Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेल्याचा कपाळमोक्ष व्हायला
मेल्याचा कपाळमोक्ष व्हायला हवा होता. त्याचं ते धोतर आणि फेंगडं चालणं डोक्यात जातं माझ्या अगदी.<<<<<खरा गो खरा.
अॕक्टींग मात्र अव्वल हां अण्णुटल्याचो
कालचो भाग आण्णा-शेवंताचो
आजच्या भागाचा वृत्तांत कुणी लिव्हिल काय?>> व्हंय तर.. ह्या घ्या -
कालचो भाग आण्णा-शेवंताचो हिसका-हिसकीत गेलो.. शेवंताक आण्णाच्या तावडीतांन सोडुक सुषमा ईल्यान तां पण हातात एवढो मोठ्ठो धोंडो घेऊन इलो. आवशीक सोड नायतर आण्णाचां डोस्कां फोडान असां दम दिल्यान. पाटणकरणीन चेडुचो ह्यां बोल आयकान तिकां आण्णाचो माफी मागुक लावल्यानी. पण सुषमान माफी नाय मागतला.
हंयसर छायाक माईन च्याय करुन दिल्यानी. च्यायवांगडा बटर घेऊक सांगितल्यानी. छाया मात्र एकच बटर घेतलां हे बघुक माईन तिकां बटरचो डबा दिल्यानी.. प्वॉट भरुन खागो असां सांगितल्यानी. पण छाया एकच बटर घेऊक व्हईत. छाया पयल्या सरखो खाऊक-पिऊकनाय हां.. फाड-फाड बोलुक नाय हा ह्यां बघुक माईचो काळीज तीळ-तीळ तुटल्यानी
मगे माईचो रडुक झाल्यावर छाया माईक पाटणकरीण कशां हां तां इचारतंय. माई तिकां सगळां सांगताहा. आता त्यांचो ह्या गावात कोण नाय हां.. तिचो जगणां मुश्कील असां ह्या पण सांगतांहा. छाया माईक पाटणाकरणीक भेटान जाऊ कां असां इचारतंय.. कोणीतरी त्यांचो जबाबदारी घेऊक व्हया असां पण सांगतां.. तेवढ्यात आपलो सरिता भस्सकन बोलुन जातंय - आण्णा घेतान की त्यांचो जबाबदारी अन आपण कायतरी जास्तच बोलुन गेलां ह्या तिका समजुन चुकतांहा.. मगे थोडी सारवा-सारव केल्यावर माईक काय संशय येत नाय पन छायाक काय कळुचा ता कळताहा..
खरं तर प्रत्येक पात्राला घर व
खरं तर प्रत्येक पात्राला घर व गाव सोडून जायची संधी मिळते ती घ्यायला हवी होती असे वाट्ते इन रिट्रोस्पेक्ट. सुषमा एकदम नॉर्मल गोड मुलगी होती तिचे पुढे काय करून ठेवले उगीचच. आत्याकडे राहून गरिबीत का होइना नीट शिकली असती चांगले संस्कार मुंबईचे एक्स्पोजर मिळा ले असते तर बरे झाले असते.
छाया ने पण राजग्या बरोबर त्याच रात्री पलून जायला हवे होते. माधव व सरिता मदतीला तयार पण होते. माईने रडून मोडता घातला.
हरी नाईकला पाटण कर आपल्याला मारतो आहे हे भास होतात ते खूपच पिळले. अर्ध्याच्या वर एपिसोड त्यातच गेला. पक्का मेंटल केस आहे आणाणा
आजच्या भागात बहुतेक अण्णा
आजच्या भागात बहुतेक अण्णा एखाद्या हिरॉईनीगत पाण्याने निथळत घरी येतो तेव्हा सरीता दार उघडते तेव्हा अण्णुला पाहुन दचकते हा भाग असावा, कारण झलक दाखवली होती. म्हणून झलक दिखलाजा हे गाणे गात ( शेवंतासाठी ) अण्णा घरी येतांना गात असेल तेव्हा पाटणकरच्या भुताने त्याला विहीरीत बुचकळुन वर काढला असेल. अशा पद्धतीने पाटणकरने अण्णूला झलक दाखवली असणार. तेव्हापासुन सरीता पाणी प्यायला पण घाबरते. ( हे आजच्या भागात आहे ) कारण बरोबर आहे, एखाद्या सुंदर तरुणी ऐवजी पेताडलेला अण्णा निथळतांना पाहुन कोणी पण दचकेल.
