अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा... अजुन एक नवीन शहर आलं म्हणायचं झीम मधे..! >>>>आतापर्यंत दुसरी का तिसरी सिरीयल असेल ठाण्यात शूट झालेली.

निवेदिता सिनेमात फारशी कधी आवडली नाही जास्त
पण comeback मध्ये आवडतेय .
मी तिचा एक आम्ही सारे खवय्ये ( की असाच कुठलातरी ) एपिसोड पाहिला .
तिने कानवले केलेले . तिचा कीचन मधला वावर प्रचंड सुखद होता .

दोन्ही एपिसोडस आवडले.

गिरिश ओकचा किचनमधल्या शेफना इन्स्ट्रक्शन्स देण्याचा सीन चीनी कम वरुन ढापल्यासारखा वाटला. पण चलता है.

बॅकग्राऊण्ड म्युझिक 'खुकखु' च आहे का?

तेजश्रीचा नवरा अशोक पत्कींचा मुलगा आहे >>>>>>> तरीच पहिल्या एपिसोडपासून वाटत होत की ह्याला कुठेतरी पाहिलय. पण नाव विसरल गेल.

मस्त वाटले दोन्ही भाग.
रवी पटवर्धन खूप जोरात बोलत होते गरज नसताना असं वाटलं.
निवेदिता जोशी मस्त अगदी आपल्या घरातल्या आई, काकूसारखी वाटली. कमी मेकप, घरात बांधतात तसे केस वगैरे.
लग्न लागलं त्यानंतर असं वाटलं की अरे मंसू का नाही घातलं बबड्या ने? तर तो कार्यक्रम घरी आल्यावर Proud
रजिस्ट्रारच्या हापिसातच घालायला पाहिजे ना?
पहिला बसस्टॉप सीन बघून आता श्री (शशांक केतकर) येईल असं वाटलं

ते कढी-खिचडी खाणारे आजोबा आणि सकाळच्या जेवणाला कढी-खिचडी करणाऱ्या सूनबाई काही पटलं नाही.
बाकी, ह्या मालिकेची वाट कशी लावतील हे सुचलं अचानक त्यामुळे मी ही मालिका बघण्याचा countdown सुरु!

शुभ्राच्या हातची चव आजोबानी ओळखली ते बरं झाली .
नाहीतर उगाचच तिला सर्वगुणसंपन्न दाखवायच्या नादात कैच्याकै झालं असतं .

मस्त वाटले दोन्ही भाग.
रवी पटवर्धन खूप जोरात बोलत होते गरज नसताना असं वाटलं. >>>>>फारच म्हातारे झालेत ते त्यांना चालताही येत नाही आहे बरोबर. म्हातारपणी ऐकू कमी येते आणि म्हणून बोलणारा मोठ्याने बोलतो. माझे आजोबा असेच मोठ्याने बोलायचे आम्ही नातवंडे मात्र त्यांच्या आरडाओरड्ला खूप एन्जॉय करायचो.

ती राजेंची असि स्टंट अतिशय इरिटेटिण्ग आहे तिला लगेच फायर केले पाहिजे. अनॉइन्ग वुमन. उगीच भाम टी बाई वाट्ते. सर जेवान सर तुम्हाला कसली बायको हवी वगैरे असे पर्सनल स्पेस वर आक्रमण का बरे करते. तिचा टोन अगदी तिच्यापासून चार हात दूर राहवे असेच सूचित करतो.

ते उरलेले क्रेम ब्रुले होते ककाह=? मला तर नुसतेच कस्टर्र्ड वाटले. कढीत लाल तिखट घातलेलं गडबडीत केली असेल.

आज मी हिरवी मिरची कोथिंबीर घालून करे न सुनबाईला कढी येइना. बबड्या खरेच चम्या आहे. एक शब्द बोलत नाही.

निवेदिताचे कॅरेक्टर तिने छान पकडले आहे. खरे तर इशा आसा ती जाडी आई सॉन्या बघायचाच वीट आला होता. ही नवी टीम प्रेक्षणीय आहे.

बबड्या ला संवाद दिले नाहीत वाटतं
शुभरा आजोबा .... असं ओरडली तेव्हा मला जाम मजा आली.. हट्टी, गुणी सून असावी

शुभरा आजोबा .... असं ओरडली तेव्हा मला जाम मजा आली. >>> + १२३ मस्त धमाल वाटलं ते. एकदम हसू आलं.

शुभ्राला सर्वगुणसंपन्न नाही दाखवल ते चान्गल केल. तिला पैज लावण्याची सवय असावी. सो, लग्नाआधी सासूच लग्न लावून देईन अशी पैज लावली असेल बबडयाशी.

सासूबाई शेफचे डायहार्ड फॅन आहेत. Wink

शुभरा आजोबा .... असं ओरडली तेव्हा मला जाम मजा आली. >>>>>>>> +++++++++++१११११११११

गुणी सून असावी >>>>>>>>>>>> पण ती सदगुणान्ची पुतळी नसावी.

