ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

पण तरीही, चल मी तुला तुझ्या प्रश्नान्ची उत्तरे देतो.

हा दावा कशाच्या आधारे केला हेच सगळे विचारत होते. >> तु त्यावेळी नव्हतास असं तु म्हणतोस, मग हे कसं माहीती पडलं तुला? असो, तो दावा गुप्तहेर संस्थांच्या अहवालावरुन केला गेला हे मी तुला आधीच सान्गीतलय.

पाकिस्तानने ४५ दिवस बंदी केली याचा अर्थ तू सांगणार होतास >> कारण तिथे हल्ला झाला हे पाकिस्तानला लपवुन ठेवायचं होतं.

हे मेंटलमधून पळालेल्या एखाद्या मंद जोशातल्या वेडसर माणसाचे तर्रर्र विधान समजावे काय ? >> तो मंद जोशी आणि तुझा दोस्ताना तुझ्या घरातच ठेव.. माझ्याबरोबरच्या चर्चेत हे नाव कशाला टाकतोयस हे कळत नाहीय.

पाकिस्तानने ४५ दिवस बंदी केली याचा अर्थ तू सांगणार होतास >> कारण तिथे हल्ला झाला हे पाकिस्तानला लपवुन ठेवायचं होतं >>> हे विधान आता तूच केले आहेस हे कबूल केल्याबद्दल सर्वप्रथम आभार.

४५ दिवस बंदी केली म्हणून तिथेच हल्ला झाला हे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे आहे.
आयटी सेलने मग खोटे फोटो का फिरवले होते ?

तो मंद जोशी आणि तुझा दोस्ताना तुझ्या घरातच ठेव.. माझ्याबरोबरच्या चर्चेत हे नाव कशाला टाकतोयस हे कळत नाहीय. >> तुला मिर्च्या का झोंबतात नेहमी नेहमी ?
मी काही चैतन्य रामसेवक हा आयडी तुझा आहे असा आरोप केलाय का ?
मी मंद जोश्यात असे म्हटले आहे , तू मंद जोशी असे करून घेतले आहेस. आता याला काय म्हणणार ?
चांदणे शिंपीत जाशी..

तो मंद जोशी आणि तुझा दोस्ताना तुझ्या घरातच ठेव.. माझ्याबरोबरच्या चर्चेत हे नाव कशाला टाकतोयस हे कळत नाहीय. >> तुला मिर्च्या का झोंबतात नेहमी नेहमी ? >> कारण मी तुझ्यासारखा दोस्तानावाला नाहीय ना.. मी एक्दम सरळ आहे. मुद्द्यांनींच चर्चा करायची या मताचा आहे.

आयटी सेलने मग खोटे फोटो का फिरवले होते ?

Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 13:03 >> ते मला कसं माहीत असणार? मी तर एकही फोटो फिरवला नाही. तु इथे फोटो फिरवतोस तसेच तेही फिरवत असतील. ते तुझे व्यवसाय बन्धु असल्याने तु ज्यानी फोटो फिरवले त्यानाच का विचारत नाहीस?

आता बघ मंद जोशी हा उल्लेख तूच केलास. मी मंद जोश्यात म्हणाले लो , ते झाकून ठेवलेस. इथल्या इथे चोरी.

मी-माझा हा आयडी सपशेल उताणा पडल्याने आता वैयक्तिक हल्ले करत आहे असे जाहीर करून मी या धाग्यावरून (मुद्दा येत नाही तोवर) रजा घेत आहे.

मी-माझा हा आयडी सपशेल उताणा पडल्याने आता वैयक्तिक हल्ले करत आहे असे जाहीर करून मी या धाग्यावरून (मुद्दा येत नाही तोवर) रजा घेत आहे.

नवीन Submitted by कांदामुळा on 14 August, 2019 - 13:21 >> बरं बरं बाळ , तुझ्या बाळबोध समाधानासाठी आपण तसं समजु हा !

१००१ !!

रश्मीताई
ते तुमचे फेवरिट चैतन्य रामसेवक राम को प्यारे हो गये बरं का.>>>>>> होऊ द्या की. चूकीचे लिहीले तर तुम्ही पण उडाल. अ‍ॅडमीन पक्षपाती नाहीयेत हे मी ठामपणे सांगु शकते.

