Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन Submitted by वेका on 14
नवीन Submitted by वेका on 14 June, 2019 - 21:06
<<
आपल्या चरणकमलांचा फोटो इथेपोस्त करा. रोज पूजा करून तीर्थप्रसादग्रहण करीण म्हनतो.
>>
हे सगळं झाल्यावर उपरती म्हणून मी त्या “त्यांच्या” पद्धतीच्या चटणीची रेसिपी विचारली ती ऐकल्यावर म्हटलं आधी माहित असतं तर चटणी अटेम्प्टच केली नसती.
<<
रोज थोडं थोडं भाजी आमटीत
वेका रोज थोडं थोडं भाजी आमटीत घालता येईल ते.
आरारा
आरारा
आभार वरच्या उपायांसाठी. ते ढकलणे प्रकार तर करीनच पण स्प्रेड्स इंटरेस्टिंग वाटतंय.
पण स्प्रेड्स इंटरेस्टिंग
पण स्प्रेड्स इंटरेस्टिंग वाटतंय. >>> हो.
असू द्या हो घरी, नको असलेले
असू द्या हो घरी, नको असलेले पाहुणे आले की त्यांच्या भाजीत मिसळा.
मी कधी कधी एक डीप करते ते
मी कधी कधी एक डीप करते ते असं आहे :
मेयोनेस आणि घट्ट दही समप्रमाणात(१:१), त्यात ४-५ लसूण किसून आणि अर्धा किंवा १ चमचा मिक्स हर्ब्स ,आणि थोडं मीठ हे ब्रेड ला लावून खाता येतं ..
तुम्ही तुमची लसूण चटणी चव घेत घेत थोडी थोडी मिसळा .. पण तुमच्या चटणी त खोबरं आणि शेंगदाणे आहेत सो चवीत थोडा फरक जाणवेल ..
अर्रर्र लाल मिरच्या पण आहेत होय .. ! अहो मग अजून शेंगदाणे आणखी सुकं खोबरं घालून लसणीचं तिखट करतो तसं होईल ना ? शेंगदाणे घातलेले असले तरी फरक नाही पडणार .. खोबरं सेपरेट भाजून मिक्सर मधून काढा आणि तिखट चटणी थोडी थोडी मिसळा ..
शिवाय भरली वांगी ,भरली भेंडी यांच्या मसाल्यात घालून संपवता येईल ..
युट्युबवर पाहून अळूच्या वड्या
युट्युबवर पाहून अळूच्या वड्या केल्या. पहिल्यांदाच केल्या तरीही सांगितलेलं पिठाच प्रमाण जास्त वाटलं. पण मग उगीच शेवटी थोडक्यासाठी कमी नको, म्हणून व्हिडीओमध्ये सांगितलं तेवढं घेतलं. ते भिजवल्यावर जास्त झालं शिवाय एक पान फटल्यामुळे सोडून द्यायला लागलं. तर या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा की बेसनाचे बॅटर बऱ्यापैकी उरलं आहे. त्यात चिंच गूळ असल्याने पकोडे करू शकत नाही किंवा पिठलं पण नाही. थालीपीठ तर आंबट गोड कल्पनाच करवत नाही.
आता प्लिज तुमच्याकडून आयडियाज येऊ द्यात. दोनेक वाट्या बॅटर आहे. टाकून द्यायला नको वाटेल.
थालीपीठ तर आंबट गोड कल्पनाच
थालीपीठ तर आंबट गोड कल्पनाच करवत नाही. >>>> कांदा ,तिखट/हि.मि. ,कोथिंबीर घालून पोळे करा किंवा थालीपीठ करा.वाटल्यास अजून ज्वारी/तांदूळ/जे असेल ते पीठ घाला.पोळे/धिरडी जास्त मस्त लागतील.
या दोन रेसिपीजमध्ये बेसन+
या दोन रेसिपीजमध्ये बेसन+ चिंच+ गूळ एकत्र आहे.
सिंधी करी
गोळ्याची आमटी
पहिलीत तिन्ही जिन्नस एकत्र झालेले असल्याने ती चालावी.
अळुची पानं विकत आणा.
अळुची पानं विकत आणा.
कोथिंबीर घालून कोथिंबीर वड्या
कोथिंबीर घालून कोथिंबीर वड्या करता येतील. नेहमीच्या रेसीपीने.
देवकी, आभारी आहे.
देवकी, आभारी आहे.
भरत, बऱ्याच दिवसांनी दिसलात. आज लंचला सिंधी करी करणार आहे.
सस्मित, वड्या करून उरलेलं बॅटर आहे ग. आता लगेच परत वड्या नको.
अमा, हा पर्याय आवडला, पण सध्या पुण्यात कोथिंबीर 35-40₹ आहे. आम्हाला 10₹ पेक्षा जास्त द्यायची सवय नाही, त्यामुळे महाग वाटते आहे.
मीरा, पत्ता देउ का?
मीरा, पत्ता देउ का?
सिरीयसली सांगायचं तर चिंच गुळ असलेलं बॅटर जास्त वेळ ठेउ नये असं मला वाटतंय.
जुनं नाही फार. काल संध्याकाळी
जुनं नाही फार. काल संध्याकाळी वड्या केल्या होत्या.
पुण्याला आल्यावर स्वागत आहे
(No subject)
Eno takun dhokla!
Eno takun dhokla!
इनो टाकू न ढोक ळा हे बेस्ट .
