Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत
-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
370 कलम रद्द केल्यामुळे
370 कलम रद्द केल्यामुळे हर्षोन्माद झालेल्या भक्तांना काश्मिरी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी तोंडाला लकवा मारलाय!JK
370 कलमामुळे काश्मीरचा विकास थांबला होता तर ते कलम नसणाऱ्या यूपी-बिहारचा विकास आजपर्यंत का झाला नाही?भाजपची'नाचता येईना...'अशी गत
लहान कुटुंब ही देशसेवा, इति
लहान कुटुंब ही देशसेवा, इति श्री श्री षष्ठम पुत्र,
नेहरूंना हे 1930 सालीच माहीत होते
https://www.facebook.com
https://www.facebook.com/jetjagdish
तर त्या वादग्रस्त मूळ पोस्टचे
तर त्या वादग्रस्त मूळ पोस्टचे लेखक नेहरुगोत्रीय चित्पावन ब्राम्हण पत्रकार आहेत. त्यांनी आधी पोस्ट टाकली, नंतर खरं काय ते कळल्यावर त्यांनी ती मागे घेतली>>>>
सामान्य लोक जाऊदेत, पत्रकार सुद्धा व्हाट्सएप फॉरवर्ड करतात? त्यांनी नंतर पोस्ट मागे घेऊन काय हासिल झाले, जे काही व्हायचे होते ते आधीच्या पोस्टने केले होतेच. या पत्रकार महाशयांनी बातमी हाती आल्यावर का नाही शहानिशा करून घेतली? ती मूळ पोस्ट इथे मायबोलीवर देणारेही पत्रकारच.
स्वतःला लोकशाहीचा एक स्तंभ समजणार्यांनी आपण स्वतःच त्या स्तंभाची वाळवी ठरतोय का हे बघावे.
इतरांवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्यांच्या डोक्यातून जात का जात नाही देव जाणे.
https://www.thehindu.com/news
https://www.thehindu.com/news/national/other-states/naga-national-flag-h...
नागध्वज प्रणाम एक दो तीन , आरम ,
निळा लाल पिवळा हिरवा, नो भगवा?
ठीक आहे. चांगले आहे की मग.
ठीक आहे. चांगले आहे की मग.
Submitted by BLACKCAT on 15
Submitted by BLACKCAT on 15 August, 2019 - 13:30. >>>
चांगलय ना , हिरवा आहे ना मग नाचून घ्या....
दिलगिरी व्यक्त करणे ही चूक
दिलगिरी व्यक्त करणे ही चूक झाली असे वाटावे अशा पूर्वग्रहदूषित लोकांशी कोणताही संवाद शक्य नाही. यांना सोयीचे कधीच खटकत नाही.
महाभारतात पांडवांनी
महाभारतात पांडवांनी खांडववनांत जाळलेले नाग लोक हेच का ?
https://m-hindi.webdunia.com/sanatan-dharma-history/history-of-nagvansh-...
काश्मीरही एकेकाळी नाग लोकांच्या अधिपत्याखाली होता. तक्षशिला नगरी तक्षकाने वसवली, नागपूर हेही नाव नाग वंशी राजसत्तेवरून आले आहे.
370 कलमामुळे काश्मीरचा विकास
370 कलमामुळे काश्मीरचा विकास थांबला होता तर ते कलम नसणाऱ्या यूपी-बिहारचा विकास आजपर्यंत का झाला नाही?भाजपची'नाचता येईना...'अशी गत
Submitted by अमर ९९ on 15 August, 2019 - 03:49
>>
तुमच्यासाठी पुन्हा एक रिपोस्ट. जरा मागचे प्रतिसाद वाचत चला. [१]
[१] https://www.business-standard.com/article/current-affairs/kickstarting-k...