पुलगमा हल्ला आणि सूर्जिकल strike ह्या दोन्ही प्रसंगाचा वेगवेगळा विचार करता येणार नाही तर प्रत्येक कडी जोडून एक सरळ प्रसंगाची मालिका तयार केली तर विरोधक strike झालाच नाही असे का म्हणतात हे स्पष्ट होईल

रश्मीताई
ते तुमचे फेवरिट चैतन्य रामसेवक राम को प्यारे हो गये बरं का.>>>>>> होऊ द्या की. चूकीचे लिहीले तर तुम्ही पण उडाल. अ‍ॅडमीन पक्षपाती नाहीयेत हे मी ठामपणे सांगु शकते.
+१११
कवितेची लिंक अशी जुळते. रश्मी जी आपणास ठाऊक असेलच थॅनोस आपटे, म्याऊ, जैशास तैसा, किरणुद्दिन चूकीचे लिहिल्यामुळेच स्वर्गवासी झाले होते.

या मला आलेल्या विपू.. या आयडीच्या पोस्ट्स रश्मीतैंना आवडत होत्या म्हणून कळवलं. त्यात अ‍ॅडमिनना मधे आणण्याचं काय संबंध ?

अमर ९९
13 August, 2019 - 05:46
फारच दहशत घेतली होती चैतन्य रामसेवक आयडीची. इतकं घाबरणं बरं नाही.

Delete entry Edit entry प्रतिसाद
चैतन्य रामसेवक
10 August, 2019 - 23:51
अगोदर मोठा आरसा विकत घेऊन घरात लाव आणि येताजाता त्यात पहा.

चैतन्य रामसेवक
10 August, 2019 - 23:51
अगोदर मोठा आरसा विकत घेऊन घरात लाव आणि येताजाता त्यात पहा.
(हा आयडी वारला आहे. त्याबद्दल हार्दीक श्रद्धांजली. विपूला उत्तर देता येत नसल्याने एडिट करून उत्तर दिले आहे)

कांदामुळा
10 August, 2019 - 14:13
मी कोण आहे याबद्दल कुणालाच ठाऊक नाही असे कसे ? आहे की माहीत.
इथे काही आयडी सातत्याने मुखवटे घेऊन वावरतात. ते ओळखू ही येतात. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन एकदा एका धाग्यासाठी काढलेला तात्पुरता आयडी आता अशा विषयांसाठी वापरायला सुरूवात केली आहे. मुखवटे धारकांनी त्यावर टीका करताना आरशात पहावं.

इतरांना आरशात पहायला सांगणाऱ्या तूला चैतन्य ने तुला आरशात पहा हे सांगितले यात चूक काय?

माझ्या विपूत मी काहीही लिहीन. माझ्या विपूत येऊन मलाच शहाणपणा शिकवणा-या आयडीची बाजू तू घेत आहेस यावरून तुझी लायकी कळतेच की. तुला आणि त्या शशिरामला हे उल्लेख झोंबण्यासाठी तुम्ही माझ्या प्रोफाईलमधे येऊन डोकावण्याची घाणेरडी सवय सोडून द्या. माझे प्रोफाईल हे पब्लिक प्लेस वाटली का ?

तुझी लायकी " मी कोण आहे याबद्दल कुणालाच ठाऊक नाही असे कसे ? आहे की माहीत.
इथे काही आयडी सातत्याने मुखवटे घेऊन वावरतात. ते ओळखू ही येतात. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन एकदा एका धाग्यासाठी काढलेला तात्पुरता आयडी आता अशा विषयांसाठी वापरायला सुरूवात केली आहे. मुखवटे धारकांनी त्यावर टीका करताना आरशात पहावं."
यावरून कळतं. ते पहायला कुणाची परवानगी घ्यायची गरज काय आहे?

चिवट Lol

एखाद्याच्या घरात घुसून काय खातो हे पाहणारे त्यावरून आणि खून करणारे आणि प्रोफाईल मधे डोकावून तिथला मजकूर सार्वजनिक धाग्यावर आणून त्यावरून लायकी काढणारे या वृत्तीत फारसा फरक नसावा.
रश्मी ताई, तुम्हाला काय वाटते ?

चिवट तुझाच ड्यु आयडी आहे. तुझे सगळे आयडी लोकांना माहिती आहेत. हजार आयडी घ्यावे लागले तरी तुझ्या सारख्यांना पुरून उरेल हे लक्षात ठेव.

हिंदुत्ववादाला झंडुत्ववाद म्हणणाऱ्याची लायकी, जागा कळाली आहे. हिदुत्वाचा द्वेष करणारांची नीच पातळी समजून आली.

