Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या आसाव रीचा आवाज जरा
त्या आसाव रीचा आवाज जरा गेंगाणा पक्षी अनुनासिक नाही वाटत का? रोज ऐकायला बोअर. आणि ती म्हणजे त्यागाचे व्यसन असल्या सार्रखी वाट्ते. आजोबा बेस्ट. पण प्रत्येक सीरीअल मध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्याला ऑबव्हिअस चान्स द्यायचे सोडून दूर का ठेवावे लागल्ते? चांगले सुखी लैंगिक संबंध अॅक्रोस द बोर्ड कोणत्या च सीरीअल मध्ये दाखवत नाहीत.
कॅमेर्याला जवळ बोलावून पुढची
कॅमेर्याला जवळ बोलावून पुढची हिंट द्यायची हा प्रकार आवडत नाही अगदी.>> मला आवडलं ते
आता आजोबांच्या सारखं ओरडण्याचा मात्र कंटाळा आला.
आता आजोबांच्या सारखा
आता आजोबांच्या सारखा ओरडण्याचा मात्र कंटाळा आला.>>>> मला तर जॅम आवडले ते..
म्हातारी लोकं तशीच असतात. त्यांना ऐकु येत नसतं म्हणुन मोठमोठ्यांन बोलणारी. आधीसारखा जोश असतो पण शरीर साथ देत नाही. म्हणुन सतत चिडचिड करणारी.
शुभ्राला स्वतःला लग्न करायचं
शुभ्राला स्वतःला लग्न करायचं होतं, संसार करायचा आहे म्हणून लग्न करुन आलीये की सासुबाईचं लग्न लावायचंय म्हणून लग्न करुन आलीये
निजो देवळात असताना सासर्यांना
निजो देवळात असताना सासर्यांना म्हणाल्या की मी प्रदक्षिणा घेऊन येते... "प्रदक्षिणा घालून येते" असं म्हणायला हवं होतं.
बाबांना चपला दिल्यावर वईच जरा हात धुवून आल्या असत्या तर बरं झालं असतं.
राजे चामड्याचा पट्टा घालून
राजे चामड्याचा पट्टा घालून देवळात! ?
अग्गंबाई सासूबाईंचं घर हे
अग्गंबाई सासूबाईंचं घर हे पार्ल्यात आहे का ??? कारण त्या सोसायटीत तुझं माझं ब्रेक अप मध्ये समीरचे घर होते आणि तो पार्ल्यात राहत आहे असे दाखवले होते.
olx किंवा तत्सम app वर वस्तू
olx किंवा तत्सम app वर वस्तू विकताना डायरेक्ट पत्ता दिलेला असतो? आधी फोनवरुन बोलणं वगैरे काही नाही?
आणि पहिल्यांदा घरी आलेला माणुस असा डायरेक्ट किचन मधे जातो?
राजे चामड्याचा पट्टा घालून
राजे चामड्याचा पट्टा घालून देवळात! ? .>>> हे कळ्ळं नाही बुवा. चमड्याचा पट्टा देवळात चालत नाही का?
हो, चालत नाही. Wallet पण नाही
हो, चालत नाही. Wallet पण नाही चालत. आता, आपल्या मानवी देहाचं चामडं कसं काय चालतं माहीत नाही. बरोबर मोठे असले (देवळांत जाताना असतातच) की देवळात जाताना, पुरुष मंडळी काढतात. मी काही कधी details मध्ये शिरले नाही.
100
हो, चालत नाही. Wallet पण नाही
हो, चालत नाही. Wallet पण नाही चालत. .>> अरे बापरे.. कोणत्या देवळात अशी पद्धत आहे म्हणायची..??
मला ही सासरे बुवांच्या
मला ही सासरे बुवांच्या ओरडण्याचा कंटाळा येतोय. किती कर्कश्य आवाजात ओरडतात ते आणि निजो तरी किती मवाळ आणि ऐकून घेते त्यांच
राजे चामड्याचा पट्टा घालून
राजे चामड्याचा पट्टा घालून देवळात! ?
Submitted by राजसी on 27 July, 2019 - 12:55
या पूर्वी कितीतरी सिरिअल्स मध्ये हिरो किंवा साईड ऍक्टर्स मंदिरात गेलेले दाखवलेत तेव्हा कधी त्यांनी काय घातले आहे किंवा काय नाही याचे निरीक्षण नाही झाले. इथे का बरे हे पिल्लू सोडले कि मंदिरात लेदर बेल्ट घालून गेले किंवा काय नि काय. सिरिअल्स वर डिस्कस करताना हे धार्मिक सोवळे / ओवळे कशाला आणायचे. आणि मग त्यावर कीबोर्ड बडवत बसायचा. उग्गीच
निजो तरी किती मवाळ आणि ऐकून
निजो तरी किती मवाळ आणि ऐकून घेते त्यांच >>>>>> नैतर काय. राजे सुद्दा बघत राहिले की हि बाई का म्हणून त्यान्च एवढ ऐकून घेतेय.
