Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बत्थड अॅक्टर आणि त्यांच्या
बत्थड अॅक्टर आणि त्यांच्या महाबत्थड कॅरॅक्टरला पुरस्कार मिळण्यासाठी 'कंपु' किती महत्त्वचा असतो हे झी गौरव ने सिद्ध केलं...!
माडी अतिशय हिणकस पात्र आहे!
माडी अतिशय हिणकस पात्र आहे! काही अर्थच नाही! जसे वाटेल तसे संवाद घातले आहेत तिच्या तोंडी! इतकी मूर्ख, बावळट बाई!
आणि तिला राजे स्पष्ट पणे का सांगत नाहीत? की बाई मी तुझ्याशी नाही लग्न करु शकत! उगीच आपलं अॅक्सेंट मिरवीत....मा अॅडी,,,,..... तसं नसतं ते.....!!!
ब्रेक अप काय अन टेबल काय! छे!
कैच्या कैच!
आणि ही आसावरी तरी मॅडीताई मॅडीताई करते..... काहीही!
कितीवेळ तेच तेच गैरसमज
कितीवेळ तेच तेच गैरसमज दाखवणार. सोहमच्या तर थोबाडीत ठेवावीशी वाटते म्हणे उपमा किती वेळा करतेस आणि काय ते भरवत असते आसावरी त्याला. त्या डबड्यालाही बक्षीस मिळालं का झी मराठीचं?
प्रज्ञाचा पत्ता कट केला का
प्रज्ञाचा पत्ता कट केला का,दिसली नाही बरेच दिवसात.
माडी ल पुरस्का र?????? घोर
माडी ल पुरस्का र?????? घोर कलियुग रे देवा
हो राजे आणि ती mady ह्यांचा
हो राजे आणि ती mady ह्यांचा गैरसमज मागे पण दाखवला होता. कुलकर्ण्यांकडे सतत कुणी ना कुणी कुणाचे ना कुणाचे लग्नाचं ठरवत असतं.
ती शुभ्रा आ. सा. आणि राजेंचं लग्न ठरवायला निघालीय.
ते दत्ता राजे आणि mady चं लग्न ठरवतायेत. त्यांनी बाहेर पाटी लावायला पाहिजे "येथे लग्न ठरवून मिळेल "
दत्तांचा स्वतःचा पुतण्या लग्नाची पत्रिका घेऊन आला तर दत्तानी त्याला हाकलून लावलं मग आता राजेंचं लग्न का बर लावतायेत?
तोही राजेंच्याच वयाचा होता ना..
रच्याकने झी मराठी अवॉर्ड्स किती बोर होते
ते " गल्लन गल्लन गुडियां " त्याच्यावर इथून तिथून सगळ्यांनी नाचायची हौस भागून घेतली. सुरवातीचे 15 mnt डान्सचं होता.
माझं तर डोकं दुखायला लागलं ते गल्लन गल्लन गुडियां ऐकून
बंद केलं बघणं.
तोही राजेंच्याच वयाचा होता ना
तोही राजेंच्याच वयाचा होता ना.. >>>>>> राजेच्या पाठीमागे पाश नाहीत ना मुलाबाळान्चे, म्हणून आजोबान्ना वाटल असेल राजेन्च लग्न लावून देऊ या म्हणून.
एरवी सिरियलमध्ये बबडया बबडयाच दिसतो, अवॉर्ड्समध्ये मात्र हॅन्डसम दिसत होता.
त्या डबड्यालाही बक्षीस मिळालं का झी मराठीचं? >>>>>>> नाही.
ह्यावर्षीच झी मराठी अवॉर्ड्स मागच्या वर्षीपेक्षा छान झाल.
ते " गल्लन गल्लन गुडियां " त्याच्यावर इथून तिथून सगळ्यांनी नाचायची हौस भागून घेतली. सुरवातीचे 15 mnt डान्सचं होता. >>>>>>> मला आवडला तो डान्स . माझ फेवरिट गाण आहे हे.
