युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, जाड चाळणी/रोळीने चाळायचे ना. साखर खाली पडली असती, तांदूळ वर राहिला असता.. पार्टीकल साईझ हो! Happy
बरं झालं मिक्स तर एक्स-बॉसच श्राद्ध समजून करायची की तांदळाची खीर Wink
(गंमत हो, बाकी हापिसात दमून आल्यावर असे किस्से घडतात खरं...:) )

Omg prior to this job
i was my on boss !!! But will remember the next time this happens. The problem is there are 12-14 coffee bottles of same size for all kirana stuff. Recycled glass bottles mind you. At least i should remove paper labels but white stuff salt, sugar, upma rawa ,everyday milk powder ( for the said coffee), rice, idli rawa ,bhagar tandul.

अमा,
प्रत्येक बाटलीवर washi tape चिकटवून त्यावर लिहायचे ना बाटलीत काय आहे ते .
स्वगत आमच्याकडे हा उपाय पण १०० % टक्के चालतोच असे नाही. तुझे अक्षर वाइट आहे, तू ते हिंदीत/ मराठीत / तेलुगु मधे लिहिलंस ते मला वाचता आलं नाही वगैरे कारणं घरातले सर्व सदस्य एकमेकांना देतात. आता मी इडली रवा, उपमा रवा , मिरची पूड वगैरेंच्या पाकीटावरचा नावाचा भाग कापून तोच बरणीमधे टाकून ठेवते Happy

असे कसे रे तुम्ही लोक. राजेहो बाण सुटल्यावर इतकी चर्चा करत बसता.‌ बित गया सो बित गया. जर आउर तर में पडे रहने से क्या हासिल होगा?

माझ्या आजीने साखर तांदूळ मिसळले होते. थोडे थोडके नव्हेत, दोन्ही मिळून दहा किलो होते. महिनाभर कामवाली बाई आणि आम्ही सगळेजण जातायेता ओंजळभर निवडून ठेवत होतो. इतकं टाकणं सुद्धा परवडणार नव्हतं. शेवटी "आता साखरभात केला की तो संपेल" इतकंच उरल्याची आईला खात्री झाली तेव्हा तिने (बहुतेक सणवार वगैरे विशेष नसतानाही) साखरभात केला.
समाप्त.

अमा किस्सा भारीच पण हा. एका सुट्टीच्या दिवशी बरण्यांची लेबलं काढणे प्रोजेक्ट घ्या हातात. बरण्याही चकाकतील, किचन मध्ये नवीन काही दिसेल आणि मग पुन्हा घोळही होणार नाहीत.
मेधा, लेबलं बरणीच्या आत टाकून कसं काय निभतं?

किचन मधले कलर कोडिन्ग.

मिसळ णाचा डब्बा वापरत नाही कारण त्यात ठेवले की पावसाळ्यात तिखटाला बुरशी येते मुंबईत. सर्व सेपरेट बाटल्यांमध्ये.
लाल तिखट
हळद
मोहरी
जिरे
धने जिरे भाजलेली पूड
हिंग हा त्याच्याच बारक्या पांढर्‍या बा टलीत असतो.
यलो स्पेक्ट्रम तूर मूग हरबरा डाळी,
ऑरेंज बहुतेक मसूर डाळ
ऑफ व्हाइट
उपमा रवा इडली रवा, भगर वरई तांदूळ एवरी डे मिल्क पाव्डर
शुभ्र व्हाइटः मीठ साखर तांदूळ पीठ मैदा
साबुदा णा पोहे.
तांदूळ : बासमती, आंबे मोहोर , सोना मसूरी.
क णीक बेसन. ऑफ व्हाइट व यलो.

ब्रू कॉफीच्या त्रिकोणी बाटल्या आहेत. लेबल काढणे पर बाटली अर्धा तासाचे काम आहे. नॉट पॉसिबल. तुम्ही फिफ्थ एलिमें ट सि नेमा पाहिला असेल तर त्यात पृथ्वी वाचवायचे चार दगड आहे त तश्या त्या दिसतात. लेबला खाली अर्धा इंच भाग आहे तिथून कलर दिसतो.

