Submitted by DJ.. on 14 June, 2019 - 02:54
झी मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येत आहे. Mrs.मुख्यमंत्री असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत कोणाची भूमिका असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण मालिकेच्या नावावरुन प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेचं नाव Mrs.मुख्यमंत्री असलं तरी ही मालिका कोणत्याही राजकीय व्यक्तीशी किंवा राजकीय घटनेशी संबंधित नाही.
ही मालिका २४ जुन पासुन प्राईम टाईम स्लॉट मधे संध्याकाळी ७ ते ७.३० वाजता झी मराठी वर प्रसारीत होईल त्यासाठीच हा धागा..!
mrs mukhyamantri
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुळात अशा मुर्ख बायांचे काम
मुळात अशा मुर्ख बायांचे काम करायला या स्रिया का तयार होतात, केवळ पैसा व टिव्हीवर दिसण्याची हौस म्हणून? बिनडोक, बथ्थड असतात मुळी. मला तर खूप संताप येतो.
काल कुणी पाहिला का फर्स्ट अ
काल कुणी पाहिला का फर्स्ट अॅपिसोड..? मला ओझरता बघायला मिळाला... सातार्याकडचीच सिरिअल वाटतेय.
काल कुणी दुसरी बाई (प्रोमो मधली भावी सी.एम. ची बायको असेल कदाचित..!) एक्स-सी.एम. ची बायको दाखवली.. तिची अॅक्टिंग भारी वाटली.
या सिरिअल मधे ओळखीचे कलाकार दिसले नाहीत..
नवीन प्रोमो बघितला. हिरो
नवीन प्रोमो बघितला. हिरो पायलट आहे वाटत.
हिरोची निवड अतिशय चुकिची
हिरोची निवड अतिशय चुकिची वाटली... हिरवीणने त्याला अक्षरशः खाऊन टाकले आहे.. शेळमट कुठचा..!
हिरोची आई भारी अॅक्टिंग करतेय.. नवीन कलाकार आहेत.. कोणीही ओळखीचं वाटत नाही..
धागा काढलाय म्हणल्यावर सुरू
धागा काढलाय म्हणल्यावर सुरू ठेवायची जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. असं कसं.
हिरो आधीही पाहिल्यासारखा
हिरो आधीही पाहिल्यासारखा वाटतोय. झी युवा वर. कुठली क्रिकेटवर सिरेल होती त्यात.
हो.. तोच आहे तो..
हो.. तोच आहे तो..
अरे वा! माझ्या लक्षात आहे!
अरे वा! माझ्या लक्षात आहे!
कैच्याकै दाखवतात राव झीमवाले.
कैच्याकै दाखवतात राव झीमवाले. काय ती बया आदळआपट करते कशाला मुख्यमंत्र्याची बायको व्हायला?
360 रुपयांसाठी सुमी गोंधळ घालते तो तरी खरा वाटतोय. बयाच्या विनाकारण आदळआपटीपेक्षा.
सुमी किती वटवट करते. अखंड
सुमी किती वटवट करते. अखंड बोलत असते. कशात होता तो हिरो आधी. जिंदगी नॉट आऊट मधला मेन लीड का. पण तो तर घाऱ्या डोळ्याचा होता ना. ही बया कोण.
हो तोच तो जिंदगी नॉट आउट वाला
हो तोच तो जिंदगी नॉट आउट वाला.. काय ते रुप.. काय ते ध्यान..पेठेतल्या शिरेलीत दिसला असेल बरा. पण गावाकडाच्या मातीत हा असला घारा-गोरा -शामळु हिरो कधी असतो का..?
महाराष्ट्रात मध्ये आता
काही तरी दर्जा असावा ना
गाडी chya bonat वर कोण्ही सांडगे वाळत घालत ka
महाराष्ट्रात मध्ये आता
महाराष्ट्रात आता
पर्यंत अत्यंत हुशार मुख्यमंत्री होवून गेलेत आणि त्यांच्या सहचारिणी सुधा अत्यंत हुशार होत्या.
आताचे आपले cm आणि त्यांच्या पत्नी सुधा
उच्याविध्याविभुशित आहेत .
त्या महाराष्ट्र chya मराठी भाषेत असली टुकार मालिका काढायची ह्यांची हिमंत कशी होते.
मराठी स्त्रिया ना आणि मराठी माणसांना हे मूर्ख समजतात काय .
शासनाने अशा मालिका वर तत्काळ बंदी आणावी
कलाकारांनी सुधा पैसे मिळतात
कलाकारांनी सुधा पैसे मिळतात म्हणून काही ही भूमिका करू नये .
थोडी तर लाज बाळगावी
राजेश भाऊ आपण दोघे आंदोलन करू
राजेश भाऊ आपण दोघे आंदोलन करू या का? कुठं टाकायचा तंबू आझाद मैदान, मंत्रालयासमोर, गेट वे ऑफ इंडिया की आणखी कुठं? सोबत रास्ता रोको करु.
मध्ये सुधा असाच मराठी सिनेमा
मध्ये सुधा असाच मराठी सिनेमा आला होता भरत जाधव चा.
