Submitted by अ'निरु'द्ध on 18 June, 2019 - 09:48
![aryanakeshwar](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2021/05/05/aryanakeshwar.jpg)
आडरानी दाट
भग्न शिवालय
उध्वस्त पाषाण
तयाचेही...
खुल्या प्रांगणात
सोसे उन्ह ताप
नंदी पाषाणाचा
धष्टपुष्ट...
पसरी आवारे
पाला नि पाचोळा
सुखे विहरती
नाग सर्प...
वन्य श्वापदांचा
अवचित डेरा
वाघाचाही फेरा
कधिमधी...
कधी काळी कोणी
एखादा पांथस्थ
आणिक भाविक
तुरळक...
योगी साधकांचा
कधी पदस्पर्श
परी अशा वेळा
कवचित...
गाभारी विलसे
सदा ही अंधार
जागे गूढ भाव
अंतरीचा...
परि रोज एक
दिवटी ती तेवे
तिजला पेटवे
कोण जाणे...
अशा त्या काळोखा
भेदी तो प्रकाश
भासवोनी त्यास
गूढगर्भ...
परि साधकासी
नसे भय चिंता
जागे आत्मज्योत
अंतरंगी...
माथा मी टेकिता
आरण्यकेश्वरा
वाहे डोळा पाणी
अनिरुद्ध... !!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सुंदर!
खुप सुंदर!
क्या बात है.
क्या बात है.
अगदी चित्र रेखाटलय जणू.
अरे फोटोही आहे की. मी नंतर
अरे फोटोही आहे की. मी नंतर पाहिले. कविता वाचुन जे चित्र डोळ्यापुढे उभे राहीले अगदी तसाच आहे फोटो.
मन्या ऽ पहिल्या वहिल्या
मन्या ऽ पहिल्या वहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
शाली तुमचेही धन्यवाद..
आज लेखन पहिल्यांदाच मोबाईलवरुन केलं त्यामुळे Google Photos ची फक्त लिंकच देऊ शकलो. (एरवी लेखनाचा धागा लॅपटॉप वरुन करतो. तिथून मला Embeded Link देता येते.)
दरम्यान मायबोली वरुन फोटो दिला आहे..
आता पहातो, ठेवायचा कि काढायचा..
अप्रतिम गूढगंभीर वर्णनात्मक
अप्रतिम गूढगंभीर वर्णनात्मक सुंदर कविता!
आवडली.
सुंदर. वर्णन तंतोतंत
सुंदर. वर्णन तंतोतंत डोळ्यासमोर आलं.
सुरेख रचना!
सुरेख रचना!
अहाहा! सुरेख ! डोळ्यासमोर
अहाहा! सुरेख ! डोळ्यासमोर चित्र उभे राहीले. निरु, मला तर बैजुबावरा आठवला. अशीच ब्लॅक अँड व्हाईट पार्श्वभूमी, अध्यात्माने ओथंबलेली गाणी. सुंदर आहे कविता. एर्हवी कविता म्हणल्या की त्या डोक्यावरुन पळतात, म्हणून उशिरा बघीतली. पण सत्कारणी लागली.
सुंदर दृश्यमयी कविता!!
सुंदर दृश्यमयी कविता!!
हा गुण अज्ञात होता
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेखच!! आवडली.
सुरेखच!! आवडली.
हा गुण अज्ञात होता>>++१११
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम, गूढगंभीर वर्णनात्मक
अप्रतिम, गूढगंभीर वर्णनात्मक सुंदर कविता! >>>+99![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
महाश्वेता, 'सिद्धि', हर्पेन,
महाश्वेता, 'सिद्धि', हर्पेन, साधना, anjali_kool, प्रांजलीप्रानम, आणि शशांकजी....
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार..
@ रश्मी.. बैजुबावरा खूप लहानपणी बघितला होता, कृष्णधवल टी.व्ही. वर..
विशेष आठवत नाही, पण आता बघणे आलेच...
अभिप्रायाबद्दल धन्यवाद _/\_
सुंदर
सुंदर
डॉ.विक्रांत...
डॉ.विक्रांत...
अभिप्रायाबद्दल धन्यवाद _/\_
खरंच सुंदर .. सगळं हुबेहूब
खरंच सुंदर .. सगळं हुबेहूब डोळ्यासमोर तरळलं... !
@ मनापासून
@ मनापासून
प्रतिसादाबद्दल आभार....
Farach sajiv kawita...
Farach sajiv kawita... Khup awadali
चित्रमय कविता.
चित्रमय कविता.
मस्त , चित्र डोळ्यासमोर उभं
मस्त , चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.
सुंदर चित्रकविता
सुंदर चित्रकविता
नजरेसमोर दाविता
देवालयाची दिव्यता
असे परी
निरु तुझा होत भास
साधक एक ज्यास
आत्मज्योत तेवण्यास
साधले असे
सुंदर.
सुंदर.
सुरेख! फोटो दिसला नाही पण
सुरेख! फोटो दिसला नाही पण तरीही मंदिर दिसलं..
वा ! काय सुंदर वर्णन, शिवालय,
वा ! काय सुंदर वर्णन, शिवालय, आजुबाजुचा परिसर आणि उतरलेले भाव. मनस्पर्शी चित्र!
सायु, सामो, मनीमोहोर, सर्वेश
सायु, सामो, मनीमोहोर, सर्वेश के, मानव पृथ्वीकर, mi manasi, _तृप्ती_
उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार...
चित्रदर्शी कविता
चित्रदर्शी कविता
गूढ, घनगंभीर....
शिव तत्वाचा अंश जाणवणारी
शिवोsहं शिवोsहं
ओंम् नमः शिवाय
ॠतुराज, मनःपूर्वक धन्यवाद..
ॠतुराज, मनःपूर्वक धन्यवाद..
(No subject)
कवितेत दिलेले प्रकाशचित्र दिसत नाही म्हणून बऱ्याच जणांनी कळवलं, म्हणून तिच प्रतिमा प्रतिसादात डकवत आहे...
(मला गुगल क्रोम मधे कवितेखाली दिसते पण फायर फाॅक्स मधे दिसत नाहीये..)
सुंदर कविता
सुंदर कविता
निलाक्षी, प्रतिसादाबद्दल आभार
निलाक्षी, प्रतिसादाबद्दल आभार...
Pages