युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद आ.रा.रा. पण आता विषय निघालाच आहे तर मग, रोज वापरायायला टाटा सॉल्ट, सलाड/सँडविच वर घालायला हिमालयन किंवा तत्सम खडे मीठ पक्षी रॉक /शेंदे सॉल्ट (हे गुलाबीसर खडे असतात आणि चव पण थोडी मिरमिरीत असते) आणि पोटात गॅस वगैरे असेल तर काला नमक / पादेलोण असं आहे का? अलीकडे मिरे आणि मिठाचे ग्राइंडर मिळतात त्यात बहुतेक गुलबट रॉक सॉल्ट असतं. प्लीज माहिती द्या.

बरेचदा लोणच जुन झाल असेल्/संपत नसेल (विकतच लोणच असेल तर ट्राय करण्यासाठी आणल जात आणि संपत नाही आवडल नाही तर) ही युक्ती :

डब्यात भाजीच्या तेलात किंवा लोणच्याच्या तेलात भिजलेली चपाती अत्यंत भारी लागते. गव्हाच्या पीठात , उरलेल जुन लोणच (मऊ झालेल) तेलासह घालायचे . हवा असेल तर एक चमचा रवा. आणि घट्ट पीठ मळुन घ्यायचे. त्याचे जाडसर पराठे लाटुन तुप लावून भाजुन घ्यायचे . कुणाल कपुरन दाखविली आहे ही रेसीपी. करून बघितली आणि आवडली.

. कुणाल कपुरन दाखविली आहे ही रेसीपी. करून बघितली आणि आवडली. >>>>. हो, मी आजच पाहिली फेसबुकवर. मस्त आहे एकदम. कोकणातून आणलेलं कैरी लोणचं खूप बंडल निघालं, कोणालाच आवडलं नसल्याने संपलं नसतं, तेवढयात हा व्हिडीओ पाहिला मिळाला. आता दोन दिवसात लोणचं सम्पणार.

डाळ ढोकळी ( वरण फळं ) करताना पोळीच्या पीठात पण लोणच्याचा खार घालण्याची पद्धत आहे . मस्त चव येते त्या तुकड्यांना आणि तो स्वाद डाळीत पण उतरतो छान.

माझ्याकडं आल्याचं लोणचं आहे. आवडलं नाही कोणाला. काही करता येईल का त्याचं? आक्खी बरणी टाकून देणं बरं नाही वाटत :-प

ट्युलिप
घाला गव्हाच्या पीठात , आणि संपवा ते. Happy

लोणचं + घट्ट दही + बारीक चिरलेला कांदा ( +लागल्यास थोडं मीठ) असं मिसळून इडली किंवा डोशाबरोबर खातात माझ्या सासरी. थोडंसं आल्याचं लोणचं घालून ट्राय करु शकता .

इथे US मध्ये वांग्यात काळ्या बिया असतात का? सुरुवातीला ३-४ दा असंच झालं. मग वांगी आणणे बंद केलेलं, आत्ता परवा परत आणून पहिली तर तेच सगळ्या काळ्या बिया. हि नॉर्मल वांगी असतात का ?
अजून एक मेथीमध्ये एवढी रेती का असते ? मेथी आणणे बंद नाही केले कधी हे असंच आपली उत्सुकता म्हणून प्रश्न.

इंग्रो मध्येही कधी तरी चांगली मिळू शकतात. काटेरी देठं असलेली , आकाराच्या मानाने वजनाला हलकी वांगी त्यातल्या त्यात बरी निघतात असा अनुभव आहे.

काळ्या बिया असलेली वांगी खराब असतात की कसं ते माहित नाही पण चवीला मात्र फार बेकार लागतात. अ‍ॅस्थेटिकली ही प्लीजींग वाटत नाहीत!

ती वांग्याची एक जात आहे. आसाममध्ये अशीच वांगी मिळायची. भरपूर काळ्या बिया आणि साल शिजत नाही अजिबातच. Sad बेचव असतात.
सशलला अनुमोदन.

कालच आईने केलेल्या चकल्या संध्याकाळी मऊ पडल्या.
मावे मध्ये किंवा अजून कुठल्या प्रकारे कुरकुरीत करता येतील का?

ओके धन्यवाद, करून बघतो.
-----------------
झाल्या कुरकुरीत. आमच्या मावेत ग्रील ऑप्शन आहे तो वापरला. आधी अजून मऊ पडल्या पण नंतर कडक व्हायला लागल्या, मग बाहेर काढून ठेवल्या आणि अर्ध्या तासात छान कुरकुरीत झाल्या. धन्यवाद sonalisl

आज हौसेहौसेने साबुदाणा खिचडी केली, पण नेहमी करत नसल्याने प्रमाण चुकलं आणि ढीगभर बनवून ठेवली. झाली आहे खूप टेस्टी, पण किती खाणार? त्यात उपास ही नव्हता त्यामुळे बाकी जेवण होतंच. एक दिवसाचा शौक संपला आणि एकदा फ्रीजमध्ये गेली की मूळ चव पण गेली त्यामुळे उद्या नक्कीच खाल्ली जाणार नाही.

तर मला एखादी अशी युक्ती सांगा की उरलेली खिचडी लोक खातील पण आणि त्यांना ती आवडेल पण. काही तरी वेगळंच, चविष्ट असं.

spread the khichadi on a plastic sheet. let it dry completely in hot sun for a week . then deep fry as required. chiwda saarkhe hote. or add to.upas bhajni and make thalipeeth

बटाटा उकडून खिचडीत मिक्स करून घ्या. थोडी मिरची,मीठ,साखर इत्यादी. कापडावर्/कागदावर थापून थालीपीठ भाजून घ्या. लग्गेच संपेल खिचडी.

माझी आई खिचडी उरली तर पंख्याखाली मोठ्या ताटात पसरवून वाळवायची आणि मग कढईत नुसती परतायची, मस्त चिवडा व्ह्यायचा कुरकुरीत. तळायला वगैरे काही लागायचं नाही. हे लगेच दुसऱ्या दिवशी करायची.

सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे आभार. एक mashed potato आणि दोन चमचे उपासाची भाजणी घालून एक थालीपीठ आणि त्याच पिठाचे थोडेसे वडे केले. दोन्ही यशस्वी झालेच शिवाय खिचडी आणि उपासाची भाजणी संपली ( जी आणलीच होती मूठभर आणि त्यातलीही उरली होती चिमूटभर. ती डब्यात पडून राहून एक दिवस टाकावी लागली असती)

मीरा, इथे काही युक्त्या मिळतात का ते पहा.>>> Lol भारी आहे लेख. वाचल्यावर हुश्श झालं की एवढा तरी अंदाज चुकला नाही.

एक mashed potato आणि दोन चमचे उपासाची भाजणी घालून एक थालीपीठ आणि त्याच पिठाचे थोडेसे वडे केले. दोन्ही यशस्वी झालेच शिवाय खिचडी आणि उपासाची भाजणी संपली >>> मस्त मस्त.

Grapes potato sabji असा search केला तर बऱ्याच रेसिपी येतात, बघा त्यातली कोणती योग्य आहे का!

कुर्गहून आणण्यात आलेली filter coffee भेट म्हणून मिळालीय.
मला स्वतःला filter coffee फार आवडते.
पण कडक coffee बनवण्याची हमखास युक्ती कोणी सांगेल का?
मी दोनदा प्रयत्न केला , फारच पाणचट बनली.
पाणी-पावडर च प्रमाण चुकतयं का ???

Pages