Submitted by प्रतिक सोमवंशी on 23 June, 2019 - 11:35
काल मी तिच्यासमोर ठेवून दिली
मी लिहिलेली काही पाने
मागच्या काही महिन्यात लिहिलेली
तिच्या ओठांवर लिहिलेल्या चारोळ्या
तिच्या पाठीवर लिहिलेल्या कविता
अन तिच्यावर लिहिलेल्या गजला
तिच्या केसांत गुंफलेली त्रिवेणीही होतीच
त्या फक्त ओळी नव्हत्या , प्रत्येक ओळ ती स्वतः होती
कशीही का असेना पण माझी होती
कित्येक मैफिली गाजवल्या होत्या मी
त्या ओळींवर, तिच्या जीवावर
तिने पान उचलले, ती वाचू लागली
माझी नजर तिचे भाव टिपू लागली
तिने हळूच एक भुवई वरती केली
एक उसासा टाकला,
पान खाली ठेवून दिल
“मैफिली गाजवून पोट भरत नसत?” -ती
©प्रतिक सोमवंशी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख! कवितेतली ती शेवटी खुपच
सुरेख! कवितेतली ती शेवटी खुपच practical विचार करणारी दाखवलीये.
मैफिली गाजवून पोट भरत नसत?”
मैफिली गाजवून पोट भरत नसत?” -ती
इतक्या छान कवितेत या ओळीने रसभंग झाला. मला वाटलं होतं ती रमणी रसिकासारखी दाद देईल. नी शृंगारिक सुखांत होईल...
मला अश्या क्लायमॅक्स असलेल्या
मला अश्या क्लायमॅक्स असलेल्या कविता खूप आवडतात, एका ओळीत भावना बदलून जातात
प्रतिक अनुमोदन तुम्हाला.एका
प्रतिक अनुमोदन तुम्हाला.एका क्षणात भावनांवर वास्तव विजय मिळवतं.
मन्या तूला माझा प्रतिसाद
मन्या तूला माझा प्रतिसाद खोडायचा होता काय? ही खोड बरी नव्हे.
वास्तविकता नेहमीच बोचते
वास्तविकता नेहमीच बोचते
शेवटची ओळ बेहद्द आवडली,
शेवटची ओळ बेहद्द आवडली, नाहीतर आहेच नेहमीप्रमाणे,
"आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं."
आवडलं.
सनम तूम जहाँ हम भी वहॉं, पिछे
सनम तूम जहाँ हम भी वहॉं, पिछे खिचे चले आते हैं.
क्यू भै?
हमको तुमसे इष्क हो गया है.