370 कलम रद्द केल्यामुळे
370 कलम रद्द केल्यामुळे हर्षोन्माद झालेल्या भक्तांना काश्मिरी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी तोंडाला लकवा मारलाय!JK
370 कलमामुळे काश्मीरचा विकास थांबला होता तर ते कलम नसणाऱ्या यूपी-बिहारचा विकास आजपर्यंत का झाला नाही?भाजपची'नाचता येईना...'अशी गत
>> विलभजी हे जगदीश काबरे यांच्या वॉलवरून घेतलं होतं हे लिहायचं राहून गेलं. आपण जगदीश काबरे यांचे फेसबुक प्रोफाईल बघू शकता , मी लिंक जोडली आहे. तसेच त्यांचे विचार कसे आहेत हेही सांगा.
विलभजी हे जगदीश काबरे यांच्या
विलभजी हे जगदीश काबरे यांच्या वॉलवरून घेतलं होतं हे लिहायचं राहून गेलं. आपण जगदीश काबरे यांचे फेसबुक प्रोफाईल बघू शकता, मी लिंक जोडली आहे.
नवीन Submitted by अमर ९९ on 15 August, 2019 - 06:38
>>
मी जगदीश यांची तुम्ही वर डकवलेली पोस्ट पहिली, पण त्यांनी त्यांच्या दाव्याला समर्थन करणारी कुठलीही शास्त्रीय आकडेवारी दिलेली नाही. फक्त सरकारी निर्णयाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून एकामागोमाग एक आरोप केलेत.
असे नुसतेच बेछूट आरोप करून काय फायदा ? त्याच्यामागे काहीतरी तर्क, पुरावे असायला नकोत?
मी मागेच काश्मिरींना भारताच्या १% लोकसंख्या असूनही बजेटच्या १०% निधी मिळतोय अन तरीही त्यांच्या अर्थव्यवस्थेने बिहारीतकीही गती पकडलेली नाही हे सप्रमाण आकडेवारीसकट सिद्ध केलय. तरी आपण नुसत्या पोस्टी आणि व्हाट्सअँप मेसेजेस डोळे मिटून फॉरवर्ड न करता, त्यामागे किती सत्यता आहे याची जरा छाननी करावी.
नवीन Submitted by विलभ on 15
नवीन Submitted by विलभ on 15 August, 2019 - 16:35. >>
विलभ भाऊ, मला वाटत की त्यांनी ते सगळे प्रतिसाद एकत्र आणि प्रस्तावनेसकट टाकायला हवे होते. बाकी त्यांचा हेतू जातीयवादी विष पसरवणार्या लोकांना उघडे पाडणे हा आहे हे मी त्यांचे आतापर्यंतचे प्रतिसाद पाहता खात्रीलायक सांगू शकतो.
काश्मीरीना बजेटचा 10 पट
काश्मीरीना बजेटचा 10 पट हिस्सा जातो , म्हणजे काश्मिरी माणसाला 1000 किलो तांदूळ अन प्रत्येकाला शालेय पुस्तकाचे 10 सेट मिळत नाहीत,
समरक्षण , पोलीस फोर्स , दारुगोळा, व को लॅटरल डेमेज ह्यांची कोस्ट काढून गणिताने गुणून भागून ते उत्तर काढलेले असते
विलभ भाऊ, मला वाटत की त्यांनी
विलभ भाऊ, मला वाटत की त्यांनी ते सगळे प्रतिसाद एकत्र आणि प्रस्तावनेसकट टाकायला हवे होते. बाकी त्यांचा हेतू जातीयवादी विष पसरवणार्या लोकांना उघडे पाडणे हा आहे हे मी त्यांचे आतापर्यंतचे प्रतिसाद पाहता खात्रीलायक सांगू शकतो.
>>
काही हरकत नाही, आमचा काही वैयक्तिक वाद नाही. फक्त कुणीही जाणते अजाणतेपणे चुकीची माहिती पसरवू नये एवढाच माझा हेतू होता.
धन्यवाद मी माझा भाऊ. फेसबुक
धन्यवाद मी माझा भाऊ. फेसबुक वर ब्राह्मण नावाने अकाउंट उघडून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट काही लोक मुद्दाम करत असतात. एक करोड अमुक तमुक ( समाजाचा) ग्रुपवर हे प्रकार खूप आहेत. इथेच आपटे हे आडनाव धारण करून गलिच्छ पणा करणारी लोकं आपण पाहिली आहेतच.
