तुझ्या आठवांचं संचित
'आपल्या' असणाऱ्या सगळ्या क्षणांच्या
मऊशार अशा रेशमी रुमालात गुंडाळून
माझ्या मनाच्या
खोल, अंधाऱ्या तळघरात
जपून ठेवलंय मी
युगानुयुगं
शरीर जीर्ण झालं असलं
तरी त्या क्षणांवर एक
सुरकुती हि नाही
का त्या आठवांवर
कुठलेही तरंग उठलेले नाहीत
अंतरीची भळभळती जखम
सातत्याने वाहतेय
नव्यानं तयार होणारं रक्त
त्या तळघराच्या जमिनीला
अखंड ओलावा देतंय
हृदयाच्या भिंतींना
अजून हि चिरा गेलेल्या नाहीत
पण त्यावर काही युगांची पुटं मात्र
आता चढू लागलीयत
मनाच्या तळघरात
गर्दी वाढतेय
अन त्या तळघराच्या गर्भात
वेदनाचे श्वासोच्छ्श्वास
स्पष्ट होऊ लागलेत
त्या वेदनेची स्पंदनं
माझ्या जीर्ण मनगटावर
सातत्याने ठोठावतायत
अनंत काळ एका पोकळीत काढलेल्या
ह्या माझ्या शरीराचे
एकसंध असणे
आता नश्वर होऊ लागले आहे
ज्या चिरा मनावर उमटल्या नाहीत कधी
त्यांचे धूसर अस्तित्व
माझ्या असण्याच्या
ह्या सगळ्यात वरवरच्या थरावर
जाणवू लागले आहे
माझ्या वेदनांच्या विषवेली
भेगांमधून ज्या अंकुरतील आता
रक्तवर्णी, लोभस
प्राजक्त होऊन!
छान
छान