Mrs. मुख्यमंत्री - mrs mukhyamantri

Submitted by DJ.. on 14 June, 2019 - 02:54

झी मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येत आहे. Mrs.मुख्यमंत्री असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत कोणाची भूमिका असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण मालिकेच्या नावावरुन प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेचं नाव Mrs.मुख्यमंत्री असलं तरी ही मालिका कोणत्याही राजकीय व्यक्तीशी किंवा राजकीय घटनेशी संबंधित नाही.

ही मालिका २४ जुन पासुन प्राईम टाईम स्लॉट मधे संध्याकाळी ७ ते ७.३० वाजता झी मराठी वर प्रसारीत होईल त्यासाठीच हा धागा..! Bw

mrs mukhyamantri

mrs cm.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालंच प्रोमो पाहिला, मुख्यमंत्रीणबाई काल गाडीतुन उतरुन म्हशी हाकताना दिसल्या.

कालंच प्रोमो पाहिला, मुख्यमंत्रीणबाई काल गाडीतुन उतरुन म्हशी हाकताना दिसल्या.>>>
मारा कपाळावर हात!

कालंच प्रोमो पाहिला, मुख्यमंत्रीणबाई काल गाडीतुन उतरुन म्हशी हाकताना दिसल्या.

Submitted by Swara@1 on 14 June, 2019 - 03:03>> हो ना आणि ती बाई अतिशय चुकीचा उच्चार करत म्हशी हाकत आहे.. अ‍ॅक्चुअली म्हशी हाकताना "हाSSल्या हैक... अंय हाSSSSल्या.." असं जोरात हेल काढुन ओरडावं लागतं तेव्हा कुठं म्हशी आपलं ऐकतात..(हे स्वानुभवावरुन सांगतोय.. लहाण्पणी सुट्टीत म्हशी राखायचो ती आठवण आली..!) आणि ही नवीन बाई काय्च्या काय प्रोनाउन्स करतेय अशानं रस्त्यावरची कुत्री पण हलायची नाहीत..! झी वाल्यांनी खरेतर त्या-त्या भागातील भाषा बोलणारे/जाणणारे प्रोम्टर्स ठेवले पाहिजेत म्हणजे अशा चुका होणार नाहीत.

का एवढ्या घाईत काढला धागा>> काल प्रोमो दिसला म्हणुन काढला.. Proud

नवीन Submitted by DJ.. on 14 June, 2019 - 03:12 >>>>
दिसला प्रोमो कि कधी धागा. हा... हा हा हा ...
shrug-796x398.png

Mrs मुख्यमंत्री पेक्षा mrs कलेक्टर किंवा Mrs engineer,किंवा कोणत्या ही मध्यम वर्गातील
Mrs var mast serial झाली असती .
शोभत नसताना कपड्यांची फॅशन दाखवता आली असती .
स्वतः खूप श्रीमंत आहे आशि समजूत करून समाजात स्वतःचे हसे करून घेणे हे दाखवता आले असते .
परवडत नसून सुधा अती श्रीमंत लोकांचे जीवन जगण्याचा दुर्बल प्रयत्न आणि अट्टाहास दाखवता आला असता .
खूप मसाला मिळाला असता story la

Mrs मुख्यमंत्री ह्या वर काही दाखवता येणार नाही .
Cm असतो तो व्यक्ती फक्त खूप चालू असतो .
स्वतःच्या स्वार्थ पुढे बायको हा विषय गौण असतो .

अरेचय्या खरी खरी सिरीयल आहे होय,
मला वाटले खऱ्या mrs मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्या बद्दल review असेल....

बहुधा Mrs. मुख्यमंत्रीच्या भूमिकेत अमृता धोंगडे आहे. झी मराठीच्या अधिकृत फेसबूक पानावर तिचे व तेजस बर्वे (झी युवावर जिंदगी नाॅट आऊट ह्या मालिकेत होतकरू क्रिकेटपटूची मुख्य भूमिका बजावली होती) ह्यांची नावे टॅग केली आहेत.

अरेचय्या खरी खरी सिरीयल आहे होय,
मला वाटले खऱ्या mrs मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्या बद्दल review असेल....

Submitted by सिम्बा on 14 June, 2019 - 04:49 >> नाही नाही.. खर्‍या मुख्यमंत्रीण बाईंबद्दल नाही हा धागा... घ्या म्हणावं मनसोक्त फिरुन.. ६ महिन्यानंतर दुसरीला चान्स मिळेल बहुतेक..! Wink

मला तर शितलीची बहिणच वाटली. सुरवातीला चांगला वाटला प्रोमो पण बाई गाडी बाहेर आल्या आणी माती खाल्ली.