कोणत्या basis वर हे महाराष्ट्र chya मुख्यमंत्र्याची प्रतिमा ठरवतात
राजेश भाऊ आपण दोघे आंदोलन करू
राजेश भाऊ आपण दोघे आंदोलन करू या का? कुठं टाकायचा तंबू आझाद मैदान, मंत्रालयासमोर, गेट वे ऑफ इंडिया की आणखी कुठं? सोबत रास्ता रोको करु.
आंदोलने आणि रस्ता रोको करून त्यांची जाहिरात होईल .
त्या पेक्षा त्यांचा टीआरपी लुडकला की serial आपोआप बंद होते
ओके आपण या वेळेत साऊथ इंडियन
ओके आपण या वेळेत साऊथ इंडियन सिनेमे पाहुयात.
हीरोला वडील नसतात का. आई काय
हीरोला वडील नसतात का. आई काय करत असते. राजकारणात कोणत्या पदावर आहे आई. स्वार्थी मामा मामी नेहेमीचा ट्रॅक.
आहेत ना हिरोला वडिल. तो सतत
आहेत ना हिरोला वडिल. तो सतत घाबरणारा माणुस हिरोचा बाप!
हिरोची आई म्हणजेच ती आदळापट करणारी बया. ती तिचा नवरा मुखयमंत्री व्हावा यासाठी प्रयत्न करतीये.
ही सिरीयल zee 5 वर धावत धावत
ही सिरीयल zee 5 वर धावत धावत बघितली.
ते माजी मुख्यमंत्री आहेत ते कसे झाले सात दिवस तरी आधी, आश्चर्य आहे. त्यांची बायकोच chapter असली तरी करारी वाटते, राजकारण करणारी. तिनेच स्वप्न बघायला हवं मुख्यमंत्री व्हायचं. अशा नवऱ्याला का करतेय.
नायिका मस्त आहे, थोडी आगाऊ, मोकळी, बिनधास्त, मेहेनती असं charactor आहे. काम छान केलं आहे अमृताने, एकदम सहज. काही काही ठिकाणी कॉमेडी छान आहे सिरीयलमध्ये. हिरोपण छान आहे पण काम जास्त छान हिरॉईन करते.
ती नायिका तिच्या बाबांना नीट कपडे का नाही घेत. जुगार खेळत असले तरी फाटकी बनियन का नेहेमी, खटकतं ते.
मी zee tv काढून टाकलं केबलवरून त्यामुळे नेटवर बघितली.
हो ना, ती बाई स्वतःसाठी का
हो ना, ती बाई स्वतःसाठी का नाही प्रयत्न करत. हिरो अगदीच वरणभात वाटतो आणि हिर्विण झणझणीत रस्सा. सुमिला मेकअप नाही करत का. बरोबर आहे ते पण ती फारच काळी आणि कशीतरी दिसते, नंतर मेकअप करेल कदाचित. दमिनीची सुरुवात अशीच होती का, नक्की आठवत नाही. तसा बऱ्याच मालिका आणि चित्रपटात वापरला आहे हा फॉर्म्युला.
ते माजी मुख्यमंत्री आहेत ते
ते माजी मुख्यमंत्री आहेत ते कसे झाले सात दिवस तरी आधी, आश्चर्य आहे. त्यांची बायकोच chapter असली तरी करारी वाटते, राजकारण करणारी. तिनेच स्वप्न बघायला हवं मुख्यमंत्री व्हायचं. >> हो ना.. मला तर त्या हिरोच्या आईमधेच मुख्यमंत्री होण्याचं पोटेंशिअल ठासुन भरलेलं दिसतं.. अॅक्टिंग पण छान करते.
त्या नायकाची आई दाखवली आहे ती
त्या नायकाची आई दाखवली आहे ती अभिनेत्री आणि सोनी मराठी वरील ती फुलराणी मालिकेतील मंजूच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री सेम आहेत असं वाटतंय... At a Time दोन वेगवेगळ्या चॅनेल्सवर काम करता येतं का??? म्हणजे contract असेल ना काही?
लीड रोल नसेल तर करता येत असेल
लीड रोल नसेल तर करता येत असेल. बावरे मधली सानवि पण फुलराणी मध्ये आहे. रोहित चव्हाणपण हस्याजात्रामध्ये असतो. पैसेही जास्त मिळत नसतील छोट्या रोलचे.
प्रोमो वरूनच मालिकेची पातळी
प्रोमो वरूनच मालिकेची पातळी कळते आणि झी ची पण .... किती पांचपणा करायचा याला पण काही मर्यादा असाव्यात
लीड रोल नसेल तर करता येत
लीड रोल नसेल तर करता येत असेल. बावरे मधली सानवि पण फुलराणी मध्ये आहे >>> oh Right...
Point ahe
हो, फुलराणी सुरु झालं तेव्हा
हो, फुलराणी सुरु झालं तेव्हा एक एपि बघितलेला त्यात होती ती आणि त्याआधी स्टार प्रवाहवर शतदा प्रेम करावे मधे होती. अभिजीत साटमची सावत्र आई.
सिरियलमध्ये सध्या काय गजनीचा
सिरियलमध्ये सध्या काय गजनीचा Track चालू आहे का? नायिका हिरोला भलताच कोणीतरी समजून कुठेतरी नोकरीला लावते असा कायतरी प्रोमो बघितला होता.
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/tejas...
Pages