युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी एस,खरंच इडली,ढोकळा चांगला होईल या पिठाचा.इडलीकरिता, सीमा म्हणाली तसे पोहे घाला.
रच्याकने हे पीठ तयार करताना डाळ,तांदूळ धुवून वाळवून दळले होते का?

सॉरी. मी चुकून उडदाची डाळ 1 कि लिहीली. ती 1/2च कि. होती. इडली साठी च दळून आणलं होतं. पण पहिल्यांदा भिजवलं. तेव्हा ते फुगलंच नाही. पावसामुळे थंड वातावरण होतं. कदाचित जास्त वेळ आंबवायला हवं होतं. म्हणून मग डोसे करायचं ठरवलं. आतापर्यंत मी डाळ तांदूळ भिजवून अनेक वेळा इडली आणि डोसे केलेत पण कधीच बिघडले नाहीत. पिठ दळून पहिल्यांदाच केले. पण कळेचना काय चुकलं असावं? पोहे भिजवून इडली करुन बघेन.
सगळ्यांना धन्यवाद Happy
शेवटी असचं वाटतय की. आपलं भिजवून, वाटून केलेलचं बरं.. नो शॉर्टकटस्.. Happy Happy

दळताना तांदूळ धुवून वाळवले आणि डाळ मात्र चाळून घेतली फक्त. पापडासाठी करतो तसं. एकत्र करून थोडं जाडसर दळून आणलं.

पीठ दळून प्रॉपर्टी बदलत असाव्यात
आपण वेगवेगळे उडीद आणि उकडा भिजवतो आणि मग दळतो.भिजलेल्या आणि मग बारीक झालेल्या कणात हवा मिसळून किणवनाची(काय हे मोबाईल, जोडाक्षर लिहू देत नाही) क्रिया उत्तम होईल.ओल आणि टेम्परेचर दोन्हीचा संबंध.
जर एकत्र कोरडे दळले आणि मग भिजवले तर होणारा पदार्थ पॅन केक बॅटर असेल डोसा बॅटर नाही.

माझ्यामते (मागच्या पानावर मेधा नी लिहिलंय तसं) जाडसर उत्तपे चांगले होतील या पिठाचे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर सगळं बारीक चिरून पिठातच घालायचं.
माझ्या साबा आणि अर्थात आता बायडी ही; दोश्याच्या, उत्तप्यांच्या आणि बहुतेक इडलीच्या पिठातही जरासं दही घालतात. नक्की काय फरक पडतो नकळे पण दोघींनीही केलेले दोसे, उत्तपे मस्त सॉफ्ट होतात आणि एक बारीकशी आंबटसर चवही छान लागते (आता ती दह्याची की नैसर्गिक आंबवल्यामुळे येणारी हे काय नाही बा माहीत)

पिठ दळून पहिल्यांदाच केले. >> आमच्याकडे झाडून सगळ्या ज्ये नांचं एकमत असतं की असे तांदूळ आणि डाळ दळून केलेल्या पीठाचे / मिश्रणाचे डोसे / इडल्या नीट होत नाहीत.

बी एस ह्या पीठाच्या इडल्या नक्कीच नेहमीच्या ईडल्या सारख्या होत नाहीत पण भिजवताना मुठ भर पोहे आणि आयत्यावेळी थोडा इनो आणि दही (बेकिंग सोडा नको) घालुन इडल्या करून बघा. छानच होतात.
गावाकडे आजीकडे सुरुवातीला मिक्सर नव्हता. नेहमी तिच्याकडे हे पीठ दळलेलं असायच. आणि त्याच्या ती अशा इडल्या करायची आणि खोबर नसलं कि शेंगदाण्याची भरपुर कोथिंबीर घातलेली चटणी.
ज्यांना फार आंबट , आंबुसलेल्या इडल्या आवडत नाहीत त्यांना नक्की आवडतील ह्या इडल्या.

सा बा वडे करायच्या अशा पिठाचे, भाजणीचे वडे करतो तसे, सोबत नारळाचे दूध, रस्सा भाजी. पीठ भिजवताना त्यात हळद, तिखट, मीठ, ओवा घालायच्या, गरम पाण्यात भिजवायचे पीठ, मोहनही घालायचं थोडं. पण उकडा तांदूळ नाही, साधा तांदूळ आणि उडीद डाळ दळून ठेवायच्या.

म्हणून मी भाजणीच्या वड्यासारखे वडे करायचे, काल लिहून गेले.

अमा Happy .

मालवणी कोंबडी वडे कसे करतात माहिती नाही पण ह्याच टाईप असावेत. पण आम्ही शाकाहारी त्यामुळे सोबत चिकन , मटन नाही. सा बा आमच्याकडे आल्या की असं दळून आणायला लावायच्या मला, आता फार आठवत नाही. त्याची धिरडीही करायचे कधीतरी, बरी व्हायची.

नाही योकु, हे नाहीत. पण धन्यवाद तुम्ही छान लिंक दिलीत. माझा वाचायचा राहिला होता तो लेख.

तांदूळ आणि उडीद डाळ एकत्र करून दळून आणलेलंच आठवतंय मला. हल्ली ते मालवणी वडे पीठ विकत मिळते म्हणून मी ते आणून करते. माहेरी मला हे वडे माहिती नव्हते, फक्त भाजणीचे माहिती होते, सासरी देवगड साईडला हे करतात खुपदा. भाजणीचे पण करतात.

