Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओके धन्यवाद
ओके धन्यवाद
पुढच्या वेळी राजमा केला की हे सर्व करून बघते
आताच किराण्यात आणलाय.
आमचा बिचारा पटकन शिजतो. आम्ही
आमचा बिचारा पटकन शिजतो. आम्ही ना सोडा घालत ना अर्धा तास कुकरला शिजवत.>>>
भातुकलीच्या खेळातील टोमणा-टोमणी आठवली
राजमा चर्चा
राजमा चर्चा
आम्ही ना सोडा घालत ना अर्धा
आम्ही ना सोडा घालत ना अर्धा तास कुकरला शिजवत.>>> खरंच की! त्याहीपेक्षा आमच्याकडे राजमा शिजवला जात नाही दोन अपवाद वगळता.उर्लेले राजमा मोक्षाची वाट पहात आहे.
अहो इतके सारे एकद म नाही.
अहो इतके सारे एकद म नाही. इडली वडा, उपमा वडा, पोंगल वडा, रसम वडा, बटन इडली वडा अशी सेट काँबो मील्स असतत. बरोबर
फिलर काआआआआपी मस्ट आहे. हैद्राबादेस आबिड ताज मध्ये हे सर्व मिळते, व चेन्नै मध्ये कुठे पण. उपमा दोश्यात भरलेला एम एल ए दोशा पण मिळतो. एक खाल्ला की काम तमाम.
राजमा मी ओव्हर नाइट भिजवून मग चार शिट्ट्या काढते. खूपच दिवसात केला नाही. काश्मिर जम्मू मध्ये बारका मस्त राजमा मिळतो व तिथलाच बासमती चावल आता घेउन येउया आणि एकदा बनवले पाहिजे राजमा चावल.
बटन इडली >> म्हणजे मिनी इडली
बटन इडली >> म्हणजे मिनी इडली का? का अजून वेगळी काही?
ज्वारीच्या भाकऱ्या दुपारच्या
ज्वारीच्या भाकऱ्या दुपारच्या जेवणापर्यत मऊ राहण्यासाठी काही युक्ती आहे का ? ऑफिसात नेईपर्यत त्या कडक होतात .
भाकरी करताना ज्वारीच्या पिठात
भाकरी करताना ज्वारीच्या पिठात थोडीशी कणीक मिसळली तर मऊ होतात आणि राहतात.
तसंच पिठात आधी अगदी कडकडीत पाणी घालायचं भिजवताना, मग हाताला सोसेल इतपत गार झालं की साधं (रूम टेम्प) पाणी लागेल तितकं घालून पीठ मळायचं.
काय सुरेख धागा आहे. सार्थक
काय सुरेख धागा आहे. सार्थक झालं जीवनाचं.
जाई, भाकरी साधारण गरम असतानाच
जाई, भाकरी साधारण गरम असतानाच ओल्या पातळ फडक्यात गुंडाळुन झिपलॉक बॅगेत ठेव. ऑफीसमधे मायक्रोवेव्ह असेल तर त्या ओल्या फडक्यातच किंचीत गरम करुन घे. मी भाकरीवर हा प्रयोग केलेला नाही. पोळीवर केला आहे. छान मऊ होते.
आपल्या त्या ह्यांचा; तो हा
आपल्या त्या ह्यांचा; तो हा लेख वाचा बरं भाकरीकरता...
राजमा / छोले हे अल्युमिनियम
राजमा / छोले हे अल्युमिनियम च्या कुकर मध्ये पटकन शिजतात असं एका मैत्रिणींनी सांगितलं आणि ते खरं आहे. स्टील / फ्यच्युरा मध्ये माझा राजमा आणि छोले अजिबात शिजत नाहीत. त्यामुळे प्रेस्टिज चा छोटु कुकर खास राजमा आणि छोल्या साठी आणला आहे.
ह्याशिवाय अजून एक टीप म्हणजे, राजमा छोले भिजत घालतोच आपण 7/8 तास पण मग त्या 7/8 तासांत दोनदा तरी पाणी चेंज करायचं. म्हणजे म्हणे गॅसेस चा त्रास होत नाही.
स्वाती, शुगोल धन्यवाद . करून
स्वाती, शुगोल धन्यवाद . करून बघते.
योकु , लिंक वाचते
भाकरी करताना ज्वारीच्या पिठात
भाकरी करताना ज्वारीच्या पिठात थोडीशी कणीक मिसळली तर मऊ होतात >>>> पण ग्लुटेन टाळण्यासाठी भाकरी खायची असेल तर ही युक्ती चालणार नाही. मी कधी तरी युट्यूब वर पाहिलं तेव्हा त्या आजींनी तांदूळ पीठ घालायला सांगितलं होतं. आणि गरम पाणी, जे तुम्ही पण सुचवलं आहे.
घरी पिझ्झा बनवण्यासाठी ड्राय
घरी पिझ्झा बनवण्यासाठी ड्राय यीस्ट पहिल्यांदाच वापरलं पण 2 वेळा ट्राय करून सुद्धा यीस्ट ऍक्टिव्ह होत नाहीये.. पॅकेट वरील सूचना वापरूनच सर्व केलं.. काय करू??