ते कढी-खिचडी खाणारे आजोबा आणि सकाळच्या जेवणाला कढी-खिचडी करणाऱ्या सूनबाई काही पटलं नाही.>> निजो म्हणतात ना की जेवायला उशीर झाला की ते कढी-खिचडीच खातात.

सिरियलच्या परपरेला जागुन अतर्क्य गोश्टी आहेतच पण कालच्या भागात निवेदिताने किचन मधे आल्यावर पहिले हात धुतले, समोरच्या नॅपकिनला पुसले आणी मग डाल-तान्दुळ धुतले , म्हणायला अगदी रुतिन गोष्ट पण निजोने अगदी सहजतेने केले , तिचा वावर आवडतोय मला.
तेजश्री प्रधान पण चान्गली वाटतेय , ओव्हरऑल सुखद वावर आहे तिचा, अ‍ॅक्टिन्ग जरा नाटकी वाटतेय पण ते बहुधा तिच्यात इनबिल्टच आहे.
सुनध्यान मधे होस्ट म्हनून फार बारिक वाटत होती इथे जरा बरी वाटतिये.
राजेची अस्टिन्टट भयाण आहे, का अशी प्रात्र लिहतात? अगदिच सुमार!

मी पहिले दोन सीन आणि दुसरा भाग संपूर्ण बघितला. नि जो ने सहज काम केलंय. बाकी बोअर झाली सिरीयल मला.

ते प्र ची आई तिची ताई वाटत होती, तिच्यापेक्षा छान दिसत होती. ते प्र तशीच कृत्रिम हसते.

कालचा, आजचा भाग आवडला.
त्यांचे घर आधी ‘तुझे माझे ब्रेक अप‘ मधे पाहिल्याचे आठवले. सोहमच्या मित्राची खोली हि समीरच्या आई-बाबांची खोली होती.

काहीही झालं तरी खिचडी न खाणारी पुरुषमंडळी घरी आणि आजुबाजुला बघितली आहेत म्हणून शॉक बसला. तसंच इतक्या अनुभवी सुनेला भराभर केलेला साधा चौरस आहार कढी-खिचडीपेक्षा सोपा वाटेल करायला असं वाटलं.
बाकी त्या मुलाला स्वतःची बेडरूम असताना (टूथब्रश गादीवर सीनमध्ये ) रात्री झोपण्याचा उगीच इथे-तिथे काय प्रॉब्लेम काही कळले नाही. Shubhraa ला सतत समजूतदारपणे आजोबा- सासू च्या मागे मागे दाखवली तर मला ती सोहम ची मोठी बहीण वाटेल लवकरच. इन फॅक्ट, आत्ताच मला ती सून कमी आणि event कॉ-ordinator/ प्रोजेक्ट मॅनेजर वाटते आहे!

त्यांचे घर आधी ‘तुझे माझे ब्रेक अप‘ मधे पाहिल्याचे आठवले. सोहमच्या मित्राची खोली हि समीरच्या आई-बाबांची खोली होती.>> हो हो.. मलाही तीच शंका आली होती.. एवढंच काय तर निजो चा हॉल मला चुभुद्याघ्या मधल्या हॉल शी मिळताजुळता वाटला..!

कॅमेर्‍याला जवळ बोलावून पुढची हिंट द्यायची हा प्रकार आवडत नाही अगदी. कादरखानने पण एका बकवास सिनेमामध्ये असा प्रकार केला आहे. बाकी कालचा भाग आवडला.

कॅमेर्‍याला जवळ बोलावून पुढची हिंट द्यायची हा प्रकार आवडत नाही अगदी.>> अगदी अगदी.. तेप्र सुन होऊन निजो च्या घरी नांदायला आलिय कि डोळे गरागरा फिरवुन प्रेक्षकांशी संवाद साधायला आलिये तेच कळत नाही..

शाळेत कशी अतीशहाणी, आगाऊ, सगळ्यात पुढे पुढे करणारी एक तरी मुलगी असतेच तशी तेजश्री वाटतेय.

सीरीयल चांगली वाटत आहे सध्यातरी. लिमिटेड एपिसोड ची असेल तर बरे उगीचच पाणी घालून वाढवीण्या पेक्षा .
ती तूपारे मी पहले 5एपिसोड पहिली होती आणी नंतर बघणे सोडून दिले.
झी मराठी ला सगळ्या मालिका ऊगीचच वाढवुन त्यांची वाट लावायची सवय आहे.
कॅमेर्‍याला जवळ बोलावून पुढची हिंट द्यायची हा प्रकार आवडत नाही अगदी. कादरखानने पण एका बकवास सिनेमामध्ये असा प्रकार केला आहे. >>
हो घर हो तो ऐसा या मूवी मध्ये आहे. त्यात त्याची बायको त्याला खुप त्रास देत असते.
आज काल जिथे एखादा माणूस प्रेक्षकांशी गप्पा मारत असेल तिथे हमखास ही पद्धत वापरतात.

Pages