Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तरी बरी वाटते अबासाबा
मला तरी बरी वाटते अबासाबा मालिका त्या मिसेस मुख्यमंत्री पेक्षा.
बाकी दिल दोस्ती दुनियादारी, एलदुगो, रुद्रम सारख्या मालिका कधीकधीच पाहायला मिळतात.
अवांतर: 24 नावाची हिंदी मालिका होती. उत्तम आहे पहिला सीझन. कोणाकडे त्याच्या दुसऱ्या सीझनचे एपिसोडस् आहेत का?
धन्यवाद चैत्राली. तो सांगतो
धन्यवाद चैत्राली. तो सांगतो की त्याने नोकरी सोडली, खरं तर त्याला काढून टाकलेले आहे, पण आता ऑफिस मधून फोन येत असतात तर जात का नाही तो. काय काम बाकी असतं ऑफिसात. फुल न फायनल नकोय का त्याला, भलताच माजोर्डा आहे डबड्या.
राजे, आसावरी, शुभरा हे सर्व
राजे, आसावरी, शुभरा हे सर्व कित्ती छान दाखवण्यासाठी बाकी सर्वांना व्हिलन करत असतील झीवाले
खरंतर शुभराने सासूचे लग्न वगैरेकडे लक्ष देण्याआधी नवऱ्याला ताळ्यावर आणायला हवं.
शुभराने सासूचे लग्न वगैरेकडे
शुभराने सासूचे लग्न वगैरेकडे लक्ष देण्याआधी नवऱ्याला ताळ्यावर आणायला हवं>>>>> +१
निवेदिता का नाही बोलत आहे
निवेदिता का नाही बोलत आहे राजेंशी? काय भांडण झाले? बबड्या इस अॅबसोल्युट डबड्या..एकदम खलनायक..
अग्गंबाई सासुबाई ला झी गौरव
..
काल कैच्याकैच दाखवल.तो बॉस
काल कैच्याकैच दाखवल.तो बॉस घरी आल्यावर एवढा मोठा बॉम्ब फोडणार आहे हे शुभ्राला माहित असत म्हणूनच त्या प्रज्ञाला कटवते ना,मग आता तो घरी आल्यावर घराचा दरवाजा कुठलीही अगदी शुभ्राएवढी स्मार्ट नसलेली मुलगीही नीट लावेल.
पण केवळ काहीतरी अतिरंजित पध्दतीने आसावरीला कळायला हव म्हणून शुभ्राला तो दरवाजा मुद्दाम उघडा ठेवायला लावला आहे.
काहीही....
मला तर अतिरेक वाटतो अनेकदा.
मला तर अतिरेक वाटतो अनेकदा. पण मनोरंजक आहे.
मला कळत नाही शुभ्राने कसे
मला कळत नाही शुभ्राने कसे काय त्या ठोंब्याशी लग्न केले. तो कसला लूझर आहे हे ३ वर्षात कळले नाही का तिला. का तिचे लक्ष फक्त या घरात येऊन सासूचे जमवायचे ह्यातच होते..
राजे डायरेक्ट सोन्याच्या दागिन्यांवर उतरले इतके डेस्परेट का दाखवले आहेत. ही कथा खरे तर छान दाखवता आली असती पण राजेंना डॅशिंग दाखवायच्या हट्टापायी खूप उथळ दाखवत आहेत.
Mast magan reply>>>>> +1
Mast magan reply>>>>> +1
अग्गंबाई सासुबाईला झी गौरव
अग्गंबाई सासुबाईला झी गौरव सर्वोत्कृष्ट कार्यक्रम साठी नामांकन मिळालेलं आहे. हा पुरस्कार मिळवुन देण्यासाठी आपल्या (किंवा दुसर्यांच्या
) मोबाईलवरुन या क्रमांकावर मिसड्कॉल द्या - ८०८००७३०७३
DJ.. काहीही !
DJ..
काहीही !
असु द्या मी_मधुरा - आता मागे
असु द्या मी_मधुरा - आता मागे हटायचं नाही.. वर दिलेल्या नंबरवर मिसड्कॉल देऊन अग्गंबाईला सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाचा झी गौरव मिळवुन द्यायचाच..!
सोम्यामाठ कुठेय? फुटलाका?>>>>
सोम्यामाठ कुठेय? फुटलाका?>>>>>>
सस्मित काय हे.
