Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजोबांना towel ऊचलायला
आजोबांना towel ऊचलायला सांगितलेलं आवडलं नाही +१. तू ऊचल की तेंव्हा,मग हवं तर सांग असा towrl टाकु नका म्हणुन.
नुसती लांबलचक ओढणी फलकारत फिरायचं तिघांना order सोडत.
नि.स. ला एकटं-स्वतंत्र रहायचं असेल तर..करेक्ट अमा.
आता वाईटात चांगलं बघते मी --
आता वाईटात चांगलं बघते मी -- राजेशी लग्न झालं तर ..
तीनच्या (प्रोस्पेक्टइव्ह चार) ऐवजी एकाचच हवं नको बघावं लागेल.
कोणाची तरी बायको म्हणून उजळ माथ्याने (कपाळाने, गळ्याने ) फिरता येईल.
सवाष्ण असल्याचे सगळे सामाजिक फायदे मिळतील.
घरचंच हॉटेल असल्याने अगदीच होतं नसलं तरी झक्कत उठून स्वयंपाकाच बघावं नाही लागणार.
राजे वयस्कर आहे त्यामुळे होपेफुल्ली दुसऱ्यांदा लाईफ मध्ये तिला कानाशी जुळवून घ्यायची गरज पडायला नको.
आता राजेला आई असेलच तर तिचे आजोबांशी लग्नाचा बार उडवून टाकता येईल (buy 1 गेट 1 free) वडील असतील तर आजोबांना मित्र मिळेल.
राजे loaded दिसतो त्यामुळे कदाचित आर्थिक दृष्टया स्वावलंबी होता येईल.
मॅडि इतके दिवस फील्डिंग
मॅडि इतके दिवस फील्डिंग लावून बसली आहे ती काहीतरी कालाकांडी करू शकते ह्या रोम्मान्सात. ते दत्ता व सोम्याला फारच लाडावून ठेवले आहे आसावरीने.
मला भीती वाटते की मुला
मला भीती वाटते की मुला-सासऱ्याच्या दावणीला बांधलेली आसावरी आता ह्या वयात नव्या नवऱ्याच्या दावणीला बांधली जाईल >>>>>>> राजे वाईट दाखवले नाहीत.
तिचा खरेतर सासू ला घरातून काढून टा कायचे लग्न करवून आणि मग आजोबाला वृद्धाश्रमात असा डाव असेल असे वाट्ते. आणी तो राजे आतनं अब्युजिव असेल तर काय?! >>>>>>>> अमा ही तुपारेसारखे सस्पेन्स सिरियल नाहीये. तिथे हिरो व्हिलन होता, इथे हिरोईन व्हिलन.
हो, पण शुभ्राच बळेच सासूला बळेच दुसर लग्न करायला लावण नाही पटल. मुळात शुभ्रा आणि सोहमचा फ्लॅशबॅक दाखवलाच नाहीये. सस्पेन्स ठेवलाय तो. त्यामुळे तिचा असा दुसर्या लग्नाचा निर्णय फास्टच वाटतो.
कोणाची तरी बायको म्हणून उजळ माथ्याने (कपाळाने, गळ्याने ) फिरता येईल.
सवाष्ण असल्याचे सगळे सामाजिक फायदे मिळतील. >>>>>>>> सॉरी राजसी, पण हे रिग्रेसिव वाटतय, रादर आहेच.
री राजसी, पण हे रिग्रेसिव
री राजसी, पण हे रिग्रेसिव वाटतय, रादर आहेच.--- हो , पण ती तशीच दाखवली आहे. लग्न झाल्यानंतर पहिला नमस्कार पण स्वतः करुन घेत नाहीये
राजे वाईट दाखवले नाहीत. --- आजोबा, सोहम तरी कुठे वाईट दाखवलेत!
लग्नाचा तिला फायदा काय तिच्या मनात विचारही नसताना.
मला तर सोहम आणि आजोबा दोघही
मला तर सोहम आणि आजोबा दोघही अजिबात आवडले नाहीत , त्या सोहमच्या तर दोन थोबाडीत ठेवून द्यायला हव्यात आईविषयी अजिबात आदर नाहीये त्याला आणि आजोबा सुनेला गुलामासारख वागवतात
आसावरी माणूस आहे की मशीन ?
