बोलायचे, लिहायचे प्रयत्न करता हे कौतुकास्पद आहे. मालवणी भाषा प्रत्येक पट्यात बदलते, देवगडची बोली मालवणीला जवळ जाणारी पण परफेक्ट मालवणी नाही, पण आमच्या घरी गावी प्रमाण मराठी बोलत असल्याने मला काही येत नाही आणि बाहेरच्या लोकांशी बोलायला गेलं तर काहीतरी चुकतं, म्हणून मी प्रयत्न सोडून देते.

कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण वगैरे प्रत्येक ठिकाणी भाषेत थोडा थोडा फरक पडतो. त्या त्या पट्यातले लोकं म्हणतात आमची अस्सल, अशी मजा.

आज एपिसोडभर शोभाचा दांडी मार्च झाला. पाटणकरणी चं डोकं दुखत होतं म्हणे. कोणी सांगितलं होतं रात्री बेडवर गप पडायचं सोडून नाही ते धंदे करायला. हे म्हणजे खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारा आना तश्यातली गत झाली की.

आता शोभा तिला मारायला विळा उगारतेय. पाटणकरणीचा आकार केव्हढा, शोभाचा आकार काय. पाटणकरणीने ढकललं तर शोभाच्या 2-3 बरगड्या नक्कीच मोडतील.

पाटणकरणीचा आकार केव्हढा, शोभाचा आकार काय. पाटणकरणीने ढकललं तर शोभाच्या 2-3 बरगड्या नक्कीच मोडतील.
>>>>>>
Rofl

>>> पूर्ण मडगाव-सिंधुदुर्ग-मालवण-देवबाग-सावंतवाडी-आकेरी चा वृत्तांत टाका बरं का. नुसता सावन्तवाडी ते आकेरी नको. पाटणकर बाईचे घर बघितलं का? आणि माधव चालत जातो तो रस्ता? तसाच हिरवागार आहे का?<<
+१
डीजे,
तो गजालीचा बाफ आहे की आणि मालवणी शिकायाचा, तिथे लिहा की. प्रयत्न जर शिकायचाच असेल तर नीट्च शिका( फु. स.).

बाकी, हे सर्व कलाकार पण कुठे शुद्ध मालवणीत बोलतात , तेव्हा टोकणार कसे?
पट्या-पट्याने भाषा व ढ्ब बदलते.
पुर्ण ट्रीप प्लॅन लिहा. प्रवास ट्रेन/ बस्/कार वा किती दिवस, खायला कुठे , चांगले वस्तीला ठिकाण वगैरे पुर्ण टप्प्यावरचं आणि भेट दिलेल्यस जागा वगैरे.
धन्यवाद.

@ स्वप्ना_राज : पाटणकर बाईचे घर बघितलं का? आणि माधव चालत जातो तो रस्ता? तसाच हिरवागार आहे का?>> पाटणकर बाईंचं घर, नेने वकिलांचं घर हे वच्छीच्या घरामागेच आहे Proud फक्त आण्णा नाईकाचा वाडा तेवढा या सर्वांपासुन दूर आहे (दूर आहे ते बरंच आहे म्हणा Proud )
माधव चालत गेला तो रस्ता अजुनही हिरवा आणि थोडाफार पोपटी-पिवळा झालाय (ऑक्टोबर चालु झाला ना.!)
@ सूलू_८२ - हो पाहिला ना एक शॉट.. वच्छीच्या घरात नेने वकील आणि आबा काहीतरी बोलत होते.. तो नक्की काय प्लॉट चालु होता त्याची आम्हाला काही टोटल लागली नाही. कळेल काही दिवसात. शिवाय सरकारी हॉस्पिटल मधे पण शुटींग सुरु होतं असं समजलं.. बहुतेक शोभा गचकतीय काय की.
@ अन्जू - थँक यु आदरमोद. बघा ना .. मालवणी तिथल्या तिथे किती वेळा बदलते आणि माझी तेवढी काहिंना खटकते Uhoh
@ अज्ञातवासी : हो ना.. मस्ट विजिट.. पुर्ण कुटुंबासोबत आण्णा नाईकाच्या वाड्यात फिरताना माझा आनंद गगनात मावत नव्हता Proud
@ सस्मित : वृतांत येउदे. (मराठीत Happy ) आणि फोटो पण (मालवणीत चालतील Light 1 )>> Proud

@ अमा : डीजे तुम्ही लिहा मालवणीत. मी त्याचे दक्खनी हैद्राबादीत भाषांतर करेन. क्या बोलते. >> Biggrin Biggrin Biggrin

पाटणकरीण हॉस्पिटलात गेली नाही म्हणजे मिळवलं. नाहीतर तिथून थेट वाड्यात यायची घरी कोणी काळजी घ्यायला नाही म्हणून.