बर्बादी का आलम कुछ ऐसा है गालिब,
हिंदुस्तान के पक्ष में पुरा विश्व है ;
और पाकीस्तान के पक्ष में हिंदुस्तान का पुरा विपक्ष है !

कायेना अप्पा साभार..

मला उर्दु येत नाही त्यामुळे शेर, शेरनी, मतला, गझला कायच समजत नाही. Sad

मला तेच म्हणायचे होते. कुणी विपू केली तरच उत्तर द्यायचे असते. कुणाच्या प्रोफाईलला काय लिहीलेय हे वाचून त्याला विपू करायची असते की नसते या प्रश्नाचे हेच उत्तर अपेक्षित होते. आभार.

धागालेखकाने लवकरात लवकर धाग्याचे प्रतिसाद बन्द करुन घ्यावेत ही विनन्ती. कारण ल्युटीयन्सना हा चांगला धागा मुद्दाम खोटे आरोप करुन व गदारोळ घालुन बन्द पाडायचा आहे.

तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनि माराव्या पैजारा...

सारंग दर्शने

अतिशय व्यथित, विमनस्क आणि प्रक्षुब्ध मनाने मला ही पोस्ट लिहावी लागत आहे. खरंतर, एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजला आहे. आणि दुसरीकडे, आपले क्षुद्र अजेंडा चालवणारे धुमाकूळ घालत आहेत. सरळ आता विषयाला हात घालतो.. सोशल मिडियावर एक पोस्ट फिरते आहे आणि ती आहे की, सांगलीत किशोर आणि इरावती या पटवर्धन दांपत्याने केवळ ब्राह्मण कुटुंबांना मदत करायची ठरवली आहे. या दांपत्याची प्रणव बिल्डकॉन ही कंपनी आहे आणि स्वाभाविकच त्यांच्याकडे काही नव्या इमारती आणि मोकळ्या सदनिका आहेत. त्या पूरग्रस्तांना देता येऊ शकतात. मला ही पोस्ट वाचून धक्का बसला आणि आजही हे असे होत असेल तर वाईट आहे, अशा भावनेने मी खंतावून गेलो. मी या कंड्यांवर विश्वास ठेवला याचे कारण, ते लिहिणारे पत्रकार होते. त्यावर प्रतिक्रिया देणारेही पत्रकार होते आणि महाराष्ट्रातल्या या जातीयवादावर तुटून पडणारे अनेक नामचीन होते.

प्रत्यक्षात, पटवर्धन दांपत्याच्या इमारतींमध्ये सर्व जातींचे हिंदू तर राहात आहेतच, पण सांगलीतील किमान 22 मुस्लिम नागरिक, त्यात एक ओली बाळंतीणही सदनिकांमध्ये आजही राहात आहेत. ते मी पुढे पुराव्याने लिहितोच. पण ज्यांचे काम सत्य माहिती देणे, हे असते, असा चौथा स्तंभ पंचमस्तंभी कसा होतो आणि त्याला वेसण कशी घालायची, ही माझी मिडियाचा एक भाग म्हणून काळजी आहे. कोणतीही खातरजमा न करता, कोणतीही चौकशी न करता, कुणालाही फोन करता सगळे पटवर्धन दांपत्यावर तुटून पडले आणि त्यांनी त्यांना पाच हजार वर्षांच्या पापाचे दगड गळ्यांत अडकवून मनोमन फासावर चढवलेदेखील!

आता हे कळले कसे? माझा तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असणारा मित्र श्रीनिवास हेमाडे याने आधीच्या असत्यावर विश्वास ठेवून कडक पोस्ट लिहिली. ते स्वाभाविक होते. पण त्याचा एक डॉक्टरमित्र त्याला म्हणाला की, अरे, हे खरे नाहीये.. तिथे सगळ्या जातींचे, धर्मांचे पूरग्रस्त पटवर्धनांच्या इमारतींमध्ये राहात आहेत. त्यांची दिवसभराची काळजी घेतली जाते आहे. त्यांना जेवणखाण मिळते आहे. पुरावा म्हणून या मित्राने श्रीला एक पोस्ट टाकली. ती होती या 22 नागरिकांचा उल्लेख करणारी. श्रीचे मोठेपण असे की, त्याने फेसबुकवर पोस्ट लिहून आपली चूक झाली असे लिहिले आणि माफी मागितली. हे असत्य पसरविणारे सोशल मिडियावाले मात्र माफी मागणार नाहीत, याची मला खात्रीच आहे. श्रीची माफी वाचून मी उडालोच आणि यातले सत्य शोधायला हवे, असे माझ़्या मनाने घेतले.

