विरह..

Submitted by मन्या ऽ on 1 August, 2019 - 03:18

विरह..

चंद्र-तारकांनी भरलेले आभाळ हे आज
रिते आहे
मनातल्या विचारांचे
मळभ हे आज
आभाळातही दाटले आहे

तुझ्यासवे जगायचे होते
आयुष्य हे सारे
आणाभाका- वचनंही
दिलेली एकमेकांस
ते सारे धुक्यात
आज विरले आहे

आषाढघन होऊन
तु बरसुन गेलास
मनात नव्या जाणिवा
पेरुन गेलास
त्याच जाणिवांआधारे
जगते आहे
पण आता मी एकटी
कमी पडते आहे
दिले वचन मोडते आहे

परतीच्या वाटा
बंद करुन
पुन्हा माघारी
वळते आहे
अश्रु असतील
तुझ्याही नयनांत
माझे ह्रद्यही
आक्रोश करत आहे

आता माझ्या
मनावर बुद्धीचे
राज्य आहे; केल्या
परतीच्या वाटा बंद
पण,
एक नवा आशेचा
सुर्योदय होत आहे
आज विलगलेल्या
आपल्या वाटा
पुन्हा एक होतील
अशी मनात आशा आहे

(Dipti Bhagat)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर

श्वेताताई>> दरवेळी तोच प्रश्न! Lol

अक्की>>पुढच्यावेळी अजुन चांगल लिहिण्याचा प्रयत्न करेन. Happy

सिद्धि, सुपु, उर्मिला, डॉ.विक्रांत प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy

Chhan kavita.

आनंद, श्रद्धा, चेतन, प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy

चंद्रभान, बदल केला आहे. प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy

छान...

बरी आहे. Lol

Submitted by Akku320 on 1 August, 2019 -
डबल प्रतिसाद? विसरले होते की काय.

विरह.....
छान मांडलाय कवितेतून.