Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चंपा, राजे शेफ आहेत. त्यांना
चंपा, राजे शेफ आहेत. त्यांना हे पदार्थ येत नसतील असं थोडच असेल .
त्यांना फक्त बहाणा हवाय नि.स.ला तिथे बोलवायचा.
प्रद्य्ना का जळतीये एवढी नि.स.वर.
आणि काय भयानक बरडं बनवलं
आणि काय भयानक बरडं बनवलं निजोने..
ना मसाला वाटला.. ना फोडणी दिली.. नुसतं खोवलेला नारळ वालांवर टाकुन ते पातेलं गॅसवर झाकुन ठेवलं अन झालं..! कोणत्या पद्धतीने बनवलं काय माहित..!
समजा तेप्र च्या आगोचरपणाला यश
समजा तेप्र च्या आगोचरपणाला यश आले व अभिजीत राजे अन निजो चे लग्न झालेच तर सोम्यावर 'बधाई हो' म्हणण्याची वेळ नक्की येणार..!>>लोल
ते वालांचं बिरडं एकदम कसं काय
ते वालांचं बिरडं एकदम कसं काय उगवलं? की राजेंकडे नेहमीच सोललेले वाल तयार असतात? काही मिनिटं मला सीरियल पाहायला मिळाली नाही. तेव्हढ्यात वालांना मोड येऊन ते सोलून तयार!
बबड्याला अजून एक पायरी खाली
बबड्याला अजून एक पायरी खाली ऊतरवलं.नि.स. व सुनबैंचा चांगुलपणा ठसवण्यासाठी.पोरगं लांबवणार आईचे पैसे व सुनबै डिटेक्टीवगिरी करणार.
तेव्हढ्यात वालांना मोड येऊन
तेव्हढ्यात वालांना मोड येऊन ते सोलून तयार!>>>> हीरा, अहो तुम्ही झीवाल्यांना अश आयडिया सुचवू नका.आधीच घारग्यांनी एक आठवडा खाल्ला.आता वाल पाण्यात भिजत घालणे,उपसणे,बांधून ठेवणे मग ते सोलणे अशा स्थितीत एक आठवडा सहज जाईल.
२ भाज्या शिकवण्याचे एवढे पैसे
२ भाज्या शिकवण्याचे एवढे पैसे!!
@मधुरा कुलकर्णी, गुगल इनपूट
@मधुरा कुलकर्णी, गुगल इनपूट टूल चांगलं आहे, वापरत आहे मी, अनेक धन्यवाद.>>>>>> स्वागत आहे.
शुभ्रा जे बोलली भावूक होऊन ते
शुभ्रा जे बोलली भावूक होऊन ते भिडलं. बाकी निवेदिता यांचे पात्र फारच बबड्या-बबड्या करत असतं. अति वाटतं ते!
आज एक कल्पना सुचली. बबड्याचं
आज एक कल्पना सुचली. बबड्याचं लग्न ईबाळाबरोबर होणंच योग्य आहे. तेवढेच माठ भाव असतात त्याच्या चेहर्यावर. आणि अतिसामान्य संवादफेक.
प्राचीन
प्राचीन
शुभ्रा कॉलेजमध्ये असल्यापासून
शुभ्रा कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखते ना सोहमला. तो असा बंडल माणूस आहे हे एवढ्या वर्षात कळत नाही का तिला. किती पैसे दिले राजेंनी. ते घर असं का दिसत होतं नवीनच, सोफे आणि पडदे वगैरे कुठे होते आधी. आसावरी घार्गे काय डिशचं नाव जिथे पिझा आणि पास्ता मिळतो, चायनीज मिळतं, तिथे घारगे आणि पातोळ्याही मिळतात, राजे सोहमच्या वरताण आहेत फेकाफेकी करण्यात. नवीन हॉटेलात आसावरीला नोकरी पक्की.
आई घरातच तर असते हे वक्तृत्व
आई घरातच तर असते हे वक्तृत्व स्पर्धा टाईप भाषण चांगले होते पण मधेच ते धजावतेच कसे हे काय प्रकरण होते. मन धजावते की जीभ धजावते, त्या धजावतेला ना शेंडा ना बुडखा. हिम्मत कशी होते हे बरोबर होतं जास्त. मराठीची दैना मराठी कलाकारांकडून, दुर्दैव दुसरे काय.
आई घरातच तर असते हे वक्तृत्व
आई घरातच तर असते हे वक्तृत्व स्पर्धा टाईप भाषण चांगले होते>> हो पण ही कल्पना फार पूर्वी पासून जाहिरातीत व साहित्यात वापरली गेली आहे. घारगे व पातोळ्यांची इतकी रॉयल्टी तर चिकन ६५ व बिर्याणीची मला किती मिळेल असा एक विचार चाटोन गेला मनास. पण त्यासाठी. वर्ल्ड्स ग्रेटॅस्त आचारी अब्ब्ब्ब्ब्ब्बिजित राआआआअजे ला कोण झेलेल. लंपट बुढढा मेला.
मी बघायचेच सोडले कारण झी अॅप वर ते डा लोच होईना. हँग होउन बसले आहे सोहमाठाच्या चेहर्यासारखे.
दर्जेदार संगीतकार अशोक
दर्जेदार संगीतकार अशोक पत्कींचा हा सोहम उर्फ अनिकेत वशिल्यानेच घुसलेला दिसतोय सिरीयल मध्ये. जबरी माठ आहे अभिनयात.