इनो टाकू न ढोक ळा हे बेस्ट . त्यात पालक वगैरे चिरून घालून किंवा गाजर मटार घालून डब्बारोटी पण करता येइल आधी तीळ घालून फोडणी करायची व त्यावर बॅट र टाकून मंद गॅस वर भाजायचे पंधरा मिनिटे. थोडा रवा पण घालता येइल हांडवो व्हेरिएशन.
राजसी, आभारी आहे.
राजसी, आभारी आहे.
अमा, तुमची डबल रोटीवाली रेसिपी फार आवडली. हे एकदा नक्की करून पाहीन.
भरत यांनी दिलेली सिंधी करीची रेसिपी अतिशय भारी होती. बदाबदा पाऊस पडत असताना, बरोबर पोळी किंवा भात न घेतासुद्धा नुसती गरमागरम करी फार यमी लागली. मी 2 बोअल्स भरून नुसती करी खाल्ली. एकदम पोटभरीची न्यूट्रिशिअस आणि टेस्टी होती.
परवा चीझकेक साठी whipping
परवा चीझकेक साठी whipping cream आणलं. अर्धापेक्षा जास्त उरलयं . Carton परत staple करून ठेवले आहे. टिकेल का fridge मध्ये ?किती दिवस ?
फ्रीझरमध्ये ठेवा. तीन
फ्रीझरमध्ये ठेवा. तीन महिन्याची मुदत असते बहुदा वापरायला. साध्या फ्रीजमध्ये खराब होतं.
आता सीझन बदलला आहे परंतु
आता सीझन बदलला आहे परंतु व्हिप क्रीम, दोन चमचे साखर व व्हॅनिला, हे बेसिक मिक्ष व त्यात आव्डती फळे/ आमरस घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे व फ्रीज करायचे. सोपे घरगुती डेझर्ट होते. आता विंबल्डनचा मौसम आहे तर ताज्या स्ट्रॉबेरी कापून वरून व्हिप क्रीम व पिठी साखर घालून खाता येइल. बटर चिकन केल्यास वरून ग्रेव्हीत घालता येइल. आलू पालक पनीर पालक रेसीपीत पण वरून घालता येइल एकदम टेस्टी लागते.
वरील साध्या आइसक्रीम वा हर्शेज चॉकोलेट सिरप घालायचे किंवा नटेला.
फ्रूट सलाड मध्ये घालतात व्हिप क्रीम किंवा गरम कॉफीच्या वर. स्टारबक्स इस्टाइल.
अमा, परत एकदा मस्त पोस्ट.
अमा, परत एकदा मस्त पोस्ट. भरपूर रेसिपीज सांगितल्या आहेत आणि सगळ्या आवडल्या आहेत. मी पालक पनीर साठी छोटासा टेट्रा पॅक आणायला सांगितला होता पण ड्रायव्हरने अमूलचा 1 लिटरचा भला मोठा डब्बा आणला. मी घरी येईपर्यंत घरच्या उत्साही लोकांनी उघडून थिक कोल्ड कॉफी केली. उरलेला बॉक्स अनेक वेळा कोल्ड कॉफी करून संपवणार होते, पण तुमची सजेशन्स भारी आहेत. सुरुवात उद्या सकाळी ब्रेकफास्ट मध्ये, होम मेड फ्रुट डेझर्टने करेन
अमा धन्यवाद.
अमा धन्यवाद.
चंपा , तुम्ही सुचवल्याप्रमाणे , रवानगी केली freezerमध्ये. Thank you
आता विंबल्डनचा मौसम आहे तर
आता विंबल्डनचा मौसम आहे तर ताज्या स्ट्रॉबेरी कापून वरून व्हिप क्रीम व पिठी साखर घालून खाता येइल. >>
अजून एक म्हणजे आपले मेयॉनीज
अजून एक म्हणजे आपले मेयॉनीज असते त्यात मीठ मिरेपूड एक चम चा केचप, दोन चमचे व्हिप्ड क्रीम, बारीक चिरलेली कांदापात व एक ठेचलेली लसूण पाकळी घालायची. एक वाटी मेयॉनीजचे प्रमाण आहे. त्यात चिकनचे बारके उकडलेले तुकडे घालायचे. किंवा दोन उकडलेल्या अंड्यांचे व्हाइटचे तुकडे व एक मध्यम बटाटा उकडून त्याचे तुक डे घालायचे अशी दोन सलाड करून फ्रिज मध्ये ठेवायचे. भूक लागली की दोन ब्रेड मध्ये घालून खावयाचे.
अळूवडी बेटर मध्ये चिंच गुल न
अळूवडी बेटर मध्ये चिंच गुल न घातले तरी चालते ना
अळूवडी बेटर मध्ये .चिंच गुल न
अळूवडी बेटर मध्ये .चिंच गुल न घातले तरी चालते ना>>>> अळूवडी बेटर होण्यासाठी घालावे
अळूवडी बेटर मध्ये चिंच गुल न
अळूवडी बेटर मध्ये चिंच गुल न घातले तरी चालते ना>>>
अळू किंचित खाजरा असतो. खाल्ल्यानंतर घशाला खाजू शकतो. तसे होऊ नये म्हणून चिंच (खरे तर कोणतातरी आंबट पदार्थ) घालतात.
पण अळूवडीत भरपूर तेल घालून
पण अळूवडीत भरपूर तेल घालून खरपूस परततात , त्यात ते क्रिस्टल मोडतात
सस्मित
सस्मित
Pages