Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आबा काय केस टाकतोय.. वच्छी
आबा काय केस टाकतोय.. वच्छी टाकेल
वच्छीसारखी वाघीण जित्ती
वच्छीसारखी वाघीण जित्ती असताना त्या चिचुन्द्री शोभाला कशाला डोईजड कामं देताहेत ...शेवंता vs वच्छी सामना लावा म्हणावं....
शेवंता व्हर्सेस वच्छी म्हणजे
शेवंता व्हर्सेस वच्छी म्हणजे एकतर्फी सामना. वच्छी तिला खाऊन टाकेल कच्ची! माय व्होट गोज टू वच्छी. ताई माई अक्का विचार करा पक्का वच्छीवर मारा शिक्का
शोभा गचकली तर वच्छी शेवंताला संपवून बदला पूरा करायला केपेबल आहे अगदी.
शेवंता वॉज saved by the Anna
शेवंता वॉज saved by the Anna अण्णा आज जन्मात पहिल्यांदा कोणासाठी तरी स्वयंपाकघरात गेला असेल. मेला बायकोकडून सेवा करुन घेतो आणि इथे पाटणकरणीची सेवा करतोय. तिची अण्णाशी वागणूक आणि पाटणकरची आठवण काढून रडणं पाहून मला असं वाटतं की अण्णाने नवर्याला मारलं म्हणून ती त्याला वाकवून त्याचा बदला घेतेय. कदाचित अण्णाकडून गुन्हा कबूल करवून घ्यायचा आणि जमल्यास एखादा पुरावा असल्यास तो पोलिसान देण्याचाही बेत असावा.
वच्छीला बेस्ट व्हीलन (लेडी)
वच्छीला बेस्ट व्हीलन (लेडी) झी गौरव मिळाला (जो तिला मिळायलाच हवा होता..! बेस्ट आई आणि सासु म्हणुन देखील तिच्या पात्राला छान छटा होती).
सर्वोत्कृष्ट आई - निवेदिता जोशी - एकुलत्या एका मुलाला लाडावुन बिघवडला म्हणुन (त्या पेक्शा हा पुरस्कार माईला मिळायला हवा होता - स्वत:ची ३ आणि भिवरीचं एक अशी ४-४ मुलांची आई झाली ती)
सर्वोत्कृष्ट सासु - निवेदिता जोशी - काय तर एकुलत्या एका मुलाने प्रेमविवाह करुन आणलेल्या गोड-गोड सुनेची सासु झाली (त्यापेक्षा हा पुरस्कार माईस मिळायला हवा होता.. सासु म्हणुन वेगवेगळॅ पदर तिच्या कॅरॅक्टर्ला आहेत)
खर्याची दुनिया नाही हेच खरं.
बत्थड अॅक्टर आणि त्यांच्या महाबत्थड कॅरॅक्टरला पुरस्कार मिळण्यासाठी 'कंपु' किती महत्त्वचा असतो हेच यावरुन सिद्ध होतं
शेवटचा अण्णाचा तिन्ही
शेवटचा अण्णाचा तिन्ही प्रेमपात्राबरोबरचा डान्स कुणीकुणी पाहिला?
शेवन्ता इतकी छान नाचेल अस वाटल नव्हते.
माई लावणी म्हणत होत्या की अन्गाईगीत म्हणत होत होत्या?
ह्या धाग्यावर अण्णान्ना ' सायको अण्णा' म्हटल ते बरोबर उचलल ह्यान्नी.
शेवन्ता कधी कधी केसाची बट बोटान्नी फिरवते ती मात्र कोमोलिकाची ( कसौटी जिन्दगी की) कॉपी वाटते.
(No subject)
काय समजला नाय बा!!
काय समजला नाय बा!!
शोभा शेवंताला मारायचा प्रयत्न करते ते काय स्वप्न असतं का??
मला आता असं वाटू लागलंय की
मला आता असं वाटू लागलंय की पाटणकरच्या घरात जे चाललंय ते शेवंता स्वत:च करतेय. आपण ह्या घरात असुरक्षित आहोत असं अण्णाला भासवून वाड्यात घुसण्यासाठी. फार तर तिला शोभाची साथ असेल.
ही मालिका म्हणजे आता
ही मालिका म्हणजे आता कुत्र्याच्या शेपटी सारखी झालीय गोल गोल फिरत आहे तिथेच आहे
अगदी अगदी....काहीही दाखवत
अगदी अगदी....काहीही दाखवत आहेत कारण शेवटी कसलंही स्पष्टीकरण न देता एखादा शेखचिल्ली ट्विस्ट देऊन मालिका संपवायचा अनुभव गाठीशी आहे त्यांच्या. छ्तावर काळ्ं मांजर मारुन पोलिस तर टाकणार नाहीत. कारण शेवंताला घाबरवन्यात त्याना काही फायदा नाही. शोभाला असं करुन काही मिळनार नाही. वच्छीचंही तेच. पाटणकरचं भूत फक्त शेवंतालाच का घाबरवेल? अण्णा तर आरामात फिरतोय की. त्याला का नाही घाबरवत म्हणे?? राहता राहिली शेवंता. सो हे तिचंच काम आहे.