अशा पोस्ट मागचा बेरकीपणा
अशा पोस्ट मागचा बेरकीपणा भोळ्या भाबड्या लोकांना कळत नाही, ते आणखी आगीत तेल ओतून ठेवतात व मुळ पोस्ट करणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांचे फावते. इथे सुध्दा असे धागे काढणाऱ्या लोकांना ओळखून इग्नोर केले जावे हेच म्हणेन.
कुलकर्णी ,देशपांडे अशी नाव
कुलकर्णी ,देशपांडे अशी नाव घेवून ब्राह्मण आहे असा भास निर्माण करून दोन जातीत वितुष्ट येईल अशा पोस्ट काही समाजकंटक करत आहेत .
तसेच विविथ जातींची आडनाव घेवून सुधा हा उद्योग बरेच समाजकंटक करत आहेत .
सर्वांनी सावध राहायची गरज आहे
समरक्षण , पोलीस फोर्स ,
समरक्षण , पोलीस फोर्स , दारुगोळा, व को लॅटरल डेमेज ह्यांची कोस्ट काढून गणिताने गुणून भागून ते उत्तर काढलेले असते
Submitted by BLACKCAT on 15 August, 2019 - 07:25
>>
मी मागेच दाखवलेली लिंक पुन्हा वाचा, इथं परत पोस्टतोय. त्यात हा खर्च सरकारी सवलतींचा आहे असं स्पष्ट म्हटलंय -
Jammu and Kashmir has received 10 per cent of all Central grants given to states over the 2000-2016 period, despite having only one per cent of the country’s population, analysis by The Hindu of Central and State finances shows.[१]
तसाही काश्मीरमधल्या आर्मीचा खर्च भारत सरकार उचलतं, काश्मीर राज्य सरकार नव्हे.
कॅग ने काश्मीर सरकारवर उगाच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नाहीत, याच बातमीत कॅगच्या २०१४ च्या रिपोर्टमधल एक वाक्य दिलंय -
“There were persistent errors in budgeting, savings, excess expenditure and expenditure without provision,” the CAG report on the State’s finances for the year ended March 31, 2014, said.
[१] https://www.thehindu.com/news/national/other-states/JampK-gets-10-of-Cen...
सरकारी ग्रँट देतात म्हणजे ती
सरकारी ग्रँट देतात म्हणजे ती सगळी लोकांना मिळतच नाही, ती पोचवणारी यंत्रणा, सतत अशांतता असेल तर , जास्त खर्चातच चालवावी लागते,
उदाहरण द्यायचे तर एक गाव नदीजवळ आहे, तिथे एक ग्लास पाणी द्यायला 10 रु खर्ची लागतात, एखादे गाव उंचावर असेल , दंगळीमुळे टाकी फुटून पुन्हा पुन्हा बांधली जात असेल तर तो खर्च 40 रु जाईल , ह्याचा अर्थ त्या लोकांना 4 पट पाणी मिळाले , असा होत नाही,
नवीन Submitted by BLACKCAT on
नवीन Submitted by BLACKCAT on 15 August, 2019 - 17:35 >>>
उदाहरणं द्यायचीच आहेत तर जरा खरी वाटतील अशी तरी दे. लिहलंय असं की जणू काश्मिरातल्या गावातच राहतोस.
बाकी सरकारी ग्रांट मिळत नाही ते का आणि ते पैसे कोण खात होतं ते आता बाहेर यायला लागलय, जममू काश्मीर बँकेच्या चौकशीतून.
बाकी सरकारी ग्रांट मिळत नाही
बाकी सरकारी ग्रांट मिळत नाही ते का आणि ते पैसे कोण खात होतं ते आता बाहेर यायला लागलय, जममू काश्मीर बँकेच्या चौकशीतून
ते काय गेले 6 वर्षे सगलीकडूनच मोदीजी बाहेर काढत आहेत की, भ्रष्ट लोकांना डामबुन तुरुंग भरून गेले आहेत , मल्ल्या व ज्युनिअर मोदींचे पैसे भरून घेऊन रिजरव्ह् ब्यांकेला पूर आला आहे
सर्व निकष लक्षात घेवून सुद्धा
सर्व निकष लक्षात घेवून सुद्धा काश्मीर ला बाकी राज्य पेक्षा जास्त पैसे केंद्राकडून मिळतात आणि काश्मीर मधून टॅक्स च्या रुपात खूप कमी पैसे मिळतात.
