Submitted by प्रतिक सोमवंशी on 19 June, 2019 - 13:31
कागदावरच्या शाहीचे डाग आता सुकले आहेत
माझ्या गजलेचे काही शेर मुद्दाम चुकले आहेत
आम्हा भुकेचे व्याकरण भूक लागल्यावर कळत नाही
भुकेल्या पोटापुढे पोरं अक्षरांना मुकले आहेत
बागेमध्ये बसलेली कित्येक पाखरं प्रेम करतात
त्यांच्या अमर नावांमुळे कित्येक खोडं दुखले आहेत
मी काय म्हणतो, तुम्हाला कश्याला तो गुलाब हवा?
त्याच गुलाबाच्या नादात किती काटे रुतले आहेत?
स्वप्न सारी दाखवून ते मत घेऊन गेले होते
सांगा तर निवडून आल्यावर ते कुठे खपले आहेत?
©प्रतिक सोमवंशी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक एक ओळ रुतली...
एक एक ओळ रुतली...
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!
सुरेख!
सुरेख!
चांगली आहे. शाही कि शाई?
चांगली आहे. शाही कि शाई?
कागदावरची शाही, सरकारी
कागदावरची शाही, सरकारी दस्तऐवज साठी घेतलाय