सासरा आणि मुलगा दोघही नोकरासारख ट्रीट करतात आसावरीला
यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही
यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही का? किती ते रामायण जेवण गरम करण्यावरून
आज बरा डोस दिला आजोबांच्या
आज बरा डोस दिला आजोबांच्या मित्राने.जे मित्राला कळतय ते आजोबा-मुलाला कळेना झालय.
आजोबांनीही टाँट मारला नातसुनेला नवर्याला डोस देत असते म्हणुन.
शुभ्राला काय माहित फोन अ.रा चा आहे? बळच ऊचलायला लावला फोन सासुला.
आजोबांच्या मित्राचा चश्मा एक
आजोबांच्या मित्राचा चश्मा एक बाजुने फुट्का वाटत होता . निवेदिताच्या साड्या छान आहेत. तिला मस्त दिसतात.
कालचा भाग सहज जाता येता
कालचा भाग सहज जाता येता बघीतला. किचनशेजारीच हॉलमध्ये टिव्ही असल्याने दिसले सर्व आणी ऐकले पण. क्षणभर वाटले की टिव्हीवर मोठ्ठा दगड फेकावा. काल आजोबा बागेत जातात, तिथे त्यांचे मित्र आजोबा त्यांना समजवतात की तुझी सून फार चांगली आहे, ती तुझी काळजी घेते, बाकीच्या सुना बघ कशा सासु सासर्यांना विचारत नाहीत वगैरे वगैरे. नेमका त्याच वेळेस मैत्रिणीचा फोन आला ती म्हणाली की हे डॉयलॉग ऐकल्यावर तिच्या घरात स्फोट झाला. कारण तिच्या सासर्यांना सवय आहे दर सेकंदाला गैरसमज करुन बोलायची. अगदी सासुला बाहेरुन काही खायला आणुन दिले तरी तिला टोमणे ऐकावे लागतात. की या वयात बाहेर खाणे कशाला? आणी नाही दिले तर सासुला राग येतो हे बाहेरचे खातात पण मला देत नाहीत म्हणून. हे ऐकल्यावर मला हबकल्यासारखे झाले.
या असल्या विकृत सिरीयलमुळे लोकांच्या घरात भांडणे होत असतील, वाद होत असतील तर काय उपयोग? ज्ये ना ना सवय असते तरुणांवर डुक धरण्याची. त्यांच्या वाडवडिलांनी तेच केलेले असल्याने हे ज्ये ना वारसा पुढे चालवतात.
देवा ! वाचव भारताताला या विकृतीपासुन.
रश्मी....थोडंफार मलाही हे
रश्मी....थोडंफार मलाही हे अनुभवायला येतं आहे. माझ्या सासूबाई पण म्हणाल्या की खरंच आहे नं...दोघीच्या दोघी कशा चालल्या गेल्या सासर्यांच्या जेवाय- खायचं न बघता.....? त्यांना राग येणं साहजिकच आहे ना...!!
आणि गुरवाचे इतके हाल चाल्लेले ही त्यांना बघवत नाहीत! म्हणे राधिका अतिरेक करते आहे त्याचा बदला घेण्याचा!! बिचार्याची काय अवस्था झालीए! त्याला सरळ घटस्फोट द्यायचा होता आधीच!
मला तर सोहम आणि आजोबा दोघही
मला तर सोहम आणि आजोबा दोघही अजिबात आवडले नाहीत , त्या सोहमच्या तर दोन थोबाडीत ठेवून द्यायला हव्यात आईविषयी अजिबात आदर नाहीये त्याला आणि आजोबा सुनेला गुलामासारख वागवतात
आसावरी माणूस आहे की मशीन ?
सासरा आणि मुलगा दोघही नोकरासारख ट्रीट करतात आसावरीला >>> + १२३४५६७८९
खरतर तो बबड्या ठोंब्या सोहम शुभ्राला का आवडला कळत नाही. का आसावरीचं लग्न लावायचं ह्या एकाच उदात्त हेतूने ती इथे लग्न करुन आली आहे? कारण बळच काही कारण नसताना ती निजो आणि गिओचं जमवायच्या मागे लागली आहे.
तेप्र उर्फ सुनबाई ही खूपच
तेप्र उर्फ सुनबाई ही खूपच चुरचुरू बोलतेय असं वाटत आहे काही।लोकांना, घरात येऊन 4 दिवस झाले नाहीत आणि सगळ्यांच आयुष्य बदलायला निघालीये .. असा मतप्रवाह ऐकलाय नुकताच..
