Submitted by प्रतिक सोमवंशी on 22 June, 2019 - 08:01
बघ कुठेतरी काहीतरी राहून गेलय...
एक एक क्षण हातातून निसटून जातोय...
तुझाही प्रवास असाच सगळ्यांसारखा...
अनंताकडून अनंताकडे...
काय कमावलस? काय गमावलस?
याच्या हिशोबात पडू नकोस...
तुझ गणित अजूनही कच्चच आहे...
बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार,
इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, ट्रीग्नोमेट्री,
क्वांटम फिजिक्स, सेलेस्टीअल मेकॅनिक्स,
कॉस्मोलॉजि, अस्ट्रोलॉजि,
न्यूटनचे, डार्विनचे, पायथागोरसचे कोणतेही सिद्धांत लावलेस तरी...
शेवटी ‛शून्य’च उरणार...
वरच्या शंकूतील वाळू खालच्या शंकूत
अशीच हळू हळू निसटत जाणार...
.
तुला नाही जमणार,
तुला काय कुणालाच नाही जमणार...
त्याला थांबवून धरायला...
.
‛काळ’ अनंत आहे...
.
तू फक्त आहे तो क्षण जगून घे...
बेफिकीर होऊन, बेफान, बेधुंद जगून घे...
.
नको इतका विचार करुस...
.
माझ ऐक , “केक कापून घे? खूप उशीर होतोय”
.
©प्रतिक सोमवंशी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काहीतरी कवितेत गुढ गंभीर
काहीतरी कवितेत गुढ गंभीर वाचयला मिळतंय असा भास झाला.
माझ ऐक , “केक कापून घे? खूप
माझ ऐक , “केक कापून घे? खूप उशीर होतोय
फूल हुंगून घे ,सुकून जाईल ...बघता बघता
छान कविता
Nice Pratik....
Nice Pratik....
सुंदर वाचनीय कविता.
सुंदर वाचनीय कविता.
सुंदर वाचनीय कविता
सुंदर वाचनीय कविता
कवितांच्या जिलब्या पाडीत बसू
कवितांच्या जिलब्या पाडीत बसू नकोस.
थोडं खाऊन घे. थोडं पिऊन घे.
समोरचा केक कापून घे.
बाकी दोन दिवसांनी कोण वाचणार
नाही तूझी कविता.
बाकी शुन्य राहणार आहे.