ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - ३

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:50

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: मराठी साहित्यिक
यामध्ये मंडळ एखाद्या साहित्यिकासंदर्भात एखादा क्ल्यू देईल जसे की त्या साहित्यिकाच्या लेखनशैलीचा एखादा नमुना, त्या साहित्यिकाच्या पुस्तकांची नावे, त्या साहित्यिकासंदर्भात काही प्रसिद्ध किस्से/गोष्टी किंवा त्या साहित्यिकाचा छोटासा परिचय. त्यावरुन आपल्याला त्या साहित्यिकाचे नाव ओळखायचे आहे
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
या खेळामध्ये फक्त मराठी साहित्यिकांचा समावेश असावा.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.

उदाहरणार्थ:
एकदा 'उदाहरणार्थ' एक मित्र आला, त्याने भांडून 'वगैरे' मला गावबाहेर नेले. पूर्वी मी त्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचा धाक धाकवून त्याने मला कायम 'मुर्दाबाद' केले
उत्तर: नेमाडे

किंवा
शिक्षणाने इंजिनीयर, व्यवसायाने कॉपीरायटर आणि तरुणाईचा लाडका कवी
उत्तर: संदीप खरे

किंवा
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
उत्तर: पु. ल. देशपांडे

आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?

तुमच्यासाठी पहीला क्ल्यू आहे:

"सवतंत्र सामाजिक नाटाक: "पायाचा दगड"
पार्टी गावतलीच
म्यानेजर: गुलाब हेरवाडे
आणि दिगदर्शक: अन्याबा परीट "

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेळ क्र २ मध्ये झाले तसे घोळ होऊ नयेत म्हणून काही सूचना :

१. एका वेळेस फक्त एकच कोडे चालू असावे.
२. त्याचे उत्तर आल्याशिवाय कोणीही पुढचे देऊ नये.
३. खेळत भाग घेणाऱ्यांनी शक्यतो स्वतःचे १ कोडे तयार ठेवावे. म्हणजे आपण बरोबर उत्तर दिल्यास लगेच पुढचे देता येते. पण द्यायचे नसल्यास लगेच जाहीर करावे.

४. संयोजकांना विनंती : जर एखाद्या कोड्यावर ३०/४० मिनिटे कुठलाच प्रतिसाद आला नाही तरच नव्या कोड्याची परवानगी तुम्ही देउन ठेवाल का ?

कृष्णा
देताय ना ? का मी देउ ?
* संयोजक, काय करावे याचा निर्णय द्यावा.

हो डॉ. कुमार आपण देऊ शकता पुढचा क्लु.
तसेच, या गोष्टीमुळे खेळात व्यत्यय येत असल्यामुळे, १५ मिनीटात आधीच्या सदस्याने नवा क्लु न दिल्यास, कोणीही पुढचा नवा क्लु देऊ शकतो.

“अतिसावध माणसे जवळ कितीही गुण असले तरी फारशी यशस्वी होत नाहीत. माणसापाशी धाडस हवे. थोडा अविचार हवा. थोडा आवेग हवा. बेहोशी हवी”.

कोणाच्या कथेतील वाक्य?

ना सी फडके?
अंदाज आहे. वाक्य लक्षात नाही.

दि बा मोकाशी?
हेही नसतील तर आता अजून एक क्ल्यू द्या Happy

होय.
विजय तेंडुलकर !
जाई ना बरोबर उत्तर येईल असा मनात अंदाज केला होता . मस्त. Bw

पुढचं कोडं

१.या लेखकाने मराठीत पोलिसी / गुन्हेगारी कथा लिहिल्या आहेत .
२.एक शून्य शून्य ही मालिका या कथांवर आधारित होती .

श्रीकांत सिनकर >>>> आहा ! एकदम कॉलेज जीवन आठवले. जुन्या आठवणी अधिक पक्क्या असतात याचा अनुभव आला या कोड्याने. एका क्षणात उत्तर सुचले.

‘ससा आणि कासव’ या नाटकाचे लेखक?

या नाटकावर आधारित हिंदी चित्रपट गाजला, ज्याचे नाव अगदी छोटे आहे ! एकदम अभिनयवाले कलाकार.

खूप सोपे

महाभारतातील एका प्रमुख पात्रावर ह्यांनी एक भली मोठी कादंबरी लिहिलीये

☺️

माझी खूप आवडती कादंबरी अन माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक

स्वप्नात असतानाच त्या स्वप्नांचं यावं पुरतं भान
तशी कुठेतरी आत आत.. जागी होते जाण

हे लिहिणारा कवी ओळखा Happy

Pages