ह्यावेळी नायक नायिकान्चे कपल डान्स नाही ठेवले.
अवॉर्ड्सची थीम ब्लॅ़क एन्ड रेड होती वाटत. सम्भाजी सिरियल आणि राखेचाचे काही कलाकार सोडून सगळेच काळया ( पुरुष) आणि लाल ( बायका) कपडयात होते.
अभिजित खान्डकेकर चान्गला नाचतोय. पुर्वी तो नॉन- डान्सर होता. बायकोकडे टयूशन लावली वाटत.
शेवटी रवी पटवर्धनना बघून, त्यान्च बोलण ऐकून वाईट वाटल.
तरीच म्हटल खुकखु आणि ह्याच बॅकग्राउण्ड सन्गीत सारख कस. कारण कम्पोझर तेच होते. त्यान्ना अवॉर्ड्स मिळाले ते मात्र चान्गल झाल. छान काम करतात ते. त्यान्ना अवॉर्ड्स देताना व्हायोलिनची धून वाजत होती.
झी ने नेहेमीप्रमाणे स्पष्ट न
झी ने नेहेमीप्रमाणे स्पष्ट न बोलण्याची परंपरा राखली आहे. सगळा घोळ साग्रसंगीत पार पडला आहे.
आजोबा दोन्हीकडून काय बोलतात? हॉटेलमधे म्हटले मी पुढारलेल्या आधुनिक विचारांचा आहे आणि आसावरीला कारमधे म्हणतात नातसूनेने जीन्स्/पँट कशाला घातली? काहीही चालू आहे.
राजेना स्पष्ट सांगायला काय होतंय त्या माडीला? गुळमुळीत काहीतरी बोलत राहतात. क्रीम ब्रुले चा उदोउदो फार झालाय आता. फासावसं वाटतंय सगळ्यांच्या तोंडाला :रागः
आजकाल हसूच येतं सगळं पाहून.
आजकाल हसूच येतं सगळं पाहून.
विश्वासच तुपारेशी कनेक्शन:
विश्वासच तुपारेशी कनेक्शन:
https://www.loksatta.com/manoranjan-news/aggabai-sasubai-marathi-serial-...
वाचली बातमी . पण आठवत नाही तो
वाचली बातमी . पण आठवत नाही तो तुपारे मधे होता ते
मॅडी इनोसंट दाखवायच्या नादात
मॅडी इनोसंट दाखवायच्या नादात बावळट दिसतेय. आसावरी ला का ऐवढं वाइट वाटतयं,त्यांच्या लग्नाचं.
आसावरी बावळट आहे.
आसावरी बावळट आहे. स्वयंपाकघरातून तिला बाहेर दिवाणखान्यात काय बोलणं चाललंय ते ऐकायला येत नाही, तरी ती शंभर वेळा डोकावताना दाखवली आहे. सगळे हावरट दाखवले आहेत, जसा कधी फराळ खाल्ला नाही, फराळ असा ताटात काढून का ठेवलेला असतो, प्रज्ञाचं काम सोपं करायला का. फराळ खाली जमिनीवर का टाकलेला दाखवला, अन्नाची नासधूस
उद्या गिओ आणि निजो येणार आहेत होम मिनिस्टर मध्ये.
निवेदिता मस्त दिसते या वयात
निवेदिता मस्त दिसते या वयात सुद्धा.
अवांतर: बाकी हो.मि. मध्ये खऱ्या जोड्यांना बोलवायला हवे ना?
ही मालिका अभिनयाच्या जोरावर तग धरून आहे असे म्हणायला हरकत नाही.
कारण विषय मस्त होता, पण हाताळणी तितकीच बालिश!
कारण विषय मस्त होता, पण
कारण विषय मस्त होता, पण हाताळणी तितकीच बालिश!>>>>> +१.