टेस्ट ऑफ लाइफ वाले (देशपांडे) तांदूळ आणि उडदाची डाळ एकत्र दळून किंवा दळून एकत्र केलेली पिठं सफेद ढोकळा, घावण यासाठी रेडिमिक्स म्हणून विकतात.
(ते घावण पीठ म्हणत असले तरी ते घावण पीठ नाही. आंबोळ्या म्हणता येईल. घावण नुसत्या तांदळाचे.)

सफेद ढोकळ्यासाठी दही घालून आंबवायचं. आंबोळ्यांसाठी भिजवून लगेच वापरायचं.

नाही योकु, हे नाहीत. पण धन्यवाद तुम्ही छान लिंक दिलीत. माझा वाचायचा राहिला होता तो लेख.आंबोळ्यांसाठी >>>>+१. आमच्याकडे नुसत्या तांदळाच्या पीठाचे वडे करतात.त्यात मीठाखेरीज काही नाही.

भिजवून लगेच वापरायचं.>>>>>> याच्या आंबोळ्या चांगल्या होतात का?

-आंबोळ्यांसाठी - हो . मी यातही थोडं दही घालतो. दहापंधरा मिनिटं तरी भिजवायचं. हे पीठ पाणी भरपूर पितं.

धन्यवाद सगळ्यांना बरीच नवीन माहिती मिळाली.

बी एस ह्या पीठाच्या इडल्या नक्कीच नेहमीच्या ईडल्या सारख्या होत नाहीत पण भिजवताना मुठ भर पोहे आणि आयत्यावेळी थोडा इनो आणि दही (बेकिंग सोडा नको) घालुन इडल्या करून बघा. छानच होतात. करून बघेन.
नाहीतर पांढरा ढोकळा आहेच.

कारल्याचे काप करून मीठ लावून ठेवले आहेत. मधल्या बिया वगळलेल्या आहेत. काप पिळून घेईन, बाकी घटक सुचवा. कोरड्या काचर्या करायच्या आहेत. मी नेहमी भरपूर लिंबू, गोडा मसाला, दाणेकूट, खोबरं वगैरे घालून करते. मुळचा कडूपणा जायला खूप साखर मात्र लागते. ती नको वाटते तर मग कोरडीच भाजी अजून काय घालून करता येईल? कांदा लसूण नकोय. पहाटे लवकर उरकेल अशी हवी.

जास्त तेलाची फोडणी करून तिखट, मीठ, साखर, मिरपूड घालून खरपूस परतायची. अर्थात थोडं जास्त तेल घालायचं, अगदी खूप नाही.

कवि ग्रेस यांनी एकदा म टा त लिहिलेली पण मला आवडते, भरपूर कढीलिंब आणि मिरपूड घालून केलेली पण त्यात मी माझं addition करते. त्यांनी बहुतेक तेलावर फक्त सांगितली आहे, मी रीतसर फोडणी करते आणि कोथिंबीरही घालते, थोडी साखर आणि तिखट मीठ पण घालते. कुठल्याही प्रकारच्या काचऱ्या मी खरपूस परतते, थोडी करपवतेच. कधी लसूण फोडणीत घालते कधी नाही. बरेचदा कांदा लसणीशिवायच करते.

पीठ पेरून पण करतात कारल्याची, पण मी करत नाही.

कोरडीच भाजी अजून काय घालून करता येईल? >>आम्ही ही भाजी मोहरी आणि जिरे ऐवजी, बडीशेप आणि जिरे फोडणीमध्ये करतो. (बाजारात मिळणारी पातळ आणि नाजूक बडीशेप. नेहमी खातो ती जाड नाही).
बाकी यात तेल हळद हिंग लाल तिखट किंचित आमचूर पावडर बस्स एवढंच. चवीला उच्च लागते. ( लिंबू रसाने क्रिस्प होत नाही म्हणून आमचूर.) मीठ कमी कारण आधी चकत्याना मीठ लावून पाणी पिळून काढलं तरी खारटपणा असतोच.

असे मीठ लावून पिळलेले काप एका प्लेटमधे पसरवून ठेवून १ -१ मिनिट असे मायक्रोवेव्ह मधे २-३ मिनिटे वाफवून घेतले तर भाजी एकदम लवकर होइल.

कारल्याच्या चकत्या - मीठ लावून पिळून घेत लेल्या चकत्या. गॅसवर केलेली फोडणी ओतून पाच मिनिटे मायक्रोवेव्ह करायच्या.मग मीठ, साखर, तिखट घा लून आणखी तीन मिनिटे. बाहेर काढून हलवत गार करायच्या. म्हणजे कुरकुरीत राहतील.
चकत्यांच्या प्रमाणानुसार वेळ कमी- जास्त करावा लागेल.

आम्ही कारल्याच्या चकत्याची तोंडलावणी करतो. मध्यम आकारात कापून घेऊन लगेचच धुवून तव्यावर भाजायचे, मस्त भाजेपर्यंत परतत रहायचे, अन शेवटाला थोडेसे तेल, तिखट अन मीठ घालून एखादं मिनिट परतून दुसऱ्या भांड्यात काढायचे, हे असे कारले मस्त कुरकुरीत लागते, पण हा लगेचच करून खायचा प्रकार आहे, डब्याला किंवा उशिरा खाल्ले की तितकीशी मजा येत नाही

Pages