एव्हढं कुठलं आपलं भाग्य!
एव्हढं कुठलं आपलं भाग्य! सुषल्याला शेवंतेपेक्षा जास्त अक्कल आहे. शेवंता गावात राहुन काय करणार आहे ते तिचं तिलाच माहित. अण्णाची माफी मागायला सांगते ती सुषमाला. धन्य आहे! सुषमाने तो दगड अण्णाच्या डोक्यात घातलेला पाहायची माझी फार इच्छा होती. मेल्याचा कपाळमोक्ष व्हायला हवा होता. त्याचं ते धोतर आणि फेंगडं चालणं डोक्यात जातं माझ्या अगदी.
>>>>>>स्वप्ना_राज >>>>>>>>> मलापण अगदी असंच वाटत होत कि खरंच सुषमाने दगड फेकून मारायला हवा होता अण्णूकल्याला ... आता शेवंताचा खूप राग येतोय .... परत गुळपीठ करायचय की काय तिला अण्णाबरोबर असं वाटतंय ... तीका वाड्यात येऊचा हा वाट्टं .... पाटणकरांनी एक हिसका शेवंतालापण दाखवायला पाहिजे...आता जीव देणार म्हणून पेताड अण्णा शेवंताला इमोशनल ब्ल्याकमेल करणार आणि शेवंता पाघळणार .... एवढ्यांदा अण्णाने रंग दाखवूनही सो कॉल्ड हुशार शेवंता मूर्ख कशी बनते ?.....
>आधीच्या भागात सुसल्या मालवणीत बोलत होती आणि ह्या भागात सुसल्या शुद्ध मराठी बोलते .... भाषा पुढे जाऊन बिघडावी एवढी तर लहान नक्कीच नाही वाटत ती....
>आधीच्या भागात सुसल्या
>आधीच्या भागात सुसल्या मालवणीत बोलत होती आणि ह्या भागात सुसल्या शुद्ध मराठी बोलते .... भाषा पुढे जाऊन बिघडावी एवढी तर लहान नक्कीच नाही वाटत ती....
मुंबईला राहून आली ना मग सुधारली असेल थोडी भाषा तिची.
काल कुमुदिनीच्या तोंडून
काल कुमुदिनीच्या तोंडून पाटणकर बोलले (माझा आपला अंदाज कि कुमुदिनीला मिमिक्री करता येत असेल पाटणकराची) अण्णा घाबरून त्या करावं कराव वाजणाऱ्या चपला घालून फेंगडत (कासोटा अडकतो वाटते नको त्या जागी म्हणून ते असे चालतात) पळून जातो आणि सुसल्याच्या आवाजाने पाटणकरीण भानावर येते. बेडवरची चुरगळली गेलेली चादर पण आपोआप सरळ होते.
काल कुमुदिनीच्या तोंडून
काल कुमुदिनीच्या तोंडून पाटणकर बोलले>> ह्या मी सांगुक इसारलंय..
पाटणकरणीच्या तोंडुन पाटणकर बोलताना बघुन आण्णाची जाम टरकली
पाटणकरणीच्या तोंडुन पाटणकर
पाटणकरणीच्या तोंडुन पाटणकर बोलताना बघुन आण्णाची जाम टरकली Biggrin >>>
पाटणकरांनी कुमुदिनीऐवजी सुषमाला झपाटयाला हवे होते तिने किमान दगड फेकून आणि दोन तीन लाथा तरी मारल्या असत्या... . नायतर कुमुदिनीच्या हातून दोन कानफाटात तरी द्यायला हव्या होत्या... बाईकडून अपमान म्हणजे अण्णाच्या चांगलाच जिव्हारी लागला असता.... सुवर्णक्षण गमावले बाई
पण गोष्ट कळत नाही एवढी सगळ्यांची भुतं अण्णाला रात्रीची घाबरवतात.... अण्णा पण घाबरतो ... त्यातला एकहिजण भूत असुनपण अण्णासारख्या क्षुद्र प्राण्याचा जीव का नाय घेऊ शकत ? .... त्यातल्या त्यात पाटणकरांनी बऱ्यापैकी धुलाई केलीय तेवढाच काय ते समाधान
(कासोटा अडकतो वाटते नको त्या जागी म्हणून ते असे चालतात) ajnabi >>> खरंच
त्याचं ते धोतर आणि फेंगडं चालणं डोक्यात जातं माझ्या अगदी >> अगदी सेम फीलिंग कमिंग टू मी
मालिकेपेक्षा प्रतिसाद वाचायला
मालिकेपेक्षा प्रतिसाद वाचायला मजा येतेय.