होमि प्रोमोशनसाठी वापरतात
होमि प्रोमोशनसाठी वापरतात कधीपासून. दुसऱ्या दिवशीपण सुमी आणि समर आले होते. सुमी अजिबात आवडत नाही त्यामुळे नाही बघितलं. गिओ आणि निजो ची मुलाखत छान होती. पांचट गेम खेळण्यापेक्षा अजून त्यांना बोलायला दिलं असतं तर आवडलं असतं. निजोचा खरा मुलगाही दाखवला शेवटी, दिसतो अशोकसारखा पण नाजूक आवाज आहे.
अवांतर: कलर्स अवॉर्ड पण छान होते. चार तास होते बहुतेक. दुपारी बाराला सुरु झालेले चार वाजता संपले. मी मध्ये मध्ये बघितले. सुमित राघवनने धमाल उडवून दिली. तो नसता तर एवढे मनोरंजन झाले नसते.
सिद्धी फक्त दहावी झालीये आत्ता किती मोठी दिसते ती.
एबीपी माझावर आज
एबीपी माझावर आज पाडव्यानिमित्त अशोक सराफ आणि निजोची मुलाखत होती. मजेदार झाली मुलाखत. त्यान्चा मुलगा शेफ झालाय. कॅनडातल्या लोकान्ना ब्रिटिश अॅक्सेण्टमधल इन्ग्रजी शिकवतो अस म्हणत होती निजो. त्याला अस्थमाचा त्रास आहे.
आपण अस करु द्त्ता च पण लग्न
आपण अस करु द्त्ता च पण लग्न करुन टाकू त्या ईश्श्य आजीशी
अवांतर : तो नि.जो.चा सिरियल
अवांतर : तो नि.जो.चा सिरियल मधला बबड्या अशोक पत्कींचा मुलगा आहे.
कालचा लक्ष्मी पूजनाचा एपिसोड
कालचा लक्ष्मी पूजनाचा एपिसोड छान झाला. हॉटेलमधला अभिजित आणि आसावरीचा सिन आवडला. साथीला ते व्हायोलिनच बॅकग्राऊण्ड म्यूझिक. वाह! क्या बात है!
कालच्या एपिसोडमधले डायलॉग्ज चान्गले होते.
बबडया म्हणे जर त्याला कुणी दिलेल गिफ्ट आवडल नाही तर तो त्याला बदलून दयायला सान्गतो. एक दिवस हा बायको सुद्दा बदलणार वाटत. पुढच्या स्टोरीची पुर्वतयारी, दुसर काय!
मला वाटलं आसावरी हॉटेलमधे आली
मला वाटलं आसावरी हॉटेलमधे आली आहे ते स्वप्नच आहे राजेंचं. नंतर कळलं ती खरंच गेली होती तिकडे. घरूनच पणत्या घेऊन गेली की काय? सॉलिडच लाईन मारतात राजे तिच्यावर मैत्रीण म्हणत म्हणत
भोचक भवानी तेजश्रीला लगेच विचारायची काय गरज? गिफ्ट आहे का म्हणून?
आसावरी राजेंना फराळ द्यायला गेली हे कसं चाललं आजोबांना? परवा तर घरातून हाकलून दिलं होतं ना?
राजेंचं सारखं दत्ता मग जीभ चावणं.. आता बोर मारतंय फारच राव
दिवाळीच्या धावपळीत 4-5 दिवस
दिवाळीच्या धावपळीत 4-5 दिवस बघायला जमलं नाही.
आज वेळ मिळाला म्हणून बघितलं.
आजोबा जे जे काही आ. सा. ला बोलले ते अजिबातच पटलं नाही.
एकोणीशे साठ किंवा सत्तरच्या दशकतला सिनेमा बघतीये असं वाटत होतं.
काय तर म्हणे डार्क रंगाच्या साड्या नेसायच्या नाहीत.
आजोबा सतत कुलकर्ण्यांकडची यौ पद्धत आहे अन त्यो रीत आहे तेच सांगत असतात.
आजोबा फार डोक्यात जातायेत.
