ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - ३

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:50

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: मराठी साहित्यिक
यामध्ये मंडळ एखाद्या साहित्यिकासंदर्भात एखादा क्ल्यू देईल जसे की त्या साहित्यिकाच्या लेखनशैलीचा एखादा नमुना, त्या साहित्यिकाच्या पुस्तकांची नावे, त्या साहित्यिकासंदर्भात काही प्रसिद्ध किस्से/गोष्टी किंवा त्या साहित्यिकाचा छोटासा परिचय. त्यावरुन आपल्याला त्या साहित्यिकाचे नाव ओळखायचे आहे
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
या खेळामध्ये फक्त मराठी साहित्यिकांचा समावेश असावा.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.

उदाहरणार्थ:
एकदा 'उदाहरणार्थ' एक मित्र आला, त्याने भांडून 'वगैरे' मला गावबाहेर नेले. पूर्वी मी त्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचा धाक धाकवून त्याने मला कायम 'मुर्दाबाद' केले
उत्तर: नेमाडे

किंवा
शिक्षणाने इंजिनीयर, व्यवसायाने कॉपीरायटर आणि तरुणाईचा लाडका कवी
उत्तर: संदीप खरे

किंवा
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
उत्तर: पु. ल. देशपांडे

आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?

तुमच्यासाठी पहीला क्ल्यू आहे:

"सवतंत्र सामाजिक नाटाक: "पायाचा दगड"
पार्टी गावतलीच
म्यानेजर: गुलाब हेरवाडे
आणि दिगदर्शक: अन्याबा परीट "

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही
मूळ लेखक आधी ओळखा; तो आला की पुढचे उत्तर गूगल देईलच !

जाई व साद, नाही.
मूळ कोडे बारकाईने वाचा .

मार्क ट्वेन >> गल्ली चुकली ना !

जगप्रसिद्ध लेखक म्हणजे शेक्सपिअर आठवला . अजून कोण असेल तर आता डोक्यात येत नाही. Wide टर्म आहे जगप्रसिद्ध .

नाही

पण जगप्रसिद्ध म्हंटल्यावर तेच नाव डोक्यात येत भौगोलिक अंतरांचा विचार डोक्यात न येता.

म्हणून म्हटलं जगप्रसिद्ध wide टर्म आहे

त्या जगप्रसिद्ध चे अनुवाद अनेकांनी केलेले असू शकतात.
पण आपल्याला हवाय तो मराठी माणूस ज्याने नोकरी सोडून
फक्त याच मराठी अनुवादांसाठी वाहून घेतले आहे.

नाही, हो.
ऑस्कर वाईल्डपेक्षा जास्त , लैच जास्त कीर्ती लाभलेला !
आता जाई ताईंचे बोट धरून चला की ☺️

साधना, नाही .

आपला जो मराठी लेखक आहे ना, त्यांचे आडनाव लैच कॉमन. अन पाहिले नाव पौराणिक.

…. आता यानंतर उत्तरच देऊ का ?

Pages