Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत
-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हं, सतीची प्रथा अन गर्भवती
हं, सतीची प्रथा अन गर्भवती बायको टाकायच्या प्रथा किती वर्षे जुन्या आहेत म्हणे ? 5000 की 10000?
आणि 1500 वर्षाच्या बाळाकडून इतक्या अपेक्षा?
Submitted by BLACKCAT on 15 August, 2019 - 23:13
सती प्रथा कुठे सुरू आहे म्हणे?
नेटवर फॅमिली कोर्ट काश्मीर
नेटवर फॅमिली कोर्ट काश्मीर शोधले तर 2018 चा एक कायदा दिसत आहे
पुढच्या १२ तासात युनो च्या
पुढच्या १२ तासात युनो च्या सुरक्षा परिषदेत (अर्थात चीन च्या पुढाकाराने) बंदिस्त खोलीमधे चर्चा होणार आहे. ही बातमी आनंद प्रकट करणारे काश्मिरचा प्रश्न युनो मध्ये कोणी नेला त्यावर मुग गीळुन गप्प आहेत !!
तुमच्या लाडक्या काॅंग्रेसने देशाची ६५ वर्षे वाट लावलेली आहे. सतत चार दशके देशाला गरीबी हटाव चा नारा दिला. जनतेला वाटल काॅंग्रेस गरीबी हटवणार !! त्यांना कुठे माहिती होत की जनतेने स्वःताची गरीबी स्वःताच हटवावी अस काॅंग्रेसला अभिप्रेत होत. जनतेसाठी मनरेगा सारख्या भ्रष्ट्राचाराचे कुरण असलेल्या योजना आणल्या. त्या योजनांचा फायदा ह्यांच्याच सगे संबंधी आपली तुंबडी भरायला केला. मनरेगाच्या भ्रष्ट्राचाराबद्दल चौकशी करणार्या कार्यकर्त्यांना नाहीसे केले !!
ह्या सर्वाला कंटाळुन जनतेने मा मोदींना निवडुन आणले. दुसर्यावेळेला मा मोदींना पहील्या पेक्षा जास्त सपोर्ट मिळालेला आहे !!
मोदीने 15 लाख दिले की हटेल
मोदीने 15 लाख दिले की हटेल गरिबी, गुजरातेत एकही गरीब नाही
काँग्रेसच्या पूर्वी पणजोबा चे
काँग्रेसच्या पूर्वी पणजोबा चे इंग्रज काळात उत्पन्न 20000 रु होते व आता माझे कमी आहे , असे प्रूफ दाखवणारा मला एकही भेटला नाही,
मनरेगा मोडीनेही सुरू ठेवले आहे
पण अब्दुल्लाच्या बायकोचे
पण अब्दुल्लाच्या बायकोचे कौतुक आहे, काश्मीरच्या बाईने दिल्ली कोर्टात नवऱ्याला आणवुन पोटगी मिळवून दाखवली,
संघ , भाजपे असल्या लोकांनी काश्मिरी मुलीचा नाद सोडून देणेच ठीक राहील
काँग्रेसच्या पूर्वी पणजोबा चे
काँग्रेसच्या पूर्वी पणजोबा चे इंग्रज काळात उत्पन्न 20000 रु होते व आता माझे कमी आहे , असे प्रूफ दाखवणारा मला एकही भेटला नाही,
मनरेगा मोडीनेही सुरू ठेवले आहे
नवीन Submitted by BLACKCAT on 16 August, 2019 - 13:37
काँग्रेसच्या काळात उत्पन्न 20०000 रु होते व आता माझे कमी आहे , असे प्रूफ दाखवणारा मला एकही भेटला नाही.
वाहन उद्योगातील मंदीमुळे
वाहन उद्योगातील मंदीमुळे रोजगार गेलेले भेटले नाही का तुम्हाला?
पुर्वीची मनरेगा " रोजगार हमी
पुर्वीची मनरेगा " रोजगार हमी निम्मे तुम्ही न् निम्मे आम्ही" अशी राबवली जात होती. आता लेबर मस्टर ऑनलाईन आहे, कामाचे फोटो अक्षांश, रेखांशासह द्यावे लागतात. गॅस सिलिंडर सबसिडी सारखे बरेच पारदर्शक बदल झाले आहेत. बऱ्याच गावांमध्ये लेबर कामाची मागणी करत नाही. पुर्वी व आता मनरेगा मध्ये लेबरची संख्या माहिती आधिकारात विचारून घ्यावी.
काँग्रेसच्या काळात उत्पन्न
काँग्रेसच्या काळात उत्पन्न 20०000 रु होते व आता माझे कमी आहे , असे प्रूफ दाखवणारा मला एकही भेटला नाही.
