मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: मराठी साहित्यिक
यामध्ये मंडळ एखाद्या साहित्यिकासंदर्भात एखादा क्ल्यू देईल जसे की त्या साहित्यिकाच्या लेखनशैलीचा एखादा नमुना, त्या साहित्यिकाच्या पुस्तकांची नावे, त्या साहित्यिकासंदर्भात काही प्रसिद्ध किस्से/गोष्टी किंवा त्या साहित्यिकाचा छोटासा परिचय. त्यावरुन आपल्याला त्या साहित्यिकाचे नाव ओळखायचे आहे
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
या खेळामध्ये फक्त मराठी साहित्यिकांचा समावेश असावा.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.
उदाहरणार्थ:
एकदा 'उदाहरणार्थ' एक मित्र आला, त्याने भांडून 'वगैरे' मला गावबाहेर नेले. पूर्वी मी त्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचा धाक धाकवून त्याने मला कायम 'मुर्दाबाद' केले
उत्तर: नेमाडे
किंवा
शिक्षणाने इंजिनीयर, व्यवसायाने कॉपीरायटर आणि तरुणाईचा लाडका कवी
उत्तर: संदीप खरे
किंवा
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
उत्तर: पु. ल. देशपांडे
आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?
तुमच्यासाठी पहीला क्ल्यू आहे:
"सवतंत्र सामाजिक नाटाक: "पायाचा दगड"
पार्टी गावतलीच
म्यानेजर: गुलाब हेरवाडे
आणि दिगदर्शक: अन्याबा परीट "
माणिक गोडघाटे 'ग्रेस' हे
माणिक गोडघाटे 'ग्रेस' हे आहेत का??
नाही !
नाही !
काव्य लेखन 'वैशाख' नावाने
काव्यलेखन 'वैशाख' नावाने
नाही माहित
नाही माहित
पण विचार करताना मजा आली
मला मुक्तीबोध वाटत होते पण त्यांनी वैशाख नावाने कविता लेखन नाही केलेलं
उत्तर : त्र्यं. वि. सरदेशमुख
उत्तर :
त्र्यं. वि. सरदेशमुख
मी देते आता कोडं
मी देते आता कोडं
१. हे महाराष्ट्र टाईम्समध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होते.
२. ह्यांनी बंगाली साहित्यिकाच्या सिरीजच मराठी अनुवाद केला आहे
अशोक जैन
अशोक जैन
... त्या रहस्यकथा ना ? वाचल्यात, छान आहेत.
बरोबर
बरोबर
लेखक, संपादक, मासिकाचे मालक.
लेखक, संपादक, मासिकाचे मालक.
भारतातील सामाजिक बदलांवरील पुस्तक प्रसिद्ध.
तसेच चरित्रात्मक लेखन देखील.
आनंद अंतरकर ?
आनंद अंतरकर ?
नाही
नाही
भानू काळे? (बदलता भारत हे
भानू काळे? (बदलता भारत हे पुस्तक आणि अंतर्नाद हे मासिक)
बलोब्बल ☺️
बलोब्बल ☺️
तर्ककठोर, बुद्धिनिष्ठ,
तर्ककठोर, बुद्धिनिष्ठ, विवेकवादी आणि तरीही रसिक असे हे व्यासंगी आणि विद्वान लेखक, समीक्षक, आस्वादक.
सुधीर रसाळ
सुधीर रसाळ
नाही.
नाही.
सुरेश द्वादशीवार
सुरेश द्वादशीवार
नाही.
नाही.
मे पुं रेगे
मे पुं रेगे
पद्माकर पुंडे
.... नसल्यास थोडी भर घाला कोड्यात .
दोन्ही नाहीत
दोन्ही नाहीत
भर घालते. त्यांच्या पुस्तकातलं एक वाक्य
'बापाची सर्वच्या सर्व मते पटणे हा मी एक प्रकारचा आंधळेपणा मानतो आणि आपले स्वातंत्र्य सांगण्यासाठी बापाची कोणतीच मते न पटणे हा मी दुसऱ्या प्रकारचा आंधळेपणा मानतो. '
रा ग जाधव शरच्चंद्र चिरमुले
रा ग जाधव
शरच्चंद्र चिरमुले
नाही, दोन्ही नाहीत.
नाही, दोन्ही नाहीत.
नरेंद्र जाधव विनोद शिरसाठ
नरेंद्र जाधव
विनोद शिरसाठ
नाही. मी जे म्हणतेय ते आता
नाही. मी जे म्हणतेय ते आता हयात नाहीत.
नरेंद्र जाधव समीक्षा करतात हे मला माहिती नव्हते.
विनोद शिरसाठ यांच्या निमित्ताने थोडे जवळ पोचला आहात. शिरसाठांचा थोडा संबंध आहे.
ग प्र प्रधान नरेंद्र दाभोलकर
ग प्र प्रधान
नरेंद्र दाभोलकर
नाही
नाही
हे एवढं कठीण जाईल असं मला वाटलं नव्हतं.
अजून एक हिंट.
ते स्वतःला मार्क्सवादी म्हणवून घेत पण त्याबरोबरच 'मी कम्युनिस्ट नाही' असंही सांगत
यदुनाथ थत्ते
यदुनाथ थत्ते
ना ग गोरे
नाही!
नाही!
प्रभाकर पाध्ये
प्रभाकर पाध्ये
वा ल कुलकर्णी
सदानंद वर्दे
.... दमलो आता ☺️
वि स खांडेकर ?
कुरुंदकर का ? पुस्तकातील भाषा तशीच वाटतेय .
की ग प्र प्रधान
Pages