अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

" काहीही. ती नोकरीनिमित्तानेच घराबाहेर असली दिवसरात्रभर तर बिघडल कुठे. >>>>>> त्याआधी ती सून घरी काहीच न करता सासूसासर्‍यांना डाफरत असते , ते दाखावलंय.मीही आताच पाहिले.

जितक रिग्रसिव्ह कुटुब दाखवलय त्यावरुन सासुबाई १-२ वर्श तरी बोहल्यावर चढत नाहित>>>>>> अगदी अगदी.

हॉटेलमध्ये काय ती निजो डबा उघडत होती चमचे आपटून. ती निरागस नाही तर बावळट वाटत होती आज.>>>>ते फार डोक्यात गेले.

हो न....निवेदिता वरुन हाताने झाकण दाबून खालून जरासाच जोर लावत ते उघडायचा प्रयत्न करीत होती..अगदीच बावळटपणा....!
गिरीश ओकांचे जरुरीपेक्षा जास्त क्लोज अप्स दाखवितात ! Angry
आणि टायटल साँग मधे रुमाल ओढून काढल्यावर त्यांचा पूर्ण कान विचित्रपणे हलतो...ईईईईई!!

काहीही...मुळात त्याला तरी ही निवेदिताच का गटवायची ए? ऑफ ऑल लेडीज?

दोघे ही अगदीच वेस्ट प्रकरणे आहेत. ती एक नीर स स्त्री व तो जरा वाढत्या वयाला रोखून धराय ला बघणारा हौशी टाइप माणूस. काही विकास खन्ना दिसत नाही. जीव टाकायला. ह्यांचे लग्न झाले काय न झाले काय काय फरक पडतो. कथा काहीही पुढे न जाता फक्त खाणे पोट बिघडणे म्हातार्‍याचे नखरे ह्यावरच फिरत राहते आहे. सर्व मिळून पीळ मारतात.

अमा Lol

अजिंक्य देव वगैरे तरी घ्यायचा. गिरीश ओक पटत नाही अगदी.

मला एक कळत नाही. दत्तला (मला गी. ओ. दत्ता म्हणतात ते आवडत )जर का पिझ्झा खाल्यानी पोट खराब होत असेल तर मग हॉटेल मध्ये नेऊन पिझ्झाच का खाऊ घातला? कि घरी ऑर्डर केलेला पिझ्झा आणि हॉटेल मधला पिझ्झा ह्यात काही फरक आहे का?? पिझ्झ्यामध्ये मैदा, चीझ वगैरे पदार्थ असतात म्हणून ते खाल्ल्यावर माझाही पोट बिघडतं. देन व्हॉट इस द डिफरेन्स बिटवीन थिस पिझ्झा अँड दॅट पिझ्झा?? की दत्ता साठी भाकरी पिझ्झा वगैरे बनवला होता गिरीश ओकांनी??

वेळेत खाल्ला तर पोट बिघडत नाही असे म्हणाले दत्ता. एकुणात सगळे फुकटे आहेत. राजेंनी हॉटेलमध्ये दोन खुर्च्या ठेवल्या होत्या, म्हणजे त्यांना कदाचित निजोबरोबर जेवायचे असेल पण हे चार कुलकर्णी तिकडे धडकले, बिन बुलये मेहमान. त्या भाजी बाजारातला प्रसंग कैच्यकाई. राजे किती महान आहेत हे दाखवायला सर्व खटाटोप.

अमा Lol
विकास खन्ना कोण?

आणि त्या गिरीश ओक ला तरी हिलाच का गटवायची ए? ऑफ ऑल लेडीज?
आणि खरंच आपल्याला काय फरक पडणारे त्यांचं लग्न झालं अथवा न झालं तरी? त्यापेक्षा जास्ती फरक आपल्याला गुरव-राधिकाचा घटस्फोट झाला तर पडेल....!!
Happy

विकास खन्ना कोण? >>>क्युट दिसणारा शेफ आहे. तसे इथल्या मास्टरशेफमध्ये बरेचसे शेफ मस्त दिसणारे असतात.

अमा Lol
विकास खन्ना कोण? >> आंगो, बघुनच घ्या जरा गूगलून. देखनेकी चीज है Lol

भाजी मार्केट मध्ये बिल्डीन्ग ची अख्खी गँग एकत्र जाते . बहुतेक घाउक घेतल्यावर सवलत मिळत असावी .
त्या मावे कडे सगळे असे काय बघत होते ??
बर त्या डिलेवरी बॉयने सांगितलं , मावेची डिलिवरी आहे .
एवढ्या मोठ्या बॉक्स वर नाव आणि चित्र ही होतं , तरी माहित नाही सगळेजण हे काय आहे हे काय आहे काय करत होते ??
आजोबांच एक ठीक पण निजो पण एलियन चं स्पेस क्राफ्ट पाहिल्यासारखी काय बघत होती ?

त्याआधी ती सून घरी काहीच न करता सासूसासर्‍यांना डाफरत असते , ते दाखावलंय.मीही आताच पाहिले. >>>>>> ओहो . ते मी बघितलच नव्हत म्हणून गैरसमज झाला. धन्स देवकी. Happy

गिरीश ओक पटत नाही अगदी. >>>>>> अन्जू, गिरिश ओक अगदीच वाईट नाही काही. अजिंक्य देवसुद्दा चान्गला आहे.