ये माझ्याकडे,
काँग्रेसने 2012 ते 17 व्यवस्थित पगार दिला , मग 2017 ची स्लॅब वाढ मोदीने चार वर्षे पुढे ढकलली,
आता किरकोळ पगार वाढ देणार आहेत म्हणे,
काँग्रेस काळात सामान्य लोकांना पेन्शन होती, ती बाजपेयींने बंद केली व स्वतः मात्र खाल्ली,
अजून उदाहरणे समाजात शोधावी,
महाराष्ट्र भाजप आमदार नी स्वतःचा पगार 50 ह वरून 1.5 लाख केला , तिप्पट, आणि आम जनतेची गेस सबसिडी बंद
कायमचे हेच रडगाणे काळ्या
कायमचे हेच रडगाणे काळ्या मांजराचे.:-))
गेले ७० वर्षांपेक्षा जास्त
गेले ७० वर्षांपेक्षा जास्त काळ कोर्टात निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या "राम मंदिर" ह्या मुद्द्याला मा मोदी सरकारने प्राथमिकता दिलेली नाही ह्यावरुन हे सरकार जनतेच्या मुळ मुद्द्यावरुन लक्ष विचलीत होउ देत नाहीय हे साबित होत आहे.
"राम मंदिर" हा हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न असुनही हिंदु समाजाने समजुदारपणे गेली ७० वर्षे न्याय होण्याची वाट बघितलेली आहे.
"राम मंदिर" ईश्युवर एके काळी (१९७०) मुस्लिम समाजाचे नेते समजुदारपणे आपला हक्क सोडायला तयार झाले होते. पण त्यावेळेलाच ऐन वेळी सरकारात शामिल झालेल्या कम्युनिस्ट लोकांनी ह्या नेत्यांचे कान भरले व मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी आपली बाजु फिरवली!! ही माहिती स्वःता के के महम्मद (ASI) ह्यांनी दिलेली आहे.
ASI चे वरिष्ठ अधिकारी लाल ह्यांना कोर्टाने रामजन्मभुमीची तपासणी करुन अहवाल सादर करायला लावले. श्री लालनी अहवाल सादर केला पण एका हिंदुने, हिंदु मंदिरासाठी सादर केलेला अवहाल फुट पाडणार्या कम्युनिस्ट लोकांना कसा पचणार ? त्यांनी मुस्लीम नेत्यांकरवी आपला विरोध कोर्टासमोर मांडला. कोर्टाने त्यावेळेला डेप्युटी असलेल्या के के महम्मद ह्यांना तपास करुन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. हिंदु समाजाने नेहेमी प्रमाणे ह्यालाही संम्मती दिली. पण ह्या गोष्टी स्वःताला सुशिक्षित समजणार्या हिंदु विरोधकांच्या लक्षात येत नाही. आदेशा नुसार के के महम्मद ह्यांनी तपास करुन अहवाल सादर केला.
https://youtu.be/e5TIZU0gdS4
सांगलीच्या पटवर्धन
सांगलीच्या पटवर्धन दाम्पत्याविषयी abp वरचा खुलासा
https://www.youtube.com/watch?v=SipzNlwVNA8
अशीही मला ती पोस्ट फेकच वाटत होती कारण कोणीही सुशिक्षित बांधकाम व्यावसायिक त्याच्या मनात काहीही असलं नसलं तरी स्वतःच्या नावाने अशी पोस्ट कधीही फॉरवर्ड करणार नाही. सायबर सेलवाले आरामात त्या पोस्टचा सोर्स शोधू शकतात आणि ते शोधतील हि अपेक्षा.
मी यासाठीच पाच वर्षांपासून फेसबुक आणि व्हाट्सऍप बंद केलंय. रोज फॉरवर्ड म्हणून कुठूनकुठून आलेले नवनवीन विद्यावाचस्पतींचे विविध विषयावरील प्रबंध वाचून डोकं फिरायचं. टेलेग्राम जिंदाबाद.
धन्यवाद जिद्दु भाई.
धन्यवाद जिद्दु भाई.
पटवर्धन सांगलीचे राजे (
पटवर्धन सांगलीचे राजे ( संस्थानिक) होते बहुतेक. हे कुटुंब ते नसले तरी मनाने राजासारखे दिलदार नक्कीच आहेत.
माबोवर पण पटवर्धन होते,
माबोवर पण पटवर्धन होते, रामाघरी गेला आयडी त्यांचा.
रामाघरी काल कोण गेले हे
रामाघरी काल कोण गेले हे सुद्धा माझ्या लक्षात नाही राहीले. चिवट लोकंच चिकटून राहतात.
काल परवा कोणी गेलं आहे का?
काल परवा कोणी गेलं आहे का?
कायमचे हेच रडगाणे काळ्या
कायमचे हेच रडगाणे काळ्या मांजराचे
काळे मांजर आडवे गेले तरी अपशकून समाजाला जातो
काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी
काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी वेडा माणूसच पाहिजे .