प्राचीन, ई बाळ पण नको ते ई बाळ. तेजश्री प्रधान जो अभिनय करतेय त्यात निभावली जातेय सिरीयल. ई बाळ घुसले असते तर प्रेक्षक ई ई करत पळाले असते.
निवेदीताचा चेहेरा फार पसरट होत चाल्लाय. आणी बबड्या काय सारखे? डबड्या म्हणायला हवे.
मुळात चूक आईची पण आहेच.
मुळात चूक आईची पण आहेच. मुलाचे अति लाड आणि ऐतोबा बनवणं , आणि thankless बनवणं किंवा बनू देणं हे चूकच. सोहम आणि तो `का रे दुरावा ' चा हिरो यांच्यात मख्खपणाची स्पर्धा लावली पाहिजे!
डबड्या
डबड्या
नातसुनेच भाषण चालू असताना आजोबा मारे डोळे पुसत होते पण काल सिलिंडर नाहीये हे माहित असताना केवढा हेकटपणा. जराही समुजन घ्यायची तयारी नाही आणि दारू पिणार होते वाटतं दोघे म्हातारे
तेजश्री प्रधानचा मेकओवर
तेजश्री प्रधानचा मेकओवर झालाय का? काल सन्सकृती कला दर्पण अॅवार्ड मध्ये वेगळीच दिसत होती.
डबड्या
डबड्या
आई अजुनही हातात टूथब्रश देत असेल तर बबड्याकडून कामाच्या अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
आई घरातच तर असते हे वक्तृत्व
आई घरातच तर असते हे वक्तृत्व स्पर्धा टाईप भाषण चांगले होते >>>सध्या कायप्पावर भारी वायरल झालाय
प्राचीन , एकदम भन्नाट आयडिया!
प्राचीन , एकदम भन्नाट आयडिया! तरी ईशाला पहाणे / ऐकणे नको.
बिर्याणीची मला किती मिळेल असा एक विचार चाटोन गेला मनास. पण त्यासाठी. वर्ल्ड्स ग्रेटॅस्त आचारी अब्ब्ब्ब्ब्ब्बिजित राआआआअजे ला कोण झेलेल. लंपट बुढढा मेला. >>> हसून हसून मेले मी.
निजोचे बबड्या आता डोक्यात जातेय.प्रथम ठीक होते.पण ही अजून सुधारत नाही का?
तेप्रला नवीन कपडे का नाहीत कितीतरी वेळा निळा ड्रेस आणि लाल ओढणीवरच असते.
कानातले बदलते ना काल तर गोड
कानातले बदलते ना काल तर गोड गैरसमज एपिसोड होता. आसावरी राजेपेक्षा जास्त उतावीळ आहे. राजे मंदोदरीला का लाईन देत असतात, पर्याय म्हणून का, ती नाही मिळाली तर ही, चुकीचं आहे हे
पर्याय म्हणून का,:G
पर्याय म्हणून का >>
मला का कोण जाणे ती मॅडी आणि
मला का कोण जाणे ती मॅडी आणि कपिल शर्मा शो म धला क्रिष्णा दोघांमधे खूप साम्य वाटते. क्रिष्णा बाई बनून आला की असाच दिसतो मॅडीसारखा.
राजेंबरोबर त्यांचा स्टाफही
राजेंबरोबर त्यांचा स्टाफही पडीक राहायला लागलाय आता कुलकर्णीकडे. काय ती चहा ओतायची पद्धत, शेफकडे कामाला आहे ना ही बाई डबड्या नाहीये दोन दिवस झाले, कारखानिसांना बघून असा राग येतो, असं वाटतं दुसरी काचपण फोडून टाकावी चष्म्याची, अशी कारण नसताना लाचारी पत्करणारी माणसं डोक्यात जातात.
मला का कोण जाणे ती मॅडी आणि
मला का कोण जाणे ती मॅडी आणि कपिल शर्मा शो म धला क्रिष्णा दोघांमधे खूप साम्य वाटते. क्रिष्णा बाई बनून आला की असाच दिसतो मॅडीसारखा.> >>>>. अगदी. मी पण हेच बोलले. सेम सपना. इन्फॅक्ट सपना जास्त चांगली मॅडीपेक्षा
अगं ती मॅडी कलर्सच्या कॉमेडी
अगं ती मॅडी कलर्सच्या कॉमेडी एक्सप्रेस मध्ये काम करायची समीर चौघुले बरोबर.
अगं ती मॅडी कलर्सच्या कॉमेडी
अगं ती मॅडी कलर्सच्या कॉमेडी एक्सप्रेस मध्ये काम करायची समीर चौघुले बरोबर. >>> हो भक्ती रत्नपारखी नाव.
ती मॅडी टोटली मॅड आहे पण
ती मॅडी टोटली मॅड आहे पण धुर्त पण आहे. कोणी ईतका बावळटपणा कसे करु शकते, बरे हीला बावळट म्हणावे तर ते पण नाही, पक्की चालु आहे. आजोबांना थापा मारल्यात त्या राजेला कळु नये म्हणुन घाबरुन लपवते पण
मधले भाग मी मिसले. ती मॅडी
मधले भाग मी मिसले. ती मॅडी राजेंची बायको असल्याचे का नाटक करतेय? तेप्र ने सांगितलेय का निजो ला जळवायला ?
Pages