मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: मराठी साहित्यिक
यामध्ये मंडळ एखाद्या साहित्यिकासंदर्भात एखादा क्ल्यू देईल जसे की त्या साहित्यिकाच्या लेखनशैलीचा एखादा नमुना, त्या साहित्यिकाच्या पुस्तकांची नावे, त्या साहित्यिकासंदर्भात काही प्रसिद्ध किस्से/गोष्टी किंवा त्या साहित्यिकाचा छोटासा परिचय. त्यावरुन आपल्याला त्या साहित्यिकाचे नाव ओळखायचे आहे
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
या खेळामध्ये फक्त मराठी साहित्यिकांचा समावेश असावा.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.
उदाहरणार्थ:
एकदा 'उदाहरणार्थ' एक मित्र आला, त्याने भांडून 'वगैरे' मला गावबाहेर नेले. पूर्वी मी त्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचा धाक धाकवून त्याने मला कायम 'मुर्दाबाद' केले
उत्तर: नेमाडे
किंवा
शिक्षणाने इंजिनीयर, व्यवसायाने कॉपीरायटर आणि तरुणाईचा लाडका कवी
उत्तर: संदीप खरे
किंवा
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
उत्तर: पु. ल. देशपांडे
आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?
तुमच्यासाठी पहीला क्ल्यू आहे:
"सवतंत्र सामाजिक नाटाक: "पायाचा दगड"
पार्टी गावतलीच
म्यानेजर: गुलाब हेरवाडे
आणि दिगदर्शक: अन्याबा परीट "
विलियम वर्डस्वर्थचे मराठी
विलियम वर्डस्वर्थचे मराठी अनुवादक का?
विल्यम शेक्सपिअर
विल्यम वर्ड्सवर्थ ?
जाई, आता जाऊदे !
जाई, आता जाऊदे !
उत्तर : परशुराम देशपांडे
रेल्वेतील नोकरी बरोबर २० वर्षे पूर्ण होताच सोडली. तेव्हा वय ४४.
शेक्सपिअर च्या सर्व साहित्याचा अनुवाद करण्याचा मानस.
बरीच नाटके अनुवाद करून झालीत.
दुवा :
https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4781513040246907903
ओके .
ओके .
परशुराम देशपांडे नामक लेखक माहीत नव्हता . त्यामुळे त्यांचं काही वाचल्याची शक्यता नव्हती. प्युअरली गेसवर्क .
काही वर्षांपूर्वी अशी एक लाट
काही वर्षांपूर्वी अशी एक लाट आली.
वय ४५ च्या दरम्यान जर आर्थिक गरज पूर्ण झाल्यासारखी वाटल्यास नोकरी सोडायची आणि मग आवडते काम, छंद वगैरे करत पुढील आयुष्य.
त्यात हे लेखक, संजय भा जोशी असे लोक होते .
परशुराम देशपांडे >>>
परशुराम देशपांडे >>>
भारीच. डोस्के गेले कामातून !
आता मी देतो-
बिहार मधील एक भीषण मोठ्या खाण अपघातावर आधारित पुस्तक लिहिणारे.
विशिष्ट राजकीय विचारधारेचे .
अकरा कोटी गॅलन पाणी
अकरा कोटी गॅलन पाणी
अनिल बर्वे
बरोबर
बरोबर
हे लोकप्रिय लेखक कोवळ्या वयात
हे लोकप्रिय लेखक कोवळ्या वयात घरातून पळून गेले होते. इतिहास, लोकसाहित्य, संतकाव्य हे त्यांच्या आवडीचे आणि अभ्यासाचे विषय होते.
रामदास बोहल्यावरन पळाले,
रामदास बोहल्यावरन पळाले, म्हणजे ते नसावेत
आनंद यादव ?
आनंद यादव ?
रा चिं ढेरे ?
नाही, तिन्ही नाहीत.
नाही, तिन्ही नाहीत.
सदानंद मोरे?
सदानंद मोरे?
म ना अदवंत द ता भोसले
म ना अदवंत
द ता भोसले
गोनीदां पळून गेले होते.
गोनीदां पळून गेले होते.
नाही.
यांनी गाडगेबाबांबरोबर आयुष्याचा काही काळ घालवला होता.
गो नी दांडेकर बरोबर भरत
बरेच तास झालेत, पुढचे कोडे:
बरेच तास झालेत, पुढचे कोडे:
१. मराठी, हिंदी व इंग्लिश मधून सामाजिक लेखन.
२. परखड राजकीय मतप्रदर्शन
३. आपल्या एका राष्ट्रपुरुषावरील चित्रपटाचे लेखन.
अरूण साधू
अरूण साधू
एकदम बरोबर !
एकदम बरोबर !
आता मी एक सोपे देतो .
आता मी एक सोपे देतो .
“जगण्यासाठी पैसा किती लागतो हे एकदा ठरवता आलं पाहिजे. नोकरीशिवाय आपलं भागू शकतं हे एकदा पटले तर, ताबडतोब ते मानहानीचे आयुष्य झुगारून द्यायला हवं. इलाज नसतो तेव्हा आपण सतत अपमान पचवतोच”
व पु?
व पु?
बरोबर
बरोबर
स्वरूप देताय का ?
स्वरूप देताय का ?
यातून बघितल्यावर झाड नुसतीच
यातून बघितल्यावर झाड नुसतीच हिरवी दिसत नाही आणि आकाश सुद्धा निळ दिसत नाही.... आणि माणस तर चक्क इंद्रधनुष्याच्या रंगाची दिसतात
असा आशय मांडणारी एक प्रसिद्ध कविता आहे यांची!
बालकवी ठोंबरे
बालकवी ठोंबरे
नाही!
नाही!
अजून एखादा मुद्दा ?
अजून एखादा मुद्दा ?
यांनी दूरदर्शनवरील लोकगीतांवर
यांनी दूरदर्शनवरील लोकगीतांवर आधारलेल्या एका कार्यक्रमाचे सादरीकरण केले होते
क्लूवरून शांता शेळके वाटताहेत
क्लूवरून शांता शेळके वाटताहेत.
कविता आठवत नाहीए.
शांता शेळके बरोबर आहे
शांता शेळके बरोबर आहे
कार्यक्रमाचे नाव आहे: रानजाई
ती कविता आहे "लोलक"
लोलक
देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक
हरवला माझ्या हातून!
तेव्हा डोळ्यातली फुलपाखरं उडून गेली
आणि विझली पाण्याच्या थेंबातली इंद्रफुलं!
आता गवत नुसतंच हिरवं दिसतं
आणि आभाळ नुसतंच निळं!
घराघरांना, माणसांना फुटतंच नाहीत इंद्रधनुष्याच्या रेषा!
परवा एक पोर आली उड्या मारत.
हातांचे पंख पसरून डोळे विस्फारून,
खिदळत मला म्हणाली,
"गम्मत बघ! गवत हिरवं नसतं,
आभाळ निळं नसतं
आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची बनवलेली!, महिताय तुला ?"
माझा लोलक हिला कुठे सापडला?
देवळातल्या झुंबराला किती लोलक आहेत अजून?
-शांता शेळके
Pages