Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहमी घालतो आंब्याच लोणच
नेहमी घालतो आंब्याच लोणच (मसाल्याशिवायच. फक्त मेथी आणि मोहोरी कुटून घालुन क्वीक लोणच घालतो तसलं) तस घाल ना हळदीच लोणच. फ्रीजामध्ये ठेव खरं.
फोडण्याच्या विविध पद्धत्ती>>>
फोडण्याच्या विविध पद्धत्ती>>>> आम खानेसे मतलब!
थॅन्क्स सीमा
थॅन्क्स सीमा
मी तर जुन्या पद्धतीप्रमा णे
मी तर जुन्या पद्धतीप्रमा णे हातानेच आपटून फोडते. एक तर पुणेरी असल्याने इतका फुल नार ळ कधी घेतच नाही. तुकड्यातच काम भागते. मोदक करंज्या करतच नाही. पण सुट्टे मिळवायला घेतला तर आपटून फोडते. त्यासाठी कोयता कशाला घरी ठेवायचा?! त्याने हात कापायचे भ्या वाट् ते. मग दोन भाग झाले कि आधी अर्धी वाटी जे गोड पाणी निघते ते पिउन घेते. मग सुरीने बारीक काप काढते. चटणी साठी आवश्यक ते.
कोरत कोरत आत गेले की एका लेव्ह ल ला काप का ढता येत नाहीत. मग उरलेली करवंटी लाटण्याने तोडून काढते. अर्धे काप नुसतेच खाण्यातच जातात. दूध हवे असले तर डाबरचे मिल्ते ते आणते. चेट्टीनाड करी साठी किंवा मालवणी मसाला घालून प्रॉन करी जबरी होते.
ओल्या हळदीचे लोणचेच करतात पण मला येत नाही. लोणचे हाय सोडिअम कंटेंट म्हणून खात नाही. बनवत नाहीच.
मी कोयती वापरते. नीट दोन भाग
मी कोयती वापरते. नीट दोन भाग होतात. कोयती म्हणजेच कोयता. पाण्याचा वाटा साबा आणि लेक. मग खवणायला घ्यायच्या आधी (साबांचा डोळा चुकवून) दोन्ही वाट्यांच्या बाजूचं खोबरं सुरीने कापून घ्यायचं. त्या दोन बांगडी सदृश कड्यांत मी आणि लेक वाटेकरी. भाजीला खोबरं कमी पडेल अशी साबांना काळजी म्हणून हा उपक्रम त्यांच्या नजरेआड करायचा.
इति श्रीफळ कथा सुफळ संपूर्ण!
यू ट्यूब वर तर गोऱ्या लोकांचे
यू ट्यूब वर तर गोऱ्या लोकांचे पण व्हिडीओस आहेत नारळ कसं काढायचं ह्यावर. ते काय करत असतील ओलं नारळ घेऊन?? >> ओल्या नारळाच्या करंज्या. ते करंजीला एम्पनाडा किंवा टर्नओव्हर म्हणतात. तसंच किटो डायट मध्ये बसतं म्हणून हल्ली बरीच मंडळी कोकोनट मिल्कशेक करून पितात. इतकं सुदृढ नसेल राहायचं तर पिनाकोलाडात घालतात. गोरे - काळे- करडे कुठल्याही रंगाची मंडळी असली तरी काही फरक पडत नाही. एक नारियल पेड से टूटा घडल्यावर सगळे सारखेच!
मी तर हल्ली खवलेला नारळ आणते.
मी तर हल्ली खवलेला नारळ आणते. सासरी उठसुठ सगळ्यात खोबरं घालतात दारात माड असल्याने, तसं नाही घालत त्यामुळे परवडते ते.
सीमंतिनी -माहिती बद्दल
सीमंतिनी -माहिती बद्दल धन्यवाद. माहिती नव्हतं ते लोक्स एवढं काय काय करतात ते.
प्रज्ञा -इति श्रीफळ कथा सुफळ संपूर्ण!:D
कोयती म्हणजेच कोयता. >>> मी
कोयती म्हणजेच कोयता. >>> मी पण कोयती म्हणते पण माझं असं की लहान असली आकाराने तर कोयती म्हणते आणि मोठा असला की कोयता. त्यामुळे काय नक्की म्हणायचं मला कळत नाही.
प्राजक्ता ओल्या हळदीचं
प्राजक्ता ओल्या हळदीचं गुजराती पद्धतीचं लोणचं कर थोड्या प्रमाणात. पंधरा दिवस टिकतं. ही लिंक बघ. आंबा न घालता कर, तेल पण लागत नाही.
https://bhavnaskitchen.com/kacchi-pili-amba-haldi-pickle-chutney--turmer...
