युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक भरीस भर म्हणून प्रकार - बटाट्याच्या चकत्या करून तव्यावर तेल किंवा तुपावर भाजून घ्यायच्या. वर तिखटमीठ भुरभुरायचं आणि गट्टम्

>>किस येईल करता. ते तसं बिनडोक काम आहे . >> हे जरा लोडेड झालं आहे पण बरोबरच आहे एका अर्थी Proud (दिवे घ्या)

Biggrin

बटाटा स्मॅश करायचा, त्यात थोडे तांदळाचे पीठ घालायचे, थोडे जिरे, ओवा , मिरपूड , मीठ अन थोडे मोहन घालून घट्ट मळून घेऊन त्याच्या चकल्या करायच्या, मस्त होतात, एकदम यम्मी

दुसरा प्रकार अजून कमी त्रासाचा म्हणजे, बटाटे थोडे पाणी घालून स्मॅश करायचे, दुसऱ्या एका भांड्यात पातळ साबुदाणा खीर (साखरे ऐवजी मीठ घालायचे) करायची. खीर थोडी गार झाली की त्यात बटाटे मिक्स करून थोडे मंद आचेवर ढवळून घ्यायचे. अन मग ह्याचे सांडगे टाकायचे

शिजवलेले बटाटे फ्रीजला सुद्धा ३ दिवसापेक्षा नाही टिकणार. बटाट्याच्या पुर्‍या (आपण कणकेच्या तिखट मिठाच्या पुर्‍या करतो तसच. फक्त निम्मा बटाटा आणि निम्म पीठ घ्या. ) केल्यात तर आठवडाभर टिकतील.
पराठे करून ते फ्रीजर मध्ये ठेवता येतील. दोन पराठ्या मध्ये फ्रीजर पेपर घाला म्हणजे चिकटुन बसणार नाहीत.

तुम्हाला हव्यात का?
भारतात कुठल्या भाज्या शिळ्या करून खायला परवानगी आहे? आणि अमेरिकेत काय फ्रीज मध्ये ठेवून खावं?

बटाट्याच्या चकत्या करून>> हो फ्रेंच फ़्राईस करावेत असा विचार आहे .
सायो Lol

@vb बटाटा स्मॅश करायचा, त्यात थोडे तांदळाचे पीठ घालायचे, थोडे जिरे, ओवा , मिरपूड , मीठ अन थोडे मोहन घालून घट्ट मळून घेऊन त्याच्या चकल्या करायच्या, मस्त होतात>> आणि मग ? त्या वळवायच्या ना ?आणि मग तळून खायच्या ना ? कि ओल्याच तळायच्या ?

शिजवलेले बटाटे फ्रीजला सुद्धा ३ दिवसापेक्षा नाही टिकणार. >> Sad झाले म ३ दिवस आधीच. फ्रिझर ला ठेवलेत .. उघडून बघायचं धाडस झालेलं नाही . वर्स्ट केस सिनॅरिओ ची मनाची तयारी करून ठेवली आहे .
बटाट्याच्या पुर्‍या >> पुऱ्या करून फ्रिझर ला टाकायचा उपाय चांगला वाटतोय. पण दुर्दैवाने मला गुरुवार संध्याकाळ शिवाय वेळ मिळणार नाहीये . रोज घरी जायला उशीर होतो ..
दोन पराठ्या मध्ये फ्रीजर पेपर घाला म्हणजे चिकटुन बसणार नाहीत.>> हमम ..बरं झालं आठवण केलीत .

@ भरत कसे आहेत बटाटे?>> कसे म्हणजे ? शिजवलेले आणि सालं काढलेले अख्खे . एका मोठ्या इव्हेंट साठी खूप बटाटेवडे करायचे होते . त्यासाठी उकडलेले . त्यातले उरले .

@ अमितव तुमचा प्रतिसाद कळला नाही . मी अमेरिकेत नाही .

सगळ्यांना धन्यवाद _/\_ भरपूर आयडिया मिळाल्या .. माझ्याकडून झालं पाहिजे Proud

@vb बटाटा स्मॅश करायचा, त्यात थोडे तांदळाचे पीठ घालायचे, थोडे जिरे, ओवा , मिरपूड , मीठ अन थोडे मोहन घालून घट्ट मळून घेऊन त्याच्या चकल्या करायच्या, मस्त होतात>> आणि मग ? त्या वळवायच्या ना ?आणि मग तळून खायच्या ना ? कि ओल्याच तळायच्या ? >>> ओल्याच तळायच्या, मी हे बरेचदा करते मुड झाला की, छान कुरकुरीत होतात
अन हो हवे असेल तर ओली मिरची पेस्ट घालु शकता त्यात

मला भारतात पाठवून दे अंजली.कंपोस्ट ला होतील ☺️☺️☺️
बाकी सूचना अमलात आणल्या असतील तर ते संपले असतील.अजून आणल्या नसतील तर खराब झाले असतील.
यांचा कुंडीत माती भरताना 1 इंच माती भरून मधला लेयर म्हणून पण वापर करता येईल.माती कमी भरावी लागेल.