अगदी अगदी....काहीही दाखवत
हिचं ते कोण आहे, कोण आहे ऐकून कान किटले माझे. असेल भूत तर काय सांगणार आहे की बाई ग मी तुझ्या नवर्याच्ं भूत आहे. दुसर्या जन्माला न जाता तुझ्या आणि अण्णाच्या लीला पहायला थांबलोय इथे पॉपकॉर्न घेऊन. का कोण मारेकरी असेल तर म्हणणार आहे की काही नाही बाई, तुम्ही झोपा निवांत. मग मी येउन तुमचा खून करतो. बरं ही बेंबीच्या देठापासून बोंब मारतेय तर शेजारी काय मेलेत काय? का घर गावकुसाबाहेर आहे?
अगदी अगदी....काहीही दाखवत
आणि सगळ्यात शेखचिल्ली म्हणजे माई. म्हणे बरं झालं हे त्यांच्या घरची काळजी घेताहेत. ह्या बाईला माधवच्या त्या मैत्रिणीच्या आईकडे, ते पण दुसर्या गावात रहानार्या हं, आपल्या नवर्याच्ं जाणं आहे हे कसं माहित होतं त्याचंच आश्चर्य वाटतंय मला. वर आपल्या नवर्याची औकात माहित असताना तो नवरा गेलेल्या सुंदर बाईकडे जातो ह्यात तिला काही वावगं वाटत नाही हे मला पटतच नाहिये
हो जरा बोअरच होते आहे सर्व.
हो जरा बोअरच होते आहे सर्व. अॅग्री. ते कोणे को णे फारच बोअर होते. २७ वेळा असेल. शोभाला अ एव्ढे पैसे आणी दत्ता सरिताला काही नाही कधी च हे पटत नाही. माई पण अं मळ डोक्याने पडली आहे काय. सुसल्या पळून परत ये णार होती ना ती पण अभ्यासात रमलेली दिसते. ती सुद्धा करत असेल.
त्या अवार्ड फंक्षन मध्ये पण अण्णाचे इतके उदात्ती करण केले गेले प्लस विबासं पण आता तर शेवंता जामच गुबगुबीत जाडी दिसू लागली आहे. नाचात आजिबातच अंग हलत नाही. पण करवला हॉट डान्स तो ही आणा बरोबर. किळस वा टली मला तर.
२७ वेळा असेल>>>
२७ वेळा असेल>>>
मी सहज विसरायला झाले म्हणुन
मी सहज विसरायला झाले म्हणुन राखेचा२ चा पहिला एपिसोड पाहिला. तब्बल ९ जणांचे डोळे पांढरे झालेले दिसले - शेवंता,पाटणकर, सदा, चोंगट्या, पांडुचा बाप, पोस्टमन, भिवरी, काशी अन शोभा..! शोभा सुद्धा जाणार हे बघुन कसेतरीच वाटले.. आण्णा मेला म्हणुन माईला नीट हंबरडा सुद्धा फोडता आला नाही...
वच्छी अन आबा चं काय होतं काय माहीत.. कारण राखेचा१ मधे त्यांचा काहीच रोल नाही.
गुबगुबीत नाय, चांगलीच
गुबगुबीत नाय, चांगलीच ढोलुढालु आहे शेवंता. डिजे , हे माका पटला हां तुमचा. माईलाच सर्वोत्कृष्ट सासु वा आईचा पुरस्कार मिळायला हवा होता. अनारश्याला आई व सासु दोन्ही पुरस्कार मिळाले.
अनारसा की घारगा?
अनारसा की घारगा?
डिजे , हे माका पटला हां तुमचा
डिजे , हे माका पटला हां तुमचा. माईलाच सर्वोत्कृष्ट सासु वा आईचा पुरस्कार मिळायला हवा होता. >> रश्मी वयनी, व्हय तर..
अनारश्याला आई व सासु दोन्ही पुरस्कार मिळाले.>> घारगा.. घारगा.. निजो म्हणजे निव्वळ घारगा आहे.. तिचा तो बबड्या म्हणजे भजा.. अन ती सुन म्हणजे कडाकणं... आणि सासरा कड कड कडबोळा..! धन्य ती अग्गंबाई सासुबाई अन त्यांना पुरस्कार देणारे ज्युरी..!!
डीजे अनुमोदन. मी अग बाय माझे
डीजे अनुमोदन. मी अग बाय माझे म्हणून हंबरडा फोडलेला माईला बक्षिस नाय मिळालेतर. निजो काय बोटॉक्स सुंदरी. गेंगाणे बाई.
@ अमा : मी अग बाय माझे म्हणून
@ अमा : मी अग बाय माझे म्हणून हंबरडा फोडलेला माईला बक्षिस नाय मिळालेतर. >>
निजो काय बोटॉक्स सुंदरी. गेंगाणे बाई.>> ट्रु
त्या अवार्ड फंक्षन मध्ये पण
त्या अवार्ड फंक्षन मध्ये पण अण्णाचे इतके उदात्ती करण केले गेले >>>>>>>> ++++++११११११११ अगदी अगदी. दान्डियामधल्या लहान मुलान्चे पिऊन टल्ली झालेल्या अण्णाची कॉपी करतानाचे व्हिडिओज दाखवले. खुप भयन्कर होत ते.
