युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काचर्या सुंदर झाल्या. आमचूर पावडर आणि बचकाभर कोथिंबीर हे गेम चेंजर आहेत. मी एरवी करते ती कारल्याची भाजी पण चाटून पुसून खाते माझी लेक, ही पण आवडणार नक्की. आणि मुख्य म्हणजे साखर एरवी पेक्षा जरा कमी घातली तरी कडसरपणा कमी आहे. साखर हाच मेन घोटाळा होता.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!

जर कास्ट आयर्नच्या पॅन मध्ये कारल्याच्या काचर्‍या केल्या तर खरपुस तर होतातच आणि चवही सुरेख येते. बटाट्याच्या , झुकीनीच्या काचर्‍या, भेंडीची भाजी कास्ट आय्र्न मध्ये अगदी कुरकुरीत छान होते.
आणि कार्ल्यात गुळ पाहिजी साखरेपेक्षा .

कारल्याचा विषय आहे म्हणून .... कारल्याच्या हलक्याशा जाड चकत्या करून मीठ्,तिखट्,हळद लावून तांदळाच्या कोरड्या पीठात घोळवून शॅलो फ्राय करायच्या.मस्त लागतात.जास्त तेल लागत नाही.कारली मीठ लावून पिळायची नाहीत की वरचे साल बिया काढत बसायचे नाही.

टेस्ट ऑफ लाईफ ची कणिक चांग्ली असते अमा. मी तीच वापरते. खुप बारीक/ फाइन नको असेल तर तशी पण मिळते. सकाळी केलेल्या पोळ्या रात्रीपण मऊ राहतात.

घरी केलेलं पराठे परदेशात जाऊन फ्रीझ केले तर चांगले राहतील का? आणि किती दिवस चांगले राहतील? पाककृतीच्या धाग्यावर पण हाच प्रश्न विचारला आहे. कृपया टिप्स / रेसिपी शेअर करा.

>>घरी केलेलं पराठे परदेशात जाऊन फ्रीझ केले तर चांगले राहतील का? आणि किती दिवस चांगले राहतील?
हो राहतील. महिनाभर राहू शकतात. थंड करून ॲल्यु. फाॅइलमध्ये पाच पाच वगैरेचं पॅकिंग करा म्हणजे काढताना सोपं होईल.

वेका +1
मेथीचे ठेपले नक्की टिकतील पण रहातील की नाही ते सांगता येत नाही Wink

मला चांगला कापूर हवाय, कोणता घेऊ? कापूर खरंच edible असतो का? ह्यावेळेस जो कापूर मिळालाय तो अगदीच बेक्कार आलाय. छान वासाचा , पूर्ण जळणारा हवाय. एखादा चांगला ब्रँड , प्रकार माहीत असेल तर सांगा.

Dhanyavad

खायचा कापूर असतो ना तो सौदिंडीयन लाडवात घालतात.
भीमसेनी कापूर आयुर्वेदीक उप्चारात वापरतात. पण तो खरा असला पाहिजे.
भीमसेनी महाग असतो आणि सुंदर वास असतो. मसाज तेला मध्ये सुद्धा वापरतात.
नाहितर, गुग्गुल ( फ्रकीनसन्स) वापरा. खुपच महाग आहे पण मस्त.

मला लाडवात कापूर घातलेला अजिबात आवडत नाहीत. कशासाठी घालतात ? मुंग्या आणि इतरांपासून संऱक्षण म्हणून का ? कि आवडतो लोकांन्ना त्याचा सुगंध म्हणून ?

>>> लाडवात कापूर मुंग्या वगैरे <<< Happy

काही जणं , गोड पदार्थात, लवंग वेलची घालतात ना चवीसाठी त्याचं दुसरं शास्त्रीय कारण हेच की, पचनास बरे. आयुर्वेदिज खाण्याचा कापूर तेच दोन्ही काम आणि सुगंध करतो. चिमटीभरच घालायचा असतो. मला आवडतात ते सौदिडियन लाडू.
भीमसेनी कापूर सुद्धा खातात पण तो नाही घालत लाडवात.

