आज मी पिणार आहे!

Submitted by अजिंक्यराव पाटील on 19 November, 2018 - 12:38

आज मी पिणार आहे!

उतरून माळ्यावरली मी स्वप्ने जिणार आहे.
सांगून ठेवा नियतीला आज मी पिणार आहे..

चुकले होते फार माझे, हिशोब काढून ठेवा,
जमेल तर आजच सारा, चुकता मी करणार आहे!

कुठे पळाली मदीराक्षी ती, आणा शोधून,
बसवून समोर तिला, डोळ्यातून पिणार आहे!

लोक जे म्हटले वाईट मला, चुकून सामोरे येऊ नका,
दिसल्याबरोबर सांगून ठेवतो, बांबू मी सारणार आहे!

घे म्हणता वारूणी लावली ज्यांच्यासवे,
उपकार तुमचे मानायाला थेंब उडवणार आहे

चढवून घेतले दुःखास जेव्हा,
मी कोडगा जाहलो,
आज उरल्या फटाक्यांची, दिवाळी करणार आहे!

बोलवून आज हरलेल्या साऱ्यांना,
पेला एक एक द्या हाती,
त्यांच्याशी जिंकलेला अजिंक्य
आज स्वतःशी हरणार आहे!

- राव पाटील
१८जून२०१८.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उतरून माळ्यावरली मी स्वप्ने जिणार आहे.
सांगून ठेवा नियतीला आज मी पिणार आहे..

चुकले होते फार माझे, हिशोब काढून ठेवा,
जमेल तर आजच सारा, चुकता मी करणार आहे!
(उतरवून पाहीजे होतं का?)

भारी! भन्नाट!

bharii

घे म्हणता वारूणी लावली ज्यांच्यासवे,
उपकार तुमचे मानायाला
>> ओठांना शब्द राहीला आहे का?

Happy