मी ओल्या खोबऱ्याची हिरवी
मी ओल्या खोबऱ्याची हिरवी मिर्ची, कोथिंबीर, थोडंसं आलं असं घालून चटणी करते. त्यासाठी खोवलेला नारळ नाही चालणार. ओल्या नारळाचे काप त्यासाठी लागतात.>>>
हे समजल नाही. खोवलेला नारळ जर मिक्सर मध्ये फिरवला तर का नाही चालणार?
मी करते हळदीचं लोणचं, लिंबू
मी करते हळदीचं लोणचं, लिंबू किंवा कैरी कुठचाही तयार लोणचं मसाला घालून! मीठ चवीपुरतंच घालायचं. थोडीशीच फोडणी द्यायची. कायम रेफ्रीजरेटरमधे ठेवायचं. महिनाभर टिकतं.
नारळ सोलून रात्रभर फ्रिझर
नारळ सोलून रात्रभर फ्रिझर मध्ये ठेवला व सकाळी मध्यभागी जाड पट्टीने फोडला तर अखंड सफेद खोबरं मिळतं हा व्हिडिओ नुकताच पाहिले. करवंटीचे खोबरे चमच्याने फार छान निघते. चमचा थोडा जाड हवा नाहीतर वाकून तुटतो.
सीमा - ऑलरेडी खोवलेल खोबरं जर
सीमा - ऑलरेडी खोवलेल खोबरं जर का कोथिंबीर, हिरवी मिर्ची, इ. सोबत वाटलं तर एक तर त्या सगळ्यांची consistency एकसारखी येणार नाही आणि दुसरं म्हणजे त्या खोबऱ्याचं दूध सुटून दुधट चटणी होईल असं वाटत अर्थात मी असं करून बघितलं नाही. पण असं होईल असं वाटत.
ऑलरेडी खोवलेल खोबरं जर का
ऑलरेडी खोवलेल खोबरं जर का कोथिंबीर, हिरवी मिर्ची, इ. सोबत वाटलं तर एक तर त्या सगळ्यांची consistency एकसारखी येणार नाही आणि दुसरं म्हणजे त्या खोबऱ्याचं दूध सुटून दुधट चटणी होईल असं वाटत अर्थात मी असं करून बघितलं नाही. पण असं होईल असं वाटत. >> असं काही अजिबात होत नाही. माझ्या घरी सर्व प्रकारच्या वाटणाला खोवलेलं खोबरंच वापरतात. रगड्यावर, पाट्यावर, मिक्सरमधे कसंही वाटलं तरी नीट मिळून येते चटणी. फ्रोझन खोबरं असेल तर ते नीट थॉ करुन घ्यावं लागतं एवढंच.
खोबर्याचे काप हे फक्त आमटीत , काही गोड पदार्थांमधे, किंवा सुक्या खोबर्याचे काप चिवड्यामधे वापरतात.
नारळ उभा धरुन गोल फिरवला तर त्यावर तीन जॉइण्ट्स असल्यासारख्या रेघा दिसतात. नॉन डॉमिनंट हातात नारळ धरुन त्या एकेक लाइनवर , लाइनला पर्पेंडिक्युलर अँगलमधे , डॉमिनंट हाताने कोयत्याचा एकेक फटका द्यायचा. थोडी सवय झाली की तीन फटक्यात नारळ फुटतो व्यवस्थित .
खोबऱ्याचं दूध सुटून दुधट
खोबऱ्याचं दूध सुटून दुधट चटणी1.........अ जिबा त तशी होत नाही.पाणी घालताना कमी घालायचे.
सीमा - ऑलरेडी खोवलेल खोबरं जर
सीमा - ऑलरेडी खोवलेल खोबरं जर का कोथिंबीर, हिरवी मिर्ची, इ. सोबत वाटलं तर एक तर त्या सगळ्यांची consistency एकसारखी येणार नाही आणि दुसरं म्हणजे त्या खोबऱ्याचं दूध सुटून दुधट चटणी होईल असं वाटत अर्थात मी असं करून बघितलं नाही. पण असं होईल असं वाटत.>>>>
अज्जिब्बतच तस होत नाही. हे वाचल्यावर वाटल कि उगाचच आपण सगळे चर्चा करत बसलो आहोत कारण इशु नाहीच आहे. LOL .