अवांतर : ह्या सिरीयलची पटकथा रोहिणी निनावे ही आहे.
जी सुरवातीला मा. न. बा. ची ही लेखिका होती.
ह्याचाच अर्थ मा. न. बा सारखीच तर्कशून्य, सुमार सिरीयल बघायला मिळणार आहे.
आजोबा फार डोक्यात जातायेत.>>>
आजोबा फार डोक्यात जातायेत.>>>>>>>खरचं! भयंकर राग येतो बोलणं ऐकताना.
सुमी असती तर तिने कानाखाली लगावली असती एक बबड्याच्या. त्या आजोबालाही सरळ केलं असतं.
झीवाले कै च्या कै मालिका दाखवतात. बालिश आणि बिनडोक मालिका काढण्यात त्यांचा हातखंडा आहेच.
बरेच दिवस झाले, ही मालिका
बरेच दिवस झाले, ही मालिका बघणं होत नाही, पण आजोबांचा DDLJ चा अमरीश पुरी होणार असं दिसतंय!
'जा सिमरन जा!'
रिमेम्बर फर्स्ट प्रोमो, 'नवऱ्या मुलीचे मामा कुठे आहेत?' आजोबांचं विचारताय
अज्ञातवासी +1 :हहपुवा:
अज्ञातवासी +1
काही सरकले का पुढे?
काही सरकले का पुढे? त्यामानाने सुमीचे लग्न पटकन झाले.
झी गौरव मधे सुमीला कोणता
झी गौरव मधे सुमीला कोणता पुरस्कार मिळाला..?
मला वाटलं आसावरी हॉटेलमधे आली
मला वाटलं आसावरी हॉटेलमधे आली आहे ते स्वप्नच आहे राजेंचं. >>>>>> मलाही आधी तसच वाटल. वाटल, आता समोर मॅडी येतेय की काय पणती घेऊन.
आजोबा फार डोक्यात जातायेत.>>>>>>>खरचं! भयंकर राग येतो बोलणं ऐकताना .आजोबा जे जे काही आ. सा. ला बोलले ते अजिबातच पटलं नाही. >>>>>>>> अगदी अगदी डबल ढोलकी आहेत आजोबा. एकीकडे मॉर्डन वस्तून्ना नाव ठेवतात आणि नन्तर त्याच वस्तू वापरतात सुद्दा.
कुळकर्ण्यान्च्या घरात यव चालत नाही आणि त्यव चालत नाही. शेजारणीची Flirting बरी एन्जॉय करतात. हे चालत वाटत त्यान्ना. त्या बबडयाच्या कानाखाली जाळ काढायला पाहिजे.
अखेर शुभ्राने तोण्ड उघडल ते चान्गल केल. पण तिचही चुकलच. तिने आसाला आधी आजोबान्समोर येऊच दयायच नव्हत. गुपचुप तिचा फोटो काढून राजेन्ना पाठवायचा होता. नन्तर आसा आजो बान्समोर आली तेव्हाच शुभ्राने त्यान्ना भिडायला पाहिजे होत.
प्रज्ञा आगाऊच आहे. आधी शुभ्राच्या साडीचा नन्तर आसाचा अपमान केला आणि तेही त्यान्च्या तोण्डावर!
मॅडी शॉर्ट कपडयात कुळकर्ण्यान्च्या घरात आलेली आजोबान्ना कशी चालते बुवा!?
अगदी अगदी डबल ढोलकी आहेत
अगदी अगदी डबल ढोलकी आहेत आजोबा. >>>> हो ना! एकीकडे भडक रंगाच्या साडीला नावे ठेवायची आणि स्वतः भडक रंगाचा गुरुशर्ट घालायचा.
मॅडी शॉर्ट कपडयात
मॅडी शॉर्ट कपडयात कुळकर्ण्यान्च्या घरात आलेली आजोबान्ना कशी चालते बुवा!?>>>>>>>>>>>> ती त्यांच्या घराण्यातली नसल्याने चालत असेल बहुधा.
Pages