खरतर तो बबड्या ठोंब्या सोहम
खरतर तो बबड्या ठोंब्या सोहम शुभ्राला का आवडला कळत नाही. का आसावरीचं लग्न लावायचं ह्या एकाच उदात्त हेतूने ती इथे लग्न करुन आली आहे? कारण बळच काही कारण नसताना ती निजो आणि गिओचं जमवायच्या मागे लागली आहे.------+1111111111
शुभ्राला स्वतःला लग्न करायचं
शुभ्राला स्वतःला लग्न करायचं होतं, संसार करायचा आहे म्हणून लग्न करुन आलीये की सासुबाईचं लग्न लावायचंय म्हणून लग्न करुन आलीये हे मी आधीच लिहिलंय. आता तर तशी खात्री झाली
बरोबर सस्मित, ते घटनांमधून
बरोबर सस्मित, ते घटनांमधून हळुवारपणे दाखवता आलं असतं
ही मालिका बघून सगळ्या
ही मालिका बघून सगळ्या घरातल्या सासूबाई ना आपली सून ही अशीच करते असं वाटू शकतं, उगाचच नजरिया/दृष्टिकोन गढूळ होईल
झीमच्या सिरियलच्या प्रोमोजचा
झीमच्या सिरियलच्या प्रोमोजचा नेहमीच लोच्याच झालेला असतो. प्रोमोजमध्ये एक दाखवतात आणि सिरियलमध्ये भलतच दिसत.
सुरुवातीच्या प्रोमोमध्ये निजोला खमकी दाखवली होती. लग्नाच्या वेळी गिओला रागाने बघताना दाखवलीय.( नवर्या मुलीला उचलायच सीन). दुसर्या प्रोमोमध्ये तर ती गिओला फणकार्याने ' लोक अजूनही माझ्याकडे बघतात' म्हणते. प्रत्यक्ष सिरिअलमध्ये मात्र तिला आत्मविश्वास नसलेली, साधी, सरळ, सगळयान्च सगळ ऐकणारी, गिओशी गोड गोड बोलणारी दाखवलीय.
फक्त तेप्र आणि गिओच्या भुमिका प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे आहेत.
आजोबा सुद्दा प्रोमोमध्ये मॉर्डन दाखवले होते. लग्नानन्तर नवर्या मुलीला उचलायच असत म्हणतात. सिरियलमध्ये मात्र कित्ती रिग्रेसिव दाखवलेत!
का आसावरीचं लग्न लावायचं ह्या एकाच उदात्त हेतूने ती इथे लग्न करुन आली आहे? >>>>>>> अगदी अगदी. सोहम आणि शुभ्रामध्ये नावालाही केमिस्ट्री दिसत नाही. रोमॅन्टिक सीन नाही दाखवला त्यान्च्यात. नवीन लग्न झालेल जोडप वाटतच नाहीत ते.
मी एकच पहिला एपिसोड बघितला.
मी एकच पहिला एपिसोड बघितला. मला गिरीश ओक नि जो चे हिरो म्हणून नाही आवडले. अभिनय करणार चांगला ते पण तरीही, कोणीतरी छान हवा होता. अशोक शिंदे मस्त वाटले असते.
आजोबांच्या मित्राचा चश्मा एक
आजोबांच्या मित्राचा चश्मा एक बाजुने फुट्का वाटत होता >>>> अगं हो मी पण ते नोटीस केलं
मागच्या आठवड्यात राजे घरी
मागच्या आठवड्यात राजे घरी येतात तेव्हा दिसली होती काच फुटलेली चष्म्याची, आजोबांच्या मित्राची. त्या शेजारच्या आजी कोणावर लाईन मारत असतात. तेजू किती उंच दिसते निजोपुढे. रविवारी सगळे भाग दाखवतात तेव्हाच बघितले जातात. ऑनलाईन काही विकताना पत्ता कुठे लगेच देतात. फक्तं नंबर देतात मग बोलणं झालं की पत्ता. राजे तर सरळ घरी आले तेही स्वयंपाकघरात. कॉफीमध्ये तांदूळ टाकले ते अती वाटलं पण निजोची किवपण आली. देवदर्शन म्हणजे मला वाटलं गावाला, कुलदेवतेच्या दर्शनाला वगैरे जातील पण ते अगदीच बाजूच्या मंदिरात गेले. पंधरा हजार कोण कोणाला असे देऊन टाकतात का. निजोचा मेकोवर दाखवतील नंतर, म्हणून आत्ता अती साधी आणि अती बिचारी.
