मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: मराठी साहित्यिक
यामध्ये मंडळ एखाद्या साहित्यिकासंदर्भात एखादा क्ल्यू देईल जसे की त्या साहित्यिकाच्या लेखनशैलीचा एखादा नमुना, त्या साहित्यिकाच्या पुस्तकांची नावे, त्या साहित्यिकासंदर्भात काही प्रसिद्ध किस्से/गोष्टी किंवा त्या साहित्यिकाचा छोटासा परिचय. त्यावरुन आपल्याला त्या साहित्यिकाचे नाव ओळखायचे आहे
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
या खेळामध्ये फक्त मराठी साहित्यिकांचा समावेश असावा.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.
उदाहरणार्थ:
एकदा 'उदाहरणार्थ' एक मित्र आला, त्याने भांडून 'वगैरे' मला गावबाहेर नेले. पूर्वी मी त्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचा धाक धाकवून त्याने मला कायम 'मुर्दाबाद' केले
उत्तर: नेमाडे
किंवा
शिक्षणाने इंजिनीयर, व्यवसायाने कॉपीरायटर आणि तरुणाईचा लाडका कवी
उत्तर: संदीप खरे
किंवा
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
उत्तर: पु. ल. देशपांडे
आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?
तुमच्यासाठी पहीला क्ल्यू आहे:
"सवतंत्र सामाजिक नाटाक: "पायाचा दगड"
पार्टी गावतलीच
म्यानेजर: गुलाब हेरवाडे
आणि दिगदर्शक: अन्याबा परीट "
रणजित देसाई सुध्दा असू शकतात.
रणजित देसाई सुध्दा असू शकतात. कादंबरी- राधेय.>> हो शक्य आहे. भलीमोठी म्हटल्यावर मृत्युंजय आठवली
रणजित देसाई सुध्दा असू शकतात.
रणजित देसाई सुध्दा असू शकतात. कादंबरी- राधेय>>>> रणजित देसाई यांची राधेय, भली मोठी नाही, उलट लहान अन समजायला सोपी आहे. त्यामुळे उत्तर शिवाजी सावंत अन मृत्युंजय हेच आहे☺️
स्वप्नात असतानाच त्या
स्वप्नात असतानाच त्या स्वप्नांचं यावं पुरतं भान
तशी कुठेतरी आत आत.. जागी होते जाण">>> सुधीर मोघे?
परफेक्ट VB!! मस्तच
परफेक्ट VB!! मस्तच
यांच्या लघुकथांवर आधारित
यांच्या लघुकथांवर आधारित बेस्ट स्टोरीज चा State award मिळालेला एक मराठी सिनेमा आहे
श्वास का? माधवी घारपुरे?
श्वास का? माधवी घारपुरे?
नाही नाव सांगू का मुव्हीचे
नाही
नाव सांगू का मुव्हीचे
.
.
.
.
सांगतेच, मला क्लू छोटा वाटतोय
नाव आहे
देवकी
देवकी म्हणजे तो अलका कुबल आणि
देवकी म्हणजे तो अलका कुबल आणि शिल्पा तुळसकरचा चित्रपट? त्याला राज्य पुरस्कार आहे??? अरेरे
उत्तर सांगते सुहास शिरवळकर
उत्तर सांगते
सुहास शिरवळकर
ओह सुहास शिरवळकर का? तोच
ओह सुहास शिरवळकर का? तोच चित्रपट का?
हो, विकी वर तेच दिलेय
हो, विकी वर तेच दिलेय
V B खूप वेळ होऊन गेल्याने नवे
V B खूप वेळ होऊन गेल्याने नवे देतो:
.......
" जर साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीचा अधिकार सर्व वाचकांना दिला तर मीच खात्रीने निवडून येईन"
हे कोण ?
हा धागा लवकर ओस पडला ! ☺️
हा धागा लवकर ओस पडला ! ☺️
आवघाड कोडं घालता मग डोसकं नही
आवघाड कोडं घालता मग डोसकं नही चालता.
हिंट द्या अजून एखादी
हिंट द्या अजून एखादी
त्यांच्या पुस्तकांचा खप
त्यांच्या पुस्तकांचा खप प्रचंड पण अभिजन म्हणतात, " ते काय साहित्य असते?"
प्रवासात आहे, रेंज चा त्रास
..
बाबा कदम?
बाबा कदम?
होय
होय
ह्यांच्या आत्मचरित्रात्मक
ह्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकास वगळता जवळपास सर्वच पुस्तकाची नावे पाचअक्षरी आहेत.
जी ए कुलकर्णी
जी ए कुलकर्णी
बरोबर
बरोबर
" अमेरिकन लोकांत वेडेपणाचा
" अमेरिकन लोकांत वेडेपणाचा अंश आहे अशी माझी खात्री झाली"
हे पी एच डी व शहरी लेखन
मूळचे महाराष्ट्राचे नव्हते.
उत्तर डॉ सुभाष भेंडे .
उत्तर
डॉ सुभाष भेंडे .
मी देतो आता.
मी देतो आता.
..
दिवंगत लेखक.
एक कादंबरी गाजली होती पण ती त्यांनी युरोपीय कादंबरी वरून चोरल्याची कुजबूज होती.
व्यंकटेश माडगूळकर. सत्तांतर
व्यंकटेश माडगूळकर. सत्तांतर
ठीक, पण माझे उत्तर वेगळे होते
ठीक, पण माझे उत्तर वेगळे होते.
विश्राम बेडेकर, रणांगण.
द्या पुढचे कोडे
ओह.
ओह.
डॉ वसंत अवसरे हे यांचं टोपण नाव.
सरोजिनी बाबर
सरोजिनी बाबर नाही नाही
शांता शेळके
बरोबर
बरोबर
Pages