गेल्यावेळचा झी गौरव सोहळा छान
गेल्यावेळचा झी गौरव सोहळा छान होता.. त्यातलं शेवंताचं शो स्टोपर नाचकाम तर अगदीच भन्नाट होतं.. यावेळेस शेवंताचं टॅलेंट अजीबात वापरुन घेतलं नाही.. तिच्याकडुन एकाच साडीवर २-३ डांस सिक्वेन्स करुन घेतले..
तिला बिचारीला लचकता मुरडता पण
तिला बिचारीला लचकता मुरडता पण येत नव्हतं . थंय राहुन भात खातंय वाइच फुगतंय शेवंता. कोणे कोणे करत वॉक तरी करायला हवा.
>>वच्छी अन आबा चं काय होतं
>>वच्छी अन आबा चं काय होतं काय माहीत.. कारण राखेचा१ मधे त्यांचा काहीच रोल नाही.
त्या सिझनमध्येही घरावर दगड पडतात तेव्हा चुलत घराण्यातले लोक करत असतील असा काहितरी मोघम उल्लेख आहे.
>> नाचात आजिबातच अंग हलत नाही
>> नाचात आजिबातच अंग हलत नाही. पण करवला हॉट डान्स तो ही आणा बरोबर. किळस वा टली मला तर.
मला दर एपिसोडमध्ये त्यांचं ते मिठ्या मारणं असह्य झालंय अगदी. एक तर त्या अण्णाचं काम करणारया नटाला ह्यात का घेतलंय कळत नाही. तो भूमिकेच्या मानाने फारच थोराड दिसतो. म्हणजे असेल त्या अण्णाचा मुलगा माधव पंचविशीचा. लग्न लवकर आणि मूल लवकर झालं म्हटलं तरी तो 45 ते 50 च्या मधला असायला हवा. हा अण्णा दिसतो 50 च्या पुढे. त्यात ते पोट. तो विग. आणि दुसर्या बाजूला वजनदार शेवंता. राजहंसाचे चालणे जगी झालीया शहाणे वगैरे मान्य करुनही हा रोमान्स म्हणा किंवा भानगड म्हणा हास्यास्पद आणि केविलवाणी दोन्ही दिसते.
अण्णा सरिताशी नीट बोलतो
अण्णा सरिताशी नीट बोलतो तेव्हा हा शोभाच्या करणीचा परिणाम असं म्हणावं तर माईच्या अंगावर वसकन ओरडला. काय टोटल लागतच नाही. आणि ह्या कश्याचिही उत्तरं मिळनार नाहीत शेवटी
>>दान्डियामधल्या लहान
>>दान्डियामधल्या लहान मुलान्चे पिऊन टल्ली झालेल्या अण्णाची कॉपी करतानाचे व्हिडिओज दाखवले. खुप भयन्कर होत ते.
हो मागेही त्या अण्णाला कोण्या छोट्या पोराने काहितरी 'सुपर अण्णा' का अशी काहितरी हाक मारली होती तेव्हा अण्णा खुश झाला होता असं लोकसत्ता ऑनलाईन वाचलं होतं. आधी ही एव्हढी लहान पोरं ही सीरियल बघतातच कशी? बायको मुलाना जनावरासारखं वागवून काही काम न करता दारु ढोसनारा बाहेरख्याली अण्णा रोल मॉडेल असेल तर कठीण आहे ह्यापुढल्ं. झी चं ठिक आहे ते टीआरपी मिळवायला बसलेत. लोकाना अक्कल नको?? का सगळ्यांनीच कमरेच्ं सोडून डोक्याला गुंडाळायचं ठरवलंय???
हायला, पाटणकरणीच्या क्लोजअप
हायला, पाटणकरणीच्या क्लोजअप नंतर बांगड्यांचा क्लोजअप आल्यावर मी खुर्चीवरुन पडलेच. म्हटलं पाटणकरणीने बांगडे केले? ते बांगडे पण बेशध्द पडले असतले. म्हणतात ना, आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतिचं मीठ अळणी. माई अगदी लहान मुलासारखी हनुवटी पुढे काढून रडायचया बेताला आली होती. शेवंता आपण अण्णाला किती नाचवू शकतो ह्याचा आन्दाज घेतेय. एक दिवस वळचणीचं पाणी आढ्या जाणार आणि मग रामनाम सत्य. चोन्गटया हुशार. डाळभात खायला लागेल म्हणून आधीच पसार झाला. पाटणकरीण डाळ भात आणि बटाटा भाजीला 'घाट घातला' म्हणतेय
डाळ तरी कशी डाळ खाली आणि वर
डाळ तरी कशी डाळ खाली आणि वर पाणी. अण्णाची भारीच जिरवली पण मज्जा आली!
Pages