म्हणजे बाकी राज्यांनी भरलेल्या टॅक्स मधील भरमसाठ पैसै काश्मीर ल दिले जातात
मग आता ते कमी होणारेत का ?
मग आता ते कमी होणारेत का ?
३७० मुळे भारतीय कायदे
३७० मुळे भारतीय कायदे राबवण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे पैस्याचं अपहार होत आहे हे उघड होत नव्हतं आता एक एक प्रकरण बाहेर येतील
पैसे कमी होणार हे काही सांगता
पैसे कमी होणार हे काही सांगता येत नाही पण पैसे चुकीच्या ठिकाणी तर वापरले जात नाहीत किंवा अपहार तर होत नाही ना ह्याच्या वर नियंत्रण येईल
बिहार आणि उत्तर प्रदेश सुद्धा
बिहार आणि उत्तर प्रदेश सुद्धा जातीय राजकारण मध्ये अखंड बुडाला आहे .
दोन्ही यादव मुलायम आणि लालू ह्यांनी जातीचे राजकारण करून ह्या दोन्ही राज्यांची वाट लावली आहे त्यामुळे ती दोन्ही राज्य अप्रगत आहेत .
किती ही पैसे खा जनतेला लुटा,कोणतेच विकास काम करू नका तरी जनता जातीवर मतदान करते तिथे त्याचीच फळ त्यांना भोगायला लागत आहे रोजगारासाठी देशभर फिरावे लागत आहे .
त्या मानाने आपल्या महाराष्ट्रात जातीवर मत दिले जात नाही .
पण आता काही समाजकंटक ,समाज द्रोही लोक जाती जाती मध्ये विष कालवून वातावरण बिघडवत आहे .
मराठी जनता सुजाण आहे त्याला बळी पडणार नाही अशी आशा करूयात
महाराष्ट्रात जातीचे मोर्चे
महाराष्ट्रात जातीचे मोर्चे एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच निघाले नव्हते .
एकमेकांचा द्वेष करणाऱ्या पोस्ट सोशल मीडिया वर कधीच बघितल्या नव्हत्या पण ह्या ५/७ वर्षात ह्याचे प्रमाण खूप वाढले आहे .
Bjp ला हरवण्याच्या नादात महाराष्ट्र आपली उज्वल परंपरा हरवू नये हीच प्रार्थना
>>>>>>>काश्मीरीना बजेटचा 10
>>>>>>>काश्मीरीना बजेटचा 10 पट हिस्सा जातो , म्हणजे काश्मिरी माणसाला 1000 किलो तांदूळ अन प्रत्येकाला शालेय पुस्तकाचे 10 सेट मिळत नाहीत<<<<<<<
बिंडोक प्रतिसाद !!
केंद्र सरकार , काश्मिर काय सगळ्याच राज्यांना पैश्याची तरतुद करते तांदुळ आणी पुस्तक देत नाही !!
फारुख अबदुल्लाचे पुत्र ओमार अब्दुल्लांनी ह्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आपल वार्षीक उत्पन्न १५ लाख दाखवल होत पण त्याच्या घटस्फोटीत बायकोने ह्या वर्षीच पोटगीसापोटी १५ लाख दर महा मागीतलेले जे मंजुर झाले आहेत ! तीला विचारल की ईतका पैसा का पाहीजे ? तिने सांगीतल की तिच्या दिमतीला १४-१५ गाड्या आहेत, ईतक्या गाड्या पार्क करण्या ईतका मोठा बंगल्याचा रेंट ५ लाखाखाली नाही !!
आयडी कुठला आहे हे पाहिले की
आयडी कुठला आहे हे पाहिले की तो काय लिहीणार हे कसे कळते याचे क्लासेस असतील तर कृपया कळवावे>>>>
सोशल मीडिया इतके दिवस वापरूनही एवढे कळत नसेल तर.....
Pages