राजसी ,डीमार्ट मध्ये कापूर डबी मिळते जो पारदर्शी दिसतो व जाळल्यावर पूर्ण जळतो.खूला कापूर पांढर्या रंगाचा दिसतो व नीट जळत नाही. आमच्याकडे पदार्थाला जर कापूराचा वास आला तर तो खात नाहीत.

वडा सांबर जमण्यासाठी काही खास टिप्स असतील तर सांगा.>> उडीद डाळ चार तास भिजवून कमी पाणी घालून वाटणे. मग बाहेर ठेवू नका. लगेच व्डे तयार करायल घ्या नाहीतर फ्रिज मध्ये. पीठ घट्ट हवे. पीठ बोटावर घेउन मध्ये अंगठ्याने भोक पाडून अलगद तेलात सोडा. तेल फार फार तापलेले असले तर लगेच जळेल. एकद्म ऑप्टिमम गरम हवे. मध्यम आच. भरपूर तेल घ्या म्हणजे वडे खाली लागणार नाहीत.

आव्डी नुसार वड्यात अर्धे कुटलेले मिरेजिरे, मिरचीचे तुकडे व कोथिंबीर, मीठ स्वादानुसार, व बारीक कापलेले ओल्या नारळाचे तुकडे काढा.
खर्पूस तळून काढा.

सांबाराच्या भाज्या व डाळ मीठ हळद कुकरला मौ शिजवून घ्या. चिंचेचा कोळ घाला सांबारात. आची किंवा तत्सम मसाला घ्या. किंवा बेस्ट मसाला घरी बनवा फ्रेश. सोपा आहे.

बरोबरीने इडली, उपमा खोबर्‍याची चटणी, शेंगदाणेची चटणी व टोमाटोची चटणी, तिखट वाला पोंगल हे बनवून सर्व केले तर हार्टी ब्रंच मेन्यू होतो.

ह्यात अजून एक व्हेरिएशन आहे. बटन इडली साचा मिळतो. त्यातून इडल्या बनवून घ्या. तसेच बारके वडे बनवा.

रसम बनवा. मोठ्या बोल मध्ये वाफाळ ते रसम घालून त्यात हे चार चार इडली वडे घालून वरोन घरचे व्हाइट लोणी घाला व गरम सर्व्ह
करा. एकद्म बेस्ट लागते. हैद्राबादेस मस्त मिळते. बट आय अ‍ॅम स्टक इन ढोकला लँड!!!

बरोबरीने इडली, उपमा खोबर्‍याची चटणी, शेंगदाणेची चटणी व टोमाटोची चटणी, तिखट वाला पोंगल>>>>>> अरे बापरे अमा,मेदूवड्यांबरोबर हे इतके सारे?

मस्त लिहिलेय अमा
याचा वेगळा धागा विथ एक फोटो झालाच पाहिजे!! ☺️

हा माझा बर्याच वर्षांचा सल आहे.माझा राजमा कधीच मऊ शिजत नाही.बाकी छोले वगैरे शिजतात.
राजमा मेल्याला रात्र भर भिजवलं.सोडा टाकला.मग परत पाण्यात उकळला. तरीहि नाही.
काही नव्या युक्त्या असल्यास सांगा.

राजमा रात्रभर भिजवून, थोड्या जास्त पाण्यात डायरेक्ट कुकरमध्ये (डब्यात नाही) टाकून २ शिट्ट्या झाल्या की मध्यम आचेवर १५ मिनिटे शिजवून मग परत आच वाढवून २ शिट्ट्या करायच्या. मस्त मऊ शिजतो. अगदी गिचका नाही की कडक नाही, हवा तसा होतो छान

माझा राजमा कधीच मऊ शिजत नाही.बाकी छोले वगैरे शिजतात.>>>>>> राजमा बिचारा पटकन शिजतो.जुने कडधान्य असल्यास लवकर शिजत नाही.पुढच्यावेळी राजमा, कुकररमधे शिजवताना १ शिटी घ्या आणि दहा मिनिटे गॅस बारीक करून ठेवा.राजमा शिजतो का पहा.नाहीतर घरी असलेला भिजवून वाटून त्याचे कट्लेट्,भजी,दोसे वगैरे करा.

का हो राजम्याला बोलता.:-)
आमचा बिचारा पटकन शिजतो. आम्ही ना सोडा घालत ना अर्धा तास कुकरला शिजवत.
देवकी + १

Pages