मी नेहमीच खोवलेला नारळ वापरुन चटणी करते. फ्रोजन असेल तर डिफ्रॉस्ट करून घेते. सगळ एकत्र करून (अगदी जीरे सुद्धा) फिरवून घ्या. थोड दही घालुन मग पाहिजे तेवढ पाणि घातली कि सुरेख चटणी तयार होते.
मी पण फ्रोजन खोवलेलं खोबरं
मी पण फ्रोजन खोवलेलं खोबरं वापरुन चटणी करते. अगदी हवी त्या कन्सिसट्न्सीची चटणी करता येते.
रादर, तुकड्यांच्या चटणीपेक्षा
रादर, तुकड्यांच्या चटणीपेक्षा खोवलेल्या खोबऱ्याची / नारळाची चटणी जास्त टेस्टी लागते. कदाचित तुम्ही लिहिलं तसं नारळाचं दूध मिसळून चटणी जास्त टेस्टी होत असेल. मला texture पण खोवलेल्या नारळाच्या चटणीचं जास्त आवडतं
नारळ उभा धरुन गोल फिरवला तर
नारळ उभा धरुन गोल फिरवला तर त्यावर तीन जॉइण्ट्स असल्यासारख्या रेघा दिसतात. नॉन डॉमिनंट हातात नारळ धरुन त्या एकेक लाइनवर , लाइनला पर्पेंडिक्युलर अँगलमधे , डॉमिनंट हाताने कोयत्याचा एकेक फटका द्यायचा. थोडी सवय झाली की तीन फटक्यात नारळ फुटतो व्यवस्थित. >> बापरे, नारळ फोडायला इतकं इंस्ट्रक्शन! मारूती मंदिराच्या पुजार्याला विचारलं तर म्हणेल "ताई, कडप्प्याचा कड बघा आणि हाणा.." झालं इंस्ट्रक्शन..
छान डिटेल लिहीलं आहे आवडलं.
धमाल चर्चा!
धमाल चर्चा!
texture पण खोवलेल्या
texture पण खोवलेल्या नारळाच्या चटणीचं जास्त आवडतं Happy>> हो. पाट्यावर बारके काप मिरची कोथिंबीर जिरे लसूण घालून थोडंस पाणी घालून वाटले तर मस्त यम्मी टेस्ट येते. काप जरा जास्त जाड झाले ना तर मिक्स र मध्ये पूर्ण वाटले जात नाहीत. एखादा तुकडा राहतो तो तसा तोंडा त आला तर काही ना आव्डत नाही. माझ्या साबा बोलून दाखवत . असे राहिले तर.
कडप्प्याचा कड बघा आणि हाणा..
कडप्प्याचा कड बघा आणि हाणा.. > नको नको. त्याने कडप्पा तडकू शकतो.
नको नको. त्याने कडप्पा तडकू
नको नको. त्याने कडप्पा तडकू शकतो. >>>> हो हो अगदी. एकदा हॅमर पटकन सापडला नाही म्हणून टेरेसच्या कट्ट्याची कड वापरली तर टाईलचा मोठा तुकडा उडाला आणि नारळ मजबूत तसाच. डिझाइनर टाईल असल्यामुळे परत तशी मिळाली नाही आणि सगळ्यांकडून टोमणे ऐकावे लागतात. नारळ फोडण 'माझं काय चुकलं' मध्ये जाऊ नये म्हणून माझा फुकट सल्ला, नारळ हॅमर किँवा कोयट्यानेच फोडा
मीरा
मीरा
डोळ्यासमोर उभं राहिले सर्व. नारळ सेफ राहून हसतोय जणू.
(No subject)
कडप्पा/ग्रॅनाईट चालले फक्त
कडप्पा/ग्रॅनाईट चालले फक्त त्याची कडा नको. Direct surface वर फोडला तर फुटतो. इटालियन marble/ marbonite असेल तर टाईल फुटते.
खवलेला नारळाच्या चटणीचा रंग,
खवलेला नारळाच्या चटणीचा रंग, तुकडा खोबऱ्याच्या चटणीपेक्षा कितीतरी सुरेख येतो.
ती खवलेल्या नार ळाची
ती खवलेल्या नार ळाची घट्ट्सर च ट्णी साध्या पांढ र्या लोण्यात मिसळून सँम्डविच केलेले फार भारी लागते. कडा काढायच्या मात्र ब्रेडच्या.
नारळ फोडण्यावर एवढी चर्चा
नारळ फोडण्यावर एवढी चर्चा
Pages