मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.
पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: मराठी साहित्यिक
यामध्ये मंडळ एखाद्या साहित्यिकासंदर्भात एखादा क्ल्यू देईल जसे की त्या साहित्यिकाच्या लेखनशैलीचा एखादा नमुना, त्या साहित्यिकाच्या पुस्तकांची नावे, त्या साहित्यिकासंदर्भात काही प्रसिद्ध किस्से/गोष्टी किंवा त्या साहित्यिकाचा छोटासा परिचय. त्यावरुन आपल्याला त्या साहित्यिकाचे नाव ओळखायचे आहे
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
या खेळामध्ये फक्त मराठी साहित्यिकांचा समावेश असावा.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.
उदाहरणार्थ:
एकदा 'उदाहरणार्थ' एक मित्र आला, त्याने भांडून 'वगैरे' मला गावबाहेर नेले. पूर्वी मी त्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचा धाक धाकवून त्याने मला कायम 'मुर्दाबाद' केले
उत्तर: नेमाडे
किंवा
शिक्षणाने इंजिनीयर, व्यवसायाने कॉपीरायटर आणि तरुणाईचा लाडका कवी
उत्तर: संदीप खरे
किंवा
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
उत्तर: पु. ल. देशपांडे
आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?
तुमच्यासाठी पहीला क्ल्यू आहे:
"सवतंत्र सामाजिक नाटाक: "पायाचा दगड"
पार्टी गावतलीच
म्यानेजर: गुलाब हेरवाडे
आणि दिगदर्शक: अन्याबा परीट "
द. मा. मिरासदार ?
द. मा. मिरासदार ?
मलाही मिरासदारच वाटताहेत.
मलाही मिरासदारच वाटताहेत.
संयोजक मंडळ जरा लक्ष द्या
संयोजक मंडळ जरा लक्ष द्या इकडे.
नाही.... मिरासदार नाही!
नाही.... मिरासदार नाही!
शंकर पाटील
शंकर पाटील
शंकर पाटील.... बरोबर आहे!
शंकर पाटील.... बरोबर आहे!
हर्पेन, तुम्ही पुढचा क्ल्यू द्या.
चुकीचा पाढा हे ह्यांच्या
क्ल्यू १ -
१.१ चुकीचा पाढा हे ह्यांच्या पुस्तकाचे नाव
Shankar Patil
Shankar Patil
क्ल्यू १ -
क्ल्यू १ -
१.१ चुकीचा पाढा हे ह्यांच्या पुस्तकाचे नाव.
१.२ ह्यांनी इंग्रजीतही विपुल लि़खाण केले आहे.
किरण नगरकर ?
किरण नगरकर ?
दि पु चित्रे ?
दि पु चित्रे ?
किरण नगरकर का? त्यांनी
किरण नगरकर का? त्यांनी इंग्रजीत विपुल लिखाण केले आहे.
जाई . बरोबर पुढचा क्ल्यू द्या
जाई . बरोबर.
सात सक्कंत्रेचाळीस हे त्यांचे पहिले पुस्तक
पुढचा क्ल्यू द्या
हे कॉलेजात भूगोल शिकवत असत
क्ल्यू 2.
हे कॉलेजमध्ये भूगोल शिकवत असत आणि किशोरवयीन मुलांवरील त्यांचे लिखाण / सिरीज प्रसिद्ध आहे .
प्रकाश नारायण संत?
प्रकाश नारायण संत?
बरोबर फारएण्ड
बरोबर फारएण्ड
बर्यापैकी सोपा क्लू.
बर्यापैकी सोपा क्लू. माबोवरच्या या लेखाचे शीर्षक हाच क्लू. हे वाक्य त्यांच्या लोकप्रिय पुस्तकात आहे.
भूगोल नाही बहुतेक
भूगोल नाही बहुतेक सायन्ससंबंधित विषय शिकवायचे ना कराडला प्रकाश संत, अमलताशमध्ये वाचलं. कॉलेजमध्ये ते दीक्षितसर म्हणून ओळखले जायचे. दोन नावं होती ना त्यांची, आजोळी दत्तक गेलेले.
फारएन्ड तो लेख वाचला नव्हता .
फारएन्ड तो लेख वाचला नव्हता . लिंकबद्दल धन्यवाद .
अंजू , मी अमलताशमध्येच भूगोल शिकवायचे अस वाचलेलं आहे..जिओलॉजी संबंधित .
विकिपीडियावरदेखील भूरचनाशास्त्र अस लिहिलेलं आहे
ओके, मला वेगळं वाटतंय. एका
ओके, मला वेगळं वाटतंय, भूगोल नाही. एका फ्रेंडला विचारेन, ती तेव्हा त्याच कॉलेजमध्ये शिकत होती. मे बी मी चुकतंही असेन.
पुढच कोडं द्या फारएन्ड
...
फारएंड, पुलं.
फारएंड, पुलं.
बटाट्याची चाळ. संगीतिका.
उत्तर बरोबर आहे असं समजून
उत्तर बरोबर आहे असं समजून पुढचं कोडं.
हे लेखक स्वतः वैज्ञानिक होते.
वैज्ञानिक हा शब्द नाम म्हणून न वापरता विशेषण म्हणून वापरला तर या लेखकाच्या बंधूंच्या कार्यक्षेत्रात वापरला जाणारा शब्दप्रयोग आठवेल
वैज्ञानिक म्हटल्यावर जयंत
वैज्ञानिक म्हटल्यावर जयंत नारळीकर पटकन आठवतात, पण ते आहेत अजून. होते लिहिलंय त्यामुळे दुसरे असावेत.
बटाट्याची चाळ. संगीतिका. >>
बटाट्याची चाळ. संगीतिका. >> परफेक्ट
नारळीकर नाही.
नारळीकर नाही.
हेही लेखक हयात आहेत, पण आता निवृत्त आहेत म्हणून वैज्ञानिक 'होते' असं लिहिलंय.
दत्तप्रसाद दाभोलकर
दत्तप्रसाद दाभोलकर ( बंधू नरेन्द्र)
हे बहुतेक स्वीडनमध्ये असतात
हे बहुतेक स्वीडनमध्ये असतात ना, हल्लीच मुलाखत झाली होती एबीपी माझावर.
दत्तप्रसाद दाभोळकर - करेक्ट!
दत्तप्रसाद दाभोळकर - करेक्ट!
शालान्त परीक्षेत गुणवत्ता
शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत
विज्ञान कथाकार
उत्तम चित्रकार
फ्रेंच कट दाढी !
Pages