Submitted by अजिंक्यराव पाटील on 19 November, 2018 - 12:38
आज मी पिणार आहे!
उतरून माळ्यावरली मी स्वप्ने जिणार आहे.
सांगून ठेवा नियतीला आज मी पिणार आहे..
चुकले होते फार माझे, हिशोब काढून ठेवा,
जमेल तर आजच सारा, चुकता मी करणार आहे!
कुठे पळाली मदीराक्षी ती, आणा शोधून,
बसवून समोर तिला, डोळ्यातून पिणार आहे!
लोक जे म्हटले वाईट मला, चुकून सामोरे येऊ नका,
दिसल्याबरोबर सांगून ठेवतो, बांबू मी सारणार आहे!
घे म्हणता वारूणी लावली ज्यांच्यासवे,
उपकार तुमचे मानायाला थेंब उडवणार आहे
चढवून घेतले दुःखास जेव्हा,
मी कोडगा जाहलो,
आज उरल्या फटाक्यांची, दिवाळी करणार आहे!
बोलवून आज हरलेल्या साऱ्यांना,
पेला एक एक द्या हाती,
त्यांच्याशी जिंकलेला अजिंक्य
आज स्वतःशी हरणार आहे!
- राव पाटील
१८जून२०१८.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उतरून माळ्यावरली मी स्वप्ने
उतरून माळ्यावरली मी स्वप्ने जिणार आहे.
सांगून ठेवा नियतीला आज मी पिणार आहे..
चुकले होते फार माझे, हिशोब काढून ठेवा,
जमेल तर आजच सारा, चुकता मी करणार आहे!
(उतरवून पाहीजे होतं का?)
भारी! भन्नाट!
bharii
bharii
इकडे आलोच नव्हतो.. धन्यवाद
इकडे आलोच नव्हतो.. धन्यवाद शाली, प्रवीण.
घे म्हणता वारूणी लावली
घे म्हणता वारूणी लावली ज्यांच्यासवे,
उपकार तुमचे मानायाला
>> ओठांना शब्द राहीला आहे का?
अमरराव, क्वार्टर लावली म्हणतो
अमरराव, क्वार्टर लावली म्हणतो ना बोलीभाषेत, तसा तो शब्द वापरला आहे.
(कारण: मिटर मध्ये बसवणे)
वोके. कविको सब माफ रहता है.
वोके. कविको सब माफ रहता है.
(No subject)
झ्याक! घेऊन वाचण्यात जास्तच
झ्याक! घेऊन वाचण्यात जास्तच मजा आहे !! सुंदर!!
आज शुक्रवार - आज मी पिणार
आज शुक्रवार - आज मी पिणार आहे.
आज मी पिऊन आहे.
आज मी पिऊन आहे.
चांगभलं!
चांगभलं!
चांगभलं. चिअर्स!!
चांगभलं. चिअर्स!!