पाटणकरीण हॉस्पिटलात गेली नाही म्हणजे मिळवलं. नाहीतर तिथून थेट वाड्यात यायची घरी कोणी काळजी घ्यायला नाही म्हणून.>> व्हय तर... ह्या माझ्या लक्षात कसा ईलो नाय..? Uhoh

आज एपिसोडभर शोभाचा दांडी मार्च झाला. >>>>>> Rofl पाटणकरीण फोफशी आहे, जाड आहे म्हणून ताकदवान नाही. Proud

डिजेनू काय ह्या ! तुम्ही लयच घाई केलीत. वाईच त्या अण्णांना मायबोलीची ओळख तर करुन द्यायची ना. म्हणजे आमचे शिव्याशाप त्यांना कळले असते. Proud बरं, छान वाटले वाचुन. आता फोटो व अगदी सविस्तर वृतांत नक्कीच टाका. वाट बघत आहोत.

>>वाईच त्या अण्णांना मायबोलीची ओळख तर करुन द्यायची ना. म्हणजे आमचे शिव्याशाप त्यांना कळले असते

हो ना, केवळ अण्णासाठी एक पूर्ण पान फुल्ल्यांनी भरुन काढलं असतं. आणि डीजेना ऐनवेळी नेटवर्क मिळालं नाही तर म्हणून स्क्रीनशॉट घेऊन जायला लावलं असतं.

अण्णा पाटणकरणीची विचारपुस करायला येऊ शकतात आणि शोभाला हल्ला करताना बघून त्या विळ्याने तिलाच कापू शकतात.

रच्याकने, पाटणकरणीचं खरं रुप कळल्यावर माईने तिचा गुपचुप गेम केला तर काय जबरदस्त twist होईल् नै. सायकोची बायको महा सायको.

पहिल्या सिझन मध्ये माईच्या खोलीच्या कपाटातून अण्णा बाहेर येतात असा तिला भास होत असतो. त्याचा ह्या सिझन मध्ये उलगडा होईल असं वाटलं होतं. ते झालं नाही.

>>पाटणकर बाईंचं घर, नेने वकिलांचं घर हे वच्छीच्या घरामागेच आहे  फक्त आण्णा नाईकाचा वाडा तेवढा या सर्वांपासुन दूर आहे

आणि तो गुत्ता??? Proud

>>माधव चालत गेला तो रस्ता अजुनही हिरवा आणि थोडाफार पोपटी-पिवळा झालाय

काल शोभा चालत होती तो हाच रस्ता काय? किती छान हिरवा होता. डोळे निवले अगदी पाहून.

@ स्वप्ना_राज : रच्याकने, पाटणकरणीचं खरं रुप कळल्यावर माईने तिचा गुपचुप गेम केला तर काय जबरदस्त twist होईल् नै. >> हो हो.. परवा एस.टीत भेटलेले नंदु (मांत्रीक) मला हेच सांगत होते की त्यांना आधी फक्त ७ एपिसोड साठी कास्ट केलेलं पण सिरिअल मधे ट्विस्ट घातला म्हणुन आता पुन्हा बोलावण्यात आलं म्हणुन... ते आलेत म्हणजे वच्छीनेच ट्विस्ट आणला असेल असं वाटतं.

आणि तो गुत्ता???>> गुत्ता म्हणजे वच्छीच्या घराची मागची बाजु..! आता बोला..! Proud

काल शोभा चालत होती तो हाच रस्ता काय? >> हो.. तोच तो रस्ता.. आणि त्या रस्त्याने ती डांबरी सडकेवर आली तेव्हा तिच्या मागुन एस.टी. आली तो वेंगुर्ला-बेळगाव रोड.

वच्छीच्या घरात नेने वकील आणि आबा काहीतरी बोलत होते.. >>>>>>>> शोभा गचकली तर अण्णावर केस टाकायची असणार आबान्ना.

Pages