म्हणून झलक दिखलाजा हे गाणे
म्हणून झलक दिखलाजा हे गाणे गात ( शेवंतासाठी ) अण्णा घरी येतांना गात असेल तेव्हा पाटणकरच्या भुताने त्याला विहीरीत बुचकळुन वर काढला असेल. अशा पद्धतीने पाटणकरने अण्णूला झलक दाखवली असणार. >>>>>>>>> राखेच्या पहिल्या भागामध्ये नाईकान्ना पाण्याचे भय का असते ते आता कळले.
तेव्हापासुन सरीता पाणी प्यायला पण घाबरते. ( हे आजच्या भागात आहे ) >>>>>>> मग हि बाई आजपर्यन्त जिवन्त कशी राहिली?
मग हि बाई आजपर्यन्त जिवन्त
मग हि बाई आजपर्यन्त जिवन्त कशी राहिली? Uhoh>> कारण तिकां आज काय तां कळात व्हया.. पाण्यात पाटणकर असां..!
मला असं का वाटतेय की पाटणकर आण्णाच्या बावीत मेला अन त्याला वहिवाटीच्या बावीत टाकला.. मी तो भाग मिसला बहुतेक.. चोंगट्याने आण्णा-पाटणकर भेटीच्या रात्री बावी नजीक नक्की काय पाहिलेले असते..?
मला असं का वाटतेय की पाटणकर
मला असं का वाटतेय की पाटणकर आण्णाच्या बावीत मेला अन त्याला वहिवाटीच्या बावीत टाकला..>>>>> मलाही असेच वाटतेय कारण माझा पण तो भाग सुरुवातीस गेला.
चोंगट्याने आण्णा-पाटणकर भेटीच्या रात्री बावी नजीक नक्की काय पाहिलेले असते..?>>>>> चोंगट्यो नेन्याला सांगतो की अण्णु पाटणकरला खूप बोलतो, ते सहन न होऊन पाटणकर जीव देतो. पण चोंगट्यो काहीतरी नक्कीच लपवतोय.
दुसरे असे की आधीच्या राखेचा १ मध्ये दत्ता पोलीसांना सांगतो की अण्णांनी गावातल्या बर्याच लोकांना आणी नतेवाईकांना पण मारुन टाकुन त्यांना भुयारात पुरलेय, कारण पोलीसांना भुयारात सांगाडे सापडतात.
इतके खून केले त्या अण्णाने,
इतके खून केले त्या अण्णाने, एकाही भुतात ताकद नव्हती काय अण्णाला ढगात पोचवायची, छान जगला की सुसल्या मोठी होईपर्यंत.
सगळ्या भुतांनी एकत्र येऊन महायुती, महाआघाडी काहीतरी करायची ना अण्णाविरोधात.
Hello Mr DJ ....
Hello Mr DJ ....
तुम्हाला मालवणी अजिबात येत नाही . मग तोडकं मोडकं ओढूनताणून कशाला मालवणीची चिंधी करताय ?
सरळ मराठीत लिहा की ....
बरेच दिवस वाचनमात्र आहे ह्या धाग्यावर . पण दरवेळी तुम्ही डोक्यात जाता ....
योग्य तो बदल कराल अशी अपेक्षा
ऱा न हे वे सां न
Rameshji, येत नसलं तरी
Rameshji, येत नसलं तरी प्रयत्न केवढा छान करतेय DJ, त्याबद्दल दाद दिली तरी चालेल, बाकी तेवढयावरुन त्या डोक्यात जायला काय मोठ्ठा प्रमाद केलाय तिने समजलं नाही. धागा वाचावा आनंद घ्यावा आणि सोडून द्यावं. एवढं रिअॕक्ट व्हायची गरज नाही.