काल येता जाता बघीतले. डबड्याच्या चेहेर्यावर दिनवाणे भाव होते, जेव्हा बॉस घरात येतात तेव्हा. उलट बॉसनेच चांगली अॅक्टिंग केली माठापेक्षा. डबड्याला बहुतेक आई व बायको तसेच आजोबांची उरली सुरली पुंजी ( काही पेन्शन, फंड वगैरे असेल तर) वरच जगायचे आहे असे दिसतेय. कारण कसलेच गांभिर्य नाही, फक्त मित्रांबरोबर मौज मज्जा ! हे वशिल्याचे तट्टु अॅक्टिंग कधी शिकणार देव जाणे !
असु द्या मी_मधुरा - आता मागे
असु द्या मी_मधुरा - आता मागे हटायचं नाही.. वर दिलेल्या नंबरवर मिसड्कॉल देऊन अग्गंबाईला सर्वोत्कृष्ट कार्यक्रमाचा झी गौरव मिळवुन द्यायचाच..! >>>>>> नाही हो. मालिका mrs. मुख्यमंत्री पेक्षा बरी आहे म्हणाले म्हणून लगेच सर्वोत्कृष्ट???? हा अन्याय आहे राव!
खरतर कुठलीच मालिका सद्ध्या दर्जेदार नाही असे माझे मत आहे. त्यामुळे मी काही कोणाला मत वगैरे देणार नाहीये.
अहो द्या हो मी_मधुरा तुमचे मत
अहो द्या हो मी_मधुरा तुमचे मत..! बिचारे किती मर-मर कामं करतात १२-१२ तासांच्या शिफ्टी असतात. एक मिसड्कॉल द्यायला फार जाणार नाही तुमचा..!
मी तर दिला बुवा..
DJ.. पण तुम्हाला तर mrs.
DJ.. पण तुम्हाला तर mrs. मिनिस्टर आवडते ना? प्रतिसादावरून वाटले तसे.
बाकी मी काही कोणाला मत देत नाहीये.
हो.. मला आवडणार्या सर्व
हो.. मला आवडणार्या सर्व सिरिअल्स ना मि वोट दिलेत.. आणि माझ्या मित्रांना पण करायला लावले.. तुम्ही पण करा वोट
काल येता जाता बघीतले.
काल येता जाता बघीतले. डबड्याच्या चेहेर्यावर दिनवाणे भाव होते, जेव्हा बॉस घरात येतात तेव्हा. उलट बॉसनेच चांगली अॅक्टिंग केली माठापेक्षा. डबड्याला बहुतेक आई व बायको तसेच आजोबांची उरली सुरली पुंजी ( काही पेन्शन, फंड वगैरे असेल तर) वरच जगायचे आहे असे दिसतेय. कारण कसलेच गांभिर्य नाही, फक्त मित्रांबरोबर मौज मज्जा ! हे वशिल्याचे तट्टु अॅक्टिंग कधी शिकणार देव जाणे !>> +++१११
@रश्मी.. वयनी, एकदम मनातलं लिहिलंत..!
निवेदिता का नाही बोलत आहे
निवेदिता का नाही बोलत आहे राजेंशी? काय भांडण झाले? >>>त्यांनी तिला तिच्यासाठी मंगळसूत्र घेणार होते असे सांगितले. (ती घरी
पळतजोरात चालत जाताना फ्लॅशबॅक मधे दाखविले. घरी आल्यावर ती डबड्याच्या गळ्यात पडून रडली.)बबड्या इस अॅबसोल्युट डबड्या.
बबड्या इस अॅबसोल्युट डबड्या..एकदम खलनायक.. >>>>>>> अगदी अगदी. तसही झीमने सध्या नवीनच ट्रेण्ड आणलाय नायकान्ना खलनायक दाखवण्याचा. ( अपवाद राणा आणि अज्या). आता राजेही त्यातले निघू नये म्हणजे झाल.
(किंवा दुसर्यांच्या Wink ) मोबाईलवरुन या क्रमांकावर मिसड्कॉल द्या >>>>>>>
झी गौरव सर्वोत्कृष्ट कार्यक्रम साठी>>>>>>>> बरोब्बर कलर्स मराठीने हाच मुहूर्त साधला कलर्स मराठी अॅवॉर्ड आणण्याचा.
घरी आल्यावर ती डबड्याच्या गळ्यात पडून रडली.) >>>>>>>>> का? शुभ्रा तिची सेवियर नव्हती का त्यावेळी? ती कुठे गेली?