किती तरी प्लस पॉइंट आहेत .
आपला देश किती तरी पटींनी पाकिस्तान पेक्षा मोठा आहे (महाराष्ट्राची अर्थ व्यवस्था सुधा पाकिस्तान पेक्षा मोठी आहे देशाशी तुलना होवूच शकत नाही )
सैन्य संख्या जास्त आहे , पाकिस्तान नष्ट करण्यासाठी भारतातील ७५ टक्के लोकांचा पाठिंबा आहे राजकीय नुकसान नाही .
वाट कसली बघताय आरपार करून टाका
ज्येष्ठ सावरकरवादी विचारवंत
ज्येष्ठ सावरकरवादी विचारवंत शेषराव मोरे यांच्या ३७० वरच्या व्याखानाचा गोषवारा
https://www.facebook.com/rajan.sane/posts/2767017453326541
<< आपला देश किती तरी पटींनी
<< आपला देश किती तरी पटींनी पाकिस्तान पेक्षा मोठा आहे (महाराष्ट्राची अर्थ व्यवस्था सुधा पाकिस्तान पेक्षा मोठी आहे देशाशी तुलना होवूच शकत नाही ) >>
------ भारताला कुठे नेले आहे.... बरोबरी करायची तर पाकसोबतच.... पाक हेच जगाच्या पाठिवरचे एकमेव आदर्ष राष्ट्र आहे असेच आता वाटायला लागले आहे.
------ भारताला कुठे नेले आहे.
------ भारताला कुठे नेले आहे.... बरोबरी करायची तर पाकसोबतच.... पाक हेच जगाच्या पाठिवरचे एकमेव आदर्ष राष्ट्र आहे असेच आता वाटायला लागले आहे.
नवीन Submitted by उदय on 16 August, 2019 - 22:38 >>
मला कुठेही बरोबरी करण्याचा प्रयत्न दिसत नाही... तुम्हाला बरोबरी कुठे दिसली?
ब रोबरी होवूच शकत नाही नगण्य
ब रोबरी होवूच शकत नाही नगण्य राष्ट्र आहे भारतासमोर
फक्त भारतीय नेतृत्व मनानी कमजोर असल्या मुळे शिरजोर झाले होते .
आता uchya मनोधैर्य असलेला नेता देशाचा पंतप्रधान आहे
तलाक देणार्या नवर्याला
तलाक देणार्या नवर्याला तुरुंगात पाठवल्यावर तिला आर्थिक आधार मिळणार?
>>>
498/A मध्ये आत गेलेल्यांच्या बायकांना कोणाचा आर्थिक आधार हे कोणी विचारलं का?
>>>>>>>>>>>>>पाक हेच जगाच्या
>>>>>>>>>>>>>पाक हेच जगाच्या पाठिवरचे एकमेव आदर्ष राष्ट्र आहे असेच आता वाटायला लागले आहे. <<<<<<<<
हेच एक राहील होत ऐकायच !!
म्हणुनच कदाचीत ३७० काढण ह्याच्या पचनी पडलेल नाही.
बाकी भारताच्या काश्मिर मध्ये ३७० रद्द केल्याने पाकिस्तानची सुलगलेली आहे ईतकी की भारता बरोबरचे संबंधच तोडणार आहेत म्हणे !!
केरळातल्या एका "महमुद" पंक्चरवाल्याने म्हणे M R F एम आर एफ नावाच्या टायर कंपनीशी असलेले संबंध तोडुन टाकण्याची धमकी दिलेली आहे म्हणे !!
https://www.firstpost.com
https://www.firstpost.com/world/bbc-to-expand-shortwave-radio-news-cover...
मग काय झालं UNSC मीटींग्मध्ये
मग काय झालं UNSC मीटींग्मध्ये?
पूराबद्दल कुणाचाही धागा इथे
पूराबद्दल कुणाचाही धागा इथे निघू शकला नाही. फक्त द्वेषपूर्ण धागे निघत आहेत. त्यातले बरेचसे प्रतिसाद यांना खटकत नाहीत. असो. या विषयावरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद
Submitted by संजय पगारे on 16 August, 2019 - 0
UNSC मीटिंग मधील चीन सोडून
UNSC मीटिंग मधील चीन सोडून इतर स्थायी सदस्य देशांचा तटस्थ राहण्याचा प्रकार मोदींविरुद्ध काहीतरी नवीन कोलीत मिळेल म्हणून आस लावून बसलेल्या ल्युटीयन्स साठी अतिशय निराशाजनक आहे.
पुन्हा एकदा पाक व चीन वेगळे पडले.
विदेश दौरे कशाला हवेत वगैरे बोंबलणारे स"माजवादी" आता ती कोल्हेकुई पुन्हा करणार नाही ही आशा आहे.
Pages