हे मा वै म
कब
ह्या सिझनच्या सुरुवातीला मारे सांगितलं होतं की ह्यात भुताटकी नाही. भाऊबंदकीचा मुलांवर काय परिणाम होतो त्यावर आहे. मग पाटणकरच्या घरातल्या बेडवरची चादर आपोआप सरळ होणे, अण्णा भिजून आला तरी तेव्ह्ढ्याच भागात पाणी दिसणे वगैरे गोष्टींचं स्पष्टीकरण हवं. मागल्या सिझनचा अनुभव पाहता ते काही मिळनार नाही हे निश्चीत. पाटणकरनिच्या तोंडून पाटणकर बोलणे हा एक तर अण्णाला झालेला भास असू शकतो किंवा शेवन्ता mentally disturbed असल्याने तिच्या तोंडून तसं काही निघुन गेलं असं समजू. अण्णाला पाटणकर चे भास होताहेत, सरिताला पाटणकरच्या आत्महत्येचा धक्का बसलाय म्हणून ती असं वागतेय असंही असेल. पण ह्या बाकी दोन घटना तश्या explain नाही करता येत.
आधी आण्णाला topless दाखवला.
आधी आण्णाला topless दाखवला. आज अंगे भिजली जलधारांनी तशी गत. रात्री झोपायच्या वेळेस का असा झी हॉरर शो दाखवतात काय माहित. आता तर काय अण्णा शेवन्ताचा हात धरतात तर तिथे माई हजर होते. आता ती माईच आहे का पाटणकर तिचं रुप घेउन आलाय ते एक पांडूच जाणे. ती खरीच आली असेल तर पाटणकर नसल्याचा फायदा घेऊन अण्णा शेवंताच्या मागे लागलाय अशी तिची समजुत होणार. शेवन्ता गावात का राहतेय ते स्पष्ट झालेलं नाहिये. तिला अण्णा पुन्हा नकोय. उदरनिर्वाहाचं साधन नाही. कुठली शहाणी बाई असा निर्णय घेईल? नवर्याची आठवण त्या घरात आहे म्हणणं म्हणजे दिल बहलाने के लिये गालीब ये खयाल अच्छा है.
>>मला असं का वाटतेय की पाटणकर
>>मला असं का वाटतेय की पाटणकर आण्णाच्या बावीत मेला अन त्याला वहिवाटीच्या बावीत टाकला.
पाटणकरने स्वत: जीव दिला असेल तर तो 'माझा जीव गुदमरतोय, मला बाहेर काढा' असं अण्णाला म्हणताना का दाखवलंय? अण्णाने त्याला मारलं असेल तर तो 'माझं मुलीवर आणि बायकोवर प्रेम होतं तरी मी जीव दिला' असं म्हणताना का दाखवलंय? त्याने जीव दिला असला तर नोटा घेऊन विहिरीत पडायचं काय प्रयोजन? हत्या असेल तर त्याला पुरुन टाकण्ं अण्णाला जड नव्हतं. विहिरीत पुरावा ठेवायची काय गरज??
सविस्तर प्रतिसादाबद्दल
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद DJ, आणि हो मला आवडतं तुमचं मालवणी सो plz continue...
पाटणकरने स्वत: जीव दिला असेल
पाटणकरने स्वत: जीव दिला असेल तर तो 'माझा जीव गुदमरतोय, मला बाहेर काढा' असं अण्णाला म्हणताना का दाखवलंय? अण्णाने त्याला मारलं असेल तर तो 'माझं मुलीवर आणि बायकोवर प्रेम होतं तरी मी जीव दिला' असं म्हणताना का दाखवलंय?<<< हो ना. इथे विसंगती आहे मोठी.
कालच्या पाण्याच्या प्रसंगात पांडूच्या कळशीत पाणी येत नव्हतं. त्या कळशीच्या तळाला वेज आहे मोठं
Rameshji, येत नसलं तरी
Rameshji, येत नसलं तरी प्रयत्न केवढा छान करतेय DJ, >>>>>> झेंडू, डिजे ती नाहीये, तो आहे.