लेबलं बरणीच्या आत टाकून कसं काय निभतं? >> पारदर्शक काचेच्या आहेत बरण्या सर्व. त्यातून दिसतं लेबल. अगदीच नाही दिसलं तर झाकण उघडल्यावर बघता येतंय. कॉर्न फ्लावर / पिठीसाखर; जाडे / पातळ पोहे ; इडली रवा/उपमा रवा; ऑल पर्पज / होल व्हीट / बाजरीचे पीठ / बेसन हे नेहमी गोंधळात टाकणारे . शिवाय मग नेहमीचे लाल तिखट, बेडगी मिरचीची पूड, मालवणी मसाला, काश्मिरी मिरचीची पूड , लोणच्याचा मसाला / हंगेरियन पाप्रिका / स्पॅनिश स्मोकड पाप्रिका यावरुन गोंधळ ठरलेला

मग आधी ठरवून बरणीत हात का घालायचा?

बरणीत हात घालून जे येते ते घ्यावे व त्याचा होईल तो पदार्थ करावा

तिखट म्हटल्यास फोडणीला टाकता येतील. बरोबर नुसते तळलेले शेंगादाणे. मी असे चुरमुर्‍याचे करते.

गोड म्हटल्यास लाडू, बर्फी.

ताकात मिसळून वरून फोड णी देउन पण झ्याक लागेल. पण हे खूप बेसिक स्नॅक आहे.

थालीपीट, पोह्यात ,गोपालकाल्यात, चिवडा, भेळ ....बारीक व हलक्या असतात कशातही बेमालूमपणे मिसळून जातात....

मी इथे का आले? तर आज अनेक दिवसांनी परत डोसा पीठ भिजवत ठेवले आहे. डाळ तांदूळ अलग. काय होते ते उद्या अपडेट देते.

ब्रेसेस लावण लय बेक्कर काम, कन्येचे चालु आहे , काहीही खायला नाही म्हणते काय द्याव? खिचडी,उपमा तिचे आवडते नाहित फारसे, इन्डियन मेनु सोडुन सुचवल तर बर होइल

मॅकरोनी चीज, सुप (टॉम थंब्ज आहे का ? भरपुर वेगळी व्हरायटी बनवतात आणि अगदी ताजे असते. ), ज्युस (प्रोटीन पावडर घालून) किंवा ट्रॉपिकल स्मुथी तत्सम काही असेल तर तिथून विकत आणुन, स्टार बक्स मधले चॉकोलेट फ्रॅपुशिनो (दुधातुन बनवितात. कॉफी नसते.) किंवा तत्सम ड्रिंक , पास्ता क्रीम घालून. मॅश्ड पोटॅटोज , राईस पुडींग, कोकोनट पुडींग (कॉस्ट्को मध्ये ऑर्गॅनिक सुरेख आहे ) जेलो, ग्रीक दही (प्रोटीन साठी), दह्याचे कोणत्याही फ्लेव्हरचे पॅक (ग्रॅनोला नसलेले), कोकोनट वॉटर, मऊ ब्रेड (सारा ली चा सॉफ्ट अँड स्मुथ व्हरायटी) बटर लावून (टोस्टेड नको) , ब्रेड अव्हाकोडा घालून , ईन्शुअर,बुस्ट ,

वरील पदार्थ (ज्युस ,सुप ) बाहेरचे (घरचे देता आले तरी चालेलच) सांगितले कारण घरी एकच चव होते. टिन एजर मुली वैतागतात. विकतच्या मध्ये जरा जास्त व्हरायटी असते. ज्युस मध्ये विटॅमिन अ‍ॅड करून देतात. शक्यतो सी किंवा डी घालून , प्रोटीन पावडर घेतली तर पोट चांगले भरते. तुम्हाला रोज घरीच करायचे असेल तर नक्कीच करा पण व्हरायाटी येईल असे बघा. हायस्कुल, मिडलस्कुल मध्ये स्पोर्ट्स वगैरे घेतले असेल तर अंगात शक्ती भरपुर लागते . अशावेळी पोटात काही नसेल तर खुप हाल होतात मुलांचे. त्यामुळ कसही करून पोट भरेल आणि कॅलरी व्यवस्थित जाईल असे पदार्थ पाहिजेत.

टिन एजर मुली वैतागतात. विकतच्या मध्ये जरा जास्त व्हरायटी असते.>> ते तर काय इचारु नकोस, आम्ही रोज बाहेरच खाउ शकतो कॅटेगरी आहे.
टॉम थब्ज नाहिये पण पानेरा आहे तिथल सुप आणून दिलय सध्या, पास्ता आणी मॅक-चिझ पण लाइन अप केलय.
स्टारबक्स चा फ्रॅपचिनोलाडका आहेच, बघ तु सुचवलेल्या निम्म्या गोष्टी तरी आवडिच्या आहेतच पण कधीकधी ना सुचत नाही त्यात शाळा पण नुकतिच सुरु झाली,
प्रोटीन पावडर इज न्यु आम्ही ट्राय नाही केलाय , कोणती आणायची? किड्स्/टिन वेगळी असते का?