घारगे सुद्धा सासुला डब्यात भरुन घ्या म्हणाली. बाई तेवढ तरी कर.. >>>>>>>>> कोण? शुभ्रा?

आज काय फालतुपणा चालला होता.कारखानीसला काही संवाद देण्यासाठी म्हणुन बळच एपि काढला होता का?त्यापेक्षा बबड्याला तरी काहीतरी संवाद द्यायचे.
आणि बबड्याला एवढं सुद्धा माहित नाही आईने घारगे केलेले? त्याच घरात रहातो ना?
कारखानीस बाईने मीच घारगे केल्याचं सांगितल्यावर लगेच विश्वास बसला त्याचा.
आणि कोण ईतकं धडधडीतपणे खोटं बोलतं.जिने घारगे केले होते, तिच्यासमोरच तिने नाही मी केले होते म्हणाली.

कारखानीस बाईला काय बेसिक स्वयंपाक सुद्धा येत नाही का? सुनबै सांगेल त्याला बावळटासारखं हो म्हऩत होती.
घारग्यात कांदे काय.टोमेटो किती मोठे मोठे चिरले.
ती कारखानीस बाई तरी किती नाटकी.जुनी mady गेली तर ही आली लाडे लाडे बोलायला.
नविन mady छान करतीये काम. मसाले लागलेत केसांना Lol
राजेसाहेब तरी का हट्टाला पेटलेत.ईतक्या फेमस शेफला काय घारगे येत नाहीत.काल साहित्य तर त्यानेच सांगितलं तुप,पीठ,साखर सगळं रेडी आहे आमच्याकडे म्हणुन.

आज बरी बोलली नि.स. सुनबैंना,तू मधे पडू नकोस म्हणुन.

सूनबाई फारच भोचक आहे, म्हणून बोलावच लागलं सासूबाईंना. राजेला काही कामधंदा नाही वाटतं, उठसूठ येतो आपला भोपळा घेऊन. कारखानीस बाई बघितली आहे कुठेतरी. नोकरी करते ना ती, एवढी येडी कशी असेल. किती तो किस भोपळ्याचा. एक आठवडा त्यावरच काढणार. पुढच्या भागात बोलणार एकदाच्या आसावरीबाई. ती कारखानीस एकदा घरी करून बघत नाही का घार्गे. टीव्हीवर जायच्या आधी कलाकार लोक पण सोपी रेसिपी निवडतात आणि करून बघतात. काय तो अवतार त्या कारखानीस बाईचा, कुठल्या जत्रेतून असे दागिने घेते, कानातले तर अगदी स्वस्त वाटतात, पाच रुपयांचे.

दिवसाच्या कोणत्याही वेळी राजेंच हॉटेल भरलेलं, सून-मुलगा घरात, आणि राजे काहीतरी कारण काढून निसच्या आसपास. हे सगळं शुभ्राला वाटतयं म्हणून चालू आहे, का राजे किंवा निस पैकी एका कोणाला तरी वाटतयं म्हणून चालू आहे काही न कळे.

२-३ दिवस.. कदाचित या संपूर्ण आठवड्याकरता या मालिकेचं नाव बदलून...
"घारगे आणि सासू" असं केलं तरी चालेल ना Wink

घारगे झाले कि नाही शिकून? हा पण लाळघोटे पणा सोडत नाही व हिच्या पण डोक्यात शिरत नाही. आसावरी गेंगाणे बोलते. म्हातारा असह्य आहे. नवी मॅडी झी मराठीच्या विनोदी पात्रांपैकी सर्व क्लिशे धारण करोन आहे. इंग्रजी शाळेत शिकली, सामान्य ज्ञान एकदम कमी, कायम वेस्टर्न ड्रेसेस मध्ये. ती नोकरी करनारी सून अगदीच असह्य आहे. उगीच जास्त मेक अप. झी जरा अहो मार्केट रिसर्च करा. लेखकांना जरा कामाला लावा. हे एकाच संकल्पनेची अनेक रूपे बघ णे पीळ आहे अहो. तेजस्री नक्की काय काम करते. का ओढणी पांघरोन व तीन पायर्‍यांचे झुमके घालून मटकते फक्त? एकाद दिवस सर्व स्वय्, पाक का नाही करत. सीरीअल मध्ये अजून काही घड ते का सैपाक व जेवन सोडून?

अभि जित राजेचा मेक ओव्हर होईल का? काळे केस बरे कप डे वगैरे बजेट आहे का.

मी बघणं बंद केलं सोहम आईवर दारातच ओरडल्यानंतर! साधं तयार स्वयंपाक ह्या मुलाला गरम करुन वाढता / घेता येऊ नये! चांगल्या (महत्त्वाचा operative शब्द) घरातली मुलं आईशी किती व्यवस्थित वागतात, बोलतात. तिला सासऱ्यांसमोर गप्प बसावं लागत असले तरी मुलाला नक्कीच ती शिस्त लावेल आणि फक्त single parentअसताना मुलं जबाबदारपणे, नम्रतेने वागतात/बोलतात

अतिशय मागासलेले विचार आहेत आजोबांचे, स्री म्हणजे पायातील वहाण टाईप. म्हणे डोक्यावर चढून बसेल. सोहम तेच बघत मोठा झालाय. आसावरी कमवत नाही आणि माहेरीही आश्रय नसेल तिला म्हणून एवढं ऐकून घेते.

Pages