ते दत्ता व सोम्याला फारच
ते दत्ता व सोम्याला फारच लाडावून ठेवले आहे आसावरीने.>>>>>अगदी अगदी अपंग सेवा संघ
जितक रिग्रसिव्ह कुटुब दाखवलय
जितक रिग्रसिव्ह कुटुब दाखवलय त्यावरुन सासुबाई १-२ वर्श तरी बोहल्यावर चढत नाहित, आजोबा एक्वेळ ठिक आहे पण सोम्या कसला आइला बोलत असतो? येड्चाप आणि शुभ्रापुढे टरकतो.
निवेदिताने तरुणपणचे सगळे सिनिमे पाहिले तर ती कायम( त्याकाळातल्या) फॅशन मधेच दिसलिये, स्कर्ट्स, लॉन्ग मिडिज, केसाचा छान लेअर कट वैगरे , तिचे रोलही श्रिमन्त बापाची मुलगी असेच होते.
प्रिया बेर्डे सारखी नौवारी साड्या नेसुन ती कधिही दिसली नाही आणी आता एक्दम रोल रिव्हर्स आहे.
ही सिरीयल डोक्यात जायला
ही सिरीयल डोक्यात जायला लागलीय. फारच बाळबोध , भडक, सामान्य वाटतेय
नि.स.चा चांगुलपणा अधोरेखित
नि.स.चा चांगुलपणा अधोरेखित करण्यासाठी एक सुन वाईट दाखवलीच पाहिजे.
किती बटबटीत आगाऊ बाई दाखवली
किती बटबटीत आगाऊ बाई दाखवली कारखानीस.
ती हिरवी साडी चुकुन पडताना जे कपाट दाखवलं ते बहुधा निवेदिताचं सुन येण्याच्या आधीचं त्यानंतर निवेदिता परत साधी साडी नेसते आणि हिरवी साडी दुसर्याच भिंतीलगतच्या कपाटात ठेवताना दाखवलीये. मुदामच दाखवायचं असेल तर गुड डिटेलींग. आता ती दुसरीकडे कपडे हलवते म्हणते तर नशीब दुसरं कपाट आहे खरंच. सरंजामे सारखं एकच जादूचं कपाट नाहीतर.
हि सिरियल सध्या बघत नाही ते
हि सिरियल सध्या बघत नाही ते चान्गलच आहे. आज चुकून एक सिन नजरेस आला. एक सासू आपल्या सुनेची आसावरीकडे तक्रार करताना म्हणते की, " ही दिवसरात्र नोकरीनिमित्ताने घराबाहेर असते. घरात एक काडी इकडची तिकडे करत नाही." काहीही. ती नोकरीनिमित्तानेच घराबाहेर असली दिवसरात्रभर तर बिघडल कुठे. मौजमजेसाठी तर नाही ना जात रोज बाहेर. हेच एखादया पुरुषाबद्दल का नाही बोलत अस कुणी?
हॉटेलमध्ये काय ती निजो डबा
हॉटेलमध्ये काय ती निजो डबा उघडत होती चमचे आपटून. ती निरागस नाही तर बावळट वाटत होती आज. तेजु किती गरागरा डोळे फिरवते. असं वाटतं आता पडेल चक्कर येऊन. Maddy कधी बदलली. रत्नपारखी आवडत होती बुलेट ट्रेनमध्ये आणि सोनिवर पण होती सध्या. आजोबा कोणावरही खेकसत असतात. चांगलं बोलतच नाही कधी कुणाबद्दल. राजे बराच संयम ठेवतात त्यामानाने.
घारगे सुद्धा सासुला डब्यात
घारगे सुद्धा सासुला डब्यात भरुन घ्या म्हणाली. बाई तेवढ तरी कर..
नि.स. काल बावळट वाटत होती +१.
आणि तिला एकटीलाच निमंत्रण होतं ना.
सुनबैंनी सकुसप जायची टुम कशाला काढली? काहीतरी आयड्या काढुन सासुला पाठवुन द्यायचं एकटीला.
सुनबैंनी सकुसप जायची टुम
सुनबैंनी सकुसप जायची टुम कशाला काढली? काहीतरी आयड्या काढुन सासुला पाठवुन द्यायचं एकटीला.>>> सासूला एकटीला पाठवले तर घरचा सगळा हिला बघावा लागेल ना त्यात स्वयंपाक नाही येत वाटत.
Pages