चामड्याचा पट्टा, पाकिट काही
चामड्याचा पट्टा, पाकिट काही प्रसिद्ध देऊळांत नाही चालत. बर्याच ठिकाणी नाही आडवत.
महाराष्ट्रातील ठाऊक नाही
महाराष्ट्रातील ठाऊक नाही.मथुरेला गेले असता,देवळातल्या रखवालदाराने लेदर सोडाच पण पायातील सॉक्सही काढून ठेवायला सांगितले होते.कोल्डवेव्ह होती त्यावेळी तरीही.अक्षरशः पायांच्या बोटावर नाचत देऊळ पाहिले.(खूप वर्षांपूर्वी म्हणून शक्य झाले).
इतक्या लांबवर येऊन पाहिले नाही असे व्हायला नको म्हणून.
तसेही नवरात्रात बर्याच बायका, चप्पल घालत नाहीत.
असो.रवि पटवर्धन,ओरड्यामुळे डोक्यात जातात.त्यात तो म्हातारपणातला एक घरघरीत खास आवाज ऐकवत नाही.
चप्पल वगैरे सुनेने घालून
चप्पल वगैरे सुनेने घालून द्यायची हे जरा डोक्यातच जातंय.
डोक्यात जाण्यासाठीच तर सगळं
डोक्यात जाण्यासाठीच तर सगळं अति दाखवताहेत ते.
बबड्या अगदीच चम्या दाखवतायत
बबड्या अगदीच चम्या दाखवतायत बुवा. हा, वडिलांची शेवटची आठवण वगैरे dialogue तो ही बोलु शकला असता.
अ.रा..'डुड' म्हणाला असेल हे ही तिच्याच लक्षात आणुन दिलय.
शुभ्रा नोकरी करते की नाही? ना घरात काही काम करताना दिसतीये. फक्त सासु व नवर्याबरोबर बाहेर भटकते.
नि.स चा वावर सहज आहे.काँफिडंस नसलेली व्यक्ती ती छान ऊभी करतीये.
तिची आवडती भाजी विचारल्यावर ईतरांचीच आवड सांगणं, कोणी आजपर्यंत विचारलच नाही म्हणताना ऊदासलेला चेहरा..मस्त रंगवतीये ती.
भोळेपणाने अ.रा.चा नंबर तो काय तिथे डायरीत लिहीलाय..हे ही सांगुन टाकते.
एकट्या परावलंबी स्त्रीची
एकट्या परावलंबी स्त्रीची परिस्थिती बऱ्यापैकी दाखवत आहेत. मला भीती वाटते की मुला-सासऱ्याच्या दावणीला बांधलेली आसावरी आता ह्या वयात नव्या नवऱ्याच्या दावणीला बांधली जाईल
उद्या जेव्हा आसवरीच लग्न होईल तेव्हा आजोबांकडे कोण बघणार ? त्यांनी ह्या वयात नातसूनेची शिस्त ऐकायची आणि स्वतः मध्ये बदल करायचे का?
बाकी, आईचं दुसरं लग्न म्हणजे मुलाला पण issues होणारच! किती वर्षे असलेलं त्याचं 'आंखों का तारा' status एका क्षणात होत्याचं नव्हते होणार!
हे सगळं कोणामुळे तर सुनेला वाटलं सासूचा पुनर्विवाह चांगली कल्पना आहे!
आसावरीनी जर लिव्ह-इन-companianship तिच्या गरजेनुसार असा काही stand घेतला तर मजा येईल काहीतरी वेगळं बघितलं वाटेल:)
राजसी प्लस वन. तिला एकटे घरी
राजसी प्लस वन. तिला एकटे घरी पण चालत जाता येइना?! मग जीवन खूपच चॅलेंजि ग आहे तिच्या साठी . बघवेना मला. राजे शेफ फ्लर्ट करतो आहे हे ही समजेना बिचारीला.
उद्या जेव्हा आसवरीच लग्न होईल
उद्या जेव्हा आसवरीच लग्न होईल तेव्हा आजोबांकडे कोण बघणार ? Sad त्यांनी ह्या वयात नातसूनेची शिस्त ऐकायची आणि स्वतः मध्ये बदल करायचे का? >>>>> अहो राजसी, नातसून शिस्त लावत्ये ती सोहमला, त्यात काय चुकलं ? आजोबांना कामाला लावत असेल तर ठीक आहे. कालच्या सीनमधेही सोहम सारखा आईमुळे झालं करत होता ते चूकचं होतं.