राईस पुडींग, कोकोनट पुडींग (कॉस्ट्को मध्ये ऑर्गॅनिक सुरेख आहे ) जेलो, ग्रीक दही (प्रोटीन साठी), दह्याचे कोणत्याही फ्लेव्हरचे पॅक (ग्रॅनोला नसलेले), कोकोनट वॉटर, मऊ ब्रेड (सारा ली चा सॉफ्ट अँड स्मुथ व्हरायटी) बटर लावून (टोस्टेड नको) , ब्रेड अव्हाकोडा घालून , ईन्शुअर,बुस्ट ,>>> हे सगळ( तिला इचारुन)आता लाईन अप करते.
स्पोर्ट्स म्हणजे डान्स करते त्यातही माइल-२ माइल पळवतात रोज

राजगिर्‍यांच्या लाह्यांचा हा एक प्रकार करून पाहा (बहुतेक अल्पना नी दिलाय; कुठल्यातरी तिच्याच धाग्यावर प्रतिसादांमध्ये आहे; मीठा सियोल/खारा सियोल म्हणतात बहुधा) - राजगिर्‍यांच्या लाह्या ताकात भिजवून घ्यायच्या; दाटसर खीर टाईप. ताकामध्ये आपल्या चवीचा हवा तो मालमसाला घालायचा - मिरची ठेचून/मीठ/जिरेपूड/सैंधव/मीरीची पूड/पुदिना/कोथिंबीर इ.
मी एकदोनदा केलं आहे आहे हे. मस्त लागतं चवीला. Happy

उडदाची डाळ 1 कि. आणि उकडा तांदूळ 2 कि. असं एकत्र दळून आणलं. नेहमीप्रमाणे पीठ भिजवलं. रात्रभर ठेवलं. सकाळी डोसे केले. पण असे चिकटायला लागले तव्यावर..! निघेचना....पुन्हा त्यात रवा पण घालून केले. तरी निघेना..
शेवटी मग ढोकळे केले.
आता एवढं पीठ दळून आणलेलं आहे. त्याचं काय करावं?
पुन्हा डोसे करायचे असतील तर प्रश्नच पडला. हे पीठ भिजवावं का?

पेपर डोसे पीठ नुसता उडीद भिजवून वाटून आणि त्यात सम प्रमाणात नुसता रवा मिसळून छान होतं.तांदूळ मिसळले तर घावन/उत्तप्पा लूक येतो.
इथे डोसे चिकटत आहेत म्हणजे उडीद जास्त झालाय.
या उरलेल्या पिठात आलं लसूण मिरची कोथिंबीर वाटण मिसळून आप्पे मस्त होतील.आप्पे पात्रात सुरुवातीला नीट तेल, व्यवस्थित तापू देणे. मिश्रण टाकल्यावर वरून झाकण ठेवणे, नाहीतर खालचा लेयर जास्त होऊन मध्ये पातळ लिक्विड राहील.
पिठात उडीद जास्त आहे.खोबरं मिरची वाटण घालून वडे तळून नंतर पाण्यात घालून पिळून दही वडे पण भन्नाट लागतील
(मी येऊ का पीठ विकत घ्यायला ☺️ दही वडे मूड आहे पण काल ऑफिस असल्याने काहीच तयारी केलि नव्हती)

मी अनु.. तुम्हाला नाशिक ला यावं लागेल पीठ घ्यायला Happy
मी आणखी पीठ नाही तर रवा घालून डोसे करून बघेन.

आता एवढं पीठ दळून आणलेलं आहे. त्याचं काय करावं? >> तव्यावर सढळ हाताने तेल घालून चांगले तापवून घ्या. त्यावर भिजवलेले पीठ साधारण अर्धा इंच लेयर होईल एवढे ओता. लगेच आच मंद करुन , झाकण ठेवून खरपूस भाजू द्या.५-७ मिनिटे लागतील. मग वरच्या बाजूवर अजुन थोडे तेल घालून, पलटवून परत मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. काकवीबरोबर, मधाबरोबर, किंवा कुठल्याही आवडत्या चटणीबरोबर सर्व्ह करा. आमच्याकडे आवडता ब्रेकफास्ट आयटेम आहे . आवडत असल्यास पीठात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची , आले असे घालू शकता.

उडदाची डाळ 1 कि. आणि उकडा तांदूळ 2 कि. >>>>हे कसे दळून आणायचे,एकत्र,सरसरीत की जरासे जाडसर?
फक्त डोसे ,की इडल्या पण करू शकतो?

Pages