कालंच प्रोमो पाहिला, मुख्यमंत्रीणबाई काल गाडीतुन उतरुन म्हशी हाकताना दिसल्या.>>>
मारा कपाळावर हात!

Submitted by महाश्वेता on 14 June, 2019 - 12:34>>>>>> Rofl
मी कपाळावर बुक्क्या मारल्या Proud Proud

Rajesh188,

व्वा. तुम्हाला छान कल्पना सुचताहेत. तुम्हीच काढा ना सिरियल!!
आता तुमच्या कल्पना चोरून तेच याहि सिरियलवर दाखवतील. जोपर्यंत माझ्या नवर्‍याची बायको सिरियल कुठल्यातरी चॅनेल वर अजून सुरु आहे, तोपर्यंत काहीहि दाखवले तरी बघणारे लोक मिळतीलच.

मला तर शितलीची बहिणच वाटली. सुरवातीला चांगला वाटला प्रोमो पण बाई गाडी बाहेर आल्या आणी माती खाल्ली.>>>> हो, मला पण तसेच वाटले, पण शीतली सुंदरच दिसते हिच्या मानाने. त्या लागीरं झालं च्या ऐवजी ती भंगार तुजीरं बंद करायला हवी होती. Angry

अगं नाहीतर काय सस्मित. तुजीरं म्हणजे तुझ्यात जीव रंगला. तो अती माठ, मंदबुद्धी, गुढघ्यात मेंदु असलेला पैलवान बैलोबा राणा, वहिनीच्या सांगण्यावरुन नसबंदी करुन घेतो. बायकोला कधीच काही सांगत नाही, तिला विश्वासात घेत नाही. हा भुक्कड स्वतः खोटे बोलतो तर बोलतोच पण अंजलीने काही केले की लग्गेच अंजलीबाई तुम्ही असं वागायला नको होतं !

का रे बैला, तू वहिनीच्या तालावर नाचतो अस्वलासारखा, पण बायकोला काहीच अधिकार नाहीत? धन्य आहे त्या निर्मातीची आणी लेखकाची. वरतुन हे बधीर कलाकार ! Angry

हो हो रश्मी.
माझ्या तर असला डोक्यात जातं राणाचं कॅरेक्टर. बैल!!!
तुजीरं च फुफॉ आठवत नव्हतं मला Lol

Proud हो, हे लागिरं आणी ते तुजीरं . कयामतसे कयामत तक पासुन हा शॉर्ट फॉर्मचा ट्रेंड चालू झाला बहुतेक. कयामत से कयामत तक (QSQT) आणी पार जुने म्हणजे माझ्या वडलांनी सांगीतलेले. त्यांना त्यांच्या मित्राने विचारले की तू जप्प्याकिहो पाहीलास का? तर त्यांना काहीच कळेना, मग मित्र म्हणाला की जप्प्याकिहो म्हणजे जब प्यार किसीसे होता है.

डिजे, आता तुम्ही या शॉर्ट फॉर्मस वर एक नवीन धागा काढा विरंगुळा मध्ये. Proud

मला तर शितलीची बहिणच वाटली. >>>>>>>> मला ती आधी दिप्ती भागवत वाटली.

तुजीरं म्हणजे तुझ्यात जीव रंगला. >>>>>>>> मध्यन्तरी अन्जली राणाला आपल्यात इण्टरेस्ट वाटावा म्हणून त्याला रिझवण्याचा प्रयन्त करते असा प्रोमो बघितला होता.

तो अती माठ, मंदबुद्धी, गुढघ्यात मेंदु असलेला पैलवान बैलोबा राणा, वहिनीच्या सांगण्यावरुन नसबंदी करुन घेतो. >> गो बाय माजे...! Uhoh राणादाने 'हे' कवा केल्यान..??

डिजे, आता तुम्ही या शॉर्ट फॉर्मस वर एक नवीन धागा काढा विरंगुळा मध्ये. >> अहो रश्मी वैनी, मला त्या शॉर्टफॉर्म मधलं काही कळात नाही बघा..

तुझ्यात जीव रंगला,
माझ्या नवऱ्याची बायको.
चला हवा येवू ध्या अतिशय बकवास मालिका आहेत ताबडतोप बंद केल्या पाहिजेत .
राणा चे पात्र तर अतिशय मूर्ख आहे किळस वाटते त्या रणाची आणि तसे पात्र उभ्ये करणाऱ्या लेखकाची .
नवऱ्याची बायको म्हणजे मुरखांचा बाजार आहे अतिशय राग येतो सर्व पात्रांचा

Pages