@ प्रकाश भिडे, मला मालवणी जमत
@ प्रकाश भिडे, मला मालवणी जमत नाहीच मुळी. एवढंच काय माझं मालवण-सावंतवाडीतच काय आख्ख्या कोकणात पण कुणी सगे-सोयरे-पाहुणे-रावळे नाहीत त्यामुळे मला त्या भाषेचा गंधही नाही. तरीपण नपेक्षा बर्यापैकी शब्द-काळ जमु लागले असतील असा मला विश्वास आहे. बाकी मला १००% मालवणी जमत नाही आणि त्याचा तुम्हाला त्रास झाला हे वाचुन वाईट वाटले परंतु काळजी नसावी राखेचा-२ संपेपर्यंत मी पुर्ण प्रयत्न करेन
@ सान्वी, झेंडु - तुमका आवडताहा ना माझी मालवणी..? मगे माका कुणाची भिती नाय हा
Rameshji, येत नसलं तरी प्रयत्न केवढा छान करतेय DJ, >>>>>> झेंडू, डिजे ती नाहीये, तो आहे.>> आभारी आहे रश्मी.. वयनी..!!
**********************************************
कालचो भागात आण्णा, सरिता अन पांडुन लोकांक घाबरवायचो लय प्रयत्न केल्यान पण त्येंका काय तां जमलां नाय. कालचो भागात आज रात्रीक काय होउचा असां तां बघुक मी घाबरलां असां.. आण्णा+शेवंताचो झेंगाट माईक कळलां म्हणान माई कित्त्या आरडलो असात.. तिचो आण्णाक दिल्यालो धमकी ऐकुन माका घाम फुटल्यान..
मला पण मालवणी आजिबातच येत
मला पण मालवणी आजिबातच येत नाही. पण ही सीरेअल बघून इलंय जमायला लागंलय. डिजे लिहीत राहा अशानेच सुधारेल भाषा.
डिजे लिहीत राहा अशानेच
डिजे लिहीत राहा अशानेच सुधारेल भाषा.>> व्हय तर..!
सुषमा चे काम करणाऱ्या
सुषमा चे काम करणाऱ्या बालकलाकाराच्या बालमनावर काय परिणाम होताहेत याचा कोण विचार करणार?
सुषमाचं काम करणार्या
सुषमाचं काम करणार्या बालकलाकारास गेल्या २-३ भागात थोडंसं काम मिळालंय.. नाहीतर नुसतं घुम्यागत बसुन रहाण्याचं काम होतं. बाकी ती लहान सुषमा ही पाटणकरणीच्या नणंदेची मुलगी वाटते.. सेम तशीच दिसते.. हो ना..??
हो ना..?? अगदी अगदी. असेल
हो ना..?? अगदी अगदी. असेल सुद्धा. शिल्पाच्या काकांना माहीत असेल. आता छान कपडे घातलेली बारी क झालेली शेवंता कधी दिसेल.
शिल्पाच्या काकांना माहीत असेल
शिल्पाच्या काकांना माहीत असेल.>> (शिल्पा नव्हे सुषमा..! )
आता छान कपडे घातलेली बारी क झालेली शेवंता कधी दिसेल.>> पांडु सांगान तेव्हा.
>>सुषमा चे काम करणाऱ्या
>>सुषमा चे काम करणाऱ्या बालकलाकाराच्या बालमनावर काय परिणाम होताहेत याचा कोण विचार करणार?
कोणीही नाही हे ह्याचं स्पष्ट उत्तर आहे. अशी अपेक्षा टीआरपीच्या मागे धावणार्या लोकांकडून करणं व्यर्थ आहे. आणि तसंही आता मुलांना जे कळायला नको ते इतर बर्याच ठिकाणहून कळतंच की.
>>आता छान कपडे घातलेली बारी क झालेली शेवंता कधी दिसेल.
सीझन ३ मध्ये. त्यात शेवंताचं लहानपण दाखवतील. तिचं शास्त्रीय नृत्याचं शिक्षण, वडिल वकिल असल्याने मिळालेलं ज्ञान वगैरे. माईलातिच्या आईने अलका कुबल लाजेल इतकं सोशिक कसं व्हावं आणि निरुपा रॉयला कॉप्लेक्स येईल अशी आसवं कशी गाळावीत त्याचं शिक्षण दिलेलं दाखवतील. नाना आणि आबा ह्यांची लग्नं दाखवतील. अण्णाने तरुणप्णी काय गुण उधळलेत, त्याला ताकाचं व्यसन कसं लागलं ते पुराण चवीने ऐकू. वच्छीने नेमका काय घोळ घातला म्हणून तिला घराबाहेर काढली ते बघू यात. पांडूच्या आई-वडिलांच्या लग्नात अक्षता टाकू. एकदा भूतकाळच दाखवायचा म्हटला म्हणजे फुल्टु स्कोप आहे पांडग्याला.
Pages