आसावरीला कळेल तोवर नोकरी परत
आसावरीला कळेल तोवर नोकरी परत आलेली असेल आणि शुभ्रा प्रज्ञालाच मुर्खात काढेल. राजे आसावरीला एकवचनी कधीपासून बोलायला लागले, आसावरी तर अहो जाहो करते. सोन्याचा दागिना म्हणजे अति झालं, तेही रात्रभर दुकानाबाहेर थांबून. मला वाटलं राजे डबड्याला त्यांच्या नवीन हॉटेलात नोकरी देतील. शुभ्रा बहुतेक किचनच्या बाहेर उभी राहून अंदाज घेते, स्वयंपाक झाला असेल असे वाटले की आत येते आणि मग मानभावीपणा करते. निजोने बोलण्याची लकब छान घेतली आहे, संथ, थोडी घाबरलेली, पडतं घेणारी, समजूतदार.
राजे फार अॅक्सेंट मारत असतात
राजे फार अॅक्सेंट मारत असतात. शेजवान राईस, फ्राईड राईस म्हणताना.
डेस्परेटच झाले आहेत. सोनं काय , लगेच मंसु काय? इतकी घाई कशाला आणि मंसु असं भेट देणार होते की काय?
हो ते फार विचित्र बोलत होते.
हो ते फार विचित्र बोलत होते. प्रत्यक्षात त्या मिरच्या खाण्याच्या सीनमध्ये जो काही चायनीज भात होता तो रस्त्यावरच्या गाडीवरून आल्यासारखा दिसत होता. त्यांचं जे कौतुक दाखवत आहेत, वर्ल्ड फेमस वगैरे ते काही त्यांच्या वागण्याला शोभत नाही. ते अगदीच रिकामटेकडे वाटतात, भाजी आणायलाही स्वतः जातात. स्टाफ आहे दोन, चार जणांचा, त्यात ती मॅडी हाफमॅड आहे. हॉटेल कधीही बंद करतात, कोणी भेटायला आलं असेल तर आत लपून बसतात, खोटं बोलतात. त्यांचा नंबर कोणीही कुणालाही देऊ शकतं, ते फोन उचलतात पण, नको तो फोन असेल तर बायकी आवाजात बोलतात. कॉलेजात असतानाही मित्रांचा डबा खायचे म्हणे. मंदिरातला प्रसाद आवडतो म्हणून चार चारदा प्रसाद घेतात, दुसऱ्याची चप्पल बिनदिक्कत घालतात. त्यांना कोणीही जग बघितलेली बाई पसंत करणार नाही, म्हणून ते साध्या पिचलेल्या आसावरीच्या मागे लागले आहेत. लग्न झाल्यावर रोज तिलाच स्वयंपाक करायला लावतील, हरभऱ्याच्या झाडावर चढवून. आसावरी आधी कुलकर्णींचा पूर्ण दिवसाचा स्वयंपाक करेल आणि मग राजेंचा. काही खरं नाही असावारीचं. आगीतून फुफाट्यात पडणारे ती.
चंपा लय भारी कमेंट
चंपा लय भारी कमेंट
ती शुभरा किचनमध्ये स्वयंपाक झाल्यावर येते, ती पण मस्त.
माझ्या मोबाईलवरून शुभ्र होते नाहीतर शुभरा, नीट लिहिता येत नाही तिचं नाव.
मंगळसुत्र जरा अती होतय..
मंगळसुत्र जरा अती होतय.. चांगली म्हणता म्हणता ही सिरियल पण गंडायला लागलेली आहे. काल निवेदिता डोक्यात गेली. बबड्या करतो ती काळजी आणि सुन करते ती फसवणुक.
बबड्या करतो ती काळजी आणि सुन
बबड्या करतो ती काळजी आणि सुन करते ती फसवणुक.>>>>>>> हो अतिशयच डोक्यात गेलं. शेवटी सुन ती सुनच. मुलाने गळा कापला तरी म्हणणार अरे चुकून सुरी फिरवली गेली असेल. कठीण आहे. अशा आया पाहण्यात आहेत त्यामुळे जास्त रिलेट झाले.
आता तर मनोरंजक पण वाटेना!
आता तर मनोरंजक पण वाटेना! काहीही! नाही आवडली नि.स. या वेळी.
अंजली१२, अनुमोदन!
पहिल्या पासून टुकारच आहे
पहिल्या पासून टुकारच आहे सीरीअल. निस बोटॉक्स करून सुरेख दिसायचा प्रयत्न करते आहे. म्हातारा आशिक लंपट वाट्तो. आजोबा उगीचच त्रासदायक शुभ्रा पेनफुल बाकी तर फारच इरिटेटिन्ग पब्लिक. नॉट वर्थ इट.
हो अतिशयच डोक्यात गेलं. शेवटी
हो अतिशयच डोक्यात गेलं. शेवटी सुन ती सुनच. मुलाने गळा कापला तरी म्हणणार अरे चुकून सुरी फिरवली गेली असेल. कठीण आहे.. +१००
Pages