ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

चीन सोडला तर एका सुद्धा बोध्य धर्मीय देशांनी पाकिस्तान किंवा कोणत्याही मुस्लिम राष्ट्राला पाठिंबा दिला नाही .
चीन पाठिंबा देत आहे पाकिस्तान ला त्यात त्याचा स्वार्थ आहे भारताची भूमी चीन ल सुद्धा हाडपयची आहे .
बाकी चीन मध्ये मुस्लिम समाजाला कसलेच स्वतंत्र नाही

इथे पंतप्रधानांना अत्यंत वाईट भाषेत संबोधले जाते तेव्हा ? उगीच गरळ ओकल्यासारखे भाजप्ये, संघोटे अशी विशेषणे वापरली जातात तेव्हा? >>>> मी आधीच म्हटलंय की वाद निर्माण करणारी व पर्सनल ॲटॅक करणारी विधानं असतील त्यावरून चालू दे. अगदी दंगा होवू दे. आणि त्यावरून कुणी समजावण्याच्या पलिकडे वातावरण गेले आहे.

पण त्याचा संबंध लावून जामोप्यांच्या डॉक्टरकीला बोल लावणे बरे वाटत नाही. आणि निदान मी तरी त्यांना डॉक्टर असण्याचा माज करताना पाहिले नाही. तसं करताना पाहिलं असतं तर मी हे लिहिलं नसतं. आपल्याला माहित नाही की ते त्यांच्या प्रोफेशनमध्ये कितीतरी एड्सच्या रुग्णांचे उपचार करत असतील.

बाकी धनगराच्या जडीबुटीचं म्हणाल तर ते चूकच आहे एक डॉक्टर म्हणून. पण कदाचित ती जडीबूटी खरोखरचं आयुर्वेदीक औषध असेल असे वाटून घेतलेही असेल desperate होवून व्याधीतून सुटका करून घेण्यासाठी.

आपल्याला दोन गोष्टी वेगळ्या ठेवता यायला हव्यात.

असो. No more comments on this issue.

Pages