Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय मस्त डिफाईन केलंय
काय मस्त डिफाईन केलंय
मला इतकं चांगलं कधीच ब्रेक अप करता आलं नसतं पाव कापणं.
काय मस्त डिफाईन केलंय >
काय मस्त डिफाईन केलंय > +१
अगदी चित्रदर्शी ( मनाची घाई, इथे तिथे फिरणॅ, पाव गबाळेपणे कापणे वगैरे .. मी माझ्या चुकांसकट चा डेमो सादर केल्यावर दिल्यासारखी अक्क्युरेट) प्रतिक्रिया! राजसी धन्यवाद !
रावी,
रावी,
बटर सुरीने लावण्यापेक्षा, बटर पातळकरून घ्यायचे आणि कुकिंग ब्र्शने सगळी कडे लावायचे. पटकन आणि एकसारखे लावले जाते.
अवन मध्ये पण ठेवून भाजता येतात. पण मी खुप घाई असेल तरच तस करते. तव्यावरची चव जास्त छान येते.
रूम टें बटरमधे पाभा मसाला
रूम टें बटरमधे पाभा मसाला कालवून पावाला लावून छान लागते.
इथेच कुठेतरी वाचलेली युक्ती -
इथेच कुठेतरी वाचलेली युक्ती - पाव भाजून घ्यायचे नेहेमीप्रमाणे. आणि वेळेवर कुकर मध्ये बंद डब्यात घालून (कुकरची शिटी वगैरे नाही करायची; प्रेशर आलं की बास) करायचे. एकगठ्ठा गरम होतात आणि बरेच लोक एकदम असले तरी पुरतात.
अगोदर भाजलीले पाव आयत्यावेळी
अगोदर भाजलेले पाव आयत्यावेळी मावेत गरम करायचे.
पाव टिपिकली चिकटलेले असतात.
पाव टिपिकली चिकटलेले असतात. ते ४ -४ न सोडवता फक्त सुरीने कापून ग्रिडल असेल तर त्यावर किंवा मग तव्याच्या आकारा प्रमाणे एकदम गरम करावे. आधी सगळ्यांना लोणी लावून घेतलं की कितीही माणसं असतील तरी एकदम पटपट होतात.
यात नविन काही नाही. पण पोस्ट टाकल्याचं पुण्य!
मी मोठी पार्टी असेल तर सरळ
मी मोठी पार्टी असेल तर सरळ अव्हन ४०० डि फॅ ला गरम करून घेते आणि एक किंवा दोन ट्रे भरून पाव सर्व बाजूंनी सढळ हस्ते बटर फासून त्यात १५-२० मिनिट गरम करते. मस्त होतात. खूप लोकांना पाभा एकदम सर्व करणे सोप्पे जाते मग.
अगोदर भाजलेले पाव आयत्यावेळी
अगोदर भाजलेले पाव आयत्यावेळी मावेत गरम करायचे.>>>
चिवट होतात ग. करायचेच असतील तर ओल्या कपड्यात गुंडाळुन मग गरम करायचे. विकतच्या चपात्या पण तसच.
सीमाची आयडिया मस्त आहे .
सीमाची आयडिया मस्त आहे .
>> पाव टिपिकली चिकटलेले असतात
>> पाव टिपिकली चिकटलेले असतात.
तुला इकडे असे पाव मिळतात
बर्याच प्रयत्नांनी मी थोडेफार आपल्या टाइपचे पाव घरी बनवायला शिकले. एकावेळी बारा. विकेंडला फार उरक असेल तेव्हा दोन्ही घरचं खायला मिळतं आणि त्यानिमित्तान् फुड प्रोसेसर पण वापरला जातो.
लादी पाव सेफ-वे, लकी,
लादी पाव सेफ-वे, लकी, वॉलमार्टातही मिळतात की!
घरी पाव बनवलेत, पण तो लगदा नेंड करण्यात फार श्रम जातात. फुड प्रोसेसर रेसिपीत न्हवता, सो तो वापरला नाही.
मरो ते लादी पाव ते फार गोडूस
मरो ते लादी पाव ते फार गोडूस असतात.
तुझ्याच पावाच्या रेसिपीत फुपो वापर की. माझी पोरं तर घरचा पाव म्हटलं की तिंबायला पण तयार होतात पण त्यांना फक्त ते सुरूवातीचं पंचिंग आवडतं. अब बनाना पडेंगाजी
मी संपूर्ण 8 पावाची लादी एका
मी संपूर्ण 8 पावाची लादी एका वेळी भाजली, मोठा तवा हवा. 1 चमचा बटर टाकायचं तव्यावर, घाई करून लगेच लादीला उलटी पलटी करून, तवाभर फिरवून बटर लावून घ्यायच मग हवा तस भाजायचा.
सर्व्ह करतानाच शक्यतो पाव भाजा. आधी भाजून पुन्हा वाढताना गरम करणे, डबल उद्योग नकोच. डबल time, डबल मेहनत.
वेळ आणि मेहेनत बघितली की सहा
वेळ आणि मेहेनत बघितली की सहा महिन्यातून एकदा फोटो काढण्यापुरते करतो. बाकी बाहेरचे चालवुन घेतो. गोड मानून ही घ्यायला लागत नाहीत.
वेका, रेसिपी दे!!
वेका, रेसिपी दे!!
http://shitals-kitchen
http://shitals-kitchen.blogspot.com/2014/03/pav-bread.html?m=1
लिंकवर तिने खाली जिथे स्टॅंड मिक्सर लिहिलंय तिथे मी फुप्रो वापरते. तिने लिहिलंय का आठवत नाही. आणखी एक रेसिपी मिसळपाव वर होती पण माझा नीट झाला नव्हता. तिथे कशी शोधली होती ते आठवत नाही.
पाव घरी बनवण्याची कृती बघून,
पाव घरी बनवण्याची कृती बघून, अत्यानंद होऊन ताबडतोब रेसिपी वाचायला गेले आणि ingredients मध्ये मैदा वाचून बाकी पुढे न वाचताच बंद करून टाकलं.
गव्हाची शोधू शकतेस पण तो
गव्हाची शोधू शकतेस पण तो ग्लुटेन (लादी पाव) इफेक्ट मैद्यानेच येतो गॅ
केली होती पा. भा. राजसीच्या
केली होती पा. भा. राजसीच्या सर्व सूचना लक्षात ठेवून आणि सीमा ने सांगितल्याप्रमाणे बटर पातळ करून भरपूर लावून ठेवले होते आधीच. त्यामुळे नेहेमीपेक्षा सफाईदार आणि छान भाजले गेले पाव. परत एकदा धन्यवाद.
पावभाजीचे पाव कापण्याची अजून
पावभाजीचे पाव कापण्याची अजून एक युक्ती म्हणजे, स्वयंपाकाच्या कात्रीने पाव कापणे, अगदी एक सारखे कापले जातात!
पावाला मधे चीर देऊन उघडायचे.
पावाला मधे चीर देऊन उघडायचे. मग कात्रीने कसे कापायचे? त्याचे तुकडे पडतील ना.
नाहि सुरीने कापायच्या ऐवजी
नाहि सुरीने कापायच्या ऐवजी डायरेक्ट कात्रीने कापायचे. माझी वहिनी पण असेच कापते कात्रीने.
कात्रीचं एक पातं सुरीसारखं
कात्रीचं एक पातं सुरीसारखं चालवायचं का. दुसरं पातं हाताला लागू शकतं ना पण.
कात्रीची दोनही पाती सम्पूर्ण
कात्रीची दोनही पाती सम्पूर्ण उघडून पावाचा अंदाजे मध्य गाठून मग पावाच्या मध्यातून कात्रीची पाती फ़िरवुन पाव कापावा!
ह्यापेक्षा सुरीने कापणं सहज
ह्यापेक्षा सुरीने कापणं सहज सोपं नाही का?
येस... कात्रीने थ्री डी पाव
येस... कात्रीने थ्री डी पाव कापणं कठीण आहे! तो मधे चोळामोळा होईल, व मधोमध कापता येणार नाही!
थ्री डी पाव> >>>
थ्री डी पाव> >>>
येस... कात्रीने थ्री डी पाव
येस... कात्रीने थ्री डी पाव कापणं कठीण आहे! तो मधे चोळामोळा होईल, व मधोमध कापता येणार नाही! >>>:) अहो ही क्रिया मराठी मधे कशी लिहायची ते मला अजीबात झेपले नाही हे उघड आहे!! फोटो काढून टाकयला हवा!!
ह्यापेक्षा सुरीने कापणं सहज सोपं नाही का? >>>मला कात्रीनी कापाय्ची सवय झाली आहे म्हणून असेल कदाचीत पण सुरीपेक्षा कात्रीनी खुप चांगले कापले जातात ब्रेड
फोटो काढून टाकयला हवा!! >+१
फोटो काढून टाकयला हवा!! >+१
Pages