@vb >> ओके . धन्यवाद . बघते आता जमतंय का , आणि काय काय जमतंय .
मला भारतात पाठवून दे अंजली.कंपोस्ट ला होतील >> मला आवडले असते ग.. अगदी सग्गळे घेऊन जा .
बाकी सूचना अमलात आणल्या असतील तर ते संपले असतील.>> छे ! अजून वेळ आहे . आज तरी नक्कीच जमणार नाहीये .. फार फार तर उद्या पाव भाजी
अजून आणल्या नसतील तर खराब झाले असतील.. Sad नको नाsss असं व्हायला नकोय . लग्गेच फ्रिझर ला टाकलेत .
यांचा कुंडीत माती भरताना 1 इंच माती भरून मधला लेयर म्हणून पण वापर करता येईल>> नंतर वास नाही ना येणार ?कारण कुजणार ते आतमध्ये ना ?

माझ्याकडून बटाट्याचे अपडेट्स : सर्व बटाटे चांगले राहिले होते . त्यांची पावभाजी आणि टिक्क्या(रगडा पॅटिस साठी ) केल्या .
बटाट्याचे दगड ५ तास बाहेर ठेवूनही दगडच राहिले होते. आतमधल्या पाण्याचाही बर्फ झाल्यामुळे असावं कदाचित !! ते एकमेकांपासून सोडवणे हेच एक काम झाले . सोडवून थॉ केल्यावर ते फारच मऊ मऊ लुसलुशीत झाले .. त्यामुळे ते किसता येणार नव्हते Sad म्हणून मग पाव भाजी आणि टिक्या करायचं ठरवलं . आणि नुसता बटाटा थोडा पाणचट लागत होता म्हणून काहीतरी खणखणीत मसालेदार करण्याची गरज पडली ... अजून थोडे (८ - १० असतील )उरलेत (इथे मला मार मिळेल आता बहुतेक Sad )
तर मूळ मुद्दा असा कि ८ दिवसांपेक्षा जास्त दिवस शिजवून सालं काढलेले बटाटे फ्रिझर ला व्यवस्थित टिकले ..
तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद!!

बाबो काय पेशन्स अंजली.
बटाटे चांगले सांभाळलेस आणि वापरलेस पण.
उरलेल्याचे आलू पराठे होतील चांगले.

बाबो काय पेशन्स अंजली.>> न ठेऊन काय करणार .. एवढे टाकायचे खरंच जीवावर आलेलं .. खराब झाले असते तर गोष्ट वेगळी
उरलेल्याचे आलू पराठे होतील चांगले>> हां ss गुड आयडिया !!

एकदा फ्रिजर मधुन काढुन थॉ करुन परत फ्रिजरला टाकले असतील तर वापरु नका मात्र>> नाही नाही .. जे वापरणार होते तेवढेच थॉ केलेले

मॅश्ड अन स्मॅश्ड यात फरक आहे हो>>>>> तरीही लोक स्मॅश केले असेच म्हणतात. आणी सांगीतले काय हे वेडे अशा नजरेने बघतात.

नक्की काय फरक आहे?
मॅश म्हणजे प्रेमाने कुस्करून मळून गोळा करणे आणि स्मॅश म्हणजे शत्रूवर चाल केल्यासारखे आवेशाने चिरडणे का?
मॅश ला स्मॅश म्हणणं बरेच जण करतात.जसं लहानपणी सबट्रॅ क्ट ला सबस्ट्रॅक्ट म्हणतात तसे.

What is the difference between mashed potatoes and smashed potatoes?
Smashed potatoes are generally prepared with the skins on, creating a bit more chunkiness to the finished dish. Another distinct difference between smashed and mashed is the way in which the potatoes are broken up. The majority of recipes advise hand mashing with either a fork or handheld masher.

स्मॅश = जाड भरड कुस्करलेले. सालासह.
मॅश = सूप स्ट्रेनरमधून काढलेले मुलायम बारीक केलेले.

ओम गूगलाय नमः

पुण्यात कोणी/कुठे ताजा आमरस आपल्यासमोर काढून व्हॅक्यूम सील करून देतात का?
न्यू जर्सीत कझिन राहते ती सांगत होती की तिच्या मैत्रिणीचे आई-बाबा अहमदाबाधून आले त्यांनी १५ किलो आमरस व्हॅक्यूम बॅग मध्ये पॅक करून आणला. तो डीप फ्रीजर मध्ये टाकला. प्रवासाला निघताना इंसुलेटेड बॅग्ज मध्ये घालून इथे आणला. अगदी घरी येइतो मस्त दगड राहिला होता.

आई बाबा इथे येत आहेत आणी अनायासे सध्या आंब्याचा सिझन जोरात आहे तर त्यांना पण हा उद्योग करून माझ्यासाठी १-२ किलो आमरस आणता आला तर बघा असं सांगणार होते.

तर पुण्यात असं व्हॅक्यूम सील कुठे करून मिळेल आणि इंसुलेटेड बॅग्ज कुठे मिळतील ते कोणाला माहित असेल तर सांगाल का?

हा प्रश्न कोणत्या धाग्यावर विचारायचं ते मला समजत नाही. इथे योग्य नसेल तर कुठे हलवू ?

Pages