आणि नि.स. च लग्न झालं तरी ह्या वयात जी लग्नं होत असतील त्यात कोणा एकाच्या म्हातार्या डिपेंडंटसना वार्यावर सोडत असतील कशावरून ?
राजसी, अनुमोदन
राजसी, अनुमोदन
निसच्या घरात अनेक गोष्टी खटकणाऱ्या असल्या तरी आल्या आल्या सुनेने त्यांना शुचिर्भूत करायचं अगदीच काही आवश्यक नाही. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ती घरातील व्यक्ती म्हणून आधी थोडा कामांचा भार हलका करताना दाखवायला हवी होती. कितीही मैत्रिणीचं नातं म्हटलं तरी मग वयानं मोठ्या अशा सासूमैत्रिणीसा
ठी तेजू काहीही मदत करताना दिसत नाहीये. फक्त चलाखीने वागताना दिसत आहे.
तिचा खरेतर सासू ला घरातून
तिचा खरेतर सासू ला घरातून काढून टा कायचे लग्न करवून आणि मग आजोबाला वृद्धाश्रमात असा डाव असेल असे वाट्ते. आणि ओढणी काय कायम लोंबत असते. बर सासू सिंगल असली तरी पूर्ण इक्वेशन पहिल्या पासून ठरवूनच टाकले आहे. हे बरोबर नाही. पण सीरीअलच्या स्क्रिप्ट मध्ये असेल. इशा जर विक्या ऐवजी झेंडेच्या प्रेमात पडली असती तर इतिहास वेगळाच झाला असता.
आजोबा आसवरीला तुला काही नवरा
आजोबा आसवरीला तुला काही नवरा सांभाळता आला नाही म्हणाले तेव्हा मला जाम वाईट वाटलं किती सहज किती hurtful बोलले ते! आणि आसावरीनी पण वर्षानुवर्षे हे वाक्य काही पर्याय नसल्याने ऐकले असणार, जाम तुटलं.
शुभ्र, आजोबांना टॉवेल उचलायला
शुभ्र, आजोबांना टॉवेल उचलायला सांगते ते काही मला आवडलं नाही कितीही तिचं बरोबर असलं तरी. सोहमला सांगितले तर ठीक आहे की आजोबांचा टॉवेल उचलून वाळत घाल.
सोहमला काय ती शिस्त लाव, सासूला पाहिजे तर सल्ले दे पण आजोबांच्या वाट्याला जायला नको shubhraa नी
आजोबा वृध्दाश्रमात..काहीही
आजोबा वृध्दाश्रमात..काहीही काय..ती काही वाईट नाहीये मनाने..आणि ही काही टिपीकल सासु-सुन सिरीयल नाही..
फक्त ती शेफ राजेंकडे बळे बळेच ढकलतीये सासुला.तिचा ऊद्देश चांगला असला तरी आधी त्या दोघांचं जुळतय.मग सुनेने गाडी पुढे न्यायला मदत केलीये असं दाखवायला हवं होतं.
ईथे सुनेने ठरवुनच टाकलय दोघांचं जुळवायचं.
म्हणजे सून ठरवेल तेच तिने
म्हणजे सून ठरवेल तेच तिने करायचे म्हणजे ह्यात तिला स्वातंत्र्य नाही आहे ते आहे च्चे. तिला ज र नुसतेच स्वतंत्र राहयचे असेल . स्वैपाक सोडून देउन स्वीगी वर ऑर्डर देउन खायचे असेल शॉपिन्ग मूव्हीज ट्रॅवल करायचे असेल तर ?१ तिला जीवनात काही चॉइस आहे असे दिसत नाहीये. बळेच रोमान्स. आणी तो राजे आतनं अब्युजिव असेल तर काय?!
अमा.. अॅब्युझिव्ह! आपण
अमा.. अॅब्युझिव्ह! आपण किती रिअल टाईम विचार करतो!
राजे किती उगीच इंग्लिश अॅक्सेंट नी मराठीत बोलतो! आणि ही इतकी काय घाबरलेली....रस्ता देखिल तिला नीट समजेना.. घट्ट पदर ओढून, कावर्या बावर्या नजरेने.....निवेदिता दिसतेय छान पण..... राजे ला सूट होतेय!
बहुतेक आसावरी आर्थिकदृष्टया
बहुतेक आसावरी आर्थिकदृष्टया स्वावलंबी नाहीये त्यामुळे तिची अशी फरफट आहे. आर्थिक दृष्टया स्वावलंबी नसेल तर स्विगी, शॉपिंग, सिनेमा असे विचार तिच्या मनात येणं अवघड आहे. राजे निदान तिला तुमची आवडती भाजी कोणती विचारतोय आणि करुन देणार आहे. आवळा देऊन कोहळा काढणार राजे! त्याला आयतीच त्याचं बघणारी आणि रांधा, वाढा, उष्टी काढा मोलकरीण फुकटात
Pages