मी श्रीच्या डॉक्टरमित्राला शोधले. तो श्रीप्रमाणेच संगमनेरचा. नंतर पटवर्धन दांपत्याला शोधले. पत्रकाराचा फोन म्हटल्यावर हे दोघेही इतके धास्तावले की, आम्हाला प्लीज सोडा. आमचे काम आम्ही करतो आहोत, पण आम्हाला काही बोलायचे नाही, असे ते म्हणू लागले. या अपप्रचाराने त्यांचे इतके ट्रोलिंग सुरू झाले होते की, लोकांनी त्यांना फक्त दगडच मारायचे शिल्ल्क ठेवले होते. त्यांना समजावून शांत केले आणि हळुहळू खरे काय ते कळत गेले...

सांगलीत पूर आल्यानंतर या पटवर्धनांनी आपल्या बांधून तयार असलेल्या इमारतींमधील रिकामे फ्लॅट दुसऱ्याच दिवशी खुले केले आणि भराभर निरोप पाठवले. ही माहिती कळल्यावर हिंदूंमधल्या अनेक जातींची कुटुंबे आसऱ्याला आली. पण पटवर्धनांच्या जवळच्या नातलगानं निरोप आणला की, काही मुस्लिम घरांची अवस्था फार वाईट आहे आणि तेथे घरात उभंही राहता येत नाहीये... घरं खुली होतीच. पाच कुटुंबं आली. एकूण सदस्य 22. त्यात एक 13 दिवसांचे बाळ. पण पटवर्धन सांगतात ते तरी खरं कशावरून?

मग मी तिथं राहणाऱ्यांचा शोध घेतला. समीर रियाज मुल्ला इनामदार हे गेले अनेक दिवस कुटुंबासह तिथे राहतायंत. त्यांच्याशी बोललो. ते सांगत होते, माझ्या घरात पाचजण. आम्ही आलो. मग हळुहळू पाच कुटुंबं आली. घरं रिकामी. मग ताईदादांनी सतरंज्या आणल्या. खुर्च्या मागवल्या. गॅस नव्हता. मग दोन वेळचं जेवण. नाश्ता येऊ लागला. सगळ्यांत अवघड होतं, सादिकच्या घराचं. त्याचं बाळ तर दहा दिवसांचं. या बाळासाठी छोटी गादी करून आणली. त्याच्या दूधाची, औषधाची व्यवस्था करण्यात आली... पाणी नव्हतं. लाइट नसल्यानं टाक्या भरत नव्हत्या. मग टँकर मागवण्यात आले. आता आम्ही तिथेच थोडं शिजवतो आहेत. आमची घरं स्वच्छ झाली की जाऊ... पण हे मधले दिवस आम्हाला हा आसरा मिळाला..

बाहेर काय चर्चा चालू आहे, हे समीरला माहीत नसेल. इतरांनाही नसेल. असायची काही गरजही नाही. पश्चिम महाराष्ट्रात सारेच परस्परांच्या मदतीला धावले असल्याने यात काही जगावेगळं झालंय, असं नाही.
प्रश्न आहे तो, असत्याच्या अपप्रचाराचा. त्याला बळी पडणाऱ्या सोशल मिडियाचा. त्यात वावरणाऱ्यांचा. सोयीचं तेच सत्य मानणाऱ्यांचा. सत्याचा शोध न घेणाऱ्या मिडियात काम करणाऱ्यांचा.. स्वत:ला विचारवंत समजणाऱ्या विकृत आणि साडिस्ट लेखकांचा. खरंतर, त्यांचा निषेध करून भागणार नाही. या प्रकरणाची तड लागली पाहिजे. जरूर तर विद्वेष पसरविणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करायला हवी..

अस्मानी कोसळली असताना काहींना महाराष्ट्र नासविण्याचा आपला अजेंडा पुढे रेटायचाच आहे. तसे होऊ देता कामा नये..

(सोबतच्या छायाचित्रांमध्ये पटवर्धनांच्या इमारतींत सध्या राहणारी कुटुंबे, जैनब हे काही दिवसांचे बाळ. या बाळाची निशाद ही आई...)

(आपण हा मजकूर शेअर करू शकता..)

Pages