यीस्ट ॲक्टिव्ह करण्यासाठी
यीस्ट ॲक्टिव्ह करण्यासाठी कोमट पाणी , छोटा चमचा साखर आणि नमुद केलेलं यीस्ट एकत्र करून दहा मिनिटं ठेवा. मी नेहमी पू्र्ण सॅशे वापरला आहे. पाकिटावरची तारीख चेक करा किंवा ब्रॅंड बदलून पहा.
वेका +१
वेका +१
>>>>> थोडीशी कणीक मिसळली तर
>>>>> थोडीशी कणीक मिसळली तर मऊ होतात>>>>>>> मीरा, दशम्या माहीतेत का तुम्हाला? गव्हाचे पीठ दूध घालून भिजवतात. गरम दूध घालून मस्त मऊ दशम्या होतात. तशी भाकरी करता यावी बहुधा.
नवीन Submitted by वेका on 12
नवीन Submitted by वेका on 12 October, 2019 - 00:08>>>>>> याच पद्धतीने केलं मी ही पण यीस्ट ऍक्टिव्ह होतच नाहीये बहुतेक ब्रँड बदलून पहावा लागेल...
दुकानात (किराणा) मध्ये
दुकानात (किराणा) मध्ये मिळणारं खोक्यातलं ब्लु बर्ड ड्राय यीस्ट जुनं असतं.अश्या वस्तू खपत नसल्याने कोपऱ्यात पडून असतं.व्यवस्थित प्रोफेशनल बेकर कडून किंवा अमेझॉन वरून खसखस सारखं दिसणारं बारीक यीस्ट वापरा.तेही उघडल्यावर वापरून संपवावं लागतं ठराविक वेळात.यीस्ट कोमट पाणी/दूध आणि किंचित साखर यात मिसळून 10 मिनिट झाकून ठेवून फुलवून वापरा.
झटपट आप्पे करायचे आहेत सकाळी.
झटपट आप्पे करायचे आहेत सकाळी. ३५-४० आप्पे करायचे तर रवा आणि दही किती घेऊ? इनो नाही, बेकिंग सोडा आहे फक्त. तो किती घालू? बोगातू, बा चि हि मि आणि को वगैरे यशस्वी कलाकार आहेत.
शंकरपाळ्या करताना त्यात
शंकरपाळ्या करताना त्यात पार्ले जी ची बिस्किटे घातल्यास खूप खुसखुशीत होतात असे वाचले आहे. परंतु प्रमाण माहित नाही. कोणाला माहित असल्यास सांगाल का?
ह्या पद्धतीने शंकरपाळी करून
ह्या पद्धतीने शंकरपाळी करून बघा बरं. अतिशय खुसखुशित शंकरपाळी तयार होईल. मी बाकी काहीही नाही केल तर एवढा पदार्थ हमखास दिवाळीत जमविते.
https://www.maayboli.com/node/30052
कशाला उगाच ते पार्ले बिस्किट वगैरे. पारंपारीक रेसिपीना पारंपारीक पद्धतीने केल्याशिवाय मजा नाही. (हे मा वै म .)
100% गव्हाचं पीठ किंवा फार तर
100% गव्हाचं पीठ किंवा फार तर थोडा रवा घालून शंकरपाळे खुसखुशीत होतात का? मैदा अजिबात नको. रेसिपी हवी आहे.
मी लिहिते हवी असल्यास.
मी लिहिते हवी असल्यास.
चकल्या खुप लवकर संपतात तर
चकल्या खुप लवकर संपतात तर त्या लवकर न संपण्यासाठी काय करावे.
चकलीचा डबा लपवून ठेवावा
चकलीचा डबा लपवून ठेवावा
मीरा, हे घ्याhttps://www
मीरा, हे घ्या
https://www.maayboli.com/node/72061
पावभाजीचे पाव ऐन्वेळी
पावभाजीचे पाव ऐन्वेळी भाजण्याचा वेळ कमी करण्यासाठी, एका वेळी जास्त पाव भाजण्यासाठी, पाव छान भाजले जाण्यासाठी (बटर सगळीकडे व्यवस्थीत लागणे , पावाचे सुरीने सुबक्पणे काप पाडणे, फारसा चुरा न करता खमंग भाजणे या गोष्टी मला येत नाहीत नीट) काही युक्ती असेल तर सांगा प्लीज.
चांगली लांब दात्यांची धारदार
चांगली लांब दात्यांची धारदार सूरी हवी (ब्रेड नाईफ असेल तर उत्तम).
एका वेळेस चार एकमेकांना जोडलेले पाव कापायचे.
कटिंग बोर्ड नाहीतर ओट्याचा आधार घ्यायचा पाव कापताना
पाव धरलेला हात थोडा घट्ट आणि सुरीचा हात सैल हवा
बटर रूम टेम्पलाच हवं
बटर नाईफ नी व्यवस्थित प्रत्येक पावाच्या चारही बाजूने बटर लावून घ्यायचं. आतल्या भागाला जास्त बटर आणि बाहेर नॉमिनल चालेल.
सगळ्या पावांना असे बटर लावून तयार ठेवायचं, ऐन वेळीस भाजयचे, आतली बाजूला आणि खालची बाजू व्यवस्थित भाजायची आणि वरची बाजू नॉमिनल भाजायची.
पाव कापताना मनाची घाई नको
बटर लावायची चोरी करायची नाही
पाव भाजताना उलथन आणि चिमटा दोन्ही हाताशी हवं.
पाव भाजणारी व्यक्ती इथे तिथे फिरायला जायला नको.
Pages