ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - ३

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:50

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: मराठी साहित्यिक
यामध्ये मंडळ एखाद्या साहित्यिकासंदर्भात एखादा क्ल्यू देईल जसे की त्या साहित्यिकाच्या लेखनशैलीचा एखादा नमुना, त्या साहित्यिकाच्या पुस्तकांची नावे, त्या साहित्यिकासंदर्भात काही प्रसिद्ध किस्से/गोष्टी किंवा त्या साहित्यिकाचा छोटासा परिचय. त्यावरुन आपल्याला त्या साहित्यिकाचे नाव ओळखायचे आहे
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
या खेळामध्ये फक्त मराठी साहित्यिकांचा समावेश असावा.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.

उदाहरणार्थ:
एकदा 'उदाहरणार्थ' एक मित्र आला, त्याने भांडून 'वगैरे' मला गावबाहेर नेले. पूर्वी मी त्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचा धाक धाकवून त्याने मला कायम 'मुर्दाबाद' केले
उत्तर: नेमाडे

किंवा
शिक्षणाने इंजिनीयर, व्यवसायाने कॉपीरायटर आणि तरुणाईचा लाडका कवी
उत्तर: संदीप खरे

किंवा
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
उत्तर: पु. ल. देशपांडे

आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?

तुमच्यासाठी पहीला क्ल्यू आहे:

"सवतंत्र सामाजिक नाटाक: "पायाचा दगड"
पार्टी गावतलीच
म्यानेजर: गुलाब हेरवाडे
आणि दिगदर्शक: अन्याबा परीट "

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निवडक कुरुंदकर या पुस्तकांंच्या मालिकेचे संपादन विनोद शिरसाठ करत आहेत. Happy

ओह ओके! मी ही गेसच मारलेला . खात्री नव्हती ..

पुढचं कोड

१) यांच्या दोन्ही पुस्तकांच्या नावात रंग आहेत .

२) हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात .

३) हे तरुण लेखक आहेत , कल्याणला राहतात , रुईया कॉलेजमध्ये होते.

तुला येईल की हरपेन , फेसबुकवर असतात हे .

अभिराम दीक्षित? अंदाजच आहे.
हे तरूण आहेत आणि फेसबुकवर असतात एवढंच ऐकून आहे. पुस्तकं/ कुठे राहतात हे माहिती नाही.

ओके मी सांगून टाकते.

लेखक - प्रणव सखदेव
पुस्तक :- १) निळ्या दातांची दंतकथा
२) काळे करडे स्ट्रोक्स

पुढचं कोडं द्या कोणीतरी

तुला येईल की हरपेन , फेसबुकवर असतात हे .
>>>
जाई. मी आज पाहिले होते हे. पण हे लेखक माहीत नाहीयेत अजीबात.

मला फार मागे पडल्या सारखे वाटतंय. वाचन परत नीट सुरु करायला / वाढवायला हवं

मला फार मागे पडल्या सारखे वाटतंय. वाचन परत नीट सुरु करायला / वाढवायला हवं >>> +११११ मलाही काहीसे असेच वाटले, हल्ली माबो, प्रतिलीपी अश्या साईटवरच वाचन होतेय, काही दर्जेदार असे वाचायला मिळतच नाहीये अर्थात काही अपवाद वगळता. पण परत एकदा ग्रंथालयात सभासद व्हावेसे वाटतेय.

मी देतो :
एका प्रसिद्ध युरोपीय लेखकाच्या बहुतेक पुस्तकांचा मराठी अनुवाद करण्याचा यांनी विडा उचलला आहे.

प्रणव सखदेव यांचं नाभीतून उगवलेल्या व्रुक्षाचे रहस्य वाचनालयात अनेकदा दिसलंय. कथासंग्रह मी कमीच वाचतो, त्यामुळे कधी घेतलं नाही.

नाही. भर घालतो.
यांनी ४५ वयाचे असताना सेवा निवृत्ती घेतली आणि आता हेच कार्य आयुष्यभर करणार आहेत.
मूळ लेखक अतिप्रसिद्ध आहे !

नाही.
पन्नाशीच्या आत निवृत्ती घेउन आवडीचे काम करणाऱ्या ३ लोकांवर काही वर्षांपूर्वी अनुभव मासिकात